गझल रचना.... तरही गझल.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 December, 2010 - 04:49

गालिब्,मीर आदि शायर मैफिल संपल्यावर एक ओळ देत्,की ज्या ओळीचा उपयोग मतल्यात सानी मिसरा म्हणून करुन पुढच्या वेळेस त्यावर आधारीत एक गझल तयार करून आणायची असे.

असाच प्रयोग्,गझल सागर प्रतिष्ठान च्या वतीने मुंबई इथे काही काळ चालला. .... माझ्याशी नियमित संपर्क असलेल्या काही शायरांनी त्यात उत्तमोत्तम गझल रचून गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय व्हावा,सर्वमान्य व्हावा म्हणून बराच हातभार लावला आहे.

गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर्,प्रसादपंत्,भुंगा यांचेशी गप्पा मारताना गेली काही दिवस एक मैफिल्,एक गझल अश्या तून काही सामूहिक गझलांची निर्मिती झाली. हीच कल्पना पुढे नेवून नियमित पणे तरही गझल रचाव्यात ह्या कल्पनेतून हा धागा सुरु करतोय.

ह्यात दर आठवड्याला एक ओळ देण्यात येईल व ती ओळ मतल्यातील सानी मिसर्‍यात चपखल बसवून गझल रचावयाची आहे. आपणा सगळ्यांचे यात स्वागत आहे.

आजची ओळ आहे.

ओळ क्र.१ = जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

वृत्त : आनंदकंद
काफिया : जगण्यात किंवा अर्थ
रदीफ : अर्थ नाही किंवा नाही
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२= सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
वृत्त : चामर
काफिया : उन्हात
रदीफ : मी
लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.३= कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
वृत्त : वियदगंगा
काफिया : वाटले
रदीफ : होते
लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ४ = तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : नकार
रदीफ : आहे
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

ओळ क्र.५ = दु:ख आता फार झाले
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रदीफ : झाले
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र.६ = थांबणे सोसेल तोवर लागते चालायला ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - चालायला, वाकायला, जायला, यायला, व्हायला वगैरे स्वरुपी ('आ'यला समान)

ओळ क्र.७ = वादात या कुणीही सहसा पडू नये
वृत्त - विद्युल्लता
रदीफ - नये
काफिया - पडू
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा

ओळ क्र.८ = ठरेन या जगात मी,महान एकदा तरी ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : एकदा तरी
काफिया : महान
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र.९ = थेट माझ्या सारखा तो कोण होता ? डॉ.अनंत ढवळे यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : कोण होता
काफिया :सारखा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. १० = अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
वृत्त : आनंदकंद
रदीफ = माणसे ही
काफिया = छळतात
लगावली= गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ११ = कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मंदाकिनी
काफिया - आराम, दाम, ठाम, उद्दाम वगैरे
अलामत - आ
रदीफ - पहिल्यासारखा
गागालगा गागालगा गागालगा गागालगा

ओळ क्र.१२ = षंढ म्हणती लोक सारे,ऊठ तू आता तरी
वृत्त - कालगंगा
काफिया = सारे,तारे,वारे,न्यारे,उतारे,दारे,यारे, वगैरे
अलामत -आ
रदीफ - ऊठ तू आता तरी
लगावली - गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र.१३ = माणसे व्यर्थ मी जतन केली ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त = लज्जिता
काफिया = जतन, गहन, सहन इ.इ.
अलामत - अ
रदीफ - केली
लगावली - गालगा गालगा लगागागा

ओळ क्र.१४ = विसरणेही तुझ्या लक्षात नाही ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मृगाक्षी
मात्रा - १९
लगावली - लगागागा लगागागा लगागा
काफिया - लक्षात, गावात, रस्त्यात, कोणात, जात, आत इत्यादी
अलामत - आ
रदीफ - 'नाही'
किमान शेर - मतला धरून पाच

ओळ क्र.१५=अजूनही मी तुझ्याचसाठी जिवंत आहे ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - सती जलौघवेगा
लगावली - लगालगागा लगालगागा लगालगागा
मात्रा - २४
काफिया - जिवंत, महंत, संत, वसंत, आसमंत इत्यादी
अलामत - अं
रदीफ - 'आहे'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र.१६=आला पाउस गेला पाउस ( श्री .प्रसाद गोडबोले,''पंत'' यांची ओळ )
वृत्त - पादाकुलक
लगावली - गागागागा गागागागा

