गझल रचना.... तरही गझल.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 December, 2010 - 04:49

गालिब्,मीर आदि शायर मैफिल संपल्यावर एक ओळ देत्,की ज्या ओळीचा उपयोग मतल्यात सानी मिसरा म्हणून करुन पुढच्या वेळेस त्यावर आधारीत एक गझल तयार करून आणायची असे.

असाच प्रयोग्,गझल सागर प्रतिष्ठान च्या वतीने मुंबई इथे काही काळ चालला. .... माझ्याशी नियमित संपर्क असलेल्या काही शायरांनी त्यात उत्तमोत्तम गझल रचून गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय व्हावा,सर्वमान्य व्हावा म्हणून बराच हातभार लावला आहे.

गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर्,प्रसादपंत्,भुंगा यांचेशी गप्पा मारताना गेली काही दिवस एक मैफिल्,एक गझल अश्या तून काही सामूहिक गझलांची निर्मिती झाली. हीच कल्पना पुढे नेवून नियमित पणे तरही गझल रचाव्यात ह्या कल्पनेतून हा धागा सुरु करतोय.

ह्यात दर आठवड्याला एक ओळ देण्यात येईल व ती ओळ मतल्यातील सानी मिसर्‍यात चपखल बसवून गझल रचावयाची आहे. आपणा सगळ्यांचे यात स्वागत आहे.

आजची ओळ आहे.

ओळ क्र.१ = जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

वृत्त : आनंदकंद
काफिया : जगण्यात किंवा अर्थ
रदीफ : अर्थ नाही किंवा नाही
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२= सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
वृत्त : चामर
काफिया : उन्हात
रदीफ : मी
लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.३= कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
वृत्त : वियदगंगा
काफिया : वाटले
रदीफ : होते
लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ४ = तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : नकार
रदीफ : आहे
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

ओळ क्र.५ = दु:ख आता फार झाले
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रदीफ : झाले
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र.६ = थांबणे सोसेल तोवर लागते चालायला ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - चालायला, वाकायला, जायला, यायला, व्हायला वगैरे स्वरुपी ('आ'यला समान)

ओळ क्र.७ = वादात या कुणीही सहसा पडू नये
वृत्त - विद्युल्लता
रदीफ - नये
काफिया - पडू
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा

ओळ क्र.८ = ठरेन या जगात मी,महान एकदा तरी ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : एकदा तरी
काफिया : महान
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र.९ = थेट माझ्या सारखा तो कोण होता ? डॉ.अनंत ढवळे यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : कोण होता
काफिया :सारखा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. १० = अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
वृत्त : आनंदकंद
रदीफ = माणसे ही
काफिया = छळतात
लगावली= गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ११ = कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मंदाकिनी
काफिया - आराम, दाम, ठाम, उद्दाम वगैरे
अलामत - आ
रदीफ - पहिल्यासारखा
गागालगा गागालगा गागालगा गागालगा

ओळ क्र.१२ = षंढ म्हणती लोक सारे,ऊठ तू आता तरी
वृत्त - कालगंगा
काफिया = सारे,तारे,वारे,न्यारे,उतारे,दारे,यारे, वगैरे
अलामत -आ
रदीफ - ऊठ तू आता तरी
लगावली - गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र.१३ = माणसे व्यर्थ मी जतन केली ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त = लज्जिता
काफिया = जतन, गहन, सहन इ.इ.
अलामत - अ
रदीफ - केली
लगावली - गालगा गालगा लगागागा

ओळ क्र.१४ = विसरणेही तुझ्या लक्षात नाही ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मृगाक्षी
मात्रा - १९
लगावली - लगागागा लगागागा लगागा
काफिया - लक्षात, गावात, रस्त्यात, कोणात, जात, आत इत्यादी
अलामत - आ
रदीफ - 'नाही'
किमान शेर - मतला धरून पाच

ओळ क्र.१५=अजूनही मी तुझ्याचसाठी जिवंत आहे ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - सती जलौघवेगा
लगावली - लगालगागा लगालगागा लगालगागा
मात्रा - २४
काफिया - जिवंत, महंत, संत, वसंत, आसमंत इत्यादी
अलामत - अं
रदीफ - 'आहे'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र.१६=आला पाउस गेला पाउस ( श्री .प्रसाद गोडबोले,''पंत'' यांची ओळ )
वृत्त - पादाकुलक
लगावली - गागागागा गागागागा

