गझल रचना.... तरही गझल.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 December, 2010 - 04:49

गालिब्,मीर आदि शायर मैफिल संपल्यावर एक ओळ देत्,की ज्या ओळीचा उपयोग मतल्यात सानी मिसरा म्हणून करुन पुढच्या वेळेस त्यावर आधारीत एक गझल तयार करून आणायची असे.

असाच प्रयोग्,गझल सागर प्रतिष्ठान च्या वतीने मुंबई इथे काही काळ चालला. .... माझ्याशी नियमित संपर्क असलेल्या काही शायरांनी त्यात उत्तमोत्तम गझल रचून गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय व्हावा,सर्वमान्य व्हावा म्हणून बराच हातभार लावला आहे.

गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर्,प्रसादपंत्,भुंगा यांचेशी गप्पा मारताना गेली काही दिवस एक मैफिल्,एक गझल अश्या तून काही सामूहिक गझलांची निर्मिती झाली. हीच कल्पना पुढे नेवून नियमित पणे तरही गझल रचाव्यात ह्या कल्पनेतून हा धागा सुरु करतोय.

ह्यात दर आठवड्याला एक ओळ देण्यात येईल व ती ओळ मतल्यातील सानी मिसर्‍यात चपखल बसवून गझल रचावयाची आहे. आपणा सगळ्यांचे यात स्वागत आहे.

आजची ओळ आहे.

ओळ क्र.१ = जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

वृत्त : आनंदकंद
काफिया : जगण्यात किंवा अर्थ
रदीफ : अर्थ नाही किंवा नाही
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२= सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
वृत्त : चामर
काफिया : उन्हात
रदीफ : मी
लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.३= कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
वृत्त : वियदगंगा
काफिया : वाटले
रदीफ : होते
लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ४ = तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : नकार
रदीफ : आहे
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

ओळ क्र.५ = दु:ख आता फार झाले
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रदीफ : झाले
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र.६ = थांबणे सोसेल तोवर लागते चालायला ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - चालायला, वाकायला, जायला, यायला, व्हायला वगैरे स्वरुपी ('आ'यला समान)

ओळ क्र.७ = वादात या कुणीही सहसा पडू नये
वृत्त - विद्युल्लता
रदीफ - नये
काफिया - पडू
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा

ओळ क्र.८ = ठरेन या जगात मी,महान एकदा तरी ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : एकदा तरी
काफिया : महान
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र.९ = थेट माझ्या सारखा तो कोण होता ? डॉ.अनंत ढवळे यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : कोण होता
काफिया :सारखा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. १० = अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
वृत्त : आनंदकंद
रदीफ = माणसे ही
काफिया = छळतात
लगावली= गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ११ = कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मंदाकिनी
काफिया - आराम, दाम, ठाम, उद्दाम वगैरे
अलामत - आ
रदीफ - पहिल्यासारखा
गागालगा गागालगा गागालगा गागालगा

ओळ क्र.१२ = षंढ म्हणती लोक सारे,ऊठ तू आता तरी
वृत्त - कालगंगा
काफिया = सारे,तारे,वारे,न्यारे,उतारे,दारे,यारे, वगैरे
अलामत -आ
रदीफ - ऊठ तू आता तरी
लगावली - गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र.१३ = माणसे व्यर्थ मी जतन केली ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त = लज्जिता
काफिया = जतन, गहन, सहन इ.इ.
अलामत - अ
रदीफ - केली
लगावली - गालगा गालगा लगागागा

ओळ क्र.१४ = विसरणेही तुझ्या लक्षात नाही ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मृगाक्षी
मात्रा - १९
लगावली - लगागागा लगागागा लगागा
काफिया - लक्षात, गावात, रस्त्यात, कोणात, जात, आत इत्यादी
अलामत - आ
रदीफ - 'नाही'
किमान शेर - मतला धरून पाच

ओळ क्र.१५=अजूनही मी तुझ्याचसाठी जिवंत आहे ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - सती जलौघवेगा
लगावली - लगालगागा लगालगागा लगालगागा
मात्रा - २४
काफिया - जिवंत, महंत, संत, वसंत, आसमंत इत्यादी
अलामत - अं
रदीफ - 'आहे'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र.१६=आला पाउस गेला पाउस ( श्री .प्रसाद गोडबोले,''पंत'' यांची ओळ )
वृत्त - पादाकुलक
लगावली - गागागागा गागागागा

