गझल रचना.... तरही गझल.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 December, 2010 - 04:49

गालिब्,मीर आदि शायर मैफिल संपल्यावर एक ओळ देत्,की ज्या ओळीचा उपयोग मतल्यात सानी मिसरा म्हणून करुन पुढच्या वेळेस त्यावर आधारीत एक गझल तयार करून आणायची असे.

असाच प्रयोग्,गझल सागर प्रतिष्ठान च्या वतीने मुंबई इथे काही काळ चालला. .... माझ्याशी नियमित संपर्क असलेल्या काही शायरांनी त्यात उत्तमोत्तम गझल रचून गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय व्हावा,सर्वमान्य व्हावा म्हणून बराच हातभार लावला आहे.

गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर्,प्रसादपंत्,भुंगा यांचेशी गप्पा मारताना गेली काही दिवस एक मैफिल्,एक गझल अश्या तून काही सामूहिक गझलांची निर्मिती झाली. हीच कल्पना पुढे नेवून नियमित पणे तरही गझल रचाव्यात ह्या कल्पनेतून हा धागा सुरु करतोय.

ह्यात दर आठवड्याला एक ओळ देण्यात येईल व ती ओळ मतल्यातील सानी मिसर्‍यात चपखल बसवून गझल रचावयाची आहे. आपणा सगळ्यांचे यात स्वागत आहे.

आजची ओळ आहे.

ओळ क्र.१ = जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

वृत्त : आनंदकंद
काफिया : जगण्यात किंवा अर्थ
रदीफ : अर्थ नाही किंवा नाही
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२= सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
वृत्त : चामर
काफिया : उन्हात
रदीफ : मी
लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.३= कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
वृत्त : वियदगंगा
काफिया : वाटले
रदीफ : होते
लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ४ = तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : नकार
रदीफ : आहे
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

ओळ क्र.५ = दु:ख आता फार झाले
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रदीफ : झाले
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र.६ = थांबणे सोसेल तोवर लागते चालायला ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - चालायला, वाकायला, जायला, यायला, व्हायला वगैरे स्वरुपी ('आ'यला समान)

ओळ क्र.७ = वादात या कुणीही सहसा पडू नये
वृत्त - विद्युल्लता
रदीफ - नये
काफिया - पडू
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा

ओळ क्र.८ = ठरेन या जगात मी,महान एकदा तरी ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : एकदा तरी
काफिया : महान
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र.९ = थेट माझ्या सारखा तो कोण होता ? डॉ.अनंत ढवळे यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : कोण होता
काफिया :सारखा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. १० = अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
वृत्त : आनंदकंद
रदीफ = माणसे ही
काफिया = छळतात
लगावली= गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ११ = कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मंदाकिनी
काफिया - आराम, दाम, ठाम, उद्दाम वगैरे
अलामत - आ
रदीफ - पहिल्यासारखा
गागालगा गागालगा गागालगा गागालगा

ओळ क्र.१२ = षंढ म्हणती लोक सारे,ऊठ तू आता तरी
वृत्त - कालगंगा
काफिया = सारे,तारे,वारे,न्यारे,उतारे,दारे,यारे, वगैरे
अलामत -आ
रदीफ - ऊठ तू आता तरी
लगावली - गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र.१३ = माणसे व्यर्थ मी जतन केली ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त = लज्जिता
काफिया = जतन, गहन, सहन इ.इ.
अलामत - अ
रदीफ - केली
लगावली - गालगा गालगा लगागागा

ओळ क्र.१४ = विसरणेही तुझ्या लक्षात नाही ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मृगाक्षी
मात्रा - १९
लगावली - लगागागा लगागागा लगागा
काफिया - लक्षात, गावात, रस्त्यात, कोणात, जात, आत इत्यादी
अलामत - आ
रदीफ - 'नाही'
किमान शेर - मतला धरून पाच

ओळ क्र.१५=अजूनही मी तुझ्याचसाठी जिवंत आहे ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - सती जलौघवेगा
लगावली - लगालगागा लगालगागा लगालगागा
मात्रा - २४
काफिया - जिवंत, महंत, संत, वसंत, आसमंत इत्यादी
अलामत - अं
रदीफ - 'आहे'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र.१६=आला पाउस गेला पाउस ( श्री .प्रसाद गोडबोले,''पंत'' यांची ओळ )
वृत्त - पादाकुलक
लगावली - गागागागा गागागागा

