..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं क्र. ४/०२६:

"काय रे मन्या, आजकाल कट्टयावर दिसत नाहीस तू संध्याकाळी?" मोहितने मनिषच्या पाठीवर थाप मारत विचारलं.
"आजकाल, मन्याबुवांची स्वारी कोपऱ्यावरच्या इराण्याकडे ब्रुन-मस्का खात असते दररोज दुपारी' विकीने डोळे मिचकावत सांगितलं.
'नुरानी केफेत? हायला, तू तर चहा घेत नाहीस ना रे? ये क्या हुआ, ये क्यो हुआ?' मोहित पुन्हा म्हणाला.
'आजकाल त्या इराण्याची मुलगी बसते गल्ल्यावर यार."
"इराण्याची मुलगी? आणि गल्ल्यावर बसते? काय बोलतोस काय तू?'
'पुराव्याशिवाय बोलत नाही आपण. आपले मन्याराव जाम फिदा झालेत तिच्यावर. मन्या, बोल की लेका' विकीने मन्याला कोपराने ढोसलं.
'काय बोलू लेको. आपली तर बोलती बंद आहे. तिचे डोळे निळे आहेत माहीत आहे? निळे. मी आधी कधीच असे डोळे पहिले नव्हते."
"हे सगळं तिच्या बापाला कळलं तर पुन्हा कधी काहीच बघणार नाहीस् तू.' विकी पचकला.
'ए गप् रे विक्या. मन्या बोल रे' मोहितला मन्याचा देवदास झालेला बघण्यात जाम गम्मत वाटत होती.
'तिची कांती अगदी आरस्पानी कां काय म्हणतात तशी आहे. साला मस्तानी अशीच असेल काय रे?'
'मला काय ठाऊक? बाजीराव सिंघमला विचारू या'
'विक्या, आता गप् बसतोस का? केस कसे आहेत रे तिचे?'
'ओफ, लांबसडक आहेत अगदी गुडघ्यापर्यत. काळेभोर. रेश्मासारखे.'
'हा साल्या तुझा गेस आहे. तू तिच्या केसाला जरी धक्का लावलास तरी तो इराणी तुझ्या डोक्यावरचे उरलेले सगळे केस उपटेल'
'आणि हसली की तिच्या दोन्ही गालाला कातील खळ्या पडतात रे.' मन्या व्याकुळ होत म्हणाला.
'म्हणूनच सारखी हसत असते वाटतं ती."
'मन्या, लेका, हे सगळं तुला एक धम्माल गाणं म्हणून सांगता आलं असतं की." मोहित हसत हसत म्हणाला.
'गाणं? ते कोणतं?' मन्या बुचकळ्यात पडला.
मग मोहितने म्हणूनच दाखवलं ते गाणं. आणि तिघेही मित्र हास्यकल्लोळात बुडून गेले.

कोणतं गाणं म्हटलं असेल मोहितने?

उत्तरः

हसता हुआ नूरानी चेहेरा
काली झुल्फे रंग सुनहरा

प्राची, मला आता डोळ्यास्मोर गरमागरम समोसे, पुदिन्याची हिरवीगार चटणी आणि चिंचेची आंबटगोड चटणी दिसतेय. तुला हवी का? Happy

कोडं क्र. ४/०२७

आपल्या शिख गर्व्हर्नेसच्या अस्थिंचं भारतात विसर्जन करायला आलेली झारा वीरच्या प्रेमात पडते. तिला शोधत तिचा पाकिस्तानी नियोजित वर रझा भारतात येतो. झारा आणि रझा पाकिस्तानात जायला निघाले असताना स्टेशनवर वीर तिच्यावर आपलं प्रेम असल्याचं सांगतो. रझाही तिला आपलं तिच्यावर प्रेम असल्याचं सांगतो. वीर आपलंच प्रेम कसं सर्वश्रेष्ठ आहे हे पटवायला लागतो तेव्हा रझा एका जुन्या हिंदी गाण्याच्या २ ओळी म्हणून त्याला गप्प करतो.

सांगा त्या दोन ओळी.

कोडं क्र. ४/०२७

तुम तो ठहरे परदेसी
साथ क्या निभाओगे?

किंवा

परदेसीयों से ना आंखिया मिलाना
परदेसीयों को है एक दिन जाना

हे होऊ शकलं असतं पण नाहिये. कोड्यातला दुसरा शब्द शोधा. ते कोणाचं नावच असलं पाहिजे असं नाही. Happy

कोडं क्र. ४/०२७

आपल्या शिख गर्व्हर्नेसच्या अस्थिंचं भारतात विसर्जन करायला आलेली झारा वीरच्या प्रेमात पडते. तिला शोधत तिचा पाकिस्तानी नियोजित वर रझा भारतात येतो. झारा आणि रझा पाकिस्तानात जायला निघाले असताना स्टेशनवर वीर तिच्यावर आपलं प्रेम असल्याचं सांगतो. रझाही तिला आपलं तिच्यावर प्रेम असल्याचं सांगतो. वीर आपलंच प्रेम कसं सर्वश्रेष्ठ आहे हे पटवायला लागतो तेव्हा रझा एका जुन्या हिंदी गाण्याच्या २ ओळी म्हणून त्याला गप्प करतो.

सांगा त्या दोन ओळी.

उत्तर:

मेरी मुहोबत पाक मुहोबत
और जहां की खाक मुहोबत

पडद्यावर विश्वजीत आणि बहुतेक सायरा

लगेच म्हणून नको दाखवूस. कृपा कर. Proud

आताच युट्युबीवर पाहिलं.
और किसीकी खाक मुहोबत >> हे 'और जहां की खाक मुहोबत' असं आहे.

मामी, दुरुस्ती केली आहे. धन्यवाद! विश्वजीतबाबूंकडे बघण्यात सगळा वेळ जातो ना, लिरिक्सकडे लक्षच जात नाही Proud

विश्वजीतबाबूंकडे बघण्यात सगळा वेळ जातो ना >>>>> i can understand your feelings ... उसे देखके मेरे भी होश उड जाते है ना! म्हणून मला तर बघ गाणं सुद्धा ऐकल्याचं आठवत नाही. Proud

प्राची, चित्रं क्रमाने नाहीत....ही चित्रं गाण्याची दुसरी ओळ वर्णन करत आहेत. जिप्सी, क्लू आहे भारतकुमार.

झिरो जब दिया हमने दुनिया को, तब गिनती आई...
है रीत जहा की प्रीत सदा...
भारत का रेहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ... बरोबर?

जिप्सी बाळा, तुला तारा कुठून दिसला? :फिदी:.........हर्षल, नाही.
रच्याकने, हे गाणं मी आज सकाळी रेडिओवर ऐकलं - माझ्या आयुष्यात पहिल्यांदा.

Pages