..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

००४/०१०

आई हृदयनाथला बाजारात भाजी आणायला पाठवते. हृदयनाथ बटाटे घेतो, कांदे घेतो. त्याला एका गाळ्यात परवर दिसतात. त्याला ते घ्यायचे असतात. पण त्याच्या कडे फक्त बंदे ५०० रुपये असतात. भाजीवाली काही सुट्टे देत नाही. तो तसाच नाराज होवून निघतो. तेवढ्यात त्याची मैत्रीण प्रिया तिकडे येते. त्याचा प्रोब्लेम तिला कळतो. ती खरं तर मनातून त्याच्यावर प्रेम करत असते. तिला त्याला मदत करायची असते, पण तिच्या कडे सुध्धा पुरेसे पैसे नसतात. तेवढ्यात तिच्या लक्षात येत. की तिचा ओळखीचा खाटिक दिलावर चं दुकान तिकडेच आहे. ती दिलावरला त्याच्या कडे घेवून जाते. दिलावर त्याला सुट्टे पैसे देतो. मग खुशीत हृदयनाथ परवर घेतो. प्रियाच्या मनात एक गाणं रुंजी घालायला लागतं. कोणत बरं ते ?

उत्तरः

बंदा परवर थामलो जीगर
बनके प्यार फीर आया हु
खिदमत मे आपकी हुजुर
फीर वही दिल लाया हुं

माधव यांना जिप्सीने न पाठवलेले आंबे ... पाटीभर.

( माधव... आता खुश!!!! दिलं ना बक्षिस)

००४/००१: रीया आणि प्रिया खूप चांगल्या मैत्रिणी असतात. प्रिया कथ्थकची प्रसिद्ध कलाकार असते. पण एकदा गाडी शिकताना रीयाकडून प्रियाचा अपघात होतो. अपघातातून प्रिया वाचते पण तिचा पाय कायमचा जायबंदी होतो. कथ्थक पण बंदच मग अरेरे . ती रीयाशी मैत्री तोडते. प्रियाचा प्रियकर शाम. त्याचे मात्र तिच्यावर मनापासून प्रेम असते. पण एकदा रीया त्याच्याकडे प्रेमभर्‍या नजरेने बघते आणि गाणे गुणगुणते. ते बघून मात्र प्रिया पार खचून जाते. एका पायात घुंगरू बांधून ती खोलीत येरझार्‍या घालू लागते. शाम येतो तर त्याला कळतच नाही की प्रिया असे का वागतेय. तो तिला विचारतो तर ती त्याला गाण्यातून उत्तर देते.

उत्तरः मेरी ये पाय-लिया गीत तेरे गाये
चलू थमथमके घुंगरू खनक जाये

कोडं ००४/०११:

वैदेही उपवनात दिसली नाही तसं ऋषी वशिष्ठांना थोडंसं आश्चर्य वाटलं. 'जानकी कुठे आहे गं' समोर आलेल्या आश्रमकन्येला त्यांनी विचारलं. 'प्रणाम ऋषिवर, त्यांना आत्ताच त्यांच्या पर्णकुटीच्या दिशेने जाताना पाहिलं' तिने आदबीने सांगितलं. 'पर्णकुटीत? आणि ह्या वेळी? तब्येत तर बरी आहे ना हिची' असा विचार करत ऋषी पर्णकुटीच्या दिशेने निघाले.

तर बाहेरच एका झाडाखाली जानकी बसलेली दिसली. हातात एक जपमाळ घेऊन जप करत होती. मुनींची चाहूल लागताच तिने डोळे उघडले आणि उठून प्रणाम केला. 'अग असू देत. तब्येत ठीक आहे ना तुझी?' त्यांनी विचारलं तेव्हा तिने हसून मान डोलावली.

'जपमाळ कुठून आली तुझ्याकडे? सुरेख आहे'
'मागे वनवासाला जाताना कौसल्यामाता आणि सुमित्रामाता दोघींनी दिली होती. मी जपून ठेवली आहे तेव्हापासून'

'बरं बरं. देवाचं नाव घेत होतीस होय? चांगलं आहे.' असं त्यांनी म्हणताच ती थोडीशी लाजली.
मुनींना आश्चर्य वाटलं. पण क्षणार्धात त्यांच्या लक्शात सारा प्रकार आला. जानकी कोणाचं नाव घेत होती हे लक्शात येताच त्यांच्या चेहेर्‍यावर हसू पसरलं आणि ते गुरुकुलाच्या दिशेने रवाना झाले.