ओळ क्र.१७ = श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गांव मनोहर (उमेश कोठीकर यांची ओळ.)
वृत्त - गागागागा * ४ - किंवा ३२ मात्रांचे मात्रावृत्त
काफिया - मनोहर, घर, उत्तर, जर, तर, अंबर इत्यादी स्वरुपाचे
रदीफ - रदीफ नाही
अलामत - 'अ'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र. १७ = खोल खोल आतवर तुझी नजर
वृत्त = श्येनिका
काफिया = नजर्,उदर्,अधर्,शहर इ.
अलामत = अ
रदीफ = नाही.गैरमुरद्दफ
लगावली =गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.१८ = काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
वृत्त = कालगंगा /देवप्रिया
काफिया = आनंदण्याची, ......... पेरण्याची,तारण्याची,वाकण्याची,अंधारण्याची इ.इ.
अलामत्=अ
रदीफ= कारणे
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.१९ = ही जगाची रीत नाही
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रददीफः नाही
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र. २० = चांदणे आहे खरे की भास नुसता ?.......नचिकेत जोशी,आनंदयात्री यांची ओळ
वृत्त : मंजुघोषा
रदीफ :नुसता
काफिया :भास्,खास्,आभास्,त्रास्,इ..इ..
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.२१ = जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
काफिया : मागतो,ठेवतो,पाहतो ,बोलतो
रददीफः मी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र.२२ =************************************************
वृत्त : सुमंदारमाला
काफिया : जावे,खावे,विसावे,जडावे इ.इ.
रददीफः कुठे
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

ओळ क्र.२३ *********************************************************************************************************
वृत्त :तोटक
काफिया :खरा,जरा,बरा,धरा,करा
रदीफ : गैरमुरद्दफ
लगावली :ललगा ललगा ललगा ललगा

ओळ क्र.२४ :शेवटी संपायला आलीच ही एकांकिका......भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ.
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - एकांकिका, मालिका, विका, शिका, टिका, राधिका, इत्यादी
अलामत - र्‍हस्व इ
शेर - मतला धरून पाच
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.२५ : या इथे कधी काळी देखणे शहर होते.......... बेफिकिर यांची ओळ
वृत्त : रंगराग
रदीफ : होते
काफिया : शहर्,गजर्,अधर्,पदर्,इ.इ.
अलामत : अ
लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा

ओळ क्र.२६ :कशास त्याची वाट पहावी,जे घडणे आहेच असंभव....... अमितदेसाई, बागुलबुवा यांची ओळ
वृत्त : वनहरिणी ( मात्रा वृत्त्, अष्ट मात्रिक ४ आवर्तने )
रदीफ : नाही..गैरमुरद्दफ
काफिया : असंभव्,अनुभव्,वैभव्,संभव्, उद्भव,

ओळ क्र.२७ : हा कोणत्या दिशेचा,आहे प्रवास अजुनी............नयना मोरे, मी_ आर्या यांची ओळ
वृत्त : आनंदकंद
रदीफ : अजुनी
काफिया : प्रवास्,भास्,तास्,निवास्,श्वास
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२८ : तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता
वृत्त : वियदगंगा
रदीफ : होता
काफिया : ओलावला, पाणावला,भंडावला,पावला,धावला,इ.इ...
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र.२९ : सोड चिंता मीच माझे पाहतो आता '' कणखर'' यांचि ओळ
वृत्त : राधा
रदीफ : आता
काफिया : पाहतो,वाहपाहतो,वाहतो,साहतो,राहतो,नाहतो
लगावलि : गालगागा गालगागा गालगागा गा

ओळ क्र. ३०: जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे.
वृत्त : वियदगंगा
रदीफ : आहे
काफिया : रेंगाळतो,जाळतो,टाळतो,हेटाळतो
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ३१: हृदय एवढे धडधडत का असावे?
वृत्त :भुजंगप्रयात
रदीफ : असावे
काफिया : सौतीकाफिया " आ'' कारान्त स्वरकाफिया
लगावली :लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र. ३२: कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले ? डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : राहिले,पाहिले,साहिले,वाहिले,दाहिले,
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र. ३३: जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : देवप्रिया
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : माझ्यासवे, चालवे,आसवे, कालवे, काजवे,आठवे, जाणवे,पारवे,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३४: पिंजर्‍याला मानती आकाश रावे गझलसम्राट सुरेश भट यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : रावे, व्हावे, असावे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३५ : येत जा देवून थोडी कल्पना
वृत्त : मेनका
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : कल्पना,प्रार्थना,वंचना,वासना,साधना,कामना,वेदना
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३६ : दाटते आहे निराशा फार हल्ली
वृत्त :मंजुघोषा
रदीफ : हल्ली
काफिया : फार्,चार्,आजार्,बाजार्,व्यापार.....
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३७ : आज आहे नेमका शुद्धीत मी
वृत्त : मेनका
रदीफ : मी
काफिया : शुद्धीत्,रीत्,प्रीत्,विपरीत्,गीत्,भीत्,आश्रीत,
लगावली : गालगागा गालगागा गालगा

