..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं क्र. ४/०२३

गुलाबराव कदम एक बडं प्रस्थं. त्यांना धनश्री आणि रतन नावाच्या दोन मुली असतात. पण एकदा शेतात फिरताना त्यांना एक नुकतीच जन्मलेली मुलगी कोणीतरी टाकून दिलेली दिसते. तिला ते घरी आणून प्रेमाने आपल्या मुलीसारखीच वाढवतात. मातीत मिळाली म्हणून तिचं नाव धुलिका ठेवतात. यथावकाश मुली मोठ्या होतात.

एकदा गुलाबरावांचा भाचा आणि त्याचा मित्र त्यांच्या घरी रहायला येतात. मुक्कामात मित्र आपल्या एका मामेबहिणीच्या प्रेमात पडलाय हे त्या भाच्याच्या लक्षात येतं. तो आपल्या मित्राला त्याबद्दल विचारतो. तर तो मित्र कोणतं गाणं म्हणून त्याला उत्तर देईल?

बरोब्बर प्राची. तुला जिप्सीतर्फे एक काश्मिरी गुलाबांचा बुके बक्षिस! Happy

कोडं क्र. ४/०२३

गुलाबराव कदम एक बडं प्रस्थं. त्यांना धनश्री आणि रतन नावाच्या दोन मुली असतात. पण एकदा शेतात फिरताना त्यांना एक नुकतीच जन्मलेली मुलगी कोणीतरी टाकून दिलेली दिसते. तिला ते घरी आणून प्रेमाने आपल्या मुलीसारखीच वाढवतात. मातीत मिळाली म्हणून तिचं नाव धुलिका ठेवतात. यथावकाश मुली मोठ्या होतात.

एकदा गुलाबरावांचा भाचा आणि त्याचा मित्र त्यांच्या घरी रहायला येतात. मुक्कामात मित्र आपल्या एका मामेबहिणीच्या प्रेमात पडलाय हे त्या भाच्याच्या लक्षात येतं. तो आपल्या मित्राला त्याबद्दल विचारतो. तर तो मित्र कोणतं गाणं म्हणून त्याला उत्तर देईल?

उत्तर :

ना मैं 'धन' चाहूं, ना 'रतन' चाहूं
तेरी 'चरनों'की 'धूल' मिल जाये
तो मैं तर जाऊं..... इ. इ.

मी_आर्या, बरोबर!

कोडं क्र. ४/२१:

'मी ना आता ठरवलंय, भारतातले सगळे Tiger Reserves पालथे घालायचे' बटाटेवडयाचा तुकडा मोडता मोडता सुचेताने जाहीर केलं.
'अरे बाप रे! आता बिचार्या वाघांचं काही खरं नाही' मिहीरने असं म्हणताच सगळ्यानी खिदळत एकमेकांना टाळ्या दिल्या.

पण सुचेताने आपलं म्हणणं खरं केलं. वर्षाच्या आत ती भारतातल्या सगळ्या Tiger Reserves मध्ये जाऊन आली - एक सोडून. तिथे चौकशी केली रे केली की "रिझर्व्हेशन फुल आहे' असं उत्तर मिळायचं. त्यामुळे ती जाम वैतागली होती.

शेवटी कुठलातरी देव तिच्या नवसाला पावला असावा कारण तिला एकदाचं तिथे जायला मिळालं. ह्यावेळी सेलेब्रेट करायला तिच्यासोबत अख्खं मित्रमंडळही होतं. त्या Tiger Reserveमध्ये पोचताच विशालने तिच्या तोंडासमोर एक काल्पनिक् माईक धरला आणि विचारलं 'तो मेडम सुचेता, आप इस वक्त क्या महसूस कर रही है ये हमारे दर्शकोंकॉ प्लीज बताईये'

सुचेताने एकदा त्या Tiger Reserve च्या नावाच्या पाटीकडे पाहिलं आणि तिला काय वाटतं ते नेमक्या शब्दात सांगितलं - एका हिंदी गाण्याची पहिली ओळ गुणगुणून. तिच्या मित्रमंडळीनी ज्यां ओळीला दाद दिली ते गाणं तुम्ही ओळखा.

उत्तरः
कान्हा, कान्हा
आन पडी मै तेरे द्वार

लोक्स, ४/२२ चं उत्तर द्या की

प्राची, नाही. श्रध्दा......क्लू आहे 'हरी जरीवाला' Happy आता आलंच पाहिजे.