ओळ क्र.१७ = श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गांव मनोहर (उमेश कोठीकर यांची ओळ.)
वृत्त - गागागागा * ४ - किंवा ३२ मात्रांचे मात्रावृत्त
काफिया - मनोहर, घर, उत्तर, जर, तर, अंबर इत्यादी स्वरुपाचे
रदीफ - रदीफ नाही
अलामत - 'अ'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र. १७ = खोल खोल आतवर तुझी नजर
वृत्त = श्येनिका
काफिया = नजर्,उदर्,अधर्,शहर इ.
अलामत = अ
रदीफ = नाही.गैरमुरद्दफ
लगावली =गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.१८ = काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
वृत्त = कालगंगा /देवप्रिया
काफिया = आनंदण्याची, ......... पेरण्याची,तारण्याची,वाकण्याची,अंधारण्याची इ.इ.
अलामत्=अ
रदीफ= कारणे
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.१९ = ही जगाची रीत नाही
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रददीफः नाही
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र. २० = चांदणे आहे खरे की भास नुसता ?.......नचिकेत जोशी,आनंदयात्री यांची ओळ
वृत्त : मंजुघोषा
रदीफ :नुसता
काफिया :भास्,खास्,आभास्,त्रास्,इ..इ..
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.२१ = जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
काफिया : मागतो,ठेवतो,पाहतो ,बोलतो
रददीफः मी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र.२२ =************************************************
वृत्त : सुमंदारमाला
काफिया : जावे,खावे,विसावे,जडावे इ.इ.
रददीफः कुठे
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

ओळ क्र.२३ *********************************************************************************************************
वृत्त :तोटक
काफिया :खरा,जरा,बरा,धरा,करा
रदीफ : गैरमुरद्दफ
लगावली :ललगा ललगा ललगा ललगा

ओळ क्र.२४ :शेवटी संपायला आलीच ही एकांकिका......भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ.
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - एकांकिका, मालिका, विका, शिका, टिका, राधिका, इत्यादी
अलामत - र्‍हस्व इ
शेर - मतला धरून पाच
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.२५ : या इथे कधी काळी देखणे शहर होते.......... बेफिकिर यांची ओळ
वृत्त : रंगराग
रदीफ : होते
काफिया : शहर्,गजर्,अधर्,पदर्,इ.इ.
अलामत : अ
लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा

ओळ क्र.२६ :कशास त्याची वाट पहावी,जे घडणे आहेच असंभव....... अमितदेसाई, बागुलबुवा यांची ओळ
वृत्त : वनहरिणी ( मात्रा वृत्त्, अष्ट मात्रिक ४ आवर्तने )
रदीफ : नाही..गैरमुरद्दफ
काफिया : असंभव्,अनुभव्,वैभव्,संभव्, उद्भव,

ओळ क्र.२७ : हा कोणत्या दिशेचा,आहे प्रवास अजुनी............नयना मोरे, मी_ आर्या यांची ओळ
वृत्त : आनंदकंद
रदीफ : अजुनी
काफिया : प्रवास्,भास्,तास्,निवास्,श्वास
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२८ : तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता
वृत्त : वियदगंगा
रदीफ : होता
काफिया : ओलावला, पाणावला,भंडावला,पावला,धावला,इ.इ...
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र.२९ : सोड चिंता मीच माझे पाहतो आता '' कणखर'' यांचि ओळ
वृत्त : राधा
रदीफ : आता
काफिया : पाहतो,वाहपाहतो,वाहतो,साहतो,राहतो,नाहतो
लगावलि : गालगागा गालगागा गालगागा गा