khal.jpg

ओळ क्र. ३८ : चालला आहे कशाचा खल इथे
वृत्त : मेनका
रदीफ : इथे
काफिया :खल्,चल्,निश्चल्,बल्,कल्,दल्,कोलाहल
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३९ : सारे जुनेच आहे काही नवीन नाही....... शाम यांची ओळ.
वृत्त : आनंदकंद
रदीफ :नाही
काफिया : नवीन्,लीन्,दीन.विहीन्,हीन्,लगीन्,तीन्,अधीन्,मशीन,
लगावली :गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ४० :कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा.... रसप यांची ओळ.

लगावली - लगालगागा लगालगा - यती - लगालगागा लगालगा

वृत्ताचे नांव - ज्ञात नाही, कोणाला ठाऊक असल्यास कृपया नोंदवावेत.

काफिया - विरघळून / जळून / पळून / वळून इत्यादी

अलामत - 'ऊ' (दीर्घ ऊकार)

रदीफ - जा

ओळ क्र. ४१: आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
वृत्त : व्योमगंन्गा
रदीफ : तितकीच आहे
काफिया : वेदना , साधना, वन्चना,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.42 : सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची ( वैभव वसंत कुलकर्णी यांची ओळ )
वृत्त : वियद्गंगा
लगावली: लगागागा लगागागा लगागागा लगागागा
काफिये: ताज्या, माझ्या, साध्या , गेल्या
अलामत : तंत्रानुसार आ ह्या स्वरांतयमकाची अलामत..बाकी त्याच्या आधीच्या अक्षरावर आलेली जोडाक्षरातील उछारात येणारे वजन हेही अलामतीसारखे वारंवार येणारे ठरावे अश्या काफियांची अपेक्षा !!
रदीफ : विचारांची

ओळ क्र.४३ : आतला माणूस माझ्या जळत आहे.
वृत्त : मंजुघोषा
काफिया : जळत्,कळत्, वळत्,पळत्,हळहळत
रदीफ : आहे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

गुलमोहर: 

अक्कल, नक्कल आणि शक्कल

ही कविता सुद्धा आजची नाही. ती

16 May, 2010 - 10:32

ला लिहिली आहे. त्यावरून माझे मत हे ढोंग आहे असे मला तरी वाटत नाही.
हा
http://www.maayboli.com/node/16199
मायबोलीवरचा धागा.

(ही माझी स्वतःची मते आहेत. ती इतरांना पटलीच पाहिजे असा अजिबात आग्रह नाही.)

मत क्र १} आणी याला म्हणावे शक्कल
मत क्र २} ( एखाद्या विषयाची अनास्था असावी पण ढोंग असता कामा नये )

असो तुमचे वाक्य जसेच्या तसे कॉपीपेस्ट कलेले नाही ...मी दोन मते वरील प्रमाणे मांडली आहेत ( एक तितली अनेक तितलियां..तसेच एक मत अनेक मते)
....................................................................................................................................................
स्पर्धा सुरळीत संपली.
पुढील वाटचालीसाठी काही प्रश्नाची उत्तरे आवश्यक आहे.

१) तरहीवर लिहिलेल्या हजलेला स्पर्धेत स्थान दिले जाणार नाही काय? नसेल तर का नाही याचे स्पष्टीकरण आवश्यक.
२) यापुढे तरहीवर गझल लिहिणार्‍यांना स्पर्धेत समाविष्ट होणे बंधनकारक राहील काय? की ऐच्छिक राहिल.

-गंगाधर मुटे

.......................................................................................................................................

'तरही' हा गझलेतला फार पूर्वापार चालत आलेला प्रकार असला तरी मला व्यक्तिशः कधीच रुचला नाही.

