..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोकिमीला एक डझन मउसूत पुरणपोळ्या!

०४/०७४:
चंदू आणि रजनी यांचे नुकतेच लग्न झालेले असते. एकमेकांशिवाय दोघांना जराही करमायचे नाही. तशात लग्नानंतरची पहिलीच होळी येते. चंदूला होळी प्रचंड प्रिय तर रजनीला रंगांची अ‍ॅलर्जी. चंदूचे मित्र आणि मैत्रिणी त्या दोघांनाही होळीसाठी बोलवायला येतात. रजनी तिचे न येण्याचे कारण सगळ्यांना सांगते आणि मग ते तिला आग्रह करत नाहीत. रजनी नाही येत म्हणून चंदूही जायला तयार नसतो. पण सगळे मित्र त्याचे जराही ऐकतच नाहीत. त्याला ओढतच घेऊन जातात. दुपारी रंग खेळून झाल्यावर, भांग पिण्याआधी चंदू रजनीला फोन करतो - ती कशी आहे याची चौकशी करायला! ती काय उत्तर देइल?

उत्तरः
मेरे पिया गये रंगून
किया है वहासे टेलिफून

मोकिमीला एक डझन मउसूत पुरणपोळ्या!>>

अलकनंदाच्या द्या... होळीला पाठवा ( म्हणजे घरी करायला नकोत !!! फिदी)

अलकनंदाच्या द्या... होळीला पाठवा>>>>>>मोकीमी, पुरणपोळ्या आल्यावर तू फक्त कटाची आमटी आणि गव्हाच्या कुरडया कर. आम्ही सगळे येऊच (न बोलावता) Proud

>>अलकनंदाच्या द्या

म्हणजे काय?

चला, हेही कोडं सुटलं हे मस्त झालं. ह्या बीबीला टाळं लागण्याआधी काही दोन शब्द बोलायचे असतील तर बोलून घ्या मंडळी. Happy

अलकनंदा म्हणुन ठाण्यात लै भारी सपेशल दूकान हाय... त्यांच्या पुपो जगप्रसिद्ध आहेत ठाण्यात.....

Pages