गझल रचना.... तरही गझल.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 December, 2010 - 04:49

गालिब्,मीर आदि शायर मैफिल संपल्यावर एक ओळ देत्,की ज्या ओळीचा उपयोग मतल्यात सानी मिसरा म्हणून करुन पुढच्या वेळेस त्यावर आधारीत एक गझल तयार करून आणायची असे.

असाच प्रयोग्,गझल सागर प्रतिष्ठान च्या वतीने मुंबई इथे काही काळ चालला. .... माझ्याशी नियमित संपर्क असलेल्या काही शायरांनी त्यात उत्तमोत्तम गझल रचून गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय व्हावा,सर्वमान्य व्हावा म्हणून बराच हातभार लावला आहे.

गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर्,प्रसादपंत्,भुंगा यांचेशी गप्पा मारताना गेली काही दिवस एक मैफिल्,एक गझल अश्या तून काही सामूहिक गझलांची निर्मिती झाली. हीच कल्पना पुढे नेवून नियमित पणे तरही गझल रचाव्यात ह्या कल्पनेतून हा धागा सुरु करतोय.

ह्यात दर आठवड्याला एक ओळ देण्यात येईल व ती ओळ मतल्यातील सानी मिसर्‍यात चपखल बसवून गझल रचावयाची आहे. आपणा सगळ्यांचे यात स्वागत आहे.

आजची ओळ आहे.

ओळ क्र.१ = जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

वृत्त : आनंदकंद
काफिया : जगण्यात किंवा अर्थ
रदीफ : अर्थ नाही किंवा नाही
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२= सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
वृत्त : चामर
काफिया : उन्हात
रदीफ : मी
लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.३= कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
वृत्त : वियदगंगा
काफिया : वाटले
रदीफ : होते
लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ४ = तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : नकार
रदीफ : आहे
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

ओळ क्र.५ = दु:ख आता फार झाले
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रदीफ : झाले
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र.६ = थांबणे सोसेल तोवर लागते चालायला ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - चालायला, वाकायला, जायला, यायला, व्हायला वगैरे स्वरुपी ('आ'यला समान)

ओळ क्र.७ = वादात या कुणीही सहसा पडू नये
वृत्त - विद्युल्लता
रदीफ - नये
काफिया - पडू
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा

ओळ क्र.८ = ठरेन या जगात मी,महान एकदा तरी ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : एकदा तरी
काफिया : महान
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र.९ = थेट माझ्या सारखा तो कोण होता ? डॉ.अनंत ढवळे यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : कोण होता
काफिया :सारखा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. १० = अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
वृत्त : आनंदकंद
रदीफ = माणसे ही
काफिया = छळतात
लगावली= गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ११ = कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मंदाकिनी
काफिया - आराम, दाम, ठाम, उद्दाम वगैरे
अलामत - आ
रदीफ - पहिल्यासारखा
गागालगा गागालगा गागालगा गागालगा

ओळ क्र.१२ = षंढ म्हणती लोक सारे,ऊठ तू आता तरी
वृत्त - कालगंगा
काफिया = सारे,तारे,वारे,न्यारे,उतारे,दारे,यारे, वगैरे
अलामत -आ
रदीफ - ऊठ तू आता तरी
लगावली - गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र.१३ = माणसे व्यर्थ मी जतन केली ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त = लज्जिता
काफिया = जतन, गहन, सहन इ.इ.
अलामत - अ
रदीफ - केली
लगावली - गालगा गालगा लगागागा

ओळ क्र.१४ = विसरणेही तुझ्या लक्षात नाही ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मृगाक्षी
मात्रा - १९
लगावली - लगागागा लगागागा लगागा
काफिया - लक्षात, गावात, रस्त्यात, कोणात, जात, आत इत्यादी
अलामत - आ
रदीफ - 'नाही'
किमान शेर - मतला धरून पाच

ओळ क्र.१५=अजूनही मी तुझ्याचसाठी जिवंत आहे ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - सती जलौघवेगा
लगावली - लगालगागा लगालगागा लगालगागा
मात्रा - २४
काफिया - जिवंत, महंत, संत, वसंत, आसमंत इत्यादी
अलामत - अं
रदीफ - 'आहे'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र.१६=आला पाउस गेला पाउस ( श्री .प्रसाद गोडबोले,''पंत'' यांची ओळ )
वृत्त - पादाकुलक
लगावली - गागागागा गागागागा