ओळ क्र.१७ = श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गांव मनोहर (उमेश कोठीकर यांची ओळ.)
वृत्त - गागागागा * ४ - किंवा ३२ मात्रांचे मात्रावृत्त
काफिया - मनोहर, घर, उत्तर, जर, तर, अंबर इत्यादी स्वरुपाचे
रदीफ - रदीफ नाही
अलामत - 'अ'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र. १७ = खोल खोल आतवर तुझी नजर
वृत्त = श्येनिका
काफिया = नजर्,उदर्,अधर्,शहर इ.
अलामत = अ
रदीफ = नाही.गैरमुरद्दफ
लगावली =गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.१८ = काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
वृत्त = कालगंगा /देवप्रिया
काफिया = आनंदण्याची, ......... पेरण्याची,तारण्याची,वाकण्याची,अंधारण्याची इ.इ.
अलामत्=अ
रदीफ= कारणे
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.१९ = ही जगाची रीत नाही
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रददीफः नाही
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र. २० = चांदणे आहे खरे की भास नुसता ?.......नचिकेत जोशी,आनंदयात्री यांची ओळ
वृत्त : मंजुघोषा
रदीफ :नुसता
काफिया :भास्,खास्,आभास्,त्रास्,इ..इ..
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.२१ = जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
काफिया : मागतो,ठेवतो,पाहतो ,बोलतो
रददीफः मी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र.२२ =************************************************
वृत्त : सुमंदारमाला
काफिया : जावे,खावे,विसावे,जडावे इ.इ.
रददीफः कुठे
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

ओळ क्र.२३ *********************************************************************************************************
वृत्त :तोटक
काफिया :खरा,जरा,बरा,धरा,करा
रदीफ : गैरमुरद्दफ
लगावली :ललगा ललगा ललगा ललगा

ओळ क्र.२४ :शेवटी संपायला आलीच ही एकांकिका......भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ.
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - एकांकिका, मालिका, विका, शिका, टिका, राधिका, इत्यादी
अलामत - र्‍हस्व इ
शेर - मतला धरून पाच
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.२५ : या इथे कधी काळी देखणे शहर होते.......... बेफिकिर यांची ओळ
वृत्त : रंगराग
रदीफ : होते
काफिया : शहर्,गजर्,अधर्,पदर्,इ.इ.
अलामत : अ
लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा

ओळ क्र.२६ :कशास त्याची वाट पहावी,जे घडणे आहेच असंभव....... अमितदेसाई, बागुलबुवा यांची ओळ
वृत्त : वनहरिणी ( मात्रा वृत्त्, अष्ट मात्रिक ४ आवर्तने )
रदीफ : नाही..गैरमुरद्दफ
काफिया : असंभव्,अनुभव्,वैभव्,संभव्, उद्भव,

ओळ क्र.२७ : हा कोणत्या दिशेचा,आहे प्रवास अजुनी............नयना मोरे, मी_ आर्या यांची ओळ
वृत्त : आनंदकंद
रदीफ : अजुनी
काफिया : प्रवास्,भास्,तास्,निवास्,श्वास
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२८ : तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता
वृत्त : वियदगंगा
रदीफ : होता
काफिया : ओलावला, पाणावला,भंडावला,पावला,धावला,इ.इ...
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र.२९ : सोड चिंता मीच माझे पाहतो आता '' कणखर'' यांचि ओळ
वृत्त : राधा
रदीफ : आता
काफिया : पाहतो,वाहपाहतो,वाहतो,साहतो,राहतो,नाहतो
लगावलि : गालगागा गालगागा गालगागा गा

ओळ क्र. ३०: जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे.
वृत्त : वियदगंगा
रदीफ : आहे
काफिया : रेंगाळतो,जाळतो,टाळतो,हेटाळतो
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ३१: हृदय एवढे धडधडत का असावे?
वृत्त :भुजंगप्रयात
रदीफ : असावे
काफिया : सौतीकाफिया " आ'' कारान्त स्वरकाफिया
लगावली :लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र. ३२: कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले ? डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : राहिले,पाहिले,साहिले,वाहिले,दाहिले,
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र. ३३: जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : देवप्रिया
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : माझ्यासवे, चालवे,आसवे, कालवे, काजवे,आठवे, जाणवे,पारवे,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३४: पिंजर्‍याला मानती आकाश रावे गझलसम्राट सुरेश भट यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : रावे, व्हावे, असावे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३५ : येत जा देवून थोडी कल्पना
वृत्त : मेनका
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : कल्पना,प्रार्थना,वंचना,वासना,साधना,कामना,वेदना
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३६ : दाटते आहे निराशा फार हल्ली
वृत्त :मंजुघोषा
रदीफ : हल्ली
काफिया : फार्,चार्,आजार्,बाजार्,व्यापार.....
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३७ : आज आहे नेमका शुद्धीत मी
वृत्त : मेनका
रदीफ : मी
काफिया : शुद्धीत्,रीत्,प्रीत्,विपरीत्,गीत्,भीत्,आश्रीत,
लगावली : गालगागा गालगागा गालगा