प्राची:-)

कोडं क्र. ४/२२:

'मुली काय क्रिकेट खेळतात? काहीतरीच तुझं' आईने नेहाला दटावलं.
'अग, तिने तो रानी मुखर्जीचा पिक्चर पाहिला असेल' भावाने दात काढले.
'ए गप् ए, मी बॉलीग करायला लागले ना की भल्याभल्यांची तंतरवेन हा. बघ तू'
'का? असं काय जगावेगळं करणार आहेस तू?'
'मी स्पिनर आहे माझ्या टीमची. आपूनके सामने कोई टिकेगा नही' नेहाने अभिमानाने सांगितलं.

त्या रविवारी नेहाचा सामना बघायला तिचा भाऊ आणि त्याचा मित्र कुणाल गेले. नेहाने खरोखरच समोरच्या टीमचा धुव्वा उडवला. कुणाल भलताच इम्प्रेस झाला. सामना संपल्यावर नेहाच्या भावाने तिची आणि कुणालची ओळख करून दिली. आणि त्या दोघांचं बघताबघता जमलंच की. नेहाच्या सगळ्या मेचेसना कुणाल हजेरी लावायला लागला. मेक संपली की लंचला जायचं हेही ठरून गेलं.

पण एका रविवारी नेहाने त्याला लंचला जाता येणार नाही असं सांगितलं. तो बिचारा नाराज झाला. 'अरे, माझी एक मैत्रीण आलेय अमेरिकेवरून. २ दिवसांनी परत चाललेय. तिच्यासोबत लंच घेतेय आज' नेहाने सांगितलं. तरी तो रुसलेलाच होता.

'आपण उद्या लंच करायचा कां? तुझ्या फेव्हरेट चायनीज हॉटेलात जाऊ हवं तर'
'नक्की?' त्याने विचारलं.
'आता "गीतापे हाथ रखके कसम' खाऊ का?' तिने हसतहसत विचारलं. तोही हसला.

जेव्हा रात्री त्याने उद्याच्या बेताची आठवण करून द्यायला एका गोल्डन एरामधल्या हिंदी गाण्याच्या ओळी असलेला एसएमएस पाठवला तेव्हा पुन्हा हसायची पाळी तिची होती. ओळखा ते गाणं.

क्लू आहे 'हरी जरीवाला

उत्तरः

फिरकीवाली तू कल फिर आना
नहीं फिर जाना तू अपनी जुबानसे

कोडं क्र. ४/०२४:

पूर्वी आणि अमरचं प्रेम कॉलेजपासूनचं. शिक्षण संपून नोकरी लागली तेव्हा त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. यथावकाश हनिमूनसाठी तिकिटं बुक झाली. दार्जिलिंगला पोचले आणि जेव्हा मुक्कामाचा बंगला बघितला तेव्हा पूर्वी उडालीच. अगदी रामसेंच्या पिक्चरमधून उचलून आणल्यासारखा दिसत होता. तीच करकरणारी दारं, पायात घोटाळणारी काळी मांजर, घुबडांचा आवाज, गूढ वाटणारा बंगल्याचा केअरटेकर. तिची अगदी पाचावर धारण बसली. पण अमर टिंगल करेल म्हणून ती काही बोलली नाही. रात्री खोलीत गेल्यावर बाहेरून कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकून मात्र तिच्या छातीत धडधडायला लागलं. न रहावून अमरकडे वळून ती त्याला काय म्हणाली असेल?

जिप्स्या.....निदान ५ मिनिटं तरी जाऊ द्यायचीस की रे Happy

तेरा मेरा प्यार अमर
फिर क्यु मुझको लगता है डर
मेरे जीवन साथी बता
क्यो दिल धडके रह रह कर

तुझे देख देख सोना,
तुझे देखकर है जगना,
मैने ये जिन्दगानी
संग तेरे बितानी,
तुझमे बसी है मेरी जान;
जिया धडक धडक जाये...