मुटेजी वरील वाक्य ही आपणच म्हणता आणी

नशीब माझं की हझल लिहिली, गझल नाही लिहिली. हे ही आपणच म्हणता...

मला एक कळत नाही व्यक्तिशः कधीच न रुचलेल्या विषयावर आपण हजल लिहिताच कशी ?.. कळस म्हणजे गझल न लिहिल्या ने स्वतहाला नशीबवान ही म्हणवता ? . म्हणजे न रुचणार्‍या विषयावर आपण हजल लिहीता (.. साहित्य निर्मीतीत असा पंक्तीप्रपंच का??? हे ही अनाकलनीयच) म्हणून म्हणतो मुटे साहेब भूमिका स्पष्ट हवी.. ढोंग नै करू.... "याला डबल ढोलकी" असे म्हणतात ..हा इथे मी नक्कीच म्हणेन की (हे माझे स्वतःचे मत आहे. ते इतरांना पटलेच पाहिजे असा अजिबात आग्रह नाही.) .. जर एखादा विषय खरोखरच एखाद्याला न रुचणारा आहे तर त्यात कुठल्याच प्रकारे सहभाग घेतला जात नाही मग गझलही बनायला नको आणी हजल ही नको... ( तुम्हाला तरही हा विषयच रुचत नाही म्हटल्यावर) हजलेला स्पर्धेत स्थान दिले जाणार नाही काय? नसेल तर का नाही याचे स्पष्टीकरण आवश्यक हा पाठ पुरावा तरी का हवा ?

अस्सलाची विटंबना, तिला नक्कल का म्हणावे?
बुरशीवाणी परजीवी, तिला अक्कल का म्हणावे?

या ओळीतून आपणास काय म्हणायचे आहे हे नकळण्या इतके आम्ही दूध खुळे नाही

तरही वर लिहिलेले जर बुरशी वाणी परजीवी (आयती मिळालेली ओळ )असल्याने तिला अक्कल का म्हणावे?

तर मग मुळातच न रुचणार्‍या तरही प्रकारावर लिहून वर (केवळ स्वतः हजल लिहिलिये म्हणून) स्पर्धेत स्थान दिले जाणार नाही काय? नसेल तर का नाही याचे स्पष्टीकरण आवश्यक - असे म्हणणार्‍याला चांगली शक्कल लढवणारा (वारा येइल तशी पाठ फिरवणारा)ढोंगी का म्हणू नये ..हा सवाल विचारावासा वाटतो..

मला व्यक्तीगत आपणास दुखवायचे नाही.. पण या वृत्तीची मनस्वी भिरड येते, कीळस वाटते.. आपण दुखावले जात असल्यास क्षमस्व ... संदर्भा साठी पुन्हा एकदा ही लिंक देत आहे http://www.maayboli.com/node/28315

मयुरेशजी, मुद्दा भरकटून चर्चा व्यक्तिगत पातळीवर घसरली, असे नाही वाटत? . असो.
http://www.maayboli.com/node/28315 या लिंकवर
आता "तरही" वर गझल लिहायची म्हणजे - एका नव्या साहित्यसंग्रामाला सामोरे जावे लागेल असे दिसते.
असे म्हटले होते. ते आता खरे ठरत आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
<<<आणी याला म्हणावे शक्कल ( एखाद्या विषयाची अनास्था असावी पण ढोंग असता कामा नये )>>>>
यामध्ये दोनच काय सव्वा दोन, अडीच, पावने तीन, तीन, साडेतीन किंवा त्यापेक्षा जास्त मते व्यक्त झाली आहेत, हे मी मान्य करतोय.
---------------------------------------------------------------------------------------------
हझल म्हणजे गंगाधर मुटे नाही. किंवा हझल माझा पेटेंट नाही. ती कोणिही लिहू शकते.
गझलेसोबतच हझलेला स्थान का नाही, असे विचारणे, यात माझा व्यक्तिगत फायदा होण्यासाठी मी तशी मागणी करतो, असा अर्थ घेणे अनाकलनीय आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
<<<चांगली शक्कल लढवणारा (वारा येइल तशी पाठ फिरवणारा)ढोंगी का म्हणू नये ..हा सवाल विचारावासा वाटतो..>>>
कुणाला काय म्हणायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एखाद्याला ढोंगी म्हणायचे असेल तर परवानगी घ्यावी लागत नाही.
तुम्ही मला सुद्धा ढोंगी म्हणणार असाल तर तसा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे. मी मनाई करणार नाही.
----------------------------------------------------------------------------------------------
<<<अस्सलाची विटंबना, तिला नक्कल का म्हणावे?
बुरशीवाणी परजीवी, तिला अक्कल का म्हणावे?
.
या ओळीतून आपणास काय म्हणायचे आहे हे नकळण्या इतके आम्ही दूध खुळे नाही>>>>