रामायणाच्या काळात बॅकग्राऊन्ड म्युझिक देण्याचा प्रघात असता तर जानकीच्या क्लोजअप वर कुठलं गाणं वाजलं असतं? क्लू - गाणं गोल्डन इरातलं नाही.

वि.सू. कोणाच्या धार्मिक भावना दुखवायचा हेतू नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.

कोडं ००४/०११:

संभाला है मैने बहुत अपने दिल को
जबां पर तेरा फिर भी नाम आ रहा है
जहाँ राज को छुपाया ना जाये...

अंधारात दगड!
माधव गोल्डन इरा नाही म्हणतेय ती.

स्वप्ना ते बिन बादल बरसात तु दिलंस चक्क? अग ते किती एन्शंट गाणं आहे. तुला कसं माहित. इथल्या थोरांनाही माहित नाहीये. Happy

>>> वि.सू. कोणाच्या धार्मिक भावना दुखवायचा हेतू नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी. >>> हे योग्य केलंस. Proud

बिन बादल बरसात मधली बाकीची गाणी ऐकलेली आहेत. टायटल साँग कधीही कानावर पडलेलं नाही. स्वप्ना शोधून शोधू काढतेय गाणी.

तुमचा विश्वास बसो अगर न बसो ते गाणं मी ऐकलेलं आहे. Proud आणि तो पिक्चरही थोडा पाहिला आहे. त्या पाहिलेल्या भागाबद्दल मी ' अशक्य सीन्स अतर्क लॉजिक' का कायसं नाव असलेल्या बीबीवर लिहिलं आहे.

त्या पाहिलेल्या भागाबद्दल मी ' अशक्य सीन्स अतर्क लॉजिक' का कायसं नाव असलेल्या बीबीवर लिहिलं आहे. >> गाणे न ऐकल्याचे दु:ख नाहीसे झाले हे वाचून Happy

मामी शालजोडी केवढ्याला पडली? Happy

कोडं ००४/०११

तेरे नाम का कलमा कलमा
तेरे नाम का कलमा कलमा

मेरि जान की तु जान हबीबा
दिल तेरे कुर्बान हबीबा

हे की काय???

००४/०१२: शिरपाची मोठी बागायत होती. त्याने अनेक फळझाडे त्यात लावली होती आणि तो त्यावर खूप मेहनत पण घ्यायचा. मस्त होती त्याची बाग. पण एकदा दुष्काळ पडतो आणि सगळी झाडे पाण्यावाचून माना टाकतात. वळचणीच्या पाण्यावर जगणारी केळ कशीबशी तगते. खूप उशीरा पाउस येतो. उजाड झालेल्या बागेकडे बघून ते एकमेव झाड कोणते गाणे म्हणेल.

लय सोप्प आहे.

कोडं ००४/०११:

उत्तरः

माई नी माई मुंडेर पे तेरी बोल रहा है कागा
जोगन होगयी तेरी दुलारी मन जोगी संग लागा (???)

कोडं ००४/०११:

वैदेही उपवनात दिसली नाही तसं ऋषी वशिष्ठांना थोडंसं आश्चर्य वाटलं. 'जानकी कुठे आहे गं' समोर आलेल्या आश्रमकन्येला त्यांनी विचारलं. 'प्रणाम ऋषिवर, त्यांना आत्ताच त्यांच्या पर्णकुटीच्या दिशेने जाताना पाहिलं' तिने आदबीने सांगितलं. 'पर्णकुटीत? आणि ह्या वेळी? तब्येत तर बरी आहे ना हिची' असा विचार करत ऋषी पर्णकुटीच्या दिशेने निघाले.

तर बाहेरच एका झाडाखाली जानकी बसलेली दिसली. हातात एक जपमाळ घेऊन जप करत होती. मुनींची चाहूल लागताच तिने डोळे उघडले आणि उठून प्रणाम केला. 'अग असू देत. तब्येत ठीक आहे ना तुझी?' त्यांनी विचारलं तेव्हा तिने हसून मान डोलावली.