ओळ क्र.१७ = श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गांव मनोहर (उमेश कोठीकर यांची ओळ.)
वृत्त - गागागागा * ४ - किंवा ३२ मात्रांचे मात्रावृत्त
काफिया - मनोहर, घर, उत्तर, जर, तर, अंबर इत्यादी स्वरुपाचे
रदीफ - रदीफ नाही
अलामत - 'अ'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र. १७ = खोल खोल आतवर तुझी नजर
वृत्त = श्येनिका
काफिया = नजर्,उदर्,अधर्,शहर इ.
अलामत = अ
रदीफ = नाही.गैरमुरद्दफ
लगावली =गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.१८ = काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
वृत्त = कालगंगा /देवप्रिया
काफिया = आनंदण्याची, ......... पेरण्याची,तारण्याची,वाकण्याची,अंधारण्याची इ.इ.
अलामत्=अ
रदीफ= कारणे
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.१९ = ही जगाची रीत नाही
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रददीफः नाही
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र. २० = चांदणे आहे खरे की भास नुसता ?.......नचिकेत जोशी,आनंदयात्री यांची ओळ
वृत्त : मंजुघोषा
रदीफ :नुसता
काफिया :भास्,खास्,आभास्,त्रास्,इ..इ..
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.२१ = जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
काफिया : मागतो,ठेवतो,पाहतो ,बोलतो
रददीफः मी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र.२२ =************************************************
वृत्त : सुमंदारमाला
काफिया : जावे,खावे,विसावे,जडावे इ.इ.
रददीफः कुठे
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

ओळ क्र.२३ *********************************************************************************************************
वृत्त :तोटक
काफिया :खरा,जरा,बरा,धरा,करा
रदीफ : गैरमुरद्दफ
लगावली :ललगा ललगा ललगा ललगा

ओळ क्र.२४ :शेवटी संपायला आलीच ही एकांकिका......भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ.
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - एकांकिका, मालिका, विका, शिका, टिका, राधिका, इत्यादी
अलामत - र्‍हस्व इ
शेर - मतला धरून पाच
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.२५ : या इथे कधी काळी देखणे शहर होते.......... बेफिकिर यांची ओळ
वृत्त : रंगराग
रदीफ : होते
काफिया : शहर्,गजर्,अधर्,पदर्,इ.इ.
अलामत : अ
लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा

ओळ क्र.२६ :कशास त्याची वाट पहावी,जे घडणे आहेच असंभव....... अमितदेसाई, बागुलबुवा यांची ओळ
वृत्त : वनहरिणी ( मात्रा वृत्त्, अष्ट मात्रिक ४ आवर्तने )
रदीफ : नाही..गैरमुरद्दफ
काफिया : असंभव्,अनुभव्,वैभव्,संभव्, उद्भव,

ओळ क्र.२७ : हा कोणत्या दिशेचा,आहे प्रवास अजुनी............नयना मोरे, मी_ आर्या यांची ओळ
वृत्त : आनंदकंद
रदीफ : अजुनी
काफिया : प्रवास्,भास्,तास्,निवास्,श्वास
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२८ : तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता
वृत्त : वियदगंगा
रदीफ : होता
काफिया : ओलावला, पाणावला,भंडावला,पावला,धावला,इ.इ...
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र.२९ : सोड चिंता मीच माझे पाहतो आता '' कणखर'' यांचि ओळ
वृत्त : राधा
रदीफ : आता
काफिया : पाहतो,वाहपाहतो,वाहतो,साहतो,राहतो,नाहतो
लगावलि : गालगागा गालगागा गालगागा गा

ओळ क्र. ३०: जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे.
वृत्त : वियदगंगा
रदीफ : आहे
काफिया : रेंगाळतो,जाळतो,टाळतो,हेटाळतो
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ३१: हृदय एवढे धडधडत का असावे?
वृत्त :भुजंगप्रयात
रदीफ : असावे
काफिया : सौतीकाफिया " आ'' कारान्त स्वरकाफिया
लगावली :लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र. ३२: कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले ? डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : राहिले,पाहिले,साहिले,वाहिले,दाहिले,
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र. ३३: जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : देवप्रिया
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : माझ्यासवे, चालवे,आसवे, कालवे, काजवे,आठवे, जाणवे,पारवे,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३४: पिंजर्‍याला मानती आकाश रावे गझलसम्राट सुरेश भट यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : रावे, व्हावे, असावे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३५ : येत जा देवून थोडी कल्पना
वृत्त : मेनका
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : कल्पना,प्रार्थना,वंचना,वासना,साधना,कामना,वेदना
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३६ : दाटते आहे निराशा फार हल्ली
वृत्त :मंजुघोषा
रदीफ : हल्ली
काफिया : फार्,चार्,आजार्,बाजार्,व्यापार.....
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३७ : आज आहे नेमका शुद्धीत मी
वृत्त : मेनका
रदीफ : मी
काफिया : शुद्धीत्,रीत्,प्रीत्,विपरीत्,गीत्,भीत्,आश्रीत,
लगावली : गालगागा गालगागा गालगा