ओळ क्र. ३०: जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे.
वृत्त : वियदगंगा
रदीफ : आहे
काफिया : रेंगाळतो,जाळतो,टाळतो,हेटाळतो
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ३१: हृदय एवढे धडधडत का असावे?
वृत्त :भुजंगप्रयात
रदीफ : असावे
काफिया : सौतीकाफिया " आ'' कारान्त स्वरकाफिया
लगावली :लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र. ३२: कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले ? डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : राहिले,पाहिले,साहिले,वाहिले,दाहिले,
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र. ३३: जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : देवप्रिया
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : माझ्यासवे, चालवे,आसवे, कालवे, काजवे,आठवे, जाणवे,पारवे,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३४: पिंजर्‍याला मानती आकाश रावे गझलसम्राट सुरेश भट यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : रावे, व्हावे, असावे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३५ : येत जा देवून थोडी कल्पना
वृत्त : मेनका
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : कल्पना,प्रार्थना,वंचना,वासना,साधना,कामना,वेदना
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३६ : दाटते आहे निराशा फार हल्ली
वृत्त :मंजुघोषा
रदीफ : हल्ली
काफिया : फार्,चार्,आजार्,बाजार्,व्यापार.....
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३७ : आज आहे नेमका शुद्धीत मी
वृत्त : मेनका
रदीफ : मी
काफिया : शुद्धीत्,रीत्,प्रीत्,विपरीत्,गीत्,भीत्,आश्रीत,
लगावली : गालगागा गालगागा गालगा

khal.jpg

ओळ क्र. ३८ : चालला आहे कशाचा खल इथे
वृत्त : मेनका
रदीफ : इथे
काफिया :खल्,चल्,निश्चल्,बल्,कल्,दल्,कोलाहल
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३९ : सारे जुनेच आहे काही नवीन नाही....... शाम यांची ओळ.
वृत्त : आनंदकंद
रदीफ :नाही
काफिया : नवीन्,लीन्,दीन.विहीन्,हीन्,लगीन्,तीन्,अधीन्,मशीन,
लगावली :गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ४० :कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा.... रसप यांची ओळ.

लगावली - लगालगागा लगालगा - यती - लगालगागा लगालगा

वृत्ताचे नांव - ज्ञात नाही, कोणाला ठाऊक असल्यास कृपया नोंदवावेत.

काफिया - विरघळून / जळून / पळून / वळून इत्यादी

अलामत - 'ऊ' (दीर्घ ऊकार)

रदीफ - जा

ओळ क्र. ४१: आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
वृत्त : व्योमगंन्गा
रदीफ : तितकीच आहे
काफिया : वेदना , साधना, वन्चना,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.42 : सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची ( वैभव वसंत कुलकर्णी यांची ओळ )
वृत्त : वियद्गंगा
लगावली: लगागागा लगागागा लगागागा लगागागा
काफिये: ताज्या, माझ्या, साध्या , गेल्या
अलामत : तंत्रानुसार आ ह्या स्वरांतयमकाची अलामत..बाकी त्याच्या आधीच्या अक्षरावर आलेली जोडाक्षरातील उछारात येणारे वजन हेही अलामतीसारखे वारंवार येणारे ठरावे अश्या काफियांची अपेक्षा !!
रदीफ : विचारांची

ओळ क्र.४३ : आतला माणूस माझ्या जळत आहे.
वृत्त : मंजुघोषा
काफिया : जळत्,कळत्, वळत्,पळत्,हळहळत
रदीफ : आहे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

गुलमोहर: 

हसून खेळून व गंमतीत चालले होते. आता भूमिका आवश्यक वाटत आहे.
=================================================

गंगाधर मुटे - आता आवरा

======================

ज्ञानेश,

<<< हे मला माझ्या खाजगी विश्वावरील अतिक्रमण वाटते. >>> हे कृपया अधिक विस्ताराने सांगावेत.

<<< (शिवाय एका प्रसिद्ध मायबोलीकर गझलकाराचे 'तरही' अनुभवही त्रासदायक ठरल्याचा इतिहास मला ज्ञात आहेच.)>>>

त्या प्रसिद्ध मायबोलीकरांना 'तरही' अनुभव त्रासदायक ठरण्यात त्यांच्या प्रसिद्ध असण्याची कारणे होती व गझलेत बिलकुल दम नव्हता व ते त्यांच्या अनुयायांनीही त्यांना स्पष्टपणे सांगितले असे माझे मत आहे. हे मत सापेक्ष वाटणे शक्य असल्याने त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकतेच. त्या प्रसिद्ध मायबोलीकर गझलकारांच्या त्या गझलेला शेकडो स्तुतीपर प्रतिसाद आले असते तर तो 'तरही' अनुभव त्यांना त्रासदायक वाटला नसता. आता आपण व मी भिन्नच गझलकारांबाबत बोलत असलो तर गोष्ट वेगळी म्हणा! पण त्या इतिहासाचा उल्लेख मला या धाग्यावर संदर्भहीन वाटत आहे.