ओळ क्र.१७ = श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गांव मनोहर (उमेश कोठीकर यांची ओळ.)
वृत्त - गागागागा * ४ - किंवा ३२ मात्रांचे मात्रावृत्त
काफिया - मनोहर, घर, उत्तर, जर, तर, अंबर इत्यादी स्वरुपाचे
रदीफ - रदीफ नाही
अलामत - 'अ'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र. १७ = खोल खोल आतवर तुझी नजर
वृत्त = श्येनिका
काफिया = नजर्,उदर्,अधर्,शहर इ.
अलामत = अ
रदीफ = नाही.गैरमुरद्दफ
लगावली =गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.१८ = काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
वृत्त = कालगंगा /देवप्रिया
काफिया = आनंदण्याची, ......... पेरण्याची,तारण्याची,वाकण्याची,अंधारण्याची इ.इ.
अलामत्=अ
रदीफ= कारणे
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.१९ = ही जगाची रीत नाही
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रददीफः नाही
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र. २० = चांदणे आहे खरे की भास नुसता ?.......नचिकेत जोशी,आनंदयात्री यांची ओळ
वृत्त : मंजुघोषा
रदीफ :नुसता
काफिया :भास्,खास्,आभास्,त्रास्,इ..इ..
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.२१ = जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
काफिया : मागतो,ठेवतो,पाहतो ,बोलतो
रददीफः मी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र.२२ =************************************************
वृत्त : सुमंदारमाला
काफिया : जावे,खावे,विसावे,जडावे इ.इ.
रददीफः कुठे
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

ओळ क्र.२३ *********************************************************************************************************
वृत्त :तोटक
काफिया :खरा,जरा,बरा,धरा,करा
रदीफ : गैरमुरद्दफ
लगावली :ललगा ललगा ललगा ललगा

ओळ क्र.२४ :शेवटी संपायला आलीच ही एकांकिका......भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ.
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - एकांकिका, मालिका, विका, शिका, टिका, राधिका, इत्यादी
अलामत - र्‍हस्व इ
शेर - मतला धरून पाच
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.२५ : या इथे कधी काळी देखणे शहर होते.......... बेफिकिर यांची ओळ
वृत्त : रंगराग
रदीफ : होते
काफिया : शहर्,गजर्,अधर्,पदर्,इ.इ.
अलामत : अ
लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा

ओळ क्र.२६ :कशास त्याची वाट पहावी,जे घडणे आहेच असंभव....... अमितदेसाई, बागुलबुवा यांची ओळ
वृत्त : वनहरिणी ( मात्रा वृत्त्, अष्ट मात्रिक ४ आवर्तने )
रदीफ : नाही..गैरमुरद्दफ
काफिया : असंभव्,अनुभव्,वैभव्,संभव्, उद्भव,

ओळ क्र.२७ : हा कोणत्या दिशेचा,आहे प्रवास अजुनी............नयना मोरे, मी_ आर्या यांची ओळ
वृत्त : आनंदकंद
रदीफ : अजुनी
काफिया : प्रवास्,भास्,तास्,निवास्,श्वास
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२८ : तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता
वृत्त : वियदगंगा
रदीफ : होता
काफिया : ओलावला, पाणावला,भंडावला,पावला,धावला,इ.इ...
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र.२९ : सोड चिंता मीच माझे पाहतो आता '' कणखर'' यांचि ओळ
वृत्त : राधा
रदीफ : आता
काफिया : पाहतो,वाहपाहतो,वाहतो,साहतो,राहतो,नाहतो
लगावलि : गालगागा गालगागा गालगागा गा

ओळ क्र. ३०: जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे.
वृत्त : वियदगंगा
रदीफ : आहे
काफिया : रेंगाळतो,जाळतो,टाळतो,हेटाळतो
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ३१: हृदय एवढे धडधडत का असावे?
वृत्त :भुजंगप्रयात
रदीफ : असावे
काफिया : सौतीकाफिया " आ'' कारान्त स्वरकाफिया
लगावली :लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र. ३२: कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले ? डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : राहिले,पाहिले,साहिले,वाहिले,दाहिले,
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र. ३३: जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : देवप्रिया
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : माझ्यासवे, चालवे,आसवे, कालवे, काजवे,आठवे, जाणवे,पारवे,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३४: पिंजर्‍याला मानती आकाश रावे गझलसम्राट सुरेश भट यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : रावे, व्हावे, असावे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३५ : येत जा देवून थोडी कल्पना
वृत्त : मेनका
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : कल्पना,प्रार्थना,वंचना,वासना,साधना,कामना,वेदना
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३६ : दाटते आहे निराशा फार हल्ली
वृत्त :मंजुघोषा
रदीफ : हल्ली
काफिया : फार्,चार्,आजार्,बाजार्,व्यापार.....
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३७ : आज आहे नेमका शुद्धीत मी
वृत्त : मेनका
रदीफ : मी
काफिया : शुद्धीत्,रीत्,प्रीत्,विपरीत्,गीत्,भीत्,आश्रीत,
लगावली : गालगागा गालगागा गालगा

khal.jpg

ओळ क्र. ३८ : चालला आहे कशाचा खल इथे
वृत्त : मेनका
रदीफ : इथे
काफिया :खल्,चल्,निश्चल्,बल्,कल्,दल्,कोलाहल
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३९ : सारे जुनेच आहे काही नवीन नाही....... शाम यांची ओळ.
वृत्त : आनंदकंद
रदीफ :नाही
काफिया : नवीन्,लीन्,दीन.विहीन्,हीन्,लगीन्,तीन्,अधीन्,मशीन,
लगावली :गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ४० :कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा.... रसप यांची ओळ.

