गझल रचना.... तरही गझल.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 December, 2010 - 04:49

गालिब्,मीर आदि शायर मैफिल संपल्यावर एक ओळ देत्,की ज्या ओळीचा उपयोग मतल्यात सानी मिसरा म्हणून करुन पुढच्या वेळेस त्यावर आधारीत एक गझल तयार करून आणायची असे.

असाच प्रयोग्,गझल सागर प्रतिष्ठान च्या वतीने मुंबई इथे काही काळ चालला. .... माझ्याशी नियमित संपर्क असलेल्या काही शायरांनी त्यात उत्तमोत्तम गझल रचून गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय व्हावा,सर्वमान्य व्हावा म्हणून बराच हातभार लावला आहे.

गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर्,प्रसादपंत्,भुंगा यांचेशी गप्पा मारताना गेली काही दिवस एक मैफिल्,एक गझल अश्या तून काही सामूहिक गझलांची निर्मिती झाली. हीच कल्पना पुढे नेवून नियमित पणे तरही गझल रचाव्यात ह्या कल्पनेतून हा धागा सुरु करतोय.

ह्यात दर आठवड्याला एक ओळ देण्यात येईल व ती ओळ मतल्यातील सानी मिसर्‍यात चपखल बसवून गझल रचावयाची आहे. आपणा सगळ्यांचे यात स्वागत आहे.

आजची ओळ आहे.

ओळ क्र.१ = जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

वृत्त : आनंदकंद
काफिया : जगण्यात किंवा अर्थ
रदीफ : अर्थ नाही किंवा नाही
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२= सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
वृत्त : चामर
काफिया : उन्हात
रदीफ : मी
लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.३= कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
वृत्त : वियदगंगा
काफिया : वाटले
रदीफ : होते
लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ४ = तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : नकार
रदीफ : आहे
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

ओळ क्र.५ = दु:ख आता फार झाले
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रदीफ : झाले
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र.६ = थांबणे सोसेल तोवर लागते चालायला ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - चालायला, वाकायला, जायला, यायला, व्हायला वगैरे स्वरुपी ('आ'यला समान)

ओळ क्र.७ = वादात या कुणीही सहसा पडू नये
वृत्त - विद्युल्लता
रदीफ - नये
काफिया - पडू
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा

ओळ क्र.८ = ठरेन या जगात मी,महान एकदा तरी ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : एकदा तरी
काफिया : महान
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र.९ = थेट माझ्या सारखा तो कोण होता ? डॉ.अनंत ढवळे यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : कोण होता
काफिया :सारखा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. १० = अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
वृत्त : आनंदकंद
रदीफ = माणसे ही
काफिया = छळतात
लगावली= गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ११ = कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मंदाकिनी
काफिया - आराम, दाम, ठाम, उद्दाम वगैरे
अलामत - आ
रदीफ - पहिल्यासारखा
गागालगा गागालगा गागालगा गागालगा

ओळ क्र.१२ = षंढ म्हणती लोक सारे,ऊठ तू आता तरी
वृत्त - कालगंगा
काफिया = सारे,तारे,वारे,न्यारे,उतारे,दारे,यारे, वगैरे
अलामत -आ
रदीफ - ऊठ तू आता तरी
लगावली - गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र.१३ = माणसे व्यर्थ मी जतन केली ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त = लज्जिता
काफिया = जतन, गहन, सहन इ.इ.
अलामत - अ
रदीफ - केली
लगावली - गालगा गालगा लगागागा

ओळ क्र.१४ = विसरणेही तुझ्या लक्षात नाही ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मृगाक्षी
मात्रा - १९
लगावली - लगागागा लगागागा लगागा
काफिया - लक्षात, गावात, रस्त्यात, कोणात, जात, आत इत्यादी
अलामत - आ
रदीफ - 'नाही'
किमान शेर - मतला धरून पाच

ओळ क्र.१५=अजूनही मी तुझ्याचसाठी जिवंत आहे ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - सती जलौघवेगा
लगावली - लगालगागा लगालगागा लगालगागा
मात्रा - २४
काफिया - जिवंत, महंत, संत, वसंत, आसमंत इत्यादी
अलामत - अं
रदीफ - 'आहे'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र.१६=आला पाउस गेला पाउस ( श्री .प्रसाद गोडबोले,''पंत'' यांची ओळ )
वृत्त - पादाकुलक
लगावली - गागागागा गागागागा