ही कविता मी तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली नाही. शिवाय ही रचना लिहिल्याला वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
<<<<मला व्यक्तीगत आपणास दुखवायचे नाही.>>>>
एखाद्याला ढोंगी वगैरे काय म्हणायचे ते म्हणून घ्यायचे. नंतर मला व्यक्तीगत आपणास दुखवायचे नाही.असेही म्हणायचे. पण याला मी दुटप्पीपणा वगैरे म्हणणार नाही.
तुमच्या दुखावल्याने मी दुखावला जाईन एवढा मी संवेदनशील प्राणी आहे असे मला वाटत नाही. मी बर्‍यापैकी निगरगट्ट आहे, असे मला वाटते. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------
आमचेकडे एक प्रथा आहे.
एखाद्या अंतयात्रेसोबत स्मशानघाटात गेलो आणि राख वगैरे विसर्जित करून घरी आलो की घरात प्रवेश घेण्यापूर्वी आंघोळ करावीच लागते.
ही प्रथा मला कधीच पटली नाही. गेल्या तीस वर्षापासून मी प्रखरतेने याचा विरोध करतो आहे.
दरवेळेस प्रेतयात्रा संपवून घरी आलो की, हे मला अजिबात पटत नाही असे म्हणतो आणि आपला विरोध प्रदर्शित करतो. घरची मंडळीही तितक्याच ताकदीने आंघोळीची प्रथा पाळणे किती आवश्यक आहे, हे मला पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात.
शेवटी, मला पटत नसूनही मी निमूटपणे आंघोळ करून घेत असतो.
गेल्या तीस वर्षापासून हा प्रकार नियमितपणे सुरू आहे.

मतपरिवर्तनाचे कार्य हे वारंवार आपली बाजू मांडत राहून वैचारीक परिवर्तन घडवून साध्य करायचे असते. ते इतरांवर बळजबरीने लादायचे नसते.

असे मला वाटते.

मुद्दा भरकटला आहे असे खेदाने म्हणत आहे. हे विधान कोणावरही केलेली टीका नव्हे.

मूळ मुद्दा जो आहे त्याबाबत पुन्हा एकदा मत लिहीत आहे.

१. मराठी गझलचे सीमीत क्षेत्र लक्षात घेता सगळेच एकमेकांना ओळखत असतात. तरही गझल हा उपक्रम नवीन गझलकारांना वृत्तावर पकड येणे व खयाल सफाईदाररीत्या मांडणे यात सहाय्य करण्याव्यतिरिक्त काही करत नाही. उर्दूमधे जे तरही मुशायरे व्हायचे ते कवींची तात्काळ कविता रचण्याची क्षमता व स्पर्धेतून मनोरंजन या हेतूने व्हायचे मात्र ती परिस्थिती मराठी गझलमधे आलेलीच नाही. अशा परिस्थितीत तरहीसाठी ओळ दिली जाताना मुळ कवीला माहिती देणे व मान्यता मिळवणे हे संयुक्तिक ठरेलच.