लगावली - लगालगागा लगालगा - यती - लगालगागा लगालगा

वृत्ताचे नांव - ज्ञात नाही, कोणाला ठाऊक असल्यास कृपया नोंदवावेत.

काफिया - विरघळून / जळून / पळून / वळून इत्यादी

अलामत - 'ऊ' (दीर्घ ऊकार)

रदीफ - जा

ओळ क्र. ४१: आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
वृत्त : व्योमगंन्गा
रदीफ : तितकीच आहे
काफिया : वेदना , साधना, वन्चना,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.42 : सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची ( वैभव वसंत कुलकर्णी यांची ओळ )
वृत्त : वियद्गंगा
लगावली: लगागागा लगागागा लगागागा लगागागा
काफिये: ताज्या, माझ्या, साध्या , गेल्या
अलामत : तंत्रानुसार आ ह्या स्वरांतयमकाची अलामत..बाकी त्याच्या आधीच्या अक्षरावर आलेली जोडाक्षरातील उछारात येणारे वजन हेही अलामतीसारखे वारंवार येणारे ठरावे अश्या काफियांची अपेक्षा !!
रदीफ : विचारांची

ओळ क्र.४३ : आतला माणूस माझ्या जळत आहे.
वृत्त : मंजुघोषा
काफिया : जळत्,कळत्, वळत्,पळत्,हळहळत
रदीफ : आहे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

गुलमोहर: 

दिनांक ४ डिसेंबर २०१० ला सुरू झालेल्या या धाग्यान्वये गझलतंत्राचा सराव होण्याचा फायदा अनेकांना झाला असावा असे म्हणण्यास वाव आहे. मायबोली प्रशासनाने या उपक्रमाला औपचारिकपणे एक 'माबो-उपक्रम' असे मान्य केलेले नसले तरीही हा उपक्रम चालू राहू देऊन त्यांनी एक उत्तम व्यासपीठ मिळवून दिलेच. त्याबद्दल त्यांचे, तसेच धाग्यासाठी कैलासरावांचे व सहभागासाठी सर्वांचे आभार!

येथपर्यंत आलोच आहोत तर कैलासरावांची परवानगी असल्यास गझलेच्या थोड्या पुढच्या पायरीकडे वळूयात का?

खाली पाच विचार दिलेले आहेत. या पाच विचारांवर एक गझल रचायची आहे. वृत्त, काफिया, रदीफ, शब्द, प्रतिमा हे सगळे तुमचे तुम्ही ठरवायचे. मतला व पुढे चार शेर असायलाच हवेत. तखल्लुसचा शेर असायला हवा असे नाही, ती निवड तुमची. पाचपेक्षा अधिक विचार समाविष्ट करायचे असले तर ते पहिले पाच शेर या विचारांवर झाल्यानंतर पुढच्या शेरात करावेत. हे पाचही विचार याच क्रमाने गझलेत यायलाच हवेत. (म्हणजे आशय अचूकपणे असाच यायला हवा). म्हंटले तर भरपूर मोकळीक आणि म्हंटले तर अतिशय अवघड असे हे काम आहे. यात कस लागणार आहे हे नक्की!

तर हे पाच विचार येथे देत आहे: (विचार तसे अतिशय साधे आहेत, म्हणजे गझलीयत या दृष्टीने फार काही सखोल वगैरे नव्हेत).

१. माझ्याकडे जे आहे त्याची मला किंमत किंवा जाणीव नव्हती. मी माझ्याकडे नसलेल्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी झगडत बसलो होतो / बसले होते.

२. पूर्वीच्या माणसांमधील निरागसता आता कुठे लोप पावली कोण जाणे! आज जो चेहरा दिसतो तो धारण केलेला मुखवटाच असतो.

३. त्याला चार मुले असूनही चौघेही परगावी होते. खांदा द्यायला शेवटी शेजारपाजारचेच आले.

४. आजही मी आयुष्याशी झुंजत आहेच. फक्त तू सोबतीला असतास / असतीस तर ही झुंज आवडली असती / रंजक वाटली असती / झुंजच वाटली नसती वगैरे!

५. देव नाही असे मानायचे ठरवले की लगेच असा अनुभव येतो की देव आहे असे मानावे लागते.

हिंट -

१. काफिये जर क्रियापदाचे घेतले तर सोपे जाईल.

२. रदीफ जर आहे, नाही अश्या प्रकारशी घेतली तर सोपे जाईल.

