तस्वीर तरही : एकट्या वृक्षास नसतो कोणताही आसरा

Submitted by मकरंद.११७७ on 12 February, 2013 - 10:48

एकट्या वृक्षास नसतो कोणताही आसरा
मीहि तैसा एकला अन तूहि तैसा सागरा

सागराच्या गौरवाचे का हवे रे गोडवे
माझिया तृष्णेस पुरतो आड घट अन कासरा

तू कुठे अन मी कुठे हे हा न रस्ता सांगतो
हरवला कोठे न कळले मोर अल्लड नाचरा

बाळ स्वप्ने बाळ डोळे बाळ शाळा आपली
कामधेनू शिक्षणाची दूध पाजे वासरा

कालगंगा फूल अन 'मकरंद' होती तारका
काळ व्यापे चंद्र तारे शून्य करतो अंतरा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!
छानच जमलंय की.

कालगंगा नित्य वाहे अंतराळी नित्य ही
काळ व्यापे चंद्र तारे शून्य करतो अंतरा !

जियो!

वा छान जमलय की
अभिनंदन सर्वप्रथम तरही साठी
"तस्वीर तरही" ......छान नाव आहे

बाळ स्वप्ने बाळ डोळे बाळ शाळा आपली
कामधेनू शिक्षणाची दूध पाजे वासरा
>>>>अतीशय क्यूट शेर विशेष आवडला

अभिनंदन सर्वप्रथम तरही साठी Happy

धन्यवादही!

पहिल्या तीन शेरातील पहिल्या ओळी आवडल्या.

(त्यात मीहि तैसा एकला अन तूहि तैसा सागरा असे करावे लागेल)

बाळ स्वप्ने बाळ डोळे बाळ शाळा आपली
कामधेनू शिक्षणाची दूध पाजे वासरा<< वा वा

कालगंगा नित्य वाहे अंतराळी नित्य ही
काळ व्यापे चंद्र तारे शून्य करतो अंतरा<< नित्यचा दोनदा वापर लक्षात आला नाही.

पुन्हा प्रथम 'तस्वीर तरही'साठी अभिनंदन

कालगंगा नित्य वाहे अंतराळी नित्य ही

नित्य शब्दाचे दोन अर्थ आहेत.

कालगंगा 'नेहेमी' वहाते. अंतराळात ती 'नेहेमीच' आहे.
नित्य वहाते, अंतराळी नित्य (आहे) ही..Time (कालगंगा) is ALWAYS flowing, and it always IS (in space). नेहेमीसाठी आहे.

श्या, आम्ही कै भाषाप्रभू वै नाही, पण त्या 'नित्य' च्या अर्थछटा अशा निघतात ब्वा.

जब्बर्दस्ती थोडे नं है, वैवकु? वर्तून माही गझल थोडेच आहे ती? पट्लं तं घ्या. नै तं जौद्यानं? मले काय बक्षीस भेटावं हाये का हितं? मले आईकू आला तसा अर्थ लिव्ला..

असो. (वाचकाची) प्रतिभा प्रगल्भ(च) असली(च) पाहिजे असं कुठेय? कधी माझी असेल, कधी तुम्ची नसेल. कमी जास्त होतच रहातं नाही का?

मले काय बक्षीस भेटावं हाये का हितं?>>>>>>
बरे आठवले इब्लिस भौ............दिनेशदांनी "मसाल्याचे पदार्थ" या विषयावर काढलेल्या अवघड पेपरात तुम्ही पैले आलात त्याचे मेडल मिळाल्याबद्दल अभिनंदन !!!!

बेफीजी धन्यवाद !! पण अहो तुम्ही मला फोन करून हे कळवलेच आहे आगोदरच Happy
असो!!

नित्य वाली ओळ बदलली.

नाव शेळी, आंबा, मकरंद काहीही मिळो, कवितेत घुसवायला जमते.

थ्यान्क्स टू गुरुजी बेफिकिर

Happy