ओळ क्र.१७ = श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गांव मनोहर (उमेश कोठीकर यांची ओळ.)
वृत्त - गागागागा * ४ - किंवा ३२ मात्रांचे मात्रावृत्त
काफिया - मनोहर, घर, उत्तर, जर, तर, अंबर इत्यादी स्वरुपाचे
रदीफ - रदीफ नाही
अलामत - 'अ'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र. १७ = खोल खोल आतवर तुझी नजर
वृत्त = श्येनिका
काफिया = नजर्,उदर्,अधर्,शहर इ.
अलामत = अ
रदीफ = नाही.गैरमुरद्दफ
लगावली =गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.१८ = काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
वृत्त = कालगंगा /देवप्रिया
काफिया = आनंदण्याची, ......... पेरण्याची,तारण्याची,वाकण्याची,अंधारण्याची इ.इ.
अलामत्=अ
रदीफ= कारणे
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.१९ = ही जगाची रीत नाही
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रददीफः नाही
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र. २० = चांदणे आहे खरे की भास नुसता ?.......नचिकेत जोशी,आनंदयात्री यांची ओळ
वृत्त : मंजुघोषा
रदीफ :नुसता
काफिया :भास्,खास्,आभास्,त्रास्,इ..इ..
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.२१ = जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
काफिया : मागतो,ठेवतो,पाहतो ,बोलतो
रददीफः मी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र.२२ =************************************************
वृत्त : सुमंदारमाला
काफिया : जावे,खावे,विसावे,जडावे इ.इ.
रददीफः कुठे
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

ओळ क्र.२३ *********************************************************************************************************
वृत्त :तोटक
काफिया :खरा,जरा,बरा,धरा,करा
रदीफ : गैरमुरद्दफ
लगावली :ललगा ललगा ललगा ललगा

ओळ क्र.२४ :शेवटी संपायला आलीच ही एकांकिका......भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ.
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - एकांकिका, मालिका, विका, शिका, टिका, राधिका, इत्यादी
अलामत - र्‍हस्व इ
शेर - मतला धरून पाच
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.२५ : या इथे कधी काळी देखणे शहर होते.......... बेफिकिर यांची ओळ
वृत्त : रंगराग
रदीफ : होते
काफिया : शहर्,गजर्,अधर्,पदर्,इ.इ.
अलामत : अ
लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा

ओळ क्र.२६ :कशास त्याची वाट पहावी,जे घडणे आहेच असंभव....... अमितदेसाई, बागुलबुवा यांची ओळ
वृत्त : वनहरिणी ( मात्रा वृत्त्, अष्ट मात्रिक ४ आवर्तने )
रदीफ : नाही..गैरमुरद्दफ
काफिया : असंभव्,अनुभव्,वैभव्,संभव्, उद्भव,

ओळ क्र.२७ : हा कोणत्या दिशेचा,आहे प्रवास अजुनी............नयना मोरे, मी_ आर्या यांची ओळ
वृत्त : आनंदकंद
रदीफ : अजुनी
काफिया : प्रवास्,भास्,तास्,निवास्,श्वास
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२८ : तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता
वृत्त : वियदगंगा
रदीफ : होता
काफिया : ओलावला, पाणावला,भंडावला,पावला,धावला,इ.इ...
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र.२९ : सोड चिंता मीच माझे पाहतो आता '' कणखर'' यांचि ओळ
वृत्त : राधा
रदीफ : आता
काफिया : पाहतो,वाहपाहतो,वाहतो,साहतो,राहतो,नाहतो
लगावलि : गालगागा गालगागा गालगागा गा

ओळ क्र. ३०: जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे.
वृत्त : वियदगंगा
रदीफ : आहे
काफिया : रेंगाळतो,जाळतो,टाळतो,हेटाळतो
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ३१: हृदय एवढे धडधडत का असावे?
वृत्त :भुजंगप्रयात
रदीफ : असावे
काफिया : सौतीकाफिया " आ'' कारान्त स्वरकाफिया
लगावली :लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र. ३२: कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले ? डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : राहिले,पाहिले,साहिले,वाहिले,दाहिले,
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र. ३३: जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : देवप्रिया
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : माझ्यासवे, चालवे,आसवे, कालवे, काजवे,आठवे, जाणवे,पारवे,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३४: पिंजर्‍याला मानती आकाश रावे गझलसम्राट सुरेश भट यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : रावे, व्हावे, असावे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३५ : येत जा देवून थोडी कल्पना
वृत्त : मेनका
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : कल्पना,प्रार्थना,वंचना,वासना,साधना,कामना,वेदना
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३६ : दाटते आहे निराशा फार हल्ली
वृत्त :मंजुघोषा
रदीफ : हल्ली
काफिया : फार्,चार्,आजार्,बाजार्,व्यापार.....
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३७ : आज आहे नेमका शुद्धीत मी
वृत्त : मेनका
रदीफ : मी
काफिया : शुद्धीत्,रीत्,प्रीत्,विपरीत्,गीत्,भीत्,आश्रीत,
लगावली : गालगागा गालगागा गालगा