khal.jpg

ओळ क्र. ३८ : चालला आहे कशाचा खल इथे
वृत्त : मेनका
रदीफ : इथे
काफिया :खल्,चल्,निश्चल्,बल्,कल्,दल्,कोलाहल
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३९ : सारे जुनेच आहे काही नवीन नाही....... शाम यांची ओळ.
वृत्त : आनंदकंद
रदीफ :नाही
काफिया : नवीन्,लीन्,दीन.विहीन्,हीन्,लगीन्,तीन्,अधीन्,मशीन,
लगावली :गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ४० :कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा.... रसप यांची ओळ.

लगावली - लगालगागा लगालगा - यती - लगालगागा लगालगा

वृत्ताचे नांव - ज्ञात नाही, कोणाला ठाऊक असल्यास कृपया नोंदवावेत.

काफिया - विरघळून / जळून / पळून / वळून इत्यादी

अलामत - 'ऊ' (दीर्घ ऊकार)

रदीफ - जा

ओळ क्र. ४१: आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
वृत्त : व्योमगंन्गा
रदीफ : तितकीच आहे
काफिया : वेदना , साधना, वन्चना,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.42 : सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची ( वैभव वसंत कुलकर्णी यांची ओळ )
वृत्त : वियद्गंगा
लगावली: लगागागा लगागागा लगागागा लगागागा
काफिये: ताज्या, माझ्या, साध्या , गेल्या
अलामत : तंत्रानुसार आ ह्या स्वरांतयमकाची अलामत..बाकी त्याच्या आधीच्या अक्षरावर आलेली जोडाक्षरातील उछारात येणारे वजन हेही अलामतीसारखे वारंवार येणारे ठरावे अश्या काफियांची अपेक्षा !!
रदीफ : विचारांची

ओळ क्र.४३ : आतला माणूस माझ्या जळत आहे.
वृत्त : मंजुघोषा
काफिया : जळत्,कळत्, वळत्,पळत्,हळहळत
रदीफ : आहे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

गुलमोहर: 

घाबरला भिजलेला पाउस
आला पाउस गेला पाउस

तू नसतानाही कोसळतो
तेव्हा रिमझिमलेला पाउस

शेताने अश्रू वापरले
कोणी त्याचा नेला पाउस

लोकांचे ईर्शाद ऐकुनी
ग्रीष्माचा मी केला पाउस

मी भिजण्यासाठी खोळंबे
पण आहे मुरलेला पाउस

ओले ओले एक कलेवर
मृत्यूच्या वेळेला पाउस

इतके लिहिले इतके लिहिले
झाला माझा चेला पाउस

मद्यापेक्षा कैकपटीने
चढतो एकच पेला पाउस

खोल खोल जखमांना छेडे
'बेफिकीर' आलेला पाउस

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

इतके लिहिले इतके लिहिले
झाला माझा चेला पाउस

मद्यापेक्षा कैकपटीने
चढतो एकच पेला पाउस

जे हुई ना बात!!! भन्नाट जमली!!! अभिनंदन!!!

काल उमेश कोठीकर यांनी एक मिसरा सुचवला जो तरहीसाठी घ्यावासा वाटला.

मिसरा - श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गांव मनोहर

वृत्त - गागागागा * ४ - किंवा ३२ मात्रांचे मात्रावृत्त

काफिया - मनोहर, घर, उत्तर, जर, तर, अंबर इत्यादी स्वरुपाचे

रदीफ - रदीफ नाही

अलामत - 'अ'

शेर - मतला धरून किमान पाच

इच्छुकांनी गझल रचावी असे आवाहन! मला कोठीकरांचा हा मिसरा आवडल्याने येथे नोंदवला.