कोडं क्र. ४/०२५

'वेलकम टू डॉमिनोज इंटरनेशनल लिमिटेड मिस्टर अभिजीत कामत!' कंपनीचे डायरेक्टर मिस्टर रेगे म्हणाले.
'थेंक यू सर्.' अभिजीत हसत म्हणाला.
'तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे हे मी सांगायला नकोच. आपल्या नव्या ऑफिसात सगळी टीम रिक्रूट करायची आहे - सेल्स, ऑपरेशन्स, डेव्हलपमेंट, एचआर, फायनान्स....वेळ लागला तरी चालेल पण चांगली टेलेन्टेड टीम हवी आहे. तेव्हा लगेच कामाला लागा.'
अभिजीत कामाला लागला. त्याचे इंडस्ट्रीमधे बरेच कॉन्टेकट्स होते. तसंच त्याच्या बिझिनेस स्कूलमधलेही बरेच लोक नव्या चेलेन्जिग जॉबच्या शोधात होते. सगळ्या जागा हा हा म्हणता भरतील असा त्याला विश्वास होता.
पण प्रत्यक्षात झालं भलतंच. लोकांचे रेझ्युमेज आणि त्यांचं ज्ञान ह्यात जमीन अस्मानाचा फरक असायचा. आधी ठरवूनसुध्दा इंटरव्ह्युला लोक यायचे नाहीत. आले तरी पसंत पडायचे नाहीत. त्यातून कुठे जमलंच तर पगाराच्या रकमेवर गाडी अडायची. एव्हढ्या दिव्यातून पार पडून हुश्श करावं तर ठरलेल्या दिवशी तो माणूस जॉईन होईलच असं नाही.

४ महिने झाले तरी निम्म्या जागाही भरल्या नव्हत्या. अभिजीत अगदी वैतागून गेला होता. परत त्याच्या राहायच्या जागेपासून ऑफिस दूर. जाण्यायेण्यात अर्धा वेळ आणि जीव जायचा. तश्यात त्याला एक ऑफर आली. ऑफिस बऱ्यापैकी जवळ. पगारही चांगला. त्याने पहिली नोकरी सोडायची ठरवली.

आपला राजीनामा घेऊन तो मिस्टर रेग्यांकडे गेला तेव्हा त्यांनी त्याला उद्देशून कोणतं गाणं म्हटलं असेल?:

कोडं क्र. ४/०२६:

"काय रे मन्या, आजकाल कट्टयावर दिसत नाहीस तू संध्याकाळी?" मोहितने मनिषच्या पाठीवर थाप मारत विचारलं.
"आजकाल, मन्याबुवांची स्वारी कोपऱ्यावरच्या इराण्याकडे ब्रुन-मस्का खात असते दररोज दुपारी' विकीने डोळे मिचकावत सांगितलं.
'नुरानी केफेत? हायला, तू तर चहा घेत नाहीस ना रे? ये क्या हुआ, ये क्यो हुआ?' मोहित पुन्हा म्हणाला.
'आजकाल त्या इराण्याची मुलगी बसते गल्ल्यावर यार."
"इराण्याची मुलगी? आणि गल्ल्यावर बसते? काय बोलतोस काय तू?'
'पुराव्याशिवाय बोलत नाही आपण. आपले मन्याराव जाम फिदा झालेत तिच्यावर. मन्या, बोल की लेका' विकीने मन्याला कोपराने ढोसलं.
'काय बोलू लेको. आपली तर बोलती बंद आहे. तिचे डोळे निळे आहेत माहीत आहे? निळे. मी आधी कधीच असे डोळे पहिले नव्हते."
"हे सगळं तिच्या बापाला कळलं तर पुन्हा कधी काहीच बघणार नाहीस् तू.' विकी पचकला.
'ए गप् रे विक्या. मन्या बोल रे' मोहितला मन्याचा देवदास झालेला बघण्यात जाम गम्मत वाटत होती.
'तिची कांती अगदी आरस्पानी कां काय म्हणतात तशी आहे. साला मस्तानी अशीच असेल काय रे?'
'मला काय ठाऊक? बाजीराव सिंघमला विचारू या'
'विक्या, आता गप् बसतोस का? केस कसे आहेत रे तिचे?'
'ओफ, लांबसडक आहेत अगदी गुडघ्यापर्यत. काळेभोर. रेश्मासारखे.'
'हा साल्या तुझा गेस आहे. तू तिच्या केसाला जरी धक्का लावलास तरी तो इराणी तुझ्या डोक्यावरचे उरलेले सगळे केस उपटेल'
'आणि हसली की तिच्या दोन्ही गालाला कातील खळ्या पडतात रे.' मन्या व्याकुळ होत म्हणाला.
'म्हणूनच सारखी हसत असते वाटतं ती."
'मन्या, लेका, हे सगळं तुला एक धम्माल गाणं म्हणून सांगता आलं असतं की." मोहित हसत हसत म्हणाला.
'गाणं? ते कोणतं?' मन्या बुचकळ्यात पडला.
मग मोहितने म्हणूनच दाखवलं ते गाणं. आणि तिघेही मित्र हास्यकल्लोळात बुडून गेले.