khal.jpg

ओळ क्र. ३८ : चालला आहे कशाचा खल इथे
वृत्त : मेनका
रदीफ : इथे
काफिया :खल्,चल्,निश्चल्,बल्,कल्,दल्,कोलाहल
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३९ : सारे जुनेच आहे काही नवीन नाही....... शाम यांची ओळ.
वृत्त : आनंदकंद
रदीफ :नाही
काफिया : नवीन्,लीन्,दीन.विहीन्,हीन्,लगीन्,तीन्,अधीन्,मशीन,
लगावली :गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ४० :कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा.... रसप यांची ओळ.

लगावली - लगालगागा लगालगा - यती - लगालगागा लगालगा

वृत्ताचे नांव - ज्ञात नाही, कोणाला ठाऊक असल्यास कृपया नोंदवावेत.

काफिया - विरघळून / जळून / पळून / वळून इत्यादी

अलामत - 'ऊ' (दीर्घ ऊकार)

रदीफ - जा

ओळ क्र. ४१: आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
वृत्त : व्योमगंन्गा
रदीफ : तितकीच आहे
काफिया : वेदना , साधना, वन्चना,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.42 : सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची ( वैभव वसंत कुलकर्णी यांची ओळ )
वृत्त : वियद्गंगा
लगावली: लगागागा लगागागा लगागागा लगागागा
काफिये: ताज्या, माझ्या, साध्या , गेल्या
अलामत : तंत्रानुसार आ ह्या स्वरांतयमकाची अलामत..बाकी त्याच्या आधीच्या अक्षरावर आलेली जोडाक्षरातील उछारात येणारे वजन हेही अलामतीसारखे वारंवार येणारे ठरावे अश्या काफियांची अपेक्षा !!
रदीफ : विचारांची

ओळ क्र.४३ : आतला माणूस माझ्या जळत आहे.
वृत्त : मंजुघोषा
काफिया : जळत्,कळत्, वळत्,पळत्,हळहळत
रदीफ : आहे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

गुलमोहर: 

<मद्यापेक्षा कैकपटीने
चढतो एकच पेला पाउस

खोल खोल जखमांना छेडे
'बेफिकीर' आलेला पाउस>
शब्दच नाहीत माझ्याकडे,स्तुती करायला.:)

माणसे व्यर्थ मी जतन केली ( श्री विजय पाटील ,'कणखर' यांची ओळ )>>>????>>> कैलासराव ही ओळही भूषणजींचीच आहे... मी फक्त पोस्ट केली होती. कृपया बदल करावात

लालूसाहिबा, नक्कीच चालतात, स्पर्धा १६ ऑगस्टपासून सुरू करू सगळ्यांना मान्य असल्यास. मागील ओळींवरची गझल आता स्पर्धेत आली नाही तरी आस्वादास मिळेलच ना? Happy

बेफिकीर आणि कैलास,
दर आठवड्याला नविन तरहीचा नवा धागा काढून त्यात सगळ्यांनी एकाखाली एक लिहिल्या तर?
मी मागेही एकदा असं म्हणाले होते.
आपल्यालाही संदर्भासाठी एका तरहीवरच्या गझला एकत्र मिळतील.
तसेच गझल प्रेमींना ठिक आहे पण इतरांना २-२ पाने आवडीचा बा फ शोधायचा त्रास होतो ते वाचेल.

अगदी एकाखाली एक १०-१२ पाककृती आल्या नविन पानावर,तरी बरेच लोक वैतागतीलच ना.

बेफिकिर, धन्यवाद.

>>दर आठवड्याला नविन तरहीचा नवा धागा काढून त्यात सगळ्यांनी एकाखाली एक लिहिल्या तर?
saati, सगळ्या गजला एकाच ठिकाणी, त्यांच्यावरचे प्रतिसादही तिथेच. २-३ पाने मागच्या गजलेवर कोणी टिप्पणी केली तर ती मागे जाऊन शोधावे लागेल. पानांची संख्या वाढेल आणि स्लो होईल. तेव्हा नको.

