..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

०४/०१६ : शाळेपासूनच रेखाला चित्रकलेची आवड निर्माण झाली. योगायोगाने तिला शाळेजवळाच्या प्रख्यात चित्रकार जयंत नेनेंच्या चित्रकलेच्या क्लासबद्दल कळले.आपल्या वडिलांकडे तिने नेनेंच्या क्लासला जायची इच्छा व्यक्त केली. वडिलांची काही हरकत नव्हती. पण त्यांनी तिला एक वॉर्निंग दिली.
जयंतरावांचे वडील माधवराव हेही प्रख्यात चित्रकार होते आणि त्यांनीच हा क्लास सुरू केला होता. त्यांचीच पद्धत जयंतराव चालवीत होते. स्केचिंग शिकवताना विद्यार्थ्यांना ते चक्क पाटी-पेन्सिल वापरायला लावत आणि जोपर्यंत परफेक्ट स्केच जमत नाही तोवर पूर्ण चित्र पुसून पुन्हा पुन्हा नव्याने काढायला लावतात. याची तयारी ठेव.
हे त्यांनी गाण्यात कसं सांगितलं असेल?

उत्तर : ज.मा.ने. का दस्तूर है ये पुराना
बनाकर मिटाना मिटाकर बनाना

चित्रपट : लाजवाब अनिल बिस्वास मुकेश लता

भरत Happy नव्हतं माहीत आता घरी गेल्यावर शोधून ऐकतो. काय करणार लता पण आहे ना!

अशीच द्या आणखी कोडी. काही गाणी राहून गेली असतील ऐकायची तर माहीत होतील.

०४/०१७ : अमिताला पर्यटनाची फार आवड. त्यातही फार प्रसिद्ध, लोकप्रिय नसलेल्या ठिकाणी तिला जायला आवडायचे. युरोपात जायचे म्हटल्यावर तिने नॉर्वेची निवड केली. ओस्लोतल्या विमानतळावर पाय ठेवताच ती चक्क या देशाच्या प्रेमातच पडली; तशीच तिथल्या स्मार्ट, देखण्या सुरक्षाधिकार्‍याच्या. पण तो बुजरा तरी होता किंवा शिष्ट तरी. "मी फार लांबून तुला भेटायला आले आहे, आता इथे काय वेळ झाली आहे ते तरी मला सांग." असे ती जेट लॅगचा आणि आपल्याला इंग्रजी नीट येत नसल्याचा बहाणा करून त्याला म्हणाली. जर हे हिंदी गाण्यातून सांगायचे असते तर तिने कसे सांगितले असते?

०४/०१७ :

आये है दुर से
मिलने हुजुर से
देखो जी चुप ना रहिये
कहियेजी कुछ तो कहिये
दिन है के रात है

परफेक्ट मोहन की मीरा. तुम्हाला एक प्लेट पाएआ.

०४/०१७ : अमिताला पर्यटनाची फार आवड. त्यातही फार प्रसिद्ध, लोकप्रिय नसलेल्या ठिकाणी तिला जायला आवडायचे. युरोपात जायचे म्हटल्यावर तिने नॉर्वेची निवड केली. ओस्लोतल्या विमानतळावर पाय ठेवताच ती चक्क या देशाच्या प्रेमातच पडली; तशीच तिथल्या स्मार्ट, देखण्या सुरक्षाधिकार्‍याच्या. पण तो बुजरा तरी होता किंवा शिष्ट तरी. "मी फार लांबून तुला भेटायला आले आहे, आता इथे काय वेळ झाली आहे ते तरी मला सांग." असे ती जेट लॅगचा आणि आपल्याला इंग्रजी नीट येत नसल्याचा बहाणा करून त्याला म्हणाली. जर हे हिंदी गाण्यातून सांगायचे असते तर तिने कसे सांगितले असते?

आए हैं दूर से मिलने हजूर से
ऐसे भी चुप ना रहिए
कहिए जी कुछ तो कहिए
दिन है के रात है?