३. अनेकदा आपले खयाल खालील वृत्तांमध्ये बसवणे अधिक सोपे जाऊ शकते.

आनंदकंद, कालगंगा, व्योमगंगा

=======================

गझलेला 'खयाली तरही' असे शीर्षक द्यावे म्हणजे धागा ओळखायला सोपे जाईल.

अंतिम दिनांक - ५ फेब्रुवारी २०१३.

======================

सर्वांना शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

खयाली तरही ही नेहमीच्या तरहीच्या पुढची पायरी होती. या प्रकारामधून अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले हे खरे असले तरी अचूक आशय शब्दात पकडणे व काफियाशरणता पूर्णपणे टाळली जाणे याचा सराव झाला. आपण अजूनही काही खयाली तरही घेत राहू.

मात्र सध्या एकुण मोमेंटम, गझलकारांनी दिलेला एकंदर रिसपॉन्स हे पाहून खयाली तरहीच्या पुढची पायरी चढून पाहूयात का? बहुधा सर्वांना भावेल ही पायरी, अशी आशा आहे.

साध्या तरही गझलेमध्ये एक ओळ होती आणि जमीन दिलेली होती. त्यावरून गझल रचायची होती.

खयाली तरहीमध्ये आपण दिलेल्या खयालांवर गझल रचली.

आता खयालसुद्धा न देता गझल रचायची आहे. यात कल्पनाशक्तीचा कस लागेल. एखादी अनुभुती आल्यानंतर तिच्यापासून गझलेचा शेर स्फुरण्याची जी पातळी असते, थेट त्या पातळीवर आपण जाऊन थडकू. त्यामुळे एकाच अनुभुतीतून कोणाला काय काय सुचले हे पाहायलाही मजा येईल.

खाली पाच चित्रे देत आहे. पहिल्या चित्रावरून मतला रचायचा आहे. तखल्लुसचा शेर हवा की नको ही निवड कवीची स्वतःची. पण पाचही चित्रांवर त्याच क्रमाने एकेक शेर असे मतला धरून एकुण पाच शेर व्हायलाच हवेत. अधिक शेर सुचत असल्यास ते पहिल्या पाच शेरानंतर समाविष्ट करावेत.

यातही वृत्त, रदीफ, काफिया, अलामत हे सर्व तुमच्या निवडीप्रमाणे! यात आशयाचा अचूकपणा हा निकष असणारच नाही. यात निकष असेल तो हा की दिलेल्या चित्रावरून सर्वाधिक कल्पक आणि सुंदर, तसेच गझलीयतयुक्त खयाल कोणाला सुचला व तो त्याने / तिने कसा शब्दबद्ध केला.

या चित्रांवरून गझल रचून प्रकाशित करताना ती 'तस्वीर तरही' या शीर्षकासह प्रकाशित करावी, म्हणजे धागा सापडायला सोपा जाईल.

अंतिम मुदत - दिनांक १८ फेब्रुवारी २०१३.

(टीप - डॉ. कैलास गायकवाड यांना अशी विनंती की तोवर खयाली तरहीत सहभागी झालेल्यांच्या नावांची व धागा क्रमांकाच्या लिंक्सची यादी पुढील प्रतिसादात कृपया प्रकाशित करावी म्हणजे एकत्रीतरीत्या तो संच येथे मिळू शकेल.)

बघा तर! खयालही तुमचे, जमीनही तुमची, कसलीच आडकाठी नाही. फक्त पाच चित्रांवरून पाच शेर व्हायला हवेत. आता इतके मात्र पाळले पाहिजे की शेर आणि चित्र यांच्यात 'कैच्याकै' तफावत नसेल याची काळजी घेतली जायला हवी. म्हणजे शेतातली बैलगाडी दाखवली असली तर शेरामध्ये कुठेतरी निदान शेत, बैल, बैलगाडी, यापैकी काहीतरी उल्लेखिले जायला हवे. थोडक्यात, शेरातून चित्र काही प्रमाणात तरी एक्स्प्लेन व्हायला हवे. बाकी एकाच जमीनीत पाच शेर करायचे आहेत हे वेगळे सांगणे न लगे!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