हा उपक्रम दर आठ्वड्याऐवजी दर २ आठवड्याने किंवा महिन्यातून एकदा केला तर बरं होईल. लोकांना लिहायला वेळ मिळेल आणि एकदम खूप येण्याचे प्रमाण कमी होईल.

>>अगदी एकाखाली एक १०-१२ पाककृती आल्या नविन पानावर,तरी बरेच लोक वैतागतीलच ना

वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे लोक वैतागतील. Happy

<<<<वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे लोक वैतागतील.>>>> Rofl

साती, आपल्या सूचनाही चांगल्याच आहेत. अर्थात, त्यांचा विचार केलेला होताच. पण लालूसाहिबा म्हणतात त्याप्रमाणे पानांची संख्या वाढेल व वेग कमी होईल. गोंधळ उडू शकेल.

तसेच, दोन आठवड्याला एक असे केले तरी प्रतिसादकांमुळे तेच धागे वर येत आहेत असेही दिसत आहे.

Happy

ओळ क्र.२१ = जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
काफिया : मागतो,ठेवतो,पाहतो ,बोलतो
रददीफः मी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा

या वेळची ओळ आव्हानात्मक असून, ज्ञानेश सारख्या सिद्धहस्त गझलकाराची ओळ आहे,शिवाय या ओळीवर ज्ञानेशची स्व्तःची अत्यंत लोकप्रिय गझल सुद्धा उपलब्ध आहे. छोट्या बहरातील तसेच सोप्या वृत्तांतील ओळींनंतर जरा कठीण वृत्त तरहीसाठी दिले आहे,तरी सर्व गझलकारांनी अधिकाधिक प्रमाणात सहभागी होवुन उत्तमोत्तम गझला द्याव्यात. Happy

ओळ क्र.२२ =हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे? ज्ञानेश यांची ओळ
वृत्त : सुमंदारमाला
काफिया : जावे,खावे,विसावे,जडावे इ.इ.
रददीफः कुठे
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

निकाला नंतर तरहीतल्या गझला शायरांनी स्वतःच अप्रकाशीत केल्यास इतर वाचकांचा मागे उल्लेखलेला त्रास बर्‍याच अंशी कमी होईल असे वाटते. शिवाय प्रत्येकाची गझल बेफींच्या धाग्यावर असेलच. ..सूचना आहे...बाकी आपण ठरवावे.

'तरही' उपक्रमाबद्दल माझे व्यक्तिगत मत काहीसे प्रतिकूल असले, तरी हा उपक्रम चालवणारे आणि यात सहभागी होणारे सगळेच कवी माझे चांगले यारदोस्त असल्यामुळे मी अद्याप त्याबद्दल काहीसा तटस्थ होतो. पण आज माझीच ओळ तरहीसाठी दिल्यावर भूमिका घेणे भाग आहे.
यावेळी तरहीसाठी माझ्याच एका गझलेची ओळ देण्यात आली आहे, आणि मला त्याबद्दल विचारणा करण्यात आलेली नाही. कैलास व इतर संयोजक मित्रच असल्याने त्यांना तशी गरज न वाटणे समजण्यासारखे आहे, पण मला विचारले असते तर कदाचित मी ती ओळ तरहीसाठी वापरू दिली नसती. असे करण्यामागे काहीएक कारणमिमांसा माझ्याकडे आहे, जी सर्वांना पटण्यासारखी असेलच असे नाही. बरी-वाईट कशीही असली तरी मला माझ्या गझलेचे असे "सार्वजनिकीकरण" नापसंत आहे, आणि हे मला माझ्या खाजगी विश्वावरील अतिक्रमण वाटते. (शिवाय एका प्रसिद्ध मायबोलीकर गझलकाराचे 'तरही' अनुभवही त्रासदायक ठरल्याचा इतिहास मला ज्ञात आहेच.)