khal.jpg

ओळ क्र. ३८ : चालला आहे कशाचा खल इथे
वृत्त : मेनका
रदीफ : इथे
काफिया :खल्,चल्,निश्चल्,बल्,कल्,दल्,कोलाहल
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३९ : सारे जुनेच आहे काही नवीन नाही....... शाम यांची ओळ.
वृत्त : आनंदकंद
रदीफ :नाही
काफिया : नवीन्,लीन्,दीन.विहीन्,हीन्,लगीन्,तीन्,अधीन्,मशीन,
लगावली :गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ४० :कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा.... रसप यांची ओळ.

लगावली - लगालगागा लगालगा - यती - लगालगागा लगालगा

वृत्ताचे नांव - ज्ञात नाही, कोणाला ठाऊक असल्यास कृपया नोंदवावेत.

काफिया - विरघळून / जळून / पळून / वळून इत्यादी

अलामत - 'ऊ' (दीर्घ ऊकार)

रदीफ - जा

ओळ क्र. ४१: आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
वृत्त : व्योमगंन्गा
रदीफ : तितकीच आहे
काफिया : वेदना , साधना, वन्चना,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.42 : सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची ( वैभव वसंत कुलकर्णी यांची ओळ )
वृत्त : वियद्गंगा
लगावली: लगागागा लगागागा लगागागा लगागागा
काफिये: ताज्या, माझ्या, साध्या , गेल्या
अलामत : तंत्रानुसार आ ह्या स्वरांतयमकाची अलामत..बाकी त्याच्या आधीच्या अक्षरावर आलेली जोडाक्षरातील उछारात येणारे वजन हेही अलामतीसारखे वारंवार येणारे ठरावे अश्या काफियांची अपेक्षा !!
रदीफ : विचारांची

ओळ क्र.४३ : आतला माणूस माझ्या जळत आहे.
वृत्त : मंजुघोषा
काफिया : जळत्,कळत्, वळत्,पळत्,हळहळत
रदीफ : आहे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

गुलमोहर: 

कैलासजींच्या उत्तराची वाट पाहतोय.
मग मीही येतो हसायला >>> कैलासजी काय हसायचं लायसन विकायला बसलेत काय? आणि तुम्ही इथे पोस्ट टाकायची की नाही हे सांगायला हा धागा म्हणजे काय त्यांचा रुमाल आहे काय? हे टाकू नका ते टाकू नका म्हणायला. तुमचा प्रश्न योग्य होता. ओळ कुणाची आहे? सांगायला हरकत नसावी. Biggrin

कैलासजी,

सध्या तुम्ही ऑनलाईन नसावेत असे गृहीत धरतो.
पण तुम्ही ऑनलाईन झाल्यावरही तुम्ही तुमची भुमिका स्पष्ट केली नाही तर या प्रकाराला
तुमची मुकसंमती आहे असे मी गृहीत धरेन. आणि पोस्ट टाकायला मोकळा होईन.

त्यानंतर या बाफवरची चर्चा भरकटली तर तो दोष मी स्विकारणार नाही. Happy

स्वामी निश्चलानंद यांच्या खालील गझलेची ओळ "तरही" वापरली गेली असावी, असे दिसते.
त्यांची ओळ वापरण्यापूर्वी त्यांनाही काहीही कल्पना दिली गेली नाही, हे जरासे स्पष्ट व्हायला लागले आहे.

त्यांच्या अनुमतीशिवाय ही ओळ देण्यात आलेली आहे, हे जर मला माहित असते, तर निदान मी तरी माझी गझल लिहिली नसती.

असो. याविषयी स्वामीजीचे काय मत आहे ते वाचायला आवडेल. Happy

---------------------------------------
Swamiji Nishchalanand
क्षण एक पुरे...

क्षण एक पुरे जगण्यास खरा,
जर भूत भविष्य मनी न ज़रा...

क्षण हा कळता तनु जेथ असे,
मन थांबविण्यासच धीर धरा...

मन आस धरील भविष्य कसे,
भय नष्ट करी क्षणकाल खरा...

गतकाळ बळे करि मोह मनी,
क्षण हा जगण्या पकडून धरा...

मिळतो जरि काळ इथे जगण्या,
मनि भान नसे फिरती नजरा...

जगण्यास जरी क्षण हाच मिळे,
मनि वृत्ति वृथा करिते कचरा...