२. तरहीसाठी नवीन ओळ दिली जाणे याबाबत जे काही माहीत आहे ते इतकेच की नवीन ओळ दिली जाते हे खरे असावे. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. मात्र भटांच्या मिसर्‍यावर संगीता जोशींनी 'असा न कोणी' रदीफ असलेली गझल चित्तरंजन, वैभव, शाहीर व आप्पा उपस्थित असलेल्या भटांच्याच पुण्यतिथीनिमित्त भरतनाट्यम येथे आयोजीत केलेल्या मुशायर्‍यात सादर केली. एका ओळीवर, जमीनीवर किंवा कल्पनेवर कवीचा ठसा जरूर उमटलेला असतो, मात्र साहित्यक्षेत्रात या पातळीला कायदा असू शकत नाही. हंसराज रहबर यांनी त्यांच्या अभ्यासातून केलेल्या लेखनात गालिब व मीर यांचे वीस शेर एकासमोर एक ठेवून दाखवलेले आहेत. मीरचाच सही सही आशय असलेले गालिबचे शेर 'कम्युनिकेशनची माध्यमे' अजिबात नसलेल्या त्या जमान्यात गालिबला कसे काय सुचले असावेत हा प्रश्नच! यातून 'प्रभाव' याहीपेक्षा 'अंतिमतः एकाच वैचारिक पातळीला पोचण्याची शक्यता' या घटकाचा परिणाम अधिक असणार हे उघड होते. गझल सहयोगच्या मुशायर्‍यात येथील सर्व सहुदय मित्रवर्यांनी सहभाग घेऊन शोभा वाढवलेली आहे. त्या मुशायर्‍यात भटांची एक गझल केवळ सादरच करता येत नसे तर प्रत्येक मुशायर्‍याचे शीर्षकही भटांच्याच शेराचा एक भाग असे. हे सर्वश्री चित्तरंजन यांना मान्य होते. अर्थात, मी तसे त्यांना विचारलेले होते, पण त्यांनी तात्काळ मान्यता दिलेली होती. तरहिसाठी आपला मिसरा वापरला जाणे, तेही न विचारता ( न विचारता हे तर माझ्यामते अधिक महत्वाचे आहे) ही आनंददायी बाब (मला तरी) वाटते.

असो! निबंध सपवतो. Happy राग, रुसवे राहू नयेत अशी प्रामाणिक अपेक्षा! कैलासरावांनी खूप चिवटपणे व अनेक टीकाकारांना सामोरे जात चालवलेल्या या उपक्रमातून मायबोलीवरच किमान सहा नवीन गझलकार गझल लिहू लागले ही बाब दखल घेण्याजोगी मानून सर्वांनी आपले उदार सहाय्य येथे ठेवावे असे वाटते.

-'बेफिकीर'!

निव्वळ भूतकालीन इतिहासाच्या आधारावर वर्तमान व भविष्याकडे वाटचाल करता येणे शक्य नसते. अनेकदा त्यातूनच असे तापदायक प्रसंग उद्भवत असतात.

ज्या गझलकारांना स्वेच्छेने तरही साठी ओळ द्यायची असेल त्यांचीच ओळ घ्यावी, किंवा नवीन ओळ लिहून द्यावी.
एवढा चांगला,सहजसोपा, गुट्गुटीत,सुटसुटीत पर्याय उपलब्ध असताना, निष्कारण

कोणाचीही ओळ घेता येतेच, अशी पद्धतच आहे

असा विनाकारण अट्टाहास धरण्याचे काहीही कारण दिसत नाही. Happy

हंसराज रहबर यांनी त्यांच्या अभ्यासातून केलेल्या लेखनात गालिब व मीर यांचे वीस शेर एकासमोर एक ठेवून दाखवलेले आहेत. मीरचाच सही सही आशय असलेले गालिबचे शेर 'कम्युनिकेशनची माध्यमे' अजिबात नसलेल्या त्या जमान्यात गालिबला कसे काय सुचले असावेत हा प्रश्नच! यातून 'प्रभाव' याहीपेक्षा 'अंतिमतः एकाच वैचारिक पातळीला पोचण्याची शक्यता' या घटकाचा परिणाम अधिक असणार हे उघड होते. >>>

सहमत,

असेच अनेक शेर श्री. अयोध्याप्रसाद गोयलीय यांनी त्यांच्या शेर-ओ-सुखन ह्या पुस्तकमालिकेत अनेक शायरांचे दिलेले आहेत

जसे मीर व सौदा, मुसहफी व इंशा, गालीब व अनीस, आतिश व नासिख इ.इ. - ह्या दिलेल्या जोड्या समकालीन होत्या हे नमूद व्हावे.

अवांतर - कणखरराव, ते पुस्तक मलही हवे आहे, कोठे मिळेल ते सांगु शकाल काय?

=========================================================

असो, विषय संपवू आणि ही ओळ आता झालेल्या गझलांनंतर बंद करून नवीन ओळ द्यावी अशी कैलासरावांना विनंती!

Happy

भूषणजी,

हिंदी ग्रंथ कार्यालय
सी. पी. टँक सर्कल
मुंबई
श्री. मनिष मोदी

इथे आणखीही अनेक सुंदर पुस्तके आहेत Happy

ओळ क्र.२३ =क्षण एक पुरे जगण्यास खरा,
वृत्त :तोटक
काफिया :खरा,जरा,बरा,धरा,करा
रदीफ : गैरमुरद्दफ
लगावली :ललगा ललगा ललगा ललगा

ही ओळ नवीन आहे किंवा अन्य कुणाची ते लिहिले तर कमी बरे होईन.