'जपमाळ कुठून आली तुझ्याकडे? सुरेख आहे'
'मागे वनवासाला जाताना कौसल्यामाता आणि सुमित्रामाता दोघींनी दिली होती. मी जपून ठेवली आहे तेव्हापासून'

'बरं बरं. देवाचं नाव घेत होतीस होय? चांगलं आहे.' असं त्यांनी म्हणताच ती थोडीशी लाजली.
मुनींना आश्चर्य वाटलं. पण क्षणार्धात त्यांच्या लक्शात सारा प्रकार आला. जानकी कोणाचं नाव घेत होती हे लक्शात येताच त्यांच्या चेहेर्‍यावर हसू पसरलं आणि ते गुरुकुलाच्या दिशेने रवाना झाले.

रामायणाच्या काळात बॅकग्राऊन्ड म्युझिक देण्याचा प्रघात असता तर जानकीच्या क्लोजअप वर कुठलं गाणं वाजलं असतं? क्लू - गाणं गोल्डन इरातलं नाही.

वि.सू. कोणाच्या धार्मिक भावना दुखवायचा हेतू नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.

उत्तरः

सांसोकी मालापे सिमरू मै पी का नाम (चित्रपट कोयला)

सांसोकी मालापे सिमरू मै पी का नाम (चित्रपट कोयला)
>>> मला हे गाणं माहित नाही. पण कोडं एकदम समर्पक होतं. मस्तच, स्वप्ना. Happy

००४/०१२: अ-केली / केला / केले
सॉरी, मी स्वप्नाची मधली पोस्ट वाचलीच नाही आणि तेच गाणं सजेस्ट केलं.

००४/०१३: शिरपाचा भाऊ सर्जेराव. त्याचा पशुपालनाचा धंदा असतो. तो आपल्या गुरांकरता नवीन गोठा बांधतो आणि शिवभक्त असल्याने त्याला नाव देतो 'हर'. त्याच सुमारास तो गुरांच्या बाजारातून नवीन बैल आणतो - 'पवळ्या'. पवळ्या मोठे उमदे जनावर असते पण लइ वांड Happy एकदा तो दावणीची दोरी तोडून गोठ्यातून पळून जातो. सर्जेराव तेंव्हा फोनवर आपल्या वडलांशी बोलत असतो. नोकर पवळ्या पळाल्याची बातमी सांगायला येतात. तो गलका ऐकून वडील विचारतात काय झाले? सर्जेराव त्याचे उत्तर गाण्यातूनच देतो.

श्र्द्धा Happy तुला एक ग्लासभर मसालेदूध.

००४/०१३: शिरपाचा भाऊ सर्जेराव. त्याचा पशुपालनाचा धंदा असतो. तो आपल्या गुरांकरता नवीन गोठा बांधतो आणि शिवभक्त असल्याने त्याला नाव देतो 'हर'. त्याच सुमारास तो गुरांच्या बाजारातून नवीन बैल आणतो - 'पवळ्या'. पवळ्या मोठे उमदे जनावर असते पण लइ वांड स्मित एकदा तो दावणीची दोरी तोडून गोठ्यातून पळून जातो. सर्जेराव तेंव्हा फोनवर आपल्या वडलांशी बोलत असतो. नोकर पवळ्या पळाल्याची बातमी सांगायला येतात. तो गलका ऐकून वडील विचारतात काय झाले? सर्जेराव त्याचे उत्तर गाण्यातूनच देतो.

उत्तरः
बा बुल मोरा नयी-हर छुटो ही जाय.

धन्यवाद माधव. Happy

'सांसो की माला पे' मस्त कोडं होतं स्वप्ना. गाणं माहीत होतं पण लक्षात आलं नाही.

४/०१२:

अकेले है तो क्या गम है?

००४/०१२

एक अकेला इस शेहेर मे
रात मे या दोपहर मे
( हे बहुतेक नसणार)

अकेले है तो क्या गम है
चाहे तो हमारे बस मे क्या नही (????)

००४/०१२: शिरपाची मोठी बागायत होती. त्याने अनेक फळझाडे त्यात लावली होती आणि तो त्यावर खूप मेहनत पण घ्यायचा. मस्त होती त्याची बाग. पण एकदा दुष्काळ पडतो आणि सगळी झाडे पाण्यावाचून माना टाकतात. वळचणीच्या पाण्यावर जगणारी केळ कशीबशी तगते. खूप उशीरा पाउस येतो. उजाड झालेल्या बागेकडे बघून ते एकमेव झाड कोणते गाणे म्हणेल.

उत्तरः अकेले है चले आओ जहां हो कहां आवाज़ दे तुमको कहा हो

Pages