मन चंचल का इतुके बनते,
जगण्यास खरोखर यत्न करा…

(वृत्त तोटक - ललगा ललगा ललगा ललगा)
- स्वामीजी १५ जुलै ०८
------------------------------------------------

आजच मला श्री गंगाधर मुटे यांनी माहिती दिली म्हणून हा धागा पहायला आलो.
झालं असं की त्यांनी फेसबुकवर एका समूहात "क्षण एक पुरे जगण्यास खरा" हा मिसरा वापरून एक गझल लिहिली.
मी याच मिसऱ्याची माझी तब्बल तीन वर्षांपूर्वीची रचना त्यांना दाखवली. तेंव्हा त्यांनी हा मिसरा या ठिकाणी तरही गझलसाठी दिला गेलेला असल्याचं सांगितलं.
हा धागा सुरू होण्याच्या निदान दोन वर्षे आधी माझी रचना दि. १५ जुलै २००८ रोजी नेटवर प्रसिद्ध झालेली असल्याचे प्रमाण देऊ शकतो.
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=45776237&tid=5223054693013...
(त्यावेळी ती रचना अन्य समूहांमध्ये सुद्धा दिली गेली होती. आता मी तिथला सदस्य नसल्याने त्या समूहांच्या पानावर सापडणार नाही.)

पण इथे येऊन पाहतो तर डॉ ज्ञानेशच्या रचनेचा मिसरा असाच न विचारता वापरला गेल्यावरून इथे बराच वाद झालेला दिसला.
माझ्या रचनेची ओळ देताना मला विचारले गेले तर नव्हतेच..... माझा तर नामोल्लेख सुद्धा नाही !!
तोटक सारख्या चाकोरीबाहेरच्या वृत्तात गझल दुसरा कोण लिहिणार...?
आता तर या ओळीची अक्षरश: वाट लागली आहे. ज्यांना कुठल्याच अक्षरवृत्ताचे नियम पाळता येत नाहीत, अशांनी तर या ओळीचा वापर करून गझलसदृश गाणी लिहिलेली पाहिली...!!

आणि आता इथे श्री मुटे यांनी माझी मूळ रचना सुद्धा दिली आहे.
मीही डॉ ज्ञानेशप्रमाणे झाल्या प्रकाराबद्दल नापसंती व्यक्त करतो. मी इथला सदस्य असलो तरी कधी चर्चेत वा उपक्रमात सहभागी झालेला नसल्याने तसा "प्रसिद्ध" नाही. पण म्हणून माझ्या रचनेची ओळ न विचारता वापरताना मला श्रेय सुद्धा दिलं जाऊ नये हे पटणारं नाही !!
जी डॉ ज्ञानेशची स्थिति, तीच माझी.... संयोजक आता व्यक्तिगत परिचयाचे झालेले आहेत, त्यामुळे केवळ तीव्र नापसंती व्यक्त करण्याव्यतिरिक्त अधिक वाद काय घालू...?

- स्वामीजी


बाकी....
श्री मुटे यांच्याशी चर्चेत आलेल्या "ओळ चोरली आहे, काय करणार आहात?" वगैरे सुभाषितांबद्दल काय बोलणार म्हणा....!!

आणि हो, इथल्या कोणा "गालिब"ला "विचाराच्या एकाच पातळीवर जाऊन" माझी ओळ सुचली असा तर्क देऊ नका म्हणजे मिळवली...! मी स्वत:ला "मीर" समजत नाही ... पण इथला कोणीही "गालिब" तोटकवृत्तात लिहीत नसावा हे नक्की..! आणि काटेकोर संस्कृत परंपरेच्या वृत्तात बद्ध लिखाणाबाबत माझं नाव पुरेसं प्रसिद्ध आहे....!

आत्ताच कैलासरावांशी बोललो, ते स्वतः स्वामी निश्चलानंदांशी आता बोलत आहेत. समज गैरसमज क्लिअर करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे.

ओळीचे काय झाले? ओळ सुचली(एकाच पातळीवर जाऊन) की चोरली हे त्यांच्या संभाषणात बहुदा स्पष्ट होईल त्यानंतर कैलास आणि गरज वाटल्यास स्वामी भाष्य करतील.

बरे वाटले, पण तरही गझल उपक्रमाला मिसरे सुचवणारे कित्येक जण येथे आहेत. असे मिसरे घेण्याची आवश्यकता का वाटत असावी??

अशाने त्यातील सगळी मजाच जाते. संकेतस्थळावर हा उपक्रम हास्यास्पद ठरू लागतो. गझल करण्याची उर्मी नष्ट होऊ शकते. कोणत्याही ओळीबाबत अशी शंका येऊ लागते.

