दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारुख शेख यांनी दूरदर्शनवर खलिद कि खाला या नाटकात खालाची अप्रतिम भुमिका केली होती. हे नाटक चार्लीज आंट म्हणजेच मोरूची मावशी या नाटकावर आधारीत होते. ते शबाना आझमीबरोबर तुम्हारी अमृता, हे नाटकही करत असत. त्यांना श्रद्धांजली.

फारूख शेख यांच्या इतके सुंदर 'लेहेजा' वाले हिंदी मी क्वचितच ऐकले. डॉ. चंद्रप्रकाश यांच्या चाणक्य सिरिअल मधल्या हिंदी ने जितके प्रभावित झालो होतो तितकेच प्रभावित फारूख जींच्या गोड हिंदी ने झालो. माझी श्रद्धांजली!!

'जिना इसीका नाम है ' मस्त सादर करायचे फारुख शेख !
हिंदी पेक्षा हिन्दी मिश्रीत उर्दु फार मस्तं वाटायचं त्या प्रोग्रॅम मधे ऐकायला!

Sad

बापरे, या अपघाताची ती जागा अगदी डोळ्यासमोर आहे. हरिश्चंद्रगडावर कित्येकदा साधारण अशीच एसटी पकडून गेलो होतो. Sad
-गा.पै.

Sad

माळशेज घाटातील अपघाताचे वाचून मन सुन्न झाले. मृत पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली.

एक आठवण, नवऱ्याची बदली नगर जिल्ह्यात श्रीरामपूरला झाली होती तेव्हा पावणेचार वर्षे आम्ही तिथे होतो आणि मी एकटी माझ्या छोट्या मुलाला घेऊन श्रीरामपूर-कल्याण बसने बऱ्याचदा ह्याच रूटने प्रवास केला, कधीही प्रॉब्लेम आला नाही. कालचा अपघात खरंच खूप दुर्देवी होता. अंगावर काटा आला.

दैवगतीही किती विचित्र वा अकल्पित असू शकते ते ह्या एस.टी.अपघातातून दिसून येते. अपघाताअगोदर काही वेळ एके ठिकाणी चहासाठी ही एस.टी. थांबली होती. यातील चार प्रवासी अजूनी चहा घेतच होते तो पर्यंत ड्रायव्हरने एस.टी. चालू केली आणि पुढे नेलीही. गोंधळलेले हे चार प्रवासी त्या पाठोपाठ नंतर मिळेल त्या वाहनाने गेले. काही वेळाने हे लोक मागे असतानाच त्यांच्याच नजरेसमोर एस.टी. दरीत कोसळली....आणि तो भीषण अपघात घडला.

[वाचलेल्या एकाने सकाळला मुलाखात दिली आहे.]

Sad अशा बातम्या वाचवत, बघवत वा ऐकवत पण नाहीत. अशोकजी म्हणजे त्या लोकान्च्या बाबतीत देव तारी त्याला कोण मारी असे झाले. पण उरलेल्यान्चा दोष काय? ते सगळे यात्रेकरताच चालले होते म्हणे.:अरेरे:

देव त्याना मोक्ष देवो.

Sad

दुर्दैवाची परिसीमा म्हणजे अपघातातून वाचलेल्या एका बाईंचा सुटकेचे प्रयत्न सुरू असताना वरून दगड कोसळून डोक्यावर पडल्यामुळे मृत्यू झाला!! ह्याला काय म्हणावे? Sad

रश्मी....

"....ते सगळे यात्रेकरताच चालले होते म्हणे...."

~ होय, अणे नावाचे गाव आहे तेथील वार्षिक यात्रा..... हे मला माहीत होते.... असाही उल्लेख करणार होते की "जर देवासाठी हे भक्तगण जात होते, तर मग देवाने याना असे भीषणरित्या का आणि कशासाठी मारले असावे ?" ~ पण नंतर वाटले देव तरी काय करणार ? यांच्याच प्राक्तनात मृत्यू असाच असेल तर तो कसा टळेल !

बातमी वाचून मन सुन्न झालं. सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! Sad
प्रत्येकाची, जाण्याची वेळ आणि जागा ठरलेली असते हेच खरे.

दुर्दैवाची परिसीमा म्हणजे अपघातातून वाचलेल्या एका बाईंचा सुटकेचे प्रयत्न सुरू असताना वरून दगड कोसळून डोक्यावर पडल्यामुळे मृत्यू झाला!! ह्याला काय म्हणावे?>>>> हे खूपच वाईट.... शेवटी नशीब बाकी काही नाही... मी मी म्हणुन काही उपयोग नाही.... आपल्यापेक्षा मोठी एक शक्ती आहे आणि तिच प्रदर्शन दाखवेल ते काही सांगता येत नाही

अणे या गावी मी रहात होतो कधी. तिथला रन्गदासस्वामी महाराजांचा वार्षिक उत्सव असतो. अण्याचा कुठलाही नागरिक तो चुकवत नाही. म्हणून निघाले असतील. माळशेज घाट आता बराच रुन्द आणि सेफ झालाय पण वृत्तान्तावरून समोरून येणार्‍या वाहनास (दुचाकी) टाळताना डावीकडे दाबताना नियन्त्रण सुटून बस दरीत गेली म्हणे . म्हणजे वैय्यक्तिक ड्रायवरचा तो ही नाईलाजाने झालेला दोष दिसतो आहे Sad

नक्की बातमी समजली नाही कारण इंग्लिश पेपर्स वाचण्याची फार सवय नाही. पण काल परवा बहुतेक असे वाचल्याचे स्मरत आहे की नॉर्थ कोरियामधील नेत्याने आपल्या काकांना (जे पूर्वी तेथील प्रमुख नेते होते / असावेत) व त्यांच्या सहा सहकार्‍यांना नग्न करून पिंजर्‍यात कोंडले व १२० शिकारी कुत्रे (ज्यांना तीन दिवस उपाशी ठेवण्यात आलेले होते) त्यांच्यावर सोडले. एका तासाच्या अवधीत या कुत्र्यांनी त्या सात जणांचा अक्षरशः फडशा पाडला व ही प्रक्रिया त्या नेत्याने व त्याच्या काही उच्चपदस्थ आर्मी अधिकार्‍यांनी स्वतः सुपरव्हाईज केली.
ही मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत क्रूर घटना असून तिच्याबाबत काही पडसाद उमटल्याचे कुठे वाचनात आले नाही. हे नुकतेच घडल्याचे बातमीत दिलेले वाचले, पण असे तर नसेल की जुन्या बातम्यांच्या सदरात ही बातमी आली आणि मला ते लक्षात आले नाही?

अत्यंत डिस्टर्बिंग आणि व्यथित करणारे असे हे प्रकार ऐकून बराच वेळ काही सुचत नाही. मानवातील पाशवी क्रौर्य असे अधेमधे उघड होते आणि हतबलपणे ते वाचून आपले दैनंदिन जीवन जगत राहावे लागते.

निषेध!

उत्तर कोरियन नेत्यांना कुत्र्यांनी फाडून खाण्याची मूळ बातमी चीनमधून आलेली आहे. बातमीचा स्रोत चिनी वृत्तपत्रांनी उघड केला नाही. तसेच इतर पुरावा (चित्र, फीत, इ.) या घडीला तरी उपलब्ध नाही. तेव्हा या पक्क्या खबरेसाठी वाट पहावी लागेल. दक्षिण कोरियास्थित माबोकर विजय देशमुख अधिक प्रकाश टाकू शकतील असं वाटतं.
-गा.पै.

Pages