..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी ते 'काली कमली' असेच आहे. अर्थ तू दिलेलाच आहे - कृष्ण. अर्थ १: काळी कांबळी घेतलेला २: कमळासारखे काळे डोळे असलेला

यशोमती मय्यासे गाण्यातही येतात हे शब्द.

>>घिरके आईयो हमारी तलैया मै तलैया किनारे मिलुंगी

मला 'भरके जाईयो हमारी तलैय्या' असं ऐकू येतं ते.

०४/००८ मौसम है आशिकाना
दिल कहीं से उनको
ऐसे में ढूंढ लाना

सूरज कहीं भी जाए तुमपर न धूप आए
तुमको पुकारतें हैं इन गेसुओं के साए
आजाओ मैं बना दूं पलकों का शामियाना

फिरते हं हम अकेले बाहों में कोइ लेले
आखिर कोइ कहांतक तनहाइयों से खेले
डर है न मार डाले सावन का क्या ठिकाना

उगाचच.

नाही भरत Happy

(येस्स, सगळ्यांना आता खिंडीत गाठलंय. कस्से पटापट चित्रकोडे ओळखायचे. आत्ता ओळखा. :आसुरी हसणारा बाहुला: )

मीच सांगतो उत्तर Happy

००४/००८
कुछ कहता है ये सावन
क्या कहता है
शाम सवेरे दिलमें मेरे तु रहता है

कुछ कहता है ये सावन - सावन कुमार आणि माईक
क्या कहता है - माणसाच्या हातात भोंगा आणि त्यावर प्रश्नचिन्ह (दुसरे चित्र)
शाम सवेरे - सूर्य आणि बाण (खाली जाणारा बाण "शाम" (डुबणार सूर्य), वर जाणारा बाण "सवेरे" (उगवणारा सूर्य) Proud
दिल - ह्रदयाचे चिन्ह
YOU - तु

कोडं ०४/००६:

'ह्या शनिवारी सकाळी आणखी कुठला प्रोग्रॅम नको ठेवूस रे." वर्षा मटार सोलता सोलता म्हणाली.
'का? नवा पिक्चर लागलाय. बघायला जायचं का विचारणारच होतो'.
'अरे सजल, असं काय करतोस? ते तिसर्‍या मजल्यावरचे मोने आहेत ना त्यांच्याकडे पार्टी आहे...त्यांच्या २५ व्या मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरीची...तिथे जायचंय. काल मिसेस मोन्यांचा फोन आला होता'
'हायला, ते मोने लिफ्टमध्ये १ मिनिट भेटतात तेव्हाही बोअर करतात. तिथे पार्टिला कोण जाणार? त्या मिसेस मोन्यांना नोबेल दिलं पाहिजे. मी येणार नाही हा सांगून ठेवतो. '
'मग मी काय एकटी जाऊ? कारण काय सांगू पण आपण येत नाही त्याचं? मला खोटं बोलायला आवडत नाही हं'
'अग, सांग त्यांना की मी येऊ शकत नाही. आणि तुला एकटीला यायचं नाहिये'

वर्षा चतुर होती. मोन्यांची जुन्य हिंदी गाण्यांची आवड लक्षात घेऊन तिने आपण का येत नाहिये ते एका गाण्यातून असं काही सांगितलं की मोने नाराज व्हायच्या ऐवजी खुश झाले. ओळखा ते गाणं.

क्लू - नवराबायकोंची नावं आणि त्यांच्या पार्टीला न जाण्याचं कारण

उत्तरः बिन बादल बरसात ना होगी

माधव, सजल म्हणजे ढग

००४/०१०

आई हृदयनाथला बाजारात भाजी आणायला पाठवते. हृदयनाथ बटाटे घेतो, कांदे घेतो. त्याला एका गाळ्यात परवर दिसतात. त्याला ते घ्यायचे असतात. पण त्याच्या कडे फक्त बंदे ५०० रुपये असतात. भाजीवाली काही सुट्टे देत नाही. तो तसाच नाराज होवून निघतो. तेवढ्यात त्याची मैत्रीण प्रिया तिकडे येते. त्याचा प्रोब्लेम तिला कळतो. ती खरं तर मनातून त्याच्यावर प्रेम करत असते. तिला त्याला मदत करायची असते, पण तिच्या कडे सुध्धा पुरेसे पैसे नसतात. तेवढ्यात तिच्या लक्षात येत. की तिचा ओळखीचा खाटिक दिलावर चं दुकान तिकडेच आहे. ती दिलावरला त्याच्या कडे घेवून जाते. दिलावर त्याला सुट्टे पैसे देतो. मग खुशीत हृदयनाथ परवर घेतो. प्रियाच्या मनात एक गाणं रुंजी घालायला लागतं. कोणत बरं ते ?

ओ मंडळी या भागातले माझे पहिलंच कोडं अजून बाकी आहे. इतके काही कठीण नाहीये की डोळ्यापुढे काजवे चमकावेत. सांगा आता.

मोकीमी, उत्तर बरोबर असल्यास कोड्याचा क्रमांक, कोडे आणि उत्तर असे तिनही एका पोस्टीत द्यायचे असा शिरस्ता आहे इथला. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे उत्तर देणार्‍याला बक्षीस द्यायचे असते. Happy

Pages