======================

स्वामी - वृत्त, रदीफ, काफिया, मिसरा व आशय यावर तुमचा काहीही अधिकार नाही. कुणालाही काहीही सुचू शकते. तोटक बिटक वृत्ते किरकोळ आहेत. शार्दुलविक्रीडितात एकही सूट न घेता माझ्या तीन गझला आहेत. आणि त्याचे मला तरी काहीही वाटत नाही. येथे कैलासराव शिस्तबद्धपणे एक उपक्रम चालवत असून त्यात कोणताही भ्रष्टाचार नाही व कोणताही घाणेरडा हेतू नाहीच. 'रच्याकने' आपल्या त्या मूळ गझलेबाबत तर सगळा आनंदच दिसतो आहे मला तरी! आपल्या ज्या 'वृत्तावरील हुकुमती बिकुमती बाबत' आपण बोलत आहात ती खाली मिसर्‍यांमध्ये कुठे गायबली ते कृपया सांगावेत अशी विनंती!

मिळतो जरि काळ इथे जगण्या,
नि भान नसे फिरती नजरा...

येथे 'मराठी अमुक तमुक शब्दकोष' असे दाखले देण्याआधी 'कोण तोटक वृत्तात लिहील' हा प्रतिसाद संपादीत करावात अशी विनंती !

मुळात 'गझलेचे वृत्त कोणते' याला काहीही महत्व नाही या विचारापासून आपण लांब दिसता.

झाले ते चिक्कार झाले. कैलासराव, हा उपक्रम फक्त अ‍ॅडमीनच बंद करू शकतात. तेव्हा ऑल द बेस्ट!

-'बेफिकीर'!

गंगाधर मुटे - आता आवरा

हा धागा कैलासजींचा आहे. तेव्हा सर्वांनीच आवरा आता.

हा उपक्रम कैलासजी राबवत आहेत तर

इतरांनी या उपक्रमाचे आपणच कर्तेधर्ते-सर्वेसर्वा आहोत असा फालतू अभिनिवेश न बाळगता इथून आवरते घ्यायला हवे.

कैलासजींना त्यांचे काम करू देणे, ही माझी एकट्याची जबाबदारी नाही, सर्वांचीच आहे, हे ही लक्षात घ्यायलाच हवे.

मुळात 'गझलेचे वृत्त कोणते' याला काहीही महत्व नाही या विचारापासून आपण लांब दिसता.>>> Lol

http://www.maayboli.com/node/23551?page=2 ही चर्चा ह्या विचाराच्या अनुषंगाने उपयुक्त आहे, नवोदित गझलकारांनी अवश्य लाभ घ्यावा. Happy

माझ्या मामांचे ''काल दि.३१/०८/२०११ रोजी ''दहाव्याचा'' विधी असल्याने मी गेली ३ दिवस कल्याण येथे होतो,व आंतरजाल सुविधा उपलब्ध नसल्याने इथे उपलब्ध होवू शकलो नाही या बद्दल क्षमस्व.

तरही धाग्यावरील या चर्चेबाबत मी ज्ञानेश व स्वामीजींशी प्रत्यक्ष दूरध्वनीवरुन चर्चा केली असून या आधी तरही साठी देण्यात आलेल्या २ ओळी व तदनुषंगाने घडलेली साधकबाधक चर्चा यास मी याद्वारे पूर्ण विराम देत आहे.

तरही चा उपक्रम पूर्वीप्रमाणेच चालू राहील की ज्याकरीता मी, भूषणजी,कणखर्,आनंदयात्री व ज्ञानेशने सुद्धा ओळ देण्याची तयारी दर्शवली आहे.

मात्र या पुढे दिलेली ओळ पूर्णतः स्वतंत्र असेल व या आधीच्या कोणत्याही गझल्,कविता,चारोळी वा काव्यात आलेली नसेल.