Happy

-'बेफिकीर'!

कैलासरावांचा उपक्रम चालू ठेवल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद बेफिकीर!

माझाही एक प्रयत्न - इथे पहा

आवरता बघ आवरतो का,जगण्याचा हा वेग अनावर
श्वासाचा मी ब्रेक दाबता, मृत्युचा ये गाव मनोहर ||१||

शिफ्ट संपली या जन्माची,तरी होईना मुक्त ड्रायव्हर
चक्र फिरे चौर्‍यांशी योनी, टाक नव्याने पहिला गियर ||२||

फसवे जग हे बावन पानी,बदाम सत्ती राणी किलवर
राजाला बाजूला सारे, बाजी मारे फसवा जोकर ||३||

असते नित्यच शुल्लक कारण,येण्याला हमरीतुमरीवर
फुटून जाते परत एकदा,माझे कोपर तुमचे ढोपर ||४||

प्रश्न कळीचे दाबून ठेवा, हाती द्या आरक्षित गाजर
तुम्हांस पडल्या नाहीत भेगा, तुम्हा कशाला फुटेल पाझर ||५||

स्वतःच घसरा सालीवरुनी, पाय टाकण्या जाता भरभर
गप्प उभी मी बाजूला तर, माझ्यावरती उगीच खापर ||६||

मी बोलावे लटके काही ,'नेमक्यांस' ते सले आतवर
ते सर्वांना सांगत फिरती, साती आहे किती अगोचर ||७||

********************************************************************************

तरही द्यावी ऐसी देवा, वृत्त असावे साधे सुंदर
गझलेचा या घाट घालण्या, किती बसावे लिहित पानभर || *||

श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गाव मनोहर
सुख दु:खांच्या रहदारीतील जीवन म्हणजे नुसती घर घर

मरून सुद्धा जिवंत राहते भूक कधी रे शमायची ही ?
मनातले मांडे खाण्याला अजून बाकी थोडे जर तर

चरित्र नायक लिहून गेले आत्मचरित्रात हेच आपल्या
खरे जगाया उशीर झाला मरून गेलो हळूच भर भर

ललाटि रेखाटून भुमीका श्वास श्वास मोजून बिदागी
मृत्यूच्या या नाटिकेत मी जगणे हे केवळ मध्यंतर

शोभिवंत या जगात माझे विचार ठरले जूनीच अडगळ
खोल खोल सोसून वेदना हसत मुखाने जगणे वर वर

मयुरेश साने..दि २९- जून -११

तुम्हांस पडल्या नाहीत भेगा, तुम्हा कशाला फुटेल पाझर ||५||>>. सुंदर!

काही ठिकाणी र्‍हस्व दीर्घ बदलावे लागेल की काय असे वाटले.

वेगवान गझल!

स्वतःच घसरा सालीवरुनी, पाय टाकण्या जाता भरभर
गप्प उभी मी बाजूला तर, माझ्यावरती उगीच खापर ||>>>

Happy

-'बेफिकीर'!

ओळ क्र. = खोल खोल आतवर तुझी नजर
वृत्त = श्येनिका
काफिया = नजर्,उदर्,अधर्,शहर इ.
अलामत = अ
रदीफ = नाही.गैरमुरद्दफ
लगावली =गालगाल गालगाल गालगा

प्राजु यांची नव्या तरही वरील गझल.

http://www.maayboli.com/node/27202

छाया देसाई यांची गझल.

http://www.maayboli.com/node/27192

कमलेश पाटील यांची गझल.

http://www.maayboli.com/node/27203

आनंदयात्री यांची गझल.

http://www.maayboli.com/node/27261

हबा आणि शाम यांच्या लिंक्स वर आहेतच.

नव्या तरही वरील नव्या गझल्स.