====================

चित्र क्रमांक एक - मतल्यासाठीचे चित्रः

lonely-path (1).jpg

===================

चित्र क्रमांक दोन -

well.jpg

======================

चित्र क्रमांक तीन -

couple parting.jpg

=====================

चित्र क्रमांक चार -

rural school.jpg

=====================

चित्र क्रमांक पाच -

night-sky.jpg

=============

माझी तस्वीर तरही गझलची लिंक

खयाली तरही वरील रचना खालील प्रमाणे

कावळा http://www.maayboli.com/node/40705

प्राजुची गझल http://www.maayboli.com/node/40744

मिल्या http://www.maayboli.com/node/41011

शाम http://www.maayboli.com/node/40725

प्रशांत खु रसाले http://www.maayboli.com/node/40825

वैवकु http://www.maayboli.com/node/40720

सतीश देवपूरकर http://www.maayboli.com/node/40732

सुप्रिया http://www.maayboli.com/node/40730

तरही गझल, खयाली तरही गझल आणि तस्वीर तरही गझल या तीनही संकल्पना गझलकारांनी उचलून धरल्या व सत्यात आणल्या. यातून ज्याला त्याला काय मिळाले ते ज्याच्यात्याच्या जवळ! पण निव्वळ तरही गझलेच्या ओळीवरून एक गझल रचणे यापेक्षा काहीतरी कसदार किंबहुना कस लागेल असे निश्चीतच झाल्याची भावना अनेकांनी याच फोरमवर किंवा फोन / एस एम एस द्वारे माझ्याकडे व्यक्त केली.

प्रो. देवपूरकर म्हणतात ते सत्य आहे की अमुक प्रकारच्या तरहीत तमुक प्रकारची गझलीयत वगैरे असे काही नसते. असे काही कोणी म्हणालेलेही नाही / नव्हते. मुद्दा इतकाच होता की खयाली व तस्वीर तरहीत अभिप्रेत फरक जो होता तो गझलकारांनी स्वच्छपणे ध्यानात घ्यावा. खयाली तरहीत आशयाची अचूकता महत्वाची होती, मग अभिव्यक्ती किंचित अनाकर्षक झाली तरी हरकत नव्हती. तस्वीर तरहीत खयालच आपला आपण ठरवायचा होता आणि तो अभिव्यक्त करायचा होता, ज्यात आशयाच्या अचूकतेपेक्षा कल्पकतेला, गझलेच्या अंगभूत जादूला अधिक स्थान होते.

आता येथपर्यंत आलोच आहोत तर पुढची पायरी ओलांडूयात का?

येथे पुन्हा एकदा सर्व सहभागी गझलकारांच्या सहभागाबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवादही मानूयात.

(टीप - या उपक्रमात कोणी मोठा नाही वा लहान नाही. हा उपक्रम म्हणजे गझलेचा एखादा साचेबद्ध सिलॅबस असलेला कोर्सही नाही व तसा कोणाचा दावाही नाही. मात्र गझल परिपक्व होताना ज्या पायर्‍या आपसूक येत राहतात त्या केवळ औपचारीकपणे चढण्याचा यात प्रयत्न आहे, जेणेकरून गझलकाराने चौफेर प्रवृत्तीने आपलीच गझल न्याहाळावी, अधिक सखोल करावी).

तर पुढची पायरी आहे 'संकेत तरही'!

या प्रकारात पुन्हा खयाल दिले जात आहेत.

खयाल क्र १ - (मतला) -

तू माझी साथ दिली नाहीस याचे दु:ख नाही. दु:ख हे आहे की मीही माझी साथ दिली नाही

खयाल क्र २ -

रस्तारुंदीमध्ये ते लहान देऊळ हालवण्यात आले. पण जुन्याच जागी पाहून अजुन हात जोडले जाणे चुकत नाही.

खयाल क्र ३ -

श्रीमंत मुलाच्या अंगावरील कपडे पाहण्यात काही वेळ गुंग होऊन तो मजुराचा मुलगा पुन्हा मातीत खेळू लागला.

खयाल क्र ४ -

अख्खा देश रस्त्यावर आणणारे निर्भया प्रकरण दोन महिन्यांनी विस्मरणात गेले.

खयाल क्र ५ - (तखल्लुस हवे की नको ही निवड तुमची)

कुटुंबाला वेळ द्यायचा होता. पण जेव्हा वेळ मिळाला, तेव्हा कुटुंब विखुरलेले होते.

आता संकेत तरही ही कल्पना प्रथम नीट समजावून घ्यावी अशी विनंती!

ही गझल सांकेतिक पद्धतीने रचलेल्या शेरांची गझल असेल. कुठेही थेट उल्लेख नसेल. वर दिलेले मुद्दे जसेच्या तसे , त्याच शब्दांमध्ये गझलेत ओवता येणार नाहीत. ते प्रतिकांमधून मांडायचे आहेत. उदाहरणार्थ, मजुराच्या मुलाला बाभळीचे पान म्हणता येईल आणि ऐश्वर्यसंपन्न मुलाला गुलाबाचे फूल! किंवा पक्षिणी तिच्या पिल्लांसाठी कायमची घरट्यात बसू लागली तेव्हा तिची पिल्ले आभाळात उडण्याच्या ताकदीची झालेली होती असे म्हणता येईल. प्रत्यक्ष खयाल न लिहिता प्रतिमा, उपमा, संकेत यातून विचार मांडायचा आहे. प्रश्न फक्त 'प्रतीक' करेक्टली सुचण्यापर्यंतच आहे. नंतर शब्दबद्ध करणे, गझलतंत्रबद्ध करणे हे तर आपण सगळे सहज करू लागलेलो आहोत.

