दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

Sad

सई सहमत तुझ्याशी. हलकेफुलके नर्म विनोद ही त्यान्ची खासीयत. मस्त चित्रपट होते. एक जासुसी टाईप सिरीयल पण होती ना दूरदर्शनवर त्यान्ची? कानाचा काहीतरी प्रॉब्लेम असतो त्यात.

चान्गला कलाकार गेला.:अरेरे: त्याना श्रद्धान्जली.

फारुख शेख हा माणुस म्हणुन पण चांगाला होता, त्याबद्दल मला माहीत असलेली गोष्ट. माझा एक मित्र पुर्वी BPL मोबाइल कस्ट्मर केअर मधे सुपरवायझरी रोल मधे होता. फारुख शेख च्या मोबाईल सेवेबद्दल ची एक केस त्याने प्रायोरीटिवर हँडल केली , काही दिवसानी फारूख शेखनी स्वतः हातानी लिहलेली आभाराची नोट आणि एक मधाची बाटली त्याला ऑफिसात पाठवली. त्या आभार पत्रातील शब्दांची निवड पाहता त्यांचा ईंग्रजी भाषेचा वापरही सुंदर होता.
श्रद्धान्जली.

"सीने मे जलन....आँखो मे तुफान सा...." ~ जयदेव, शहरयार आणि सुरेश वाडकर या तिघांनी 'गमन' साठी तयार केलेली ही गझल पडद्यावर साकारली होती ती फारुख शेख यानी, टॅक्सी ड्रायव्हरच्या भूमिकेतून.....त्या क्षणापासून फारुख तुमच्याआमच्यातीलच एक व्यक्तिमत्व बनून गेले होते आणि अखेरपर्यंत ते आपलेच राहिले.

अशा या गुणी कलाकारांने निरोप घेतला.....कायमचा....भावपूर्ण श्रद्धांजली.

गुणी कलाकारांने निरोप घेतला.....कायमचा....भावपूर्ण श्रद्धांजली.>>> खरच Sad

Sad

श्रद्धांजली.

मला फारूक शेख सर्वात जास्त आठवतो तो चमत्कार मालिकेमधला. माझ्या लहान्पणी ती मालिका बरीचशी प्रसिद्ध होती. त्यातला मिश्किल विनोदी हजरजबाबी फारूक डोक्यात इतका फिट्ट बसलाय, की नंतर त्याचे कितीही सीरीयस सिनेमा पाहिले तरी फारूकची इमेज अशीच राहिली माझ्याकरता.
कथा, गमन, चष्मेबद्दूर हे खूप आवडलेले चित्रपट.

खूप वर्षापूर्वी, एका मुलीवर acid फेकल्याची घटना मुंबईत घडली होती, एका माणसाने आपल्या बायकोवर acid फेकण्याची सुपारी दिली होती आणि साधारण तिच्यासारखीच दिसणाऱ्या कॉलेजात जाणाऱ्या मुलीवर चुकून acid टाकले, तेव्हा त्या मुलीच्या उपचारांसाठी 'फारुख शेख' यांनी आर्थिक मदत केली होती.

मोठा कलाकार, मोठा माणूस. चष्मे बद्दूर अजूनही आठवतो. श्रद्धांजली.

अरेरे.. फारूख शेख गेले ! Sad
सुरेख अभिनय होता त्यांचा. आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व. काही वर्षांपुर्वी झी टीव्हीवार 'जीना इसी का नाम है' नामक मुलाखतींचा कार्यक्रम ते घेत असत. सुरेख कार्यक्रम होता.. समोरच्या माणसाला खुलवण्याची, बोलते करण्याची त्यांची हातोटी यात दिसायची.
'ये जवानी है दिवानी' त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यात त्यांची छोटीशीच भूमिका होती, पण सुरेख होती.

नन्दिनी धन्यवाद( इथे ती औपचारीकरता बरोबर दिसणार नाही, तरीही) मला सिरीयलचे नावच आठवत नव्हते.

Pages