आता ओळ दिली गेली आहे आणि त्यावर तीन-चार गझलाही येऊन गेलेल्या दिसत आहेत, अशा वेळी हरकत घेणे बरे दिसणार नाही, म्हणून मी आक्षेप घेत नाही- फक्त नापसंती व्यक्त करून थांबतो. मात्र यापुढे 'तरही' उपक्रमासाठी माझ्या रचनांचा वापर केला जाऊ नये, अशी विनंती संयोजकांना आहे. संयोजक मित्रच असल्याने माझ्या सदर प्रतिसादाला सकारात्मक प्रतिसाद देतील, यात शंका नाही ! Happy

ज्ञानेश जी....http://www.maayboli.com/node/28546 मी लिहिलेली आपल्या ओळीवरील तरही अक्षेपार्ह असेल तर मी ती रद्द करेन... कृपया मी काय करावे हे कळवा

१०० % सहमत ज्ञानेश!!

तुझी ओळ पाहिल्यावर मलाही थोडा धक्काच बसला होता.. पोस्ट झालेल्या तुझ्या ओळीवरील एकाही तरहीवर मी प्रतिसाद दिलेला नाही आणि मी स्वत: त्यावर गझल लिहायची नाही हे ठरवले होते... अर्थात माझी त्यामागची भूमिका थोडी वेगळी आहे.

माझी त्यामागची भूमिका - तुझी ती गझल माझी स्वतःची अत्यंत आवडती गझल आहे. its one of the best of yours! अशा वेळी जे माझ्यामते बेस्ट आहे त्याला अजिबात हात लावायचा नाही असं मला प्रकर्षाने वाटलं.. मी त्याच ओळीवर तितक्या तोडीची गझल लिहू शकेन अथवा नाही हा नाहीये (कदाचित लिहू शकणार नाहीच इतकी अप्रतिम गझल तू लिहिली आहेस), पण तुझ्या गझलेशीही जो आपलेपणा मला वाटतो (आणि हे मी तुला सांगितलंही आहे) तो तसाच ठेवायचा आहे मला...
तरी तुझ्या भूमिकेला पाठिंबाच!

डॉकना विनंती, ज्ञानेशच नव्हे तर इतरांचेही मास्टरपीसेस शक्यतो तसेच ठेऊया... its better to create an independent new masterpiece! Happy

धन्यवाद! Happy

ज्ञानेशजींशी शतप्रतिशत सहमत.

तरही साठी ही ओळ वापरायला तुम्ही मंजूरी का दिली, अशी नापसंती व्यक्त करणारा विपू मी ज्ञानेशजींना करायचा ठरवले होते. पण माझे मत ते सकारात्मक घेतील का, असा माझा मलाच प्रश्न पडल्याने मी टाळले होते.

असो,
जुन्या गझलेतील ओळ देण्यापेक्षा 'तरही' साठी नवीन ओळ रचून ती दिली गेली पाहिजे, असे मला वाटते.

कारण

तरही वर जुन्या गझलेतील ओळ घेऊन रचना सादर झाल्या तर मुळ गझलकाराने ज्या प्रेरणेने आणि उद्देशाने ती गझल लिहिली त्या उद्देशाचाच "सत्यानाश" होतो असे माझे मत आहे.

'तरही' हा गझलेतला फार पूर्वापार चालत आलेला प्रकार असला तरी मला व्यक्तिशः कधीच रुचला नाही. फार तर नवागतांसाठी प्रात्यक्षिकासारखाच उपयोग व्हायला हवा. शिवाय अशा तरहीवर लिहिलेल्या गझला खाजगी स्वरूपात चारचौघात वाचन्/गायना पुरत्याच मर्यादित असावा. प्रकाशित व्हायला नकोत.
फार तर कवितांमध्ये कवितांचे विडंबन करताना ज्या तर्‍हेने मर्यादा पाळल्या जातात, तेवढ्या तरी पाळल्या जाव्यात, असे माझे प्रामाणिक मत आहे.

मला माझ्या अंगावरती पाजेचिना....!! या कवितेतील ओळी आठवल्या.

अस्सलाची विटंबना, तिला नक्कल का म्हणावे?
बुरशीवाणी परजीवी, तिला अक्कल का म्हणावे?

(ही माझी स्वतःची मते आहेत. ती इतरांना पटलीच पाहिजे असा अजिबात आग्रह नाही.)

ज्ञानेश,

तुम्हाला विचारले'च' गेले नाही हे मला धक्कादायक वाटते. मला वाटले की हे चर्चेच्या माध्यमातून झालेले आहे.

असो!

बाकी तुमच्या निर्णयाबाबतः

गझलेची जमीन किंवा पूर्णपणे एखादा मिसराही एखाद्या गझलकाराचा नसतो. मी उद्या तुमची एखादी ओळ वापरून त्याच जमीनीत गझल रचू शकतो व उलटेही होऊ शकते. आपण फक्त नापसंती व्यक्त केली आहेत हे पूर्णपणे जाणूनही मला खालीलप्रमाणे म्हणावेसे वाटते:

१. ही ओळ ज्ञानेश पाटील यांची आहे असे सांगण्यापुर्वी कैलासरावांनी तुम्हाला विचारायला पाहिजे होते.