हायला..... या आधी आम्ही इथे येउन वाचे पर्यंत बाकी कोणी ना कोणी कोडी ओळखायच ... आज म्हणजे फुल्ल टु लग्गा लागला...

आणि पाएआ तर पाएआ...आपल्याला काय सगळं चालतं

हे नाचो रे नाचो .... ढकाक टकाक ढकाक टकाक...

nacho.jpg

उत्तर : ज.मा.ने. का दस्तूर है ये पुराना
बनाकर मिटाना मिटाकर बनाना

चित्रपट : लाजवाब अनिल बिस्वास मुकेश लता

>>>>> माहिती नसलेली गाणी कशी ओळखणार??? आँ?

त्यातून भम तुम्ही जर ...
>>>> जोपर्यंत परफेक्ट स्केच जमत नाही तोवर पूर्ण चित्र पुसून पुन्हा पुन्हा नव्याने काढायला लावतात. >>>>>> ...... आणि चित्रं पुसल्यावर एक केळं देतात असं सांगितलं असतं तर जरा सोप्पं झालं असतं. Proud Wink

कोडं क्र. ०४/०१८ : आजोबा-आजी खूप म्हातारे झालेले असतात. आयुष्यभर अतिशय हलाखीच्या परिस्थितीत राहिलेले, खस्ता खाल्लेले. जुळी मुलं होतात पण गरीबाघरी अशी सोन्यासारखी मुलं वाढवण्यापेक्षा पांडुरंगावर भरवसा ठेऊन ते त्यांचे दोन्ही मुलगे दत्तक देतात. "देवा पांडुरंगा, तुझीच नावं दिली आहेत आम्ही आमच्या मुलांना आता त्यांना तुच सांभाळ!" श्री. बर्वेही मुलांना खूप छान जपतात आणि मोठं करतात. आता आजी अगदी अथंरूणाला खिळलेल्या असतात, थोडंफार विस्मरणही झालेलं असतं. पण त्यांना आपल्या मुलांना शेवटचं डोळे भरून बघायची आस लागलेली असते. आजोबा मुलांना बोलावणं धाडतात. मुलंही लगेच येतात. आजोबा आजीला कसं सांगतील?

Yes. Correct Madhav. Happy
या उत्तराबद्दल माधवला पुढच्या वर्षी पंढरपूरच्या वारीचा योग येवो ही सदिच्छा आणि हेच बक्षिस. Happy

कोडं क्र. ०४/०१८ : आजोबा-आजी खूप म्हातारे झालेले असतात. आयुष्यभर अतिशय हलाखीच्या परिस्थितीत राहिलेले, खस्ता खाल्लेले. जुळी मुलं होतात पण गरीबाघरी अशी सोन्यासारखी मुलं वाढवण्यापेक्षा पांडुरंगावर भरवसा ठेऊन ते त्यांचे दोन्ही मुलगे दत्तक देतात. "देवा पांडुरंगा, तुझीच नावं दिली आहेत आम्ही आमच्या मुलांना आता त्यांना तुच सांभाळ!" श्री. बर्वेही मुलांना खूप छान जपतात आणि मोठं करतात. आता आजी अगदी अथंरूणाला खिळलेल्या असतात, थोडंफार विस्मरणही झालेलं असतं. पण त्यांना आपल्या मुलांना शेवटचं डोळे भरून बघायची आस लागलेली असते. आजोबा मुलांना बोलावणं धाडतात. मुलंही लगेच येतात. आजोबा आजीला कसं सांगतील?

उत्तर :
रुप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा

कोडं क्र. ४/१९ :
गावच्या जत्रेला गेल्या असताना यमुनाबाई आणि गजाननरावांची जुळी मुलं हरवतात. खूप खूप शोधूनही त्यांना ती मिळतच नाहीत. पुढे अनेक वर्षांनंतर एकदा अचानक समोर आलेल्या दोन तरूण भावांना बघून त्यांना ही आपलीच मुलं आहेत असं वाटायला लागतं. यमुनाबाई त्या मुलांच्या आईवडिलांपर्यंत जाऊन पोहोचतात आणि मुलं परत करण्याची मागणी करतात. पण आईवडिल अर्थातच तयार होत नाहीत. त्यांचं म्हणणं असतं की ही त्यांची स्वत:चीच मुलं आहेत. पोलिस केस होते, कोर्टात केस उभी राहते. कोर्ट त्यांची डीएनए चाचणी करायला सांगतं. यमुनाबाई आणि गजाननरावांना खात्रीच असते की यात ही मुलं आपली आहेत हे सिध्द होणार.

