दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह! ढसाळ???

ढसाळ आणि सपकाळेंना श्रद्धांजली.

नामदेव ढसाळ? आणि आप्पासाहेब...
अरेरे ... गुणी माणसं हरवली

कॉ.नामदेव ढसाळ...दलित पँथरची स्थापना, कार्य तसेच कवी यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेले नाव.

भावपूर्ण श्रद्धांजली.

नामदेव ढसाळ यांना श्रद्धांजली. Sad

अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि स्वत:ला भिडण्याची ताकद होती त्यांच्यात.

-गा.पै.

नामदेव ढसाळ यांना विनम्र श्रद्धांजली!

शेवटच्या दोन वर्षात त्यांना ऐकायचं भाग्य लाभलं होतं. त्यावरुन त्याकाळात त्यांची भाषणे आणि ते स्वतः किती लोकप्रिय असतील याचा अंदाज आला. ओघवती शैली आणि अधुनमधुन राजकारणावर मिस्कील ताशेरे. ते लोकांना अक्षरश: खिळवुन ठेवीत.

महेश....

भेटलो होतो म्हणजे त्यांच्या भाषणाच्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा...गर्दीतच. अर्थात तो काळही असा होतो जेव्हा दलित पँथरचा ज्वर उतरत चालला होता आणि नामदेवरावांनी बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा कार्ल मार्क्सला जवळ केल्याने दलित जनता त्यांच्यापासून हटत चालली होती. साहजिकच त्यांच्या भाषणाला जमणारे लोक त्याना राजकारणी व्यक्तीपेक्षा कवी म्हणून ओळखू लागले होते.....भाषणदेखील बहुतांशी त्याच विषयावर असे. मला तर वाटत होते ते काही कारणास्तव फार सावधपणे आपली जाहीर मते मांडू लागले होते. अर्थात ही सारी भाषणे त्यांची प्रकृती चांगली होती त्या काळातील होती.

जेष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन गेल्या. खर्जातला आवाज, आँधी आणि 'तूम आ गये हो' अगदी डोळ्यासमोर आलं पुन्हा एकदा.
श्रद्धांजली

अरे... सुचित्रा सेन... ओह!!

त्यांची तब्येत खूप दिवसांपासून खालावतच चालली होती..

माझी अत्यंत आवडती अभिनेत्री..

देवदास, ममता, बंबई का बाबू , आँधी या सिनेमांतील भूमिका अजरामर आहेत!!

भावपूर्ण श्रद्धांजली!!!

केवळ ७ हिंदी चित्रपटात भूमिका करूनही गेली ५०-५५ वर्षे सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणारी ह्या प्रभावी अभिनेत्रीने जग सोडले.

देवदासमधील 'पारो', ममतामधील 'देवयानी व ममता' आणि आंधी मधील 'आरती' ह्यामुळे कायम स्मरणात राहिलेल्या या अभिनेत्रीला श्रद्धांजली.

जब हम न होंगे तब हमारी खाक पे तुम रुकोगे चलते चलते,
अश्कों से भीगी चांदनी में इक सदा सी सुनोगे चलते चलते,
वहीं पे कहीं, वहीं पे कहीं हम तुमसे मिलेंगे,
बन के कली बन के सबा बाग़े वफ़ा में
रहें ना रहें हम, महका करेंगे बन के कली,
बन के सबा, बाग़े वफा में ... .

श्रद्धांजली Sad

सुचित्रा सेन... एक मनस्वी अभिनेत्री!!! वाईट वाटले.
माझ्याकडून श्रद्धांजली.

Sad आँधी

Pages