कुमारी यांची गझल.

http://www.maayboli.com/node/27375

मिल्या यांची गझल.

http://www.maayboli.com/node/27289

सुप्रिया यांची गझल..

http://www.maayboli.com/node/27358

शाम यांची गझल

http://www.maayboli.com/node/27223

बेफिकिर यांची गझल

http://www.maayboli.com/node/27290

शायर हटेला यांची गझल

http://www.maayboli.com/node/27285

ओळ क्र.१८ = काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
वृत्त = कालगंगा /देवप्रिया
काफिया = आनंदण्याची, ......... पेरण्याची,तारण्याची,अंधारण्याची,वाकण्याची इ.इ.
अलामत्=अ
रदीफ= कारणे
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.१९ =ही जगाची रीत नाही
वृत्त : मनोरमा
काफिया रीत
रददीफः नाही
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र.९ = चांदणे आहे खरे की भास नुसता ?.......नचिकेत जोशी,आनंदयात्री यांची ओळ
वृत्त : मंजुघोषा
रदीफ :नुसता
काफिया :भास्,खास्,आभास्,त्रास्,इ..इ..
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

तरही गझलांच्या वारंवारतेमुळे 'नवीन लेखनाच्या' पहिल्या दोन ते तीन पानांवर अनेक समान शीर्षकाच्या तरही गझला दिसत असल्यामुळे अनेक माबो सदस्यांनी डॉ. कैलास गायकवाड यांना संपर्क साधून त्याबाबत काहीमते प्रकट केली. त्यातील प्रमुख सूचना / कल्पना अशी होती की तरहीच्या उपक्रमामुळे अनेक इतर धागे एक तर मागे तरी पडत आहेत किंवा वाचकांच्य अनजरेस पडत तरी नाही आहेत. अर्थातच ही बाब कैलास यांनी गंभीरपणे घेतलीच व त्यानुसार त्यांनी माझ्याशी व आनंदयात्रींशी चर्चा केली. तसेच 'कणखर' यांच्याशीही केली असावी असा अंदाज आहे. सकृतदर्शनी जरी मला व नचिकेतला ही बाब दुर्लक्षनीय वाटली तरीही नंतर विचार केल्यावर असे जाणवले की 'शक्य आहे की काही सदस्यांना' या गझलांच्या शीर्षकामुळे व वारंवारतेमुळे कदाचित उबगही आला असेल'. त्यामुळे कैलासरावांनी सुचवलेल्या बदलांना मी प्रथम सहमती दिली व नंतर पुन्हा नचिकेतशी चर्चा केल्यावर तरही गझल उपक्रमातील बदल रद्द करावेत असे एक मत पुन्हा योग्य वाटू लागले.

तरही गझल हा उपक्रम अत्यंत सुयोग्य आहे कारण यात गझलतंत्रावर पकड येण्यासाठी सर्वच जण नुसते सहाय्यास तयार असतात असे नाही तर एकाच जमीनीत असलेल्या गझलांमधील खयालांचे वैविध्य पाहून अनेकदा कवी अधिक वैविध्यपूर्ण विचारही करायला लागतात. सफाईदार ओळींसाठी एक तयारी होऊ लागते.

मुळात तरही हा उपक्रम दिल्लीतील शायरीच्या जमान्यात सुरू झाला तो स्पर्धेसाठीच! नामवंत शायरांना बोलावून त्यांना एक ओळ दिली जायची व तेथल्यातेथेच त्यावर गझल रचायला सांगीतली जायची. एक स्पर्धा या दृष्टिकोनातून अनेक रसिक तेथे उपस्थित राहायचे व स्पर्धेत भाग घेणार्‍या कवींना उत्तेजन व दाद द्यायचे. महाकवी गालिब, दाग, मोमीन, जौक हे सर्व कवी यात सहभागी होत असत.

तरही हा उपक्रम जरी 'कवितेच्या नैसर्गीक प्रेरणेपासून' काहीसा दूर असल्याचे जाणवत असले तरी कवी शेर लिहिताना केवळ यमकांसाठी लिहीत नाहीत हे सर्वांना दिसतच असेल. कित्येक शेर आयुष्यातून येतात, कित्येक नवे खयाल मिळतात. आणि हळूहळू त्यातील कृत्रिमता जाऊन नैसर्गीक गझला येऊ लागतात.

तरहीमुळे मायबोलीवर (मी आल्यापासूनच्या कालावधीत जे दिसले त्या नुसार) साधारण सहा नवे गझलकार गझल रचू लागले. हे श्रेय कैलासराव व प्रशासक या दोघांचेही आहेच!

माझ्या, आनंदयात्री, कैलास व कणखर यांच्यामते हा धागा न बदलता असाच चालू राहील. मिल्याशी बोलणे झालेले नाही पण खात्री आहे की मिल्या याच्याशी सहमत होतीलच!

नव्याजुन्या सर्वच गझलकारांना मनापासून दाद द्यावीत अशी विनंती करून थांबतो.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Happy

Pages