लिहावे आतातरी. अशी विनंती Happy

कमी बरे होवो की जास्त बरे होवो,
होवो काहीही, बरे अथवा वाईत पण..
विनंती अशी की,
नवीन की जुनी ते लिहा एकदा. Happy

तरही सारख्या गंभीर धाग्यावर बालिशपणा बंद व्हावा अशी माझ्यासकट सर्व म्हातार्‍यांना(३५ शी च्या पुढचे) नम्र विनंती

<<<<तरही सारख्या गंभीर धाग्यावर बालिशपणा बंद व्हावा अशी माझ्यासकट सर्व म्हातार्‍यांना(३५ शी च्या पुढचे) नम्र विनंती>>>>

प्रचंड अनुमोदन!

कणखरजी, बेफिकीरजी

ओळ नवीन आहे किंवा जुनी एवढे सांगायचे सोडून

तरही सारख्या गंभीर धाग्यावर बालिशपणा बंद व्हावा अशी माझ्यासकट सर्व म्हातार्‍यांना(३५ शी च्या पुढचे) नम्र विनंती

असे वाक्य वापरणे हे फारच हुशारीचे, सभ्येतेचे, संस्कृतीचे, परिपक्वतेचे आणि शहाणपणाचे लक्षण मानायचे काय?

तुम्हाला एवढीच कंपूबाजी करायची असेल तर धागा ओपण कशाला ठेवताय? सिमीत आणि मर्यादीत लोकांनाच भाग घेता यावा म्हणून मायबोलीवर "ग्रूप" बनविता येतो. तसा बनवावा. मी येणार नाही.

मग तुमची कंपूबाजी तुम्हाला लखलाभ.

<<<<ओळ नवीन आहे किंवा जुनी एवढे सांगायचे सोडून>>>>

विचारणारे आपण कोण? आपली ओळ आहे काय? आणि समजा असली तरी त्याचा कॉपीराइट आहे काय? गझल रचायची असल्यास रचा अन्यथा नका रचू!

<<<<असे वाक्य वापरणे हे फारच हुशारीचे, सभ्येतेचे, संस्कृतीचे, परिपक्वतेचे आणि शहाणपणाचे लक्षण मानायचे काय?>>>>

आपली परिपक्वता गेले आठ दिवस मी व अनेकांनी पाहिलेली आहे. केवळ आपली परिपक्वता आणखीन बहरत राहू नये व हास्यास्पद पातळीच्याही पुढे पोचू नये म्हणून मी माझा धागा अप्रकाशित केला. तेही आपल्याला कदाचित वाटेल की आपल्याला घाबरलो की काय! हट्टी बालकासारखे आपले प्रतिसाद वाचून डोके फिरू नये म्हणून अप्रकाशित केली ती गझल!

<<<<तुम्हाला एवढीच कंपूबाजी करायची असेल तर धागा ओपण कशाला ठेवताय? सिमीत आणि मर्यादीत लोकांनाच भाग घेता यावा म्हणून मायबोलीवर "ग्रूप" बनविता येतो. तसा बनवावा. मी येणार नाही.>>>>

सल्ला देणारे आपण कोण? हा धागा असाच चालू राहणार आहे. कंपू??? आणखीन एक हास्यास्पद प्रतिसाद! माझा मायबोलीवर कंपु आहे हे विधान मायबोलीच्या काही जणांना ऐकवा, ते किती हासतील त्यावरून तुमचे तुम्हालाच समजेल.

<<<<मग तुमची कंपूबाजी तुम्हाला लखलाभ.>>>>

आता खरे उत्तर देतो. येथे कंपूबाजी काहीच नाही. हा एक निखळ आनंदाचा धागा आहे. किमान दहा ते बारा तरही मिसर्‍यांवर चांगल्या गझला झालेल्या आहेत. कंपू करून येथे कोणालाही पैसे किंवा प्रतिष्ठा मिळणार नाहि आहे. आपण प्रथम एक शुद्ध, लयबद्ध, आशयघन व गझलियत जाणवणारी गझल करून दाखवावीत अशी विनंती गझल म्हंटले की 'मला भंडायला कुरण मिळाले' अशा मुडमध्ये राहू नयेत ही दुसरी विनंती! विनंती मानने न मानणे तुमच्याच हातात आहे. मानणार नसलात तरी ओक्केच! पण न मानून पुन्हा वैयक्तीक पातळीवर येणार असाल तर मी जेथे भेटाल तेथे तुमची खबर घेत राहणार!

