..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सीच्या कोड्यातले शब्दः
निराशा(नीर+आशा), नैनो(नॅनो), एक, जीवन (३८३८७)

गाणं नाही कळलं अजोन.

एक अंधेरा लाख सितारे
एक निराशा लाख सहारे
सबसे बडी सौगात है जीवन
नादां है जो जीवन से हारे

धन्यवाद श्रद्धा

सह्हीये भरत आणि श्रद्धा Happy
या कोड्यासाठी तुम्हा दोघांनाही माझ्याकडुन आईस्क्रीम पार्टी (अगदी खर्रीखुर्री) जेंव्हा कधी भेटाल तेंव्हा. प्रॉमिस!!!!

००४/०१४
एक अंधेरा लाख सितारे
एक निराशा लाख सहारे
सबसे बडी सौगात है जीवन
नादां है जो जीवन से हारे

आशाच्या फोटोवर पाण्याचा ग्लास आहे.
यूझर ३८३८७ (मायबोलीवरचा) जीवन नावाचा आहे.
>>> महान. तो पाण्याचा ग्लास आहे हे आता कळलं. मला तो माईकच वाटत होता. हे राम!

भरत ...सह्हीच.

श्रद्धा, भरत ___/\___ Happy आणि जिप्सी तुला साष्टांग दंडवत या कोड्याबद्दल. Happy

धन्स मामी, श्रद्धा Happy

हे गाणं माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक Happy (चित्रपटः आखिर क्यो?) शब्द सुरेखच आहेत. Happy

००४/०१५:

'अब्दुल, ए अब्दुल, कुठे गेलाय कोण जाणे. तरी सांगितलं होतं की सकाळी ८ वाजता निघायचंय म्हणून' मध्या वैतागला.
'अरे, काय आग लागल्यासारखा ओरडतो आहेस? येईल तो ५ मिनिटात. शेजारच्या टपरीवर चहा प्यायला गेलाय. रात्री नीट झोप लागली नाही म्हणाला' सम्या उर्फ माहिती पुरवणी खात्याचे प्रमुख.

एव्हढयात अब्दुल आला. 'चलो साहब, हम तय्यार है'
'क्या तय्यार है? ठीक्से सोये नही हो ना रातमे? गाडी चला पाओगे? हमे उपर नही जाना' मध्या गुरकावला.
'नही साहब. मै ठीक हू. चलिये'

एक तास उलटला आणि रस्ता चुकल्याचं लोकांच्या लक्शात आलं.
'मै बोल रहा था ना तुम्हे की निंद पुरी नही हुई है तो कैसे गाडी चलाओगे? देखा अब नतीजा? क्यो नही सो पाये रातमे? बताओ अब' मध्याने सुरुवात केली.
अब्दुल कानकोंडला झाला. तो तरी काय करेल? सलमाचे अब्बाजान आप्ला निकाह लावून देतील की नाही ह्या काळजीने त्याने अख्खी रात्र जागून काढली होती.
'थांब रे जरा. अब्दुल, कही रास्ता पुछना पडेगा. अब इस रस्तेमे कोई गाव तो लगेगा ना?' इति सम्या

अब्दुलची बोलती बंद झाली नसती तर दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकाच गाण्यात कसं दिलं असतं त्याने?

क्लू - गाणं गोल्डन इरातलं आहे.

०४/०१६ : शाळेपासूनच रेखाला चित्रकलेची आवड निर्माण झाली. योगायोगाने तिला शाळेजवळाच्या प्रख्यात चित्रकार जयंत नेनेंच्या चित्रकलेच्या क्लासबद्दल कळले.आपल्या वडिलांकडे तिने नेनेंच्या क्लासला जायची इच्छा व्यक्त केली. वडिलांची काही हरकत नव्हती. पण त्यांनी तिला एक वॉर्निंग दिली.
जयंतरावांचे वडील माधवराव हेही प्रख्यात चित्रकार होते आणि त्यांनीच हा क्लास सुरू केला होता. त्यांचीच पद्धत जयंतराव चालवीत होते. स्केचिंग शिकवताना विद्यार्थ्यांना ते चक्क पाटी-पेन्सिल वापरायला लावत आणि जोपर्यंत परफेक्ट स्केच जमत नाही तोवर पूर्ण चित्र पुसून पुन्हा पुन्हा नव्याने काढायला लावतात. याची तयारी ठेव.
हे त्यांनी गाण्यात कसं सांगितलं असेल?

