Submitted by प्राजु on 3 February, 2013 - 07:21
दूरचे पर्वत बघाया जीव तोडुन धावले
अंगणी दव सांडलेले का कसे मी टाळले?
मुखवटे आहेत नुसते बेगडी चोहीकडे
ते जुने निष्पाप सारे चेहरे का लोपले?
भेटले नाहीत हक्काचे असे खांदे तया
शेवटाला चार जण शेजारचे आले भले
चाललो असतो सवे तर वाट असती देखणी
पण अता काट्याकुट्यांना मानले मी आपले
संकटाच्या पार नेण्या धावुनी आलास 'तू'
आणि बघ अस्तित्व मी होते तुझे नाकारले!!
जाणती डोळे तुझे की, मौन माझे बोलके?
उत्तरादाखल तुझे अश्रू कसे रे सांडले?
-प्राजु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवड्ली शामजींची गझलही अश्याच
आवड्ली
शामजींची गझलही अश्याच जमीनीत आहे बहुधा
दूरचे पर्वत बघाया जीव तोडुन
दूरचे पर्वत बघाया जीव तोडुन धावले
अंगणी दव सांडलेले का कसे मी टाळले?
व्वा..! आवडले.
तिसर्या व पाचव्या शेरातील
तिसर्या व पाचव्या शेरातील आशय अगदी अचूक नसला तरीही स्वच्छ आहेच. बाकीचे सर्व शेर स्वच्छ व मतला, दुसरा आणि चौथा शेर अचूक आशयाचेही! अभिनंदन प्राजू! खयाली तरहीहीतील सहभागासाठी धन्यवाद व अभिनंदन!
शुभेच्छा!
छानै !!
छानै !!
संकटाच्या पार नेण्या धावुनी
संकटाच्या पार नेण्या धावुनी आलास 'तू'
आणि बघ अस्तित्व मी होते तुझे नाकारले!! >>>>> क्या बात है....
सर्व गजलही सुंदरच...
मनापासून आभार मंडळी!
मनापासून आभार मंडळी!
वा। ...मस्त जमलिय प्राजु !
वा। ...मस्त जमलिय प्राजु !
मक्ता फारच सुरेख.... बाकी गझल
मक्ता फारच सुरेख....
बाकी गझल मस्त..
(No subject)
जाणती डोळे तुझे की, मौन माझे
जाणती डोळे तुझे की, मौन माझे बोलके?
उत्तरादाखल तुझे अश्रू कसे रे सांडले? >>>> हा अधिक आवडला.
matla .....agadi perfect
matla .....agadi perfect !!
shevatcha sherahi sundar ...
मस्त मस्त मक्ता एकदम भारी
मस्त मस्त

मक्ता एकदम भारी
चाललो असतो सवे तर वाट असती
चाललो असतो सवे तर वाट असती देखणी
पण अता काट्याकुट्यांना मानले मी आपले
.
संकटाच्या पार नेण्या धावुनी आलास 'तू'
आणि बघ अस्तित्व मी होते तुझे नाकारले!!
लाजबाब आणि गहन शेर.