पण दुर्दैवानं डीएनए चाचणीत ती मुलं यमुनाबाई आणि गजाननरावांची नाहीत हे सिद्ध होतं. तर यमुनाबाई आणि गजाननराव कोणतं गाणं म्हणतील?

कोडं क्र. ४/२०:

"सुमेधा, मी निघतो ग" अजय ओरडला तसं सुमेधा घाईघाईने दिवाणखान्यात आली.
'अरे, आज कुठे निघाला आहेस सकाळी सकाळी?'
'प्रोफेसर देवांकडे जायचं आहे. अगदी अर्जट्ली नोटस हव्या आहेत. नाहीतर परवाच्या परिक्षेत काही खरं नाही बघ"
'अरे पण, आज टॅक्सी, बसेस सगळ्यांचा संप आहे. कसा जाणार आहेस तू?'
'गाडी काढतो की." असं म्हणत अजय बाहेर पडला आणि ५ मिनिटात परत आला.
'छ्या, वैताग नुसता'
'का रे काय झालं?'
'सुरु होत नाहिये आपला खटारा." अजय वैतागून म्हणाला.
'मग आता चालतच जा. अर्जन्ट आहे म्हणालास ना?'
'चालत? ह्या उन्हात? तसंही मला पित्ताचा त्रास होतोय कालपासून. आणि पायही दुखताहेत थोडे'
सुमेधाला आपल्या थापाड्या नवर्‍याचा स्वभाव चांगलाच माहित होता. तिने त्याला जायलाच हवं हे गाण्यातून कसं सांगितलं असेल

स्वप्ना,

सजन रे झूठ मत बोलो
़खुदा के पास जाना है
ना हाथी है न घोडा है
वहा पैदल ही जाना है

श्रध्दा, तुला मसालेदार मिरची चाट Happy

उत्तरः
सजन रे झूठ मत बोलो
खुदा के पास जाना है
ना हाथी है न घोडा है
वहा पैदल ही जाना है

कोडं क्र. ४/२१:

'मी ना आता ठरवलंय, भारतातले सगळे Tiger Reserves पालथे घालायचे' बटाटेवडयाचा तुकडा मोडता मोडता सुचेताने जाहीर केलं.
'अरे बाप रे! आता बिचार्या वाघांचं काही खरं नाही' मिहीरने असं म्हणताच सगळ्यानी खिदळत एकमेकांना टाळ्या दिल्या.

पण सुचेताने आपलं म्हणणं खरं केलं. वर्षाच्या आत ती भारतातल्या सगळ्या Tiger Reserves मध्ये जाऊन आली - एक सोडून. तिथे चौकशी केली रे केली की "रिझर्व्हेशन फुल आहे' असं उत्तर मिळायचं. त्यामुळे ती जाम वैतागली होती.

शेवटी कुठलातरी देव तिच्या नवसाला पावला असावा कारण तिला एकदाचं तिथे जायला मिळालं. ह्यावेळी सेलेब्रेट करायला तिच्यासोबत अख्खं मित्रमंडळही होतं. त्या Tiger Reserveमध्ये पोचताच विशालने तिच्या तोंडासमोर एक काल्पनिक् माईक धरला आणि विचारलं 'तो मेडम सुचेता, आप इस वक्त क्या महसूस कर रही है ये हमारे दर्शकोंकॉ प्लीज बताईये'

सुचेताने एकदा त्या Tiger Reserve च्या नावाच्या पाटीकडे पाहिलं आणि तिला काय वाटतं ते नेमक्या शब्दात सांगितलं - एका हिंदी गाण्याची पहिली ओळ गुणगुणून. तिच्या मित्रमंडळीनी ज्यां ओळीला दाद दिली ते गाणं तुम्ही ओळखा.