कोणालाही न दुखावता चालू असलेला उपक्रम अशा दिशेने का गेला असावा? Sad

ज्ञानेश पाटील व स्वामी निश्चलानंद यांच्या मिसर्‍यांवर केलेल्या माझ्या गझला मी तरी अप्रकाशित करत त्या दोघांचा सन्मान ठेवत आहे. दोघांनी कृपया मनात राग धरू नये अशी विनंती!

-'बेफिकीर'!

कैलासरावांच्या मते ही ओळ त्यांना सुचली आहे, आणि ते खोटे बोलतील असा त्यांचा लौकीक नाही

कोणालाही न दुखावता चालू असलेला उपक्रम अशा दिशेने का गेला असावा?>>>>

तरही हा उपक्रम डॉ.कैलास गायकवाड स्वतःच्या प्रसिद्धीकरीता चालवतात असा सूर निर्माण होण्याआधी हा उपक्रम बंद करावा का असा विचार माझ्या डोक्यात घोळत आहे

आणि ते खोटे बोलतील असा त्यांचा लौकीक नाही>>> खोटे बोलतील हे शक्यच नाही. पूर्ण सहमत आहे.

तरही हा उपक्रम डॉ.कैलास गायकवाड स्वतःच्या प्रसिद्धीकरीता चालवतात असा सूर निर्माण होण्याआधी हा उपक्रम बंद करावा का असा विचार माझ्या डोक्यात घोळत आहे
>>>>

स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हेही पटत नाही. म्हणजे तसे असणे शक्यच नाही. जो माणूस केवळ एक गझल सादर करायला आणि इतरांच्या गझला ऐकायला स्वखर्चाने कितीही प्रवास करतो आणि तरीही लो प्रोफाईल राहतो, त्यांच्या बाबतीत असे कुणीच म्हणणार नाही. उपक्रम बंद करणे माझ्यामते चुकीचे ठरेल.

तरही हा उपक्रम डॉ.कैलास गायकवाड स्वतःच्या प्रसिद्धीकरीता चालवतात असा सूर निर्माण होण्याआधी हा उपक्रम बंद करावा का असा विचार माझ्या डोक्यात घोळत आहे

असहमत.

हा उपक्रम पुढे चालायलाच हवा. फक्त आपल्या भुमिकेत थोडे जुजबी बदल करणे गरजेचे आहे, एवढेच. Happy
डॉ. साहेबांबद्दल कोणी शंका घेईल असे मला तरी वाटत नाही.
मी त्यांना जवळून ओळखतो. सतत तीन दिवस त्यांच्या सहवासात राहण्याचे भाग्य मला मिळाले आहे. त्यांच्या विषयी माझ्या मनात कसलेच संदेह नाहीत, Happy

नमस्ते स्वामीजी!
आपली गझल वाचली. गझल मलातरी फारशी आवडली नाही. वृत्त खरंच मस्त आहे... लिहायला तितकेच अवघड आहे असं माझं मत!

अवांतरः आता राहावत नाही! मध्यस्थामार्फत करण्यापेक्षा थेट संवाद केव्हाही चांगलाच! सर्वांचीच कळकळ चांगली समजते सर्वांना! Wink जोपर्यंत डॉक स्वतः येऊन खुलासा करत नाहीत, तोपर्यंत इतरांनी पोस्ट-विसर्जन थांबवलं तरी चालेल नाही का? आणि डॉक इतके दिवस झाले तरी का खुलासा करत नाहीत हे जाणून घ्यायची घाईच असेल तर टेक्नॉलॉजी मदतीला आहे - he is just a call away!!
ह्या गोष्टी व्हायच्याच. हा अनुभव डॉक सकारात्मकपणे घेतीलच! त्यांच्या हेतूंबद्दल मलातरी कसलीच शंका नाही, त्यामुळे हे २ तरहींमुळे झालेले गैरसमज लवकरच दूर होतील ही खात्री आहे! Happy

तोपर्यंत नवीन तरही देणार का कुणी?

आनंदयात्री, मी लिहिलेला प्रतिसाद खोडला कारण वाद वाढवायचा नव्हता. मात्र एक सांगतो, मलाही मूळ गझल (स्वामींची) अजिबातच आवडली नाही, खरे तर मला ती गझलच वाटली नाही. मात्र तो मिसरा त्यांचा असल्याने व कैलासरावांनी खुलासा अजूनपर्यंत न केल्याने मी लिहिलेला प्रतिसाद खोडून टाकला. तुमच्याशी त्या बाबतीत प्रचंड सहमत आहे.