-'बेफिकीर'!

विचारणारे आपण कोण? आपली ओळ आहे काय? आणि समजा असली तरी त्याचा कॉपीराइट आहे काय? गझल रचायची असल्यास रचा अन्यथा नका रचू!

हे सांगणारे तुम्ही कोण?

आपली परिपक्वता गेले आठ दिवस मी व अनेकांनी पाहिलेली आहे. केवळ आपली परिपक्वता आणखीन बहरत राहू नये व हास्यास्पद पातळीच्याही पुढे पोचू नये म्हणून मी माझा धागा अप्रकाशित केला. तेही आपल्याला कदाचित वाटेल की आपल्याला घाबरलो की काय! हट्टी बालकासारखे आपले प्रतिसाद वाचून डोके फिरू नये म्हणून अप्रकाशित केली ती गझल!

तुमची मते तुम्हाला लखलाभ.

सल्ला देणारे आपण कोण? हा धागा असाच चालू राहणार आहे. कंपू??? आणखीन एक हास्यास्पद प्रतिसाद! माझा मायबोलीवर कंपु आहे हे विधान मायबोलीच्या काही जणांना ऐकवा, ते किती हासतील त्यावरून तुमचे तुम्हालाच समजेल.

हा धागा असाच याच तर्‍हेने गंभीरपणे चालविणार असाल तर मला काहीही अडचण नाही.

आपण प्रथम एक शुद्ध, लयबद्ध, आशयघन व गझलियत जाणवणारी गझल करून दाखवावीत

हे सांगणारे तुम्ही कोण?

शेवटी

ही ओळ नवीन आहे किंवा अन्य कुणाची हे विचारणारा मी कोणीच नाही. कारण मी तुमच्या कंपूतला नसावा, असा तुमचा समज दिसतोय.

ओळ पुन्हा एकदा चोरीची तर नाही ना? ही खात्री करायची होती म्हणून विचारले होते.
तुम्ही जाहीरपणे सांगत नाहीत त्यामुळे मी काय समजायचे समजलो आहे.

ही चर्चा मुद्दे सोडून भरकटायला लागली आहे.

त्यामुळे माझी ही शेवटची पोस्ट. आशा आहे की यानंतर कुणी माझ्यावर शरसंधान करून मला पोस्ट टाकायला भाग पाडणार नाही.

<<<<हा धागा असाच याच तर्‍हेने गंभीरपणे चालविणार असाल तर मला काहीही अडचण नाही.>>>>

Rofl

तुमच्या अडचणी विचारतंय कोण?

<<<<ओळ पुन्हा एकदा चोरीची तर नाही ना? ही खात्री करायची होती म्हणून विचारले होते.
तुम्ही जाहीरपणे सांगत नाहीत त्यामुळे मी काय समजायचे समजलो आहे.
>>>>

चला ही ओळ चोरलेलीच आहे. काय करताय???

<<<<माझी ही शेवटची पोस्ट. आशा आहे की यानंतर कुणी माझ्यावर शरसंधान करून मला पोस्ट टाकायला भाग पाडणार नाही.

>>>>

शरसंधान?? तरही गझलचा २१६५६ हा धागा म्हणजे कुरुक्षेत्र आहे काय?? Lol

वाद तुम्हाला वाढवायचा दिसतो. आणि वाद वाढवल्याचा दोष माझ्यावर लादायचा.

धागामालक डॉ.कैलास गायकवाडजी,
तुमचे मत हवे आहे. मी पोस्ट टाकणे थांबू की नको.

मुटेजी,

माझ्या वाक्याचा तुम्हाला एकट्यालाच का राग आला ह्याचे शांत चित्ताने उत्तर शोधायचा प्रयत्न करा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सापडतील

अरे काय चाललेय राव? Sad
कैलासदादांनी एवढा छान उपक्रम सुरू केलाय. त्याला पुढे न्यायचे सोडून नको त्या वादात कशाला पडताय. ज्ञानेशजींच्या बाबतीत एकदा झालेली चुक पुन्हा होणार नाही याची काळजी घेतले म्हणजे झाले.

Pages