दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे! औरंगजेबाची कृष्णकृत्ये आठवली आणि याही जमान्यात असे औरंगजेब अस्तित्वात आहेत हे वाचून विषाद वाटला!

वैभव, बातमीची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. पण मी इथे याबद्दल फारसं काहिच ऐकलं नाही. खरं तर उत्तर कोरीया अजुनही दक्षिण कोरियन लोकांसाठी अगम्य असाच आहे. कितीही सोर्स लावले, तरी खर्‍या बातम्या बाहेर येतच नाही.
माझ्या माहीतीनुसार आणि यापुर्वी ज्या लोकांना ठार केले गेले, ते गोळ्या घालुनच. तरी वरची बातमी खरी असेल, तर तो वेडेपणाच म्हणायला हवा.
मी पुन्हा एकदा स्थानिक लोकांना विचारुन लिहितोच.

इथल्या पेपरमध्ये फारश्या बातम्या नाहीत, असं लॅबमेट म्हणतोय.
http://www.concordmonitor.com/news/10061175-95/execution-by-dog-probably...
हे वाचनीय.

वांद्रे-डेहराडून एक्सप्रेसला आग. ९ जण गेले! Angry

कोणे एके काळी आम्ही ही गाडी पकडून बडोद्यास जायचो (तेव्हा मुंबईसेंट्रलवरून सुटायची)! ओळखीच्या सवारीस अपघात झाल्याचं ऐकलं की अधिकच वाईट वाटतं! Sad

-गा.पै.

अन्गावर काटा आला वाचुन. त्या नेत्यालाच तशीच शिक्षा द्यायला हवी.

अपघाताच्या बातम्या नकोच वाटतात हो.:अरेरे:

किती ही सैतानी वृत्ती. Sad
ट्रेनमध्ये कोणीतरी सिगारेट ओढल्यामुळे लागली म्हणे आग!>>>>>>>>>>चुक एकाची, शिक्षा अनेकांना. Sad

अरे? कसे? कधी? श्रद्धांजली. एवढी वयस्कर पण अ‍ॅक्टिव्ह व्यक्ती पहायला मिळणार नाही पुन्हा...

अरे बाप रे Sad श्रद्धांजली.
परवाच केव्हातरी मुलाखत पाहिली होती टिव्हिवर. चांगले फिट अ‍ॅन्ड फाईन वाटले मला.

जुन्या जमान्यातले आघाडीचे ध्वनीरेखक, तांत्रिक कामासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले गेलेले किशोर राणे यांचे राहत्या घरात वृद्धापकाळाने निधन.
फार मोठे योगदान होते त्यांचे.

थँक्स नी, पडद्यामागच्या कलाकारांबद्दल खुप कमी माहिती असतं किंवा काहीच माहिती नसतं सामान्य माणसाला... राणेसाहेबांना श्रद्धांजली!

थँक्स नी, पडद्यामागच्या कलाकारांबद्दल खुप कमी माहिती असतं किंवा काहीच माहिती नसतं सामान्य माणसाला >>>> +१
श्रद्धांजली

थँक्स नी,
पडद्यामागच्या कलाकारांबद्दल खुप
कमी माहिती असतं किंवा काहीच
माहिती नसतं सामान्य माणसाला >>>>
+11111
श्रद्धांजली

मामे, आजच्या पेपरात वाचल्यावर धक्का बसला एकदम. मला तर हल्ली रेल्वेने प्रवास म्हणजे धडकीच भरते.

गंधर्वयुग अतिशय जवळून अनुभवलेले एक थोर हार्मोनियमवादक काळाच्या पडद्याआड …… आदरणीय पुरुषोत्तम वालावलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

दोन चांगले कवी गेलेत.

कविवर्य नामदेव ढसाळ आणि कविवर्य त्र्यंबक सपकाळे. विन्रम श्रद्धांजली.

आँ, नामदेव ढसाळ केव्हा गेले ? अजुन वृत्तपत्रांच्या संकेतस्थळावर तरी दिसलेली नाही बातमी.
ढसाळ आणि सपकाळे यांना श्रद्धांजली !

महेश,

लोकसत्तामधे आली आहे बातमी मुखपृष्ठावरच आहे अगदी. मी सकाळ आणि इतर वाचले नाहीत.

Pages