उर्दूत अश्या स्वरुपाच्या अनेक प्रतिमा, संकेत निर्माण झाले. बुलबुल - सैय्याद, मयखाना - साकी, बर्क - नशेमन (वीज व घरटे) या शिवाय प्रेमविषयात तर कित्येक संकेत तयार झाले.

अशी गझल रचण्यामधून रिसोर्सफुलनेस वाढतो. एकच विचार विविध पद्धतींनी मांडण्याची कला अवगत होण्याकडे प्रवास होतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे नक्की काय म्हणायचे होते हे रसिकावर सोडले जाते व शेर बहुपदरी होऊ शकतो. अशी गझलही कसदार गझल मानली जाते.

या प्रकारासाठी अंतिम मुदत आहे २७ फेब्रुवारी २०१३.

या गझला कृपया 'संकेत - तरही' या शीर्षकासहित प्रकाशित कराव्यात जेणेकरून धागा सापडायला सोपे जाईल.

कॉणीतरी कृपया 'तस्वीर - तरही' तील सहभागी गझलकारांची नांवे व गझलेच्या लिंक्स खाली दिल्यास उत्तम होईल.

तर सर्वांना शुभेच्छा!

खयालांसाठी प्रतीके, रुपके, संकेत तुमचे, गझलजमीन तुमची! कमीतकमी पाच शेर याच क्रमाने यावेत. अधिक खयाल असलेच तर ते पाच शेरांनंतर ओवावेत अशी नम्र विनंती!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

आणखी एक उत्तम संकल्पना.....

मात्र गझल आणि भांडणे, लांबच्यालांब पोस्ट्स, टोमणे,अनवश्यक चर्चा या सर्व बाबींमुळे माबोचा सामन्य वाचक फार बिचकतो आहे.....तश्यात लगेच संकेत तरहीने अजीर्ण होवू नये म्हणजे मिळवली.

माझा मुद्दाजरासा असाआहे की घाई नको होती

तरही हा प्रकार समजून शिकायला अनेक दिवस मायबोलीकराना घेता आले मग खयाली तरही आली ती मुरेस्तोवर लगेचच तस्वीर तरही ......जरा घाई होतेय

असूद्या आता!!

हे एकूण ४ प्रकार नीट मुरूद्यात ....आलटून पालटून चालेल .....माग काही महिने तरी जातील ....तर मग जरा लिखाणात अज्जून सफाई येईल ....मग पुढ्चा प्रकर जो असेल तो पाहूयात असे मला वाटते

मी आता ह्या तरहीत रचण्याचा विचार करतोच आहे बघूया प्रयत्न करून

खरे म्हणजे -

अनेक प्रथम प्रयत्न करणार्‍यांबद्दल मला असे म्हणायचे आहे की, विचार संकेतांतून व्यक्त करणे ही गोष्ट तशी खूप अवघड आहे कारण खयाल कोणत्या संकेतांमधे बसवायचे हे ठरवणे फार कठीण आहे. आपण पाहिलेच आहे की गझल हा काव्यप्रकार शब्दनिवड ह्या बाबतीत अतिशय काटेकोर आहे.

तरीही अशा परीस्थितीत सगळ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे लगेचच अचूकतेचा आग्रह कदाचित आततायी होऊ शकावा.

तसेच आपण सार्‍या नव्याने शिकणार्‍या लोकांनीही अतिठाम मतांना थारा न दिल्यास उत्तम!

एकुण, तरही गझल ही संकल्पना अधिक स्वच्छ करायला हवी होती असे ( काही प्रमाणात माझी स्वतःचीही गझल वाचून ) वाटू लागले आहे.?>>>>>>>(इति बेफीजी! एका संकेत तरही धाग्यावर......)

माझे मत ...................

संकेत तरही बाबत नक्कीच
देताना खयाल दिले गेले...सांकेतिकता पाळायला सांगीतले गेले ..... एका खयालात ज्या मूळ प्रतिमा / प्रतिके दिसून येत होत्या त्यासाठी भिन्न प्रतिमा / प्रतिके वापरायची होती ( मराठी शायरीत नाविन्यपूर्ण प्रतिमा असव्यात अशी माफक अपेक्षा त्यामागे दिसून येत होती )...असे करताना सूचकपणे त्या मूळ खयालाकडे संकेत करतील अशी या प्रकाराची मुख्य मागणी होती

तरी शेर वाचल्यावर त्याचा संबंध त्यात्या "खयालाशी" जोडून पाहावाच लागतो कारण हा उपक्रम आहे हे वाचकास आधीच माहीत असते जे अगदीच विसरताही येत नसते मग असे करणे वाचकास् टळत नाही

