..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

०४/०३० ए जी ओ जी लो जी सुनो जी करता हूं मैं वो तुम भी करो जी
वन टु का फोर फोर टु का वन माय नेम इज लखन

कोडं क्र. ४/०२९

"ओ भाऊ, ऐकता कां जरा?" पोस्टमनची हाक ऐकून लिफ्टजवळ उभा असलेला बिल्डिंगचा वॉचमन आला.
"बोला"
"हे हार्ट कम्युनिकेशन्सचं ऑफिस कितव्या मजल्यावर आहे म्हणायचं?' पोस्टमनने हातातलं जाडजूड पाकीट नाचवत विचारलं.
"हार्ट कम्युनिकेशन्स? काय माहीत नाय बा. पाकिटावर काय लिहिलंय?"
"तिथंच तर घोळ आहे. पाकिटावर नुसतं बिल्डिंगचं नाव लिहिलंय बघा. शिकली-सवरलेली माणसंपण कसा घोळ घालतात. आणि मग आम्ही बसतो पत्ता धुंडाळत. आता हेच बघा, इथं खाली एक बोर्ड लावायचा ना की बाबा ह्या ह्या मजल्यावर ही ही ऑफिसेस आहेत. कसं सोपं होतंय सगळं."
"खरं आहे. ए मोहन, इथे ये बघू' वॉचमनने आणखी एकाला हाक मारून बोलावलं. "हा पोऱ्या canteen मध्ये काम करतो. त्याला कदाचित माहीत असेल"
"हे हार्ट कम्युनिकेशन्सचं ऑफिस कितव्या मजल्यावर आहे माहीत आहे काय तुला?"
मोहनने ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मान हलवली.
"किती मजले आहेत ह्या बिल्डिंगला?" वैतागून पोस्टमनने विचारलं.
"पुरे २५."

हातातल्या पाकीटाकडे वैतागून पाहत असताना पोस्टमनच्या डोक्यात Golden Era मधलं कोणतं गाणं आलं असेल?

उत्तरः ऐ दिल कहाँ तेरी मंजिल

कोडं क्र. ४/०३०

"रायपूरकडे जाणारी बस किती वाजता सुटते?" हातातली बेग सांभाळत त्या प्रवाश्याने पान खात असलेल्या माणसाला विचारलं.
"शेवटची बस गेली की दहा मिनीटांपूर्वी' तोंडातली पिंक बाहेर टाकल्यावर उत्तर आलं.
"अरे बाप रे! आज तर मला पोचायचं आहे तिथे." प्रवाशी काळजीच्या सुरात म्हणाला.
"अहो मग पाव्हणं, प्रायव्हेट taxi करा की. हा, खर्च ज्यादा होईल. पण आता पोचायचं म्हटलं की दुसरा पर्याय नाही, काय?"
"खरं आहे, किती वेळ लागेल इथून पोचायला?"
"५-५:३० तासांचा प्रवास आहे बघा. त्या तिथे उभ्या आहेत गाडया"

"धन्यवाद, धन्यवाद' एक नजर भरून आलेल्या आभाळाकडे टाकत झपाझप पावलं टाकत तो प्रवाशी गाडीकडे गेला. भाड्यासाठी घासाघीस करतोय तेव्हढ्यात दोन व्यक्ती त्याच्याजवळ येऊन उभ्या राहिल्या.
'माफ करा, पण तुम्ही रायपूरला जाताय का?' त्यातल्या एकाने प्रवाश्याला विचारलं.
'हो, तुम्हालाही तिथेच जायचं आहे कां?'
'हो, तुमची काही हरकत नसेल तर आपण taxi शेअर करू शकतो'
'हरकत कसली? ५-५:३० तासांचा प्रवास आहे. सोबत मिळाली तर आनंदच होईल. चला"

गाडी सुरु झाली आणि प्रवाश्याने आपला हात पुढे केला. 'मी कें आर लक्ष्मण'
'मी अनिकेत गाडगीळ आणि हा माझा धाकटा भाऊ'
"मी ओंकार गाडगीळ"

सुरु झालेल्या गप्पा मग थांबल्या ते एक गचका देऊन गाडी अचानक उभी राहिली तेव्हाच.