जिप्सी, आपल्याला एखाद्या गोष्टीचं उत्तर माहित नसेल तर आपण देवाचा हवाला देऊन काय म्हणतो?

बिन्गो श्रध्दा! तुला २ प्लेटी कांदा भजी बक्षीस Happy

००४/०१५:

'अब्दुल, ए अब्दुल, कुठे गेलाय कोण जाणे. तरी सांगितलं होतं की सकाळी ८ वाजता निघायचंय म्हणून' मध्या वैतागला.
'अरे, काय आग लागल्यासारखा ओरडतो आहेस? येईल तो ५ मिनिटात. शेजारच्या टपरीवर चहा प्यायला गेलाय. रात्री नीट झोप लागली नाही म्हणाला' सम्या उर्फ माहिती पुरवणी खात्याचे प्रमुख.

एव्हढयात अब्दुल आला. 'चलो साहब, हम तय्यार है'
'क्या तय्यार है? ठीक्से सोये नही हो ना रातमे? गाडी चला पाओगे? हमे उपर नही जाना' मध्या गुरकावला.
'नही साहब. मै ठीक हू. चलिये'

एक तास उलटला आणि रस्ता चुकल्याचं लोकांच्या लक्शात आलं.
'मै बोल रहा था ना तुम्हे की निंद पुरी नही हुई है तो कैसे गाडी चलाओगे? देखा अब नतीजा? क्यो नही सो पाये रातमे? बताओ अब' मध्याने सुरुवात केली.
अब्दुल कानकोंडला झाला. तो तरी काय करेल? सलमाचे अब्बाजान आप्ला निकाह लावून देतील की नाही ह्या काळजीने त्याने अख्खी रात्र जागून काढली होती.
'थांब रे जरा. अब्दुल, कही रास्ता पुछना पडेगा. अब इस रस्तेमे कोई गाव तो लगेगा ना?' इति सम्या

अब्दुलची बोलती बंद झाली नसती तर दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकाच गाण्यात कसं दिलं असतं त्याने?

क्लू - गाणं गोल्डन इरातलं आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीचं उत्तर माहित नसेल तर आपण देवाचा हवाला देऊन काय म्हणतो?

उत्त्तरः

इब्तदा-ए-इश्क मे हम सारी रात जागे
अल्ला जाने क्या होगा आगे?
ओ, मौला जाने क्या होगा आगे?

स्वप्ना, श्रद्धाच्या प्रश्नाचे उत्तर मलाही हवय. इब्तदा म्हणजे काय?

भरत क्लू? बनाके क्यू बिगाडा रे अशा टायपाचं गाणं वाटतय.

०४/०१६ : क्लु १ : चित्रकला शिक्षकांच्या वडिलांचे नावही का कोड्यात का दिले असावे? विचार करा
क्लु २: गाण्यातल्या काही शब्दांचे शब्दशः भाषांतर केलेले आहे.

हे खूपच सोपं आहे. १) माधवनी पहिल्या प्रयत्नात काही शब्द ओळखले होते.
२) मामीने एक शब्द ओळखलाय.
३)गाणं तसं जुनं आहे. पार्श्वगायनाची सुरुवात झाली त्या दशकातलं.
४)पार्श्वगायनातल्या तांत्रिक बाबी लता ज्यांच्याकडून शिकली त्या संगीतकाराचं गाणं आहे.
५)सोबत प्रतिसैगल होण्यासाठी आलेला तिचा xxxभैया.
६)प्रश्नाचे उत्तर आले नाही की आपण काय होतो?

आता आलंच पाहिजे.

Pages