शायराने योजलेल्या त्या त्या भिन्न प्रतिमाप्रतीकातून जे नवीन अर्थ... मग त्यामानाने त्यामागील खयाल व त्यामानाने नव्या सिच्युएशन तयार होतात त्याचाही आस्वाद घ्यायचा आहे हे काही वेळा लक्षात राहते काहीवेळा नाही
मग झालेला शेर खयाली तरहीचा आहे की सांकेतिक तरहीचा की स्वतंत्र हे लवकर ठरत नसावे

यासाठी फक्त प्रतिमा - प्रतीके देवून (एका शेरासाठी किमान दोन ) त्यावर खयाल वृत्त कवाफी रदीफ इत्यादी स्वातंत्र्य शायरास देता आले असते

खयाल दिल्याने कथानक पात्रे घटना सिच्युएशन इमोशन्स असे सर्व घटक उघड झाल्याने वाचकही नवीन अर्थबोध घेण्यात....... शायर नवीन देण्यात साहजिकच कमी पडतो (रसग्रहणासाठी कुंपणे तयार झालेली असतात सीमारेषा ठरलेल्या सतात अशा अर्थाने )

खयालाऐवजी मूळ पर्‍तिमा इत्यादी दिल्या तर कसे यावर विचार मी करतो आहे

उदा:
१)सोडून जाणारी व्यक्ती मागे राहिलेली व्यक्ती
२) नव्याजागी एखादी गोष्ट हलवली तरी जुन्या जागेची सवय
३)श्रीमंती कडे पाहत असलेली गरीबी
४)एका व्यक्तीचे समाजासाठी बलिदान .......समाजास फारसा फरक न पडलेला
५) घर सोडून जातानाचे /पूर्वीचे .. परत आल्यावरचे

(.................अपूर्ण.....................)

चूक भूल द्यावी घ्यावी

वैवकु,

मुद्याबाबत लिहिलेत हे छान केलेत.

माझ्याकडून भूमिका अधिक स्पष्ट करायचा आणखी एक प्रयत्न करतो.

संकेत तरहीमध्ये (उदाहरणार्थ) एक खयाल दिलेला आहे. आता हा खयाल जर तसाच मांडला (जसे: रस्तारुंदीत देऊळ हालवले तरी लोक जुन्या जागेकडेच बघून हात जोडतात) तर ते खयाली तरही सारखे होणार. संकेत तरहीत आपण असे म्हणण्याचा प्रयत्न करत आहोत की या सगळ्या गोष्टी, जसे रस्तारुंदी, देऊळ, ते हालवणे, जुन्याच जागी पाहून हात जोडले जाणे यातील काहीही न उल्लेखता प्रतिकांमधून असा काही शेर रचायचा की भाव तर तोच उतरला पाहिजे पण प्रत्यक्ष तो उल्लेख होता कामा नये.

आधी मुळात असे कश्यासाठी करायचे ते पाहू. असे करण्याचे मुळात गझलकाराला काही खास कारण नसतेच आणि नसावेचही! थेटच लिहीले तर कोणाची हरकत असणार? कश्यासाठी उगाच वेगळ्याच इमेजरीमधून संदेश लिहायचा आणि अवघड करून ठेवायचे सगळे? तर असे करण्याचे एक कारण आहे, जे किंचित सेन्सिटिव्हली जाणवून घेणे आवश्यक आहे. येथे कवीने थोडे फ्लेक्सिबल होऊन, एक 'गुड लिसनर' होऊन विचार करणे आवश्यक आहे.

गझलकाराला शेर सुचतो तेव्हा अनुभुतीवरून सुचतो. (बहुतांशी इतर काव्यलेखनही असेच असते). गझलकार ती अनुभुती शब्दात व गझलतंत्रात मांडून पेश करतो आणि तिला सुंदर, आकर्षक, सुलभपणे स्मरणीय व प्रभावी बनवतो. प्रत्येकाचे अनुभवविश्व व हुकुमत भिन्न भिन्न असते त्यानुसार प्रत्येकाची गझलही (त्याचमुळे) बदलते.

पण कित्येकदा (येथे खासकरून 'गुड लिसनर' होणे आवश्यक आहे) असे होते की गझलकाराला काहीतरी भलतेच पाहून तुलनात्मकरीत्या काहीतरी दुसरेच सुचते. जसे, झाडावरून पिकलेले पान गळून पडले. वास्तविक ही काही मोठी अनुभुती नाहीच. पण कवीमन असा विचार करते की असेच एक दिवस सगळे गळून पडणार आहेत, मग कशाला आयुष्यभर फुलत, ताजेतवाने राहायचा आटोकाट प्रयत्न करत बसायचे? आता हे गझलकार तीन पद्धतीने सांगू शकतो.