मी आंतरजालापासून गेली २/३ दिवस दूर असल्याने माझ्याशी फोनद्वारे या धाग्या संदर्भात चर्चा करणारे ज्ञानेश्,स्वामीजी,डॉ.श्रीकृष्ण राऊत,आनंदयात्री,कणखर्,बागेश्री आणि चर्चा तर करणारेच पण या तरहीच्या उपक्रमात सदैव सोबत असणारे व मला नेहमीच प्रोत्साहीत करणारे बेफिकिरजी यांचा मी ऋणी आहे.

मागील चर्चेस आता पूर्णविराम मिळाला असून्,या पुढे धाग्यावर तरही,ओळ्,गझल व तदनुषंगिक चर्चा घडेल. आणि हा उपक्रम चालूच राहील.

माफ करा मंडळी,तुमचा संवाद उशीराने वाचला.
नाहीतर गझल प्रकाशीत केली नसती.
आता नव्या तरहीवर लिहण्याचा प्रयत्न करते.
माफ करा.......

जियो डॉकाका.... Happy

चला मित्र-मैत्रिणिंनो, पुन्हा एकदा नव्या छान छान गझला लिहुन, आस्वाद देऊया- घेऊया... Happy

डॉक्टर साहेब ,आम्हीही या सृजन सोहळ्यात सामील होऊ म्हणतो .
नवीन मिसर्‍यावरची माझी तरही..{डॉक्टर साहेब हे " तरही" काय प्रकरण आहे ?}असो
गझल
मी तरूत ,मी नभात ,आणि त्या घनात मी
सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी

रंगलो जसा ,तसाच दंगलो जरी इथे...
राहिलो असा जनात .की जसा वनात मी..

बोललीस तू ,लढा.म्हणून धैर्य लाभले..
जिंकलो तुझ्यामुळेच आज या रणात मी ..

पाउले अशी वळोत ,रोज रोज ही तुझी..
सांडतो फुले बनून रोज अंगणात मी ..

घट्ट रोवली मुळे खरेच खोल खोल ही
राहिलो उभा म्हणून ,ताठ या "तनात" मी

ओळ क्र.२५ : या इथे कधी काळी देखणे शहर होते.......... बेफिकिर यांची ओळ
वृत्त : रंगराग
रदीफ : होते
काफिया : शहर्,गजर्,अधर्,पदर्,इ.इ.
अलामत : अ
लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा

इस दश्त में इक शेहेर था
वोक्या हुवा आवारगी

या इथे कधी काळी देखणे शहर होते

व्वा...तरही

डॉ. तुम्हाला मेल करुन २-३ दिवस झाले अजुन रिप्लाय नाही दिलात. तुमच्या गझल बद्दलच.

.

ओळ क्र.२६ :कशास त्याची वाट पहावी,जे घडणे आहेच असंभव....... अमितदेसाई, बागुलबुवा यांची ओळ
वृत्त : वनहरिणी ( मात्रा वृत्त्, अष्ट मात्रिक ४ आवर्तने )
रदीफ : नाही..गैरमुरद्दफ
काफिया : असंभव्,अनुभव्,वैभव्,संभव्, उद्भव,

मात्रा वृत्त

ओळ क्र.२७ : हा कोणत्या दिशेचा,आहे प्रवास अजुनी............नयना मोरे, मी_ आर्या यांची ओळ
वृत्त : आनंदकंद
रदीफ : अजुनी
काफिया : प्रवास्,भास्,तास्,निवास्,श्वास
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२८ : तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता
वृत्त : वियदगंगा
रदीफ : होता
काफिया : ओलावला, पाणावला,भंडावला,पावला,धावला,इ.इ...
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र.२९ : सोड चिंता मीच माझे पाहतो आता ''कणखर'' यांचि ओळ
वृत्त : राधा
रदीफ : आता
काफिया : पाहतो,वाहपाहतो,वाहतो,साहतो,राहतो,नाहतो
लगावलि : गालगागा गालगागा गालगागा गा

ओळ क्र.२८ : जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे.
वृत्त : वियदगंगा
रदीफ : आहे
काफिया : रेंगाळतो,जाळतो,टाळतो,हेटाळतो
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे.
मला हा कोणता जत्था असा रेटाळतो आहे >>>> चलेल का

करा एकी पुन्हा या हात हाती घ्या सुखानो या
दुखांचा हारला ताफा पुन्हा चेकाळतो आहे

Pages