==========================

चला नवीन तरही मी देऊ काय? Happy

शेवटी संपायला आलीच ही एकांकिका

वृत्त - कालगंगा

रदीफ - गैरमुरद्दफ

काफिया - एकांकिका, मालिका, विका, शिका, टिका, राधिका, इत्यादी

अलामत - र्‍हस्व इ

शेर - मतला धरून पाच

ही ओळ माझीच आहे व फक्त मतला झालेला असल्याने माझी गझल मलाही अजून रचायचीच आहे. स्वारस्य असल्यास कृपया या मिसर्‍यावर गझल रचावीत.

सर्वांना धन्यवाद! Happy

-'बेफिकीर'!

नमस्कार स्वामीजी,
आपल्या भावना समजू शकतो, आपण महान गझलकार असाल याची शंकाच नाही पण मुद्दा सोडून ज्या गोष्टी बोललात त्या बाबत लिहावे वाटते,

मुद्दा एक...
तोटक सारख्या चाकोरीबाहेरच्या वृत्तात गझल दुसरा कोण लिहिणार...?
आपण या वृत्ताचे जनक आहात?
नसाल तर या करोडोंच्या राज्यात एकही माणूस आपल्या व्यतिरिक्त असे लिहूच शकत नाही हा अहम का?
आपण फार दिव्य वगैरे केल्याचा हा दुराभिमान कोणत्याही सामान्य गझलकारास सुध्दा न शोभणारा आहे.

मुद्दा दोन...

आता तर या ओळीची अक्षरश: वाट लागली आहे. ज्यांना कुठल्याच अक्षरवृत्ताचे नियम पाळता येत नाहीत, अशांनी तर या ओळीचा वापर करून गझलसदृश गाणी लिहिलेली पाहिली...!!

ताजमहालाच्या अनेक प्रतिकृती जगाच्या पाठीवर आहेत, म्हणुन ताजमहालाचे महत्व कमी होत नाही,
त्यामुळे आपल्याही या दिव्य ओळींचे नविन गझलकारांमुळे फारच नुकसान झाले आहे असे वाटत असल्यास ते चुकीचेच आहे.शिवाय आपल्याकडे यथायोग्य पुरावे असल्याने 'ज्ञानपीठ' वगैरेसाठीही अडचण येणार नाही. त्यामुळे निश्चिंत असा.
गझल आणि गाण्याबद्द्ल आपले मत कळाले तसे तर एक दोन शेर वगळता आपलीही गझल गाण्याहून वेगळी नाही.
आपल्याला ओळ घेण्यापुर्वी विचारावयास हवेच होते...हे बाकी मान्यच आहे,

परंतू हा धागा नविन गझलकारांना गझलांची कार्यशाळा उपलब्ध करून देणारा आहे, यात कुणाचा वैयक्तिक स्वार्थ किंवा अर्थकारण नाही ही बाब तरी विचारात घेण्यात यायला हवी होती.
.................................................................................................शाम

ज्ञानेश आणि स्वामिजींच्या तरहीवर लिहलेल्या गझला अप्रकाशीत करण्याची सगळ्यांना नम्र विनंती करतो.

शाम, आपल्याशीही प्रचंड सहमत आहे. मीही तेच लिहिणार होतो.

अर्थात, मी तर म्हणतो की मूळ गझलेपेक्षा (माझ्यामते) चांगल्याच गझला लिहिल्या गेल्या. पण हे विधान वादोत्पादक ठरेल. Happy

स्वामीजी आत्ताच डॉ गायकवाडजींशी फोनवर बोलले आहेत....
"क्षण एक पुरे जगण्यास खरा" हा स्वामीजींच्या जुन्या रचनेचा मिसरा आहे याची या धाग्यावर नोंद केली जाईल, असे ठरल्याचे कळते.

सन्मानजनक तोडगा निघाल्याने हा वाद येथेच संपवायला हरकत नाही. Happy

"क्षण एक पुरे जगण्यास खरा" हा स्वामीजींच्या जुन्या रचनेचा मिसरा आहे याची या धाग्यावर नोंद केली जाईल, असे ठरल्याचे कळते.>>>

पण वर त्यांनी जी मुक्याफळे उधळली आहेत , त्या वरून ही ओळ रद्द करण्याची मी विनंती करीत आहे..
मी बेफींच्याच ओळीवर लिहील स्विकारा किंवा नका स्विकारू.

बाप रे हे काय भयंकर प्रकरण आहे. एका छोट्याश्या दुर्लक्षासाठी एव्हढा गदारोळ मला समजला नाही.

डॉ़क्टरांनी चालवलेला हा पारदर्शी प्रोजेक्ट आहे अस मी मानतो त्यावर जर असे आक्षेपार्ह हल्ले होणार असतील तर सभ्यतेच्या व्याख्याच बदलायला हव्यायत बहुधा !