२. ही ओळ तरहीसाठी घ्यायची आहे असे (आपल्या नावाचा उल्लेख न करता) म्हंटले गेले असते तर काही मुद्दाच नसता कारण कोणतीही ओळ तरहीसाठी घेतली जाते. (उदाहरणार्थः जरा कर जोर सीनेपर के तीरे-पुरसितम निकले ) (या ओळीवर गालिबपेक्षा दागचाच शेर अधिक चांगला झाला) Happy (इत्यादी!)

कैलासराव, तरही हा उपक्रम केवळ गझलेच्या प्रसारापुरताच असावा असे माझे स्पष्ट मत आहे. त्यात असली राजकारणे नसावीत. कंप्लीटली अपसेट! क्षमस्व!

ज्ञानेश - आय फील यू कुड ऑब्झर्व्ह व्हॉट ऑल हॅपन्स टू दॅट मिसरा ऑफ युअर्स थ्रू धिस! Happy

कैलासराव, वरील माझे मत माझ्या गझलांमधील ओळीसाठी लागू नाही. मला तरी अभिमानच वाटेल जर माझी एखादी ओळ न विचारता घेतली गेली तर! Happy

-'बेफिकीर'!

आणी याला म्हणावे शक्कल ( एखाद्या विषयाची अनास्था असावी पण ढोंग असता कामा नये )

http://www.maayboli.com/node/28315

१) तरहीवर लिहिलेल्या हजलेला स्पर्धेत स्थान दिले जाणार नाही काय? नसेल तर का नाही याचे स्पष्टीकरण आवश्यक

(ही माझी स्वतःची मते आहेत. ती इतरांना पटलीच पाहिजे असा अजिबात आग्रह नाही.)

मयुरेशजी, तुमची पोस्ट मला उद्द्शून असावी, असे दिसते. एखाद्या विषयाची अनास्था असावी पण ढोंग असता कामा नये असे एखाद्याबद्दलचे किंवा माझ्याबद्दलचे मत बनवायचे तुमचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे.

वरील पोस्टमध्ये मी तरही प्रकाराला विरोध केला नाही.

जुन्या गझलेतील ओळ देण्यापेक्षा 'तरही' साठी नवीन ओळ रचून ती दिली गेली पाहिजे, असे मला वाटते. असे म्हटले आहे.

यातून हे स्पष्ट व्हायला हरकत नाही. आणि नवीन ओळ रचने आणि ती तरही साठी वापरणे, म्हणजे अशक्य कोटीतील बाब नाही. सहज शक्य असलेली गोष्ट आहे.
---------------------------------
मला जेव्हा तरहीसाठी जुन्या गझलेतील ओळ दिली जाते, हे माहीत नव्हते तेव्हा मी काही "तरही" गझल लिहिल्याच आहेत. त्या मायबोलीवर मिळू शकतील.

नंतर जेव्हा मला थोडा अंदाज आला तेव्हापासून मी "तरही" वर गझल लिहायचे टाळलेले आहे.
त्याऐवजी "हजल" लिहिण्याचा प्रयत्न केला. बहुधा ही माझी तरही वरची दुसरी हजल आहे.
--------------------------------
हा विषय आज चर्चेला आला म्हणून मी बोलतो, असे नाही. एक महिन्यापूर्वी फेसबूकवर प्रा. ज्ञानेश वाकुडकर,मी आणि इतर सहा-सात गझलकारांनी "तरही" बद्दल चर्चा केली आहे. तेव्हाही मी माझे हेच मत व्यक्त केले होते. त्या लिंक आताही मिळू शकतील.
-------------------------------------
हा मुद्दा व्यक्तिगत स्वरूपाचा नसून एकंदरीत गझलेचाच आहे, असे मला वाटते. Happy

मयुरेशजी, तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये अनेक मते न मांडता केवळ एकच मत व्यक्त केले आहे.
म्हणून माझे वाक्य जसेच्या तसे कॉपीपेस्ट न करता

(हे माझे स्वतःचे मत आहे. ते इतरांना पटलेच पाहिजे असा अजिबात आग्रह नाही.)

असे लिहायला हवे होते. Happy

Pages