कोणतं गाणं म्हटलं असेल मोहितने?

कोडं क्र. ४/०२५:
तेरी दुनियासे होके मजबूर चला
मैं बहोत दूर, बहोत दूर, बहोत दूर चला

२५:

आपला राजीनामा घेऊन तो मिस्टर रेग्यांकडे गेला तेव्हा त्यांनी त्याला उद्देशून कोणतं गाणं म्हटलं असेल?:<<<<<

ओ जानेवाले, हो सके तो लौट के आना..

शिप्रा तुझं बरोबर आहे.

डॉमिनोज इंटरनेशनल लिमिटेड = डी आय एल = दिल

अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नही ...... Happy

स्वप्ना, महान कोडं. शिप्रा, ग्रेट!

अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नही .....डॉमिनोज इंटरनेशनल लिमिटेड = डी आय एल = दिल>>>>>

बापरे महान लॉजिक....

रच्याकने......

हे कोडं डॉमिनोज वाल्यांना दाखवायला पाहिजे... त्यांचा फायनान्स डायरेक्टर आणि सी.एफ.ओ. माझा परम मित्र आहे.... हसुन हसुन पुरेवाट होइल त्याची.....

कोडं क्र. ४/०२६:>>>

ये चांदसा रोशन चेहेरा
जुल्फों का रंग सुनेहेरा
ये झील सी नीली आन्खे
कोई राज है इनमे गेहेरा

हे नसावं बहुतेक????

कोडं क्र. ४/०२५

'वेलकम टू डॉमिनोज इंटरनेशनल लिमिटेड मिस्टर अभिजीत कामत!' कंपनीचे डायरेक्टर मिस्टर रेगे म्हणाले.
'थेंक यू सर्.' अभिजीत हसत म्हणाला.
'तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे हे मी सांगायला नकोच. आपल्या नव्या ऑफिसात सगळी टीम रिक्रूट करायची आहे - सेल्स, ऑपरेशन्स, डेव्हलपमेंट, एचआर, फायनान्स....वेळ लागला तरी चालेल पण चांगली टेलेन्टेड टीम हवी आहे. तेव्हा लगेच कामाला लागा.'
अभिजीत कामाला लागला. त्याचे इंडस्ट्रीमधे बरेच कॉन्टेकट्स होते. तसंच त्याच्या बिझिनेस स्कूलमधलेही बरेच लोक नव्या चेलेन्जिग जॉबच्या शोधात होते. सगळ्या जागा हा हा म्हणता भरतील असा त्याला विश्वास होता.
पण प्रत्यक्षात झालं भलतंच. लोकांचे रेझ्युमेज आणि त्यांचं ज्ञान ह्यात जमीन अस्मानाचा फरक असायचा. आधी ठरवूनसुध्दा इंटरव्ह्युला लोक यायचे नाहीत. आले तरी पसंत पडायचे नाहीत. त्यातून कुठे जमलंच तर पगाराच्या रकमेवर गाडी अडायची. एव्हढ्या दिव्यातून पार पडून हुश्श करावं तर ठरलेल्या दिवशी तो माणूस जॉईन होईलच असं नाही.

४ महिने झाले तरी निम्म्या जागाही भरल्या नव्हत्या. अभिजीत अगदी वैतागून गेला होता. परत त्याच्या राहायच्या जागेपासून ऑफिस दूर. जाण्यायेण्यात अर्धा वेळ आणि जीव जायचा. तश्यात त्याला एक ऑफर आली. ऑफिस बऱ्यापैकी जवळ. पगारही चांगला. त्याने पहिली नोकरी सोडायची ठरवली.

आपला राजीनामा घेऊन तो मिस्टर रेग्यांकडे गेला तेव्हा त्यांनी त्याला उद्देशून कोणतं गाणं म्हटलं असेल?:

उत्तरः

अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही

स्पष्टीकरण - डॉमिनोज इंटरनेशनल लिमिटेड = डीआयएल = दिल

Pages