मै सिमटने के लिये हर बार तुमसे मिलता हूं
..तुमसे मिलता हूं तो कुछ और बिखर जाता हूं...!!!

प्रचंड मंथन. किती अवश्यक किती अनावश्यक हे ज्यानी त्यानी ठरवावे. स्वमीजीचा त्रागा त्यांच्या नावास शोभण्या सारखा नक्कीच नाही. हा सर्व गदारोळ टाळता आला असता. सर्व गजल मार्तंड चर्चेत सरसाऊन आले आहेत.मती गूंग होते. बरे वाटते की मी एक लहान माणूस आहे आणी काठावर बसून अवलिकन करू शकतो.
या सर्व एपिसोड मधे उगीच डॉक्ना मनस्ताप ! एका उत्कृष्ट आणी उमद्या व्यक्तिमत्वाला विनाकारण त्रास.
तरही प्रकार कोणीही बंद करायचा विचार सुद्धा मनात आणू नये. माझ्या सारख्या नवशिक्याला तरहीमुळे बरीच प्रेरणा मिळाली. मी तरहीत आता पर्यंत जवळ जवळ दहा गजला रचल्या आहेत ज्या नॉर्मल कोर्स मधे झाल्या नसत्या मी तर डॉकना सुचना केली होती. तरहीत इतक्या छान गजला येत आहेत की, निवडक तरही गजलांचा एक गजल संग्रह काढण्याची वेळ आली आहे. हे जर झाले तर गजल क्षेत्रात कदाचित असा पहिला "तरही गजल संग्रह" ठरेल.
डॉकना मी वयाने मोठा असल्यामुळे सल्ला: आगे बढते रहो. हाथी चलते रहना चाहिये.

ज्ञानेश आणि स्वामिजींच्या तरहीवर लिहलेल्या गझला अप्रकाशीत करण्याची सगळ्यांना नम्र विनंती करतो.

आपल्या विनंतीस मान देऊन .. कोणिही यातून दुखावले जाऊ नये म्हणून...
दोन्ही ओळीं वरील मी लिहिलेल्या गझला अप्रकाशीत केल्या आहेत...

बराच उहापोह झालेला पाहिला.

* मी तोटक वृत्ताचा जनक नसलो तरी शक्यतो संस्कृतमधून आलेल्या शिखरिणी, शार्दूलविक्रीडित, तोटक अशा वृत्तामध्येच लिहिण्याकडे माझा कल असतो..... त्यामुळे या वृत्तात (अशा ठिकाणी तरही साठी ओळ दिल्यावर लिहिणं वगळता) अन्य कोणी सहसा वळताना दिसत नाही.... इतकंच. तोटकवृत्तात लिहिल्याखातर मला कोणी ज्ञानपीठ सोडा, कसलाच पुरस्कार देणार नाहीये..... पण अशा संस्कृत वळणाच्या वृत्तात सहसा कोणी लिहीत नाही हे मात्र तितकंच खरं आहे. (डॉ ज्ञानेश यांच्यासारखा एखादाच मुरब्बी कवि सुमंदारमाला सारख्या लांबलचक वृत्ताला हात घालू शकतो... हाही असाच अपवाद मानावा लागेल...!)

* भले गझलसाठी माधव ज्युलियन आणि सुरेश भट या मातब्बरांनी प्रचलित केलेली वृत्ते असोत... पण त्यांची निश्चित लगावली (लघुगुरुचा क्रम) असतो असंच दिसून येतं. पण एका गा ऐवजी दोन ल वापरण्याची सूट घेताघेता मूळ वृत्ताच्या लगावलीला काही महत्त्वच शिल्लक रहात नाही. अशी सूट अपवादस्वरूपाने घेण्याऐवजी सूट घेण्यालाच नियम मानून मूळ वृत्ताचे रूप सर्वस्वी बदलून टाकणं मला तरी पटत नाही. ( आणि मी अशी सूट न घेता लिहिण्याचाच प्रयत्न करत आलो आहे.) आणि मूळ वृत्तांची लगावली धाब्यावरच बसवायची तर मग उर्दूप्रमाणे नुसता छोटी बहर, मँझली बहर आणि बड़ी बहर एवढंच वर्गीकरण पुरेल ना.... उगाच वृत्तांची नावं वापरायचीच कशाला...?

* "कोणीकोणी माझ्या ओळीवर गझलसदृश गाणी लिहिली" हे लिहिताना मी इथे त्या ओळीवर लिहिलेल्या रचना पाहिलेल्या नव्हत्या. इथे लिहिणाऱ्या कोणालाही दुखावण्याचा माझा हेतु नव्हता. मात्र असं म्हणण्याजोग्या रचना गेल्या दोन दिवसात ऑर्कूट आणि फेसबुकच्या काही कविता-समूहांमध्ये प्रकाशित झाल्यामुळे मनात तो त्रागा अवश्य होता.