कोडं क्र. ४/२२:

'मुली काय क्रिकेट खेळतात? काहीतरीच तुझं' आईने नेहाला दटावलं.
'अग, तिने तो रानी मुखर्जीचा पिक्चर पाहिला असेल' भावाने दात काढले.
'ए गप् ए, मी बॉलीग करायला लागले ना की भल्याभल्यांची तंतरवेन हा. बघ तू'
'का? असं काय जगावेगळं करणार आहेस तू?'
'मी स्पिनर आहे माझ्या टीमची. आपूनके सामने कोई टिकेगा नही' नेहाने अभिमानाने सांगितलं.

त्या रविवारी नेहाचा सामना बघायला तिचा भाऊ आणि त्याचा मित्र कुणाल गेले. नेहाने खरोखरच समोरच्या टीमचा धुव्वा उडवला. कुणाल भलताच इम्प्रेस झाला. सामना संपल्यावर नेहाच्या भावाने तिची आणि कुणालची ओळख करून दिली. आणि त्या दोघांचं बघताबघता जमलंच की. नेहाच्या सगळ्या मेचेसना कुणाल हजेरी लावायला लागला. मेक संपली की लंचला जायचं हेही ठरून गेलं.

पण एका रविवारी नेहाने त्याला लंचला जाता येणार नाही असं सांगितलं. तो बिचारा नाराज झाला. 'अरे, माझी एक मैत्रीण आलेय अमेरिकेवरून. २ दिवसांनी परत चाललेय. तिच्यासोबत लंच घेतेय आज' नेहाने सांगितलं. तरी तो रुसलेलाच होता.

'आपण उद्या लंच करायचा कां? तुझ्या फेव्हरेट चायनीज हॉटेलात जाऊ हवं तर'
'नक्की?' त्याने विचारलं.
'आता "गीतापे हाथ रखके कसम' खाऊ का?' तिने हसतहसत विचारलं. तोही हसला.

जेव्हा रात्री त्याने उद्याच्या बेताची आठवण करून द्यायला एका गोल्डन एरामधल्या हिंदी गाण्याच्या ओळी असलेला एसएमएस पाठवला तेव्हा पुन्हा हसायची पाळी तिची होती. ओळखा ते गाणं.

कोडं क्र. ४/१९ :
गावच्या जत्रेला गेल्या असताना यमुनाबाई आणि गजाननरावांची जुळी मुलं हरवतात. खूप खूप शोधूनही त्यांना ती मिळतच नाहीत. पुढे अनेक वर्षांनंतर एकदा अचानक समोर आलेल्या दोन तरूण भावांना बघून त्यांना ही आपलीच मुलं आहेत असं वाटायला लागतं. यमुनाबाई त्या मुलांच्या आईवडिलांपर्यंत जाऊन पोहोचतात आणि मुलं परत करण्याची मागणी करतात. पण आईवडिल अर्थातच तयार होत नाहीत. त्यांचं म्हणणं असतं की ही त्यांची स्वत:चीच मुलं आहेत. पोलिस केस होते, कोर्टात केस उभी राहते. कोर्ट त्यांची डीएनए चाचणी करायला सांगतं. यमुनाबाई आणि गजाननरावांना खात्रीच असते की यात ही मुलं आपली आहेत हे सिध्द होणार.

पण दुर्दैवानं डीएनए चाचणीत ती मुलं यमुनाबाई आणि गजाननरावांची नाहीत हे सिद्ध होतं. तर यमुनाबाई आणि गजाननराव कोणतं गाणं म्हणतील?

>>>>>>>>>>>>> बरेच दिवस होऊन गेले. मी स्वतःच गाणं विसरण्याआधी उत्तर देऊन टाकते.

उत्तर :

हम थे 'जीन' के सहारे
'वो' हुए ना हमारे

Pages