१. सगळे शेवटी मरणार आहेत तर जगण्यासाठीची ही लढाई का जगावी - थेट

२. पिकलेले पान गळून पडते तसेच सगळे मरणार आहेत तर माणसे एवढी झुंजतात कशाला - एकच प्रतीक वापरून खयाल प्रभावीरीत्या सादर करणे

३. पिकलेले पान गळून पडले तशीच सगळे पाने गळणार आहेत तरीही ती आधी फुलत आणि हिरवी हिरवी होत का राहात असावीत - संपूर्णपणे सांकेतीकरीत्या सांगितलेला संदेश.

मुद्दा असा की ही तिसरी पद्धत अतिशय सौंदर्यवान वाटते. मनाला भावते. ही सांकेतिकता गझलेत सौंदर्य पेरण्याच्या कामी बरीच जास्त उपयुक्त ठरते.

हे असे होते, म्हणून संकेत तरही हा तरहीचा एक प्रकार (किंवा अभिनव प्रकार म्हणा) आपण घेत आहोत. यात वादाला स्थान नसावे. संकेत तरहीच्या निकषांनुसार गझल झाली नाही म्हणजे काही गुन्हा नाही. प्रत्येक दिलेल्या खयालासाठी अचूक प्रतिमा असतीलच असे नाही. असल्या तरी एकाच जमीनीत बसतील असे नाही. म्हणूनच आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक अवघड प्रकार आहे. पण काही असो, लोकांनी त्या दिशेने प्रयत्न तर केलेला आहे? शामची गझल (आणि माझी ) या आत्तापर्यंत (बर्‍यापैकी प्रमाणात) संकेत तरहीसारख्या झालेल्या दोन गझलाही आहेत. तुम्ही तुमची गझल पुनर्प्रकाशित केलीत तर हीच चर्चा तेथे करता येईल.

आपण हे सगळे करत आहोत यातून आपल्याला कोणतीही परिक्षा द्यायची नाही आहे, कोणतेही प्रशस्तीपत्रक नाही आहे, काहीही ऑथेंटिकेट होणार नाही आहे. हा केवळ चौफेर गझल लेखनाचा एक अनौपचारीक सराव आहे इतकेच.

असले कोणतेही तरहीचे प्रकार अजिबात डोक्यात न ठेवताही आपण आत्तापर्यंत चांगल्या चांगल्या गझला रचतच होतो आणि त्याच महत्वाच्या होत्या, आहेत. कारण त्यात आपला नैसर्गीक 'वजूद' आहे, असतो. पण या उपक्रमातून आपलाच कस लागतो म्हणून हे सगळे!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

धन्यवाद बेफीजी मी हा प्रतिसाद लक्षपूर्वक वाचला
लक्षात घण्याचा प्रयत्न केला

अजून काही मुद्द्यांचे आकलन झाले नाही

१)प्रतिमा भिन्न योजायच्या आहेत हे तर मस्ट आहे त्या मूळ प्रतिमाना सूचीत करतात की नाही ?...करतात तर किती प्रमाणात?... हे व्यक्तीसापेक्ष असू शकते का (एखाद्यास वाटेल एखाद्यास थोडे वाटेल थोडे नाही तर एखाद्यास जसेच्यातसे )
जसे वणवा ही प्रतिमा मी व तुम्ही एकाच खयालासाठी वापरली आहे(आपल्या दोघांकडून वापरली गेली आहे) निर्भयाचा शेर पण मी यज्ञात मी प्राणाची आहुती दिल्यावर त्याचा वणवा होईल असे वाटले पण झाला नाही हा भाव व यज्ञ आहुती या प्रतिमा वापरल्या वणवायचे हा काफिया आला (यज्ञाचा वणवा होणे हा अभिनव विचारही आलाच) ..तर यातून शेराचा विशयाशी संबंध माहीत असल्याने केवळ वाचकास निर्भया प्रकरण सूचीत होतेच

तुमच्या शेरातूनही होतेच शामजी व प्राजूच्या श्वेरातूनही होतेच

मग माझ्या प्रतिमामधे सूचकता कानीकमी की जास्त् आहे हे कसे ठरणार...... तुलना करायच्यासाठी नाही म्हव्णतय सांकेतिकतेची मुबलकता / चपखलता आहे की नाही हे तपासायला मह्णून !!!

२)ठराविक प्रतिमा ठराविकच भावही उत्पन्न करतात त्याना शायर वेगळ्या नाविन्यपूर्ण भाव-बंधात जोडू शकतो का उपक्रमादरम्यान आपन ते स्वातंत्र्य शायरास दिले तर ?

म्हणजे नव्याजागी गेलेले मंदीर पण जुन्याजागेस पाहून हात जोडले जाणे ऐवजी नव्या जागेत मला देव पहायचा नाही जुन्या जागेत माझ्या अनेक स्मृती आहेत असे शायर म्हणू शकत नाही का (भाव हा घटक आधीच निश्चित असेलतोच यायला हवा का ? की चालेल )

Pages