..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या आयुष्यात पहिल्यांदा >> भारत कुमारचं असलं गाणं आम्ही ऐकले असणार असे तुला वाटतय का? Happy जरा भक्कम क्लू दे की.

माधव, आता शेवटचा क्लू - आता गाणं येईलच. पिक्चरचं नाव एक शिवी आहे. पण कधीकधी हिरविणी लाडात आल्या की डोळ्यांपासून ते साजणापर्यंत कोणालाही ती देतात.

'बेईमान'मधलं 'जय बोलो बेईमान की' का? क्लूंवरून गेस करते आहे. ते ई+(गुरदास) मान आणि २ म्हणजे बे कळले. पण त्या हाराचं काय ते नाही कळलं.

श्रध्दा जिंदाबाद!

कोडं क्र. ४/०२८

puzzle.jpg

क्लू नं१ - भारतकुमार.
ही चित्रं गाण्याची दुसरी ओळ वर्णन करत आहेत
क्लू नं२ -पिक्चरचं नाव एक शिवी आहे. पण कधीकधी हिरविणी लाडात आल्या की डोळ्यांपासून ते साजणापर्यंत कोणालाही ती देतात.

उत्तरः
ना इज्जतकी चिंता ना फिक्र कोई अपमानकी
जय बोलो बेईमानकी, जय बोलो

बे = गुजराती २, ई - इंग्रजी ई अक्षर, मान = गुरुदास मान
जय बोलो = हार + टाळ्या

चित्रपट - बेईमान, हिरो - भारतकुमार अर्थात मनोजकुमार

४. ऊची है बिल्डींग लिफ्ट तेरी बंद है
६. चल चल चल मेरे हाथी
८. किताबे बहोतसी पढी होंगी तुमने
९. मेरा जूता है जपानी

३.
४. उंची है बिल्डींग, लिफ्ट तेरी बंद है

५.
६. चल चल चल मेरे हाथी
७.
८.
९. मेरा जुता है जपानी ये पतलुन इंग्लीस्तानी
१०

१. हसते हसते कट जाये रस्ते
२. काटें नहीं कटते ये दिन ये रात
३.सुरज हुआ मध्धम चांद जलने लगा.
४.उंची है बिल्डिंग लिफ्ट तेरी बंद है
५. राजाको रानीसे प्यार हो गया
६.चल चल मेरे हाथी
७. घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गायेंगे .....(?)
८.किताबें बहोतसी पढी होंगी तुमने
९.मेरा जुता है जापानी ये पतलून इंग्लिश्तानी
१०.गोली मार भेजेमें भेजा शोर करता है

ते फक्त संगीताच्या तालावर नाच एवढ्याच अर्थाने असावं. कारण संगीत न दाखवता नुसतीच बाजूची बाई दाखवली तर ती नेमकं काय करतेय हे कळणार नाही. ती पाय सटकून पडतेय असंही वाटू शकेल. Proud

कोडं क्र. ४/०२९

"ओ भाऊ, ऐकता कां जरा?" पोस्टमनची हाक ऐकून लिफ्टजवळ उभा असलेला बिल्डिंगचा वॉचमन आला.
"बोला"
"हे हार्ट कम्युनिकेशन्सचं ऑफिस कितव्या मजल्यावर आहे म्हणायचं?' पोस्टमनने हातातलं जाडजूड पाकीट नाचवत विचारलं.
"हार्ट कम्युनिकेशन्स? काय माहीत नाय बा. पाकिटावर काय लिहिलंय?"
"तिथंच तर घोळ आहे. पाकिटावर नुसतं बिल्डिंगचं नाव लिहिलंय बघा. शिकली-सवरलेली माणसंपण कसा घोळ घालतात. आणि मग आम्ही बसतो पत्ता धुंडाळत. आता हेच बघा, इथं खाली एक बोर्ड लावायचा ना की बाबा ह्या ह्या मजल्यावर ही ही ऑफिसेस आहेत. कसं सोपं होतंय सगळं."
"खरं आहे. ए मोहन, इथे ये बघू' वॉचमनने आणखी एकाला हाक मारून बोलावलं. "हा पोऱ्या canteen मध्ये काम करतो. त्याला कदाचित माहीत असेल"
"हे हार्ट कम्युनिकेशन्सचं ऑफिस कितव्या मजल्यावर आहे माहीत आहे काय तुला?"
मोहनने ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मान हलवली.
"किती मजले आहेत ह्या बिल्डिंगला?" वैतागून पोस्टमनने विचारलं.
"पुरे २५."