"काय हो ड्रायव्हरसाहेब, काय झालं?" कें आर लक्ष्मणने विचारलं.
'साहेब, समोर बघा की. नदीला केव्हढा पूर आलाय ते."
"अरे, मग काय झालं? नदीवर पूल आहे ना? ने की गाडी पुढे."
"नाय बा, मी नाही जायचा." ड्रायव्हर जोरजोरात डोकं हलवत म्हणाला.
'अरे पण मग आम्ही पलीकडे कसं जाणार?'
'तुम्ही चालत जावा पुलावरून. पूल पार केला की एक दहा मिनिटात रायपूर येतंय बघा'
किती मिनतवार्‍या केल्या तरी ड्रायव्हर बधेना ते पाहून तिघे सामानासकट खाली उतरले. ड्रायव्हरचं भाडं दिल्यावर तो सुसाट वेगाने गाडी वळवून निघून गेला.

"आता काय करायचं मिस्टर लक्ष्मण? आपण पूल पार करायची रिस्क घेतोय'
"घाबरू नका मिस्टर गाडगीळ. माझ्या कामानिमित्त मी भारतभर फिरलोय. छोट्या छोट्या गावांतून ह्यापेक्षा अधिक लेचेपेचे पूल मी पार केलेत." असं म्हणत लक्ष्मण पूलवार चढलासुध्दा. १५-२० पावलं तुरुतुरु चालत त्याने पूल पक्का असल्याची खात्री करून घेतली. गाडगीळ बंधू त्याच्याकडे पहात उभे होते.

'येताय ना?' लक्ष्मणची हाक आली तेव्हा त्यांनी साशंक होऊन एकमेकांकडे पाहिलं.
"मिस्टर लक्ष्मण, आम्हाला जमेल कां?' त्यांनी ओरडून विचारलं.
"काळजी नको, मी सांगतो त्याप्रमाणे करा. आपण सुखरुप पोचतो बघा'.

कें आर लक्ष्मणला हेच गाण्यात कसं सांगता आलं असतं?

क्लू - गाणं Golden Era मधलं नाही.

उत्तरः
ए जी ओ जी लो जी सुनो जी करता हूं मैं वो तुम भी करो जी
वन टु का फोर फोर टु का वन माय नेम इज लखन

बिंगो माधव Happy

००४/३२
उत्तरः थोडा रेशम लगता है, थोडा शीशा लगता है
हिरे मोती जडते है थोडा सोना लगता है
ऐसा गोरा बदन तब बनता है
थोडा रेशम लगता है......

पण तो सूर्य कशाकरता आहे?>>>>तो सूर्य नै कै Happy त्याच्या पुढचा हात "थोडा" साठी वापरलाय. Happy

अजुन एक क्लु हवाय???
चला हा पूर्ण क्लु Happy

१. क्लु (अर्धा): "किसी डिस्कोमें जाये, किसी होटलमें खाये" Happy
२. क्ल (पूर्ण): "फुल खिले है गुलशन गुलशन" Happy

चला मीच उत्तर सांगतो Happy

०४/३१
दरोगाजी चोरी हो गई
मेरी चोरी हो गई
अठर बरस संभाला था नाजो से दिल को पाला था
उन्नीसवे बरसमें मै बरबाद हो गयी
दरोगाजी चोरी हो गई Happy

(चित्रपट: गौतम गोविंद, स्वर आशा भोसले)

१. क्लु (अर्धा): "किसी डिस्कोमें जाये, किसी होटलमें खाये" - चित्रपटाच्या नावाचा अर्धा भाग - "गोविंदा"
२. क्ल (पूर्ण): "फुल खिले है गुलशन गुलशन" - या चित्रपटची हिर्वीन "मौसमी चटर्जी) Happy

जिप्स्या... हे कुठलं रे गाणं.... लहान मुलं म्हणुन वाटेलत्या शेंड्या लावशील काय ???

हायला...
मी 'अठरा बरस' पर्यंत आले होते की. नंतर कंवारी म्हणुन मी 'मेरी' घेतलं. आणि 'चोरी' साठी चोर होताच. श्या!! मी पण नव्हतं ऐकलं हे गाणं कधी.

लहान मुलं म्हणुन वाटेलत्या शेंड्या लावशील काय ???
>>
Rofl
नै तर काय Lol
पण आर्यातै ला पण माहीत आहे वाट्टं हे गाणं Uhoh
हे दोघं एकमेकांना सामिल असावेत काय? Uhoh Proud

आर्या, रिया आणि दोन्ही मीरा Happy

मोकीमी Happy अस गाण आहे हां "गौतम गोविंदा" चित्रपटातलं Happy
चटर्जींची मौसमी आणि कपूरांचा शशी आहे यात. Happy पण लक्ष फक्त मौसमीकडेच जात. Wink

यु ट्युबवर आहे हे गाणं Happy

न्हाय बा आयकलं ह्यो गानं.

मामी, फरारीच्या सवारीच्या जमान्यात स्कूटरची सवारी? धाग्याच्या मालकिणीला शोनाहो Happy

Pages