* आणि हो, असा उपक्रम मुळीच बंद केला जाता नये. डॉ कैलास यांनी प्रयत्नपूर्वक सुरू केलेला हा उपक्रम मराठी गझलच्या क्षेत्रात नक्कीच भर घालणारा ठरेल असं मनापासून वाटतं.

* एका बाबतीत मी इथल्या मातब्बरांशी सहमत आहे..... माझी फालतूशी ओळ या उपक्रमातून वगळलेली बरी !!

- स्वामीजी

इतका वेळ खूप शांत होते.

पण एक मात्र आवर्जून सांगावंसं वाटतं.. की एखद्या गझलेतली ओळ तरही साठी दिली जाणं.. हा त्या गझलेचा, रचनेचा आणि गझलकाराचा सन्मानच नव्हे काय?
माझ्या गझलांची तशी लायकी नाही.. परंतु माझ्या रचनेतली एखादी ओळ जर अशी 'अभ्यासासाठी ' दिली गेली असती.. (हो अभ्यासच.. कारण या उपक्रमातून गझलेचा अभ्यास करूनच गझला मी लिहिलेल्या आहेत.) तर मी १०००० लोकांना ओरडून सांगितलं असतं की पहा.. माझी ओळ दिली आहे या वेळी अभ्यासासाठी. असो.. हे माझे वैयक्तिक मत आहे.

आजपर्यन्त.. मराठी कविता समुहावर.. अशा 'एका गझलेतली ओळ घेऊन' लिहिलेल्या गझलांचा उपक्रम खूप गाजला आहे.
कैलासदादा, जे काही करताहेत त्यामध्ये त्यांचा वैयक्तिक काही फायदा आहे.. हे म्हणणे म्हणजे केवळ मूर्खपणाच ठरेल. आजपर्यंत ज्या काही रचना माझ्याकडून लिहिल्या गेल्या.. त्यामध्ये या उपक्रमाचा ९०% वाटा आहे असेच म्हणवे लागेल. आणि यासाठी डॉक ना शतशः धन्यवाद.
दुसरी गोष्ट अशी.. की जगात तसं पाहिलं तर.. १००% प्युअर असं काहीच नसतं.मगदी साहित्य सुद्धा. माझ्याही कविता, गझला... कोणतीतरी एखादी सुंदर रचना वाचून त्यातून प्रेरणा घेऊनच लिहिल्या जातात माझ्याकडून. प्रेरणा वेगळी असते मात्र, त्यातल्या कल्पना, मांडण्याची पद्धत ही माझी स्वतःची असते. आणि बहुतांश कविंच असंच होत असावं असा माझा अंदाज आहे. काही अपवाद असतीलही... पण त्यात इतका उहापोह करण्यासारखं काहीच नाही नाहीये. आकाश तुटून पडलं, की जमीन फाटली... असा उहापोह इथे वाचला. आणि रहावलं नाही म्हणून शेवटी हा प्रतिसाद लिहिला.
ज्ञानेशजी आणि स्वामिजींच्या गझलेतल्या ओळीवर मीही तरही गझला लिहिलेल्या आहेत. त्या मी नक्कीच पोस्ट करेन.. कुणाला त्या आवडो अथवा न आवडो. माझ्या ब्लोग वर आणि फेसबुकच्या नोटस मध्ये ही नक्की करेन. कारण ती ओळ सोडली तर बाकी पूर्ण रचना लिहायला मी कष्ट घेतले आहेत..बराच विचार केला आहे.. त्यामुळे त्या रचना माझ्या स्वतःच्या आहेत.. आणि मी त्या नक्कीच पोस्ट करेन.

प्राजू आणि सुप्रिया...संबंधीतांनीं नापसंती कळवूनहीआपली ईच्छाच आहे म्हटल्यावर काय म्हणणार?
तसंही मी फक्त विनंती केली आहे...जबरदस्ती नाही,
आपले प्रामाणिक कष्ट आपल्याला सुयश देवोत, ह्याच शुभेच्छा!!!!:)
.................................................................शाम

शामजी,
एकदा आपण ठरवतोच आहे की, कुणाचीही ओळ त्याला न विचारताच, त्या ओळीच्या मुळमालकाच्या भावनेला किंमत न देता आपल्याला वापरायचीच आहे. तर.......

प्राजू आणि सुप्रिया. यांना अडविण्याचे काहीच कारण उरत नाही.

मला व्हिलन ठरवल्याने मुळ मुद्दा निकाली निघालेला नाहीये. Happy

Pages