हातातल्या पाकीटाकडे वैतागून पाहत असताना पोस्टमनच्या डोक्यात Golden Era मधलं कोणतं गाणं आलं असेल?

कोडं क्र. ४/०३०

"रायपूरकडे जाणारी बस किती वाजता सुटते?" हातातली बेग सांभाळत त्या प्रवाश्याने पान खात असलेल्या माणसाला विचारलं.
"शेवटची बस गेली की दहा मिनीटांपूर्वी' तोंडातली पिंक बाहेर टाकल्यावर उत्तर आलं.
"अरे बाप रे! आज तर मला पोचायचं आहे तिथे." प्रवाशी काळजीच्या सुरात म्हणाला.
"अहो मग पाव्हणं, प्रायव्हेट taxi करा की. हा, खर्च ज्यादा होईल. पण आता पोचायचं म्हटलं की दुसरा पर्याय नाही, काय?"
"खरं आहे, किती वेळ लागेल इथून पोचायला?"
"५-५:३० तासांचा प्रवास आहे बघा. त्या तिथे उभ्या आहेत गाडया"

"धन्यवाद, धन्यवाद' एक नजर भरून आलेल्या आभाळाकडे टाकत झपाझप पावलं टाकत तो प्रवाशी गाडीकडे गेला. भाड्यासाठी घासाघीस करतोय तेव्हढ्यात दोन व्यक्ती त्याच्याजवळ येऊन उभ्या राहिल्या.
'माफ करा, पण तुम्ही रायपूरला जाताय का?' त्यातल्या एकाने प्रवाश्याला विचारलं.
'हो, तुम्हालाही तिथेच जायचं आहे कां?'
'हो, तुमची काही हरकत नसेल तर आपण taxi शेअर करू शकतो'
'हरकत कसली? ५-५:३० तासांचा प्रवास आहे. सोबत मिळाली तर आनंदच होईल. चला"

गाडी सुरु झाली आणि प्रवाश्याने आपला हात पुढे केला. 'मी कें आर लक्ष्मण'
'मी अनिकेत गाडगीळ आणि हा माझा धाकटा भाऊ'
"मी ओंकार गाडगीळ"

सुरु झालेल्या गप्पा मग थांबल्या ते एक गचका देऊन गाडी अचानक उभी राहिली तेव्हाच.

"काय हो ड्रायव्हरसाहेब, काय झालं?" कें आर लक्ष्मणने विचारलं.
'साहेब, समोर बघा की. नदीला केव्हढा पूर आलाय ते."
"अरे, मग काय झालं? नदीवर पूल आहे ना? ने की गाडी पुढे."
"नाय बा, मी नाही जायचा." ड्रायव्हर जोरजोरात डोकं हलवत म्हणाला.
'अरे पण मग आम्ही पलीकडे कसं जाणार?'
'तुम्ही चालत जावा पुलावरून. पूल पार केला की एक दहा मिनिटात रायपूर येतंय बघा'
किती मिनतवार्‍या केल्या तरी ड्रायव्हर बधेना ते पाहून तिघे सामानासकट खाली उतरले. ड्रायव्हरचं भाडं दिल्यावर तो सुसाट वेगाने गाडी वळवून निघून गेला.

"आता काय करायचं मिस्टर लक्ष्मण? आपण पूल पार करायची रिस्क घेतोय'
"घाबरू नका मिस्टर गाडगीळ. माझ्या कामानिमित्त मी भारतभर फिरलोय. छोट्या छोट्या गावांतून ह्यापेक्षा अधिक लेचेपेचे पूल मी पार केलेत." असं म्हणत लक्ष्मण पूलवार चढलासुध्दा. १५-२० पावलं तुरुतुरु चालत त्याने पूल पक्का असल्याची खात्री करून घेतली. गाडगीळ बंधू त्याच्याकडे पहात उभे होते.

'येताय ना?' लक्ष्मणची हाक आली तेव्हा त्यांनी साशंक होऊन एकमेकांकडे पाहिलं.
"मिस्टर लक्ष्मण, आम्हाला जमेल कां?' त्यांनी ओरडून विचारलं.
"काळजी नको, मी सांगतो त्याप्रमाणे करा. आपण सुखरुप पोचतो बघा'.

कें आर लक्ष्मणला हेच गाण्यात कसं सांगता आलं असतं.

क्लू - गाणं Golden Era मधलं नाही.

Pages