Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षीचे प्रॉब्लेम्स युनिक
दक्षीचे प्रॉब्लेम्स युनिक असतात नै...खूप शिकायला/गप्पा मारायला मिळतात त्यातून...;)
गेली का गं चिलटं?? म्हणजे पावडरच्या दुधाचा चहा प्यायला यायला बरं....
@रचु शेव बटाटा पुरी सार्खे
@रचु
शेव बटाटा पुरी सार्खे टॉपिन्ग कर .बटाट्यात मिठ घालू नको.मस्त लागतात.लेकीच्या वाढदिवसाला मटा मट संपल होत हे स्टार्टर.
घरी ज्युसरमध्ये गाजराचा रस
घरी ज्युसरमध्ये गाजराचा रस केला, त्याचं लेफ्टोवर आहे बर्यापैकी. गाजराच्या.किसासारखे दिसतेय, पण ज्युस निघून गेल्याने कोरडे आहे प्रकरण. कट्लेट वगैरे होतील का त्याची?
बस्के, पराठ्यात वापरुन टाक.
बस्के, पराठ्यात वापरुन टाक.
घरी ज्युसरमध्ये गाजराचा रस
घरी ज्युसरमध्ये गाजराचा रस केला, त्याचं लेफ्टोवर आहे बर्यापैकी. गाजराच्या.किसासारखे दिसतेय, पण ज्युस निघून गेल्याने कोरडे आहे प्रकरण. कट्लेट वगैरे होतील का त्याची? >>>>
बरेच प्रयोग केले आहेत मी.
थोडे उकडलेले बटाटे, भाज्या, पावाचा चुरा, मसाले वगैरे घालून
कट्लेटस,
कोफ्ते,
ब्रेडरोल्स,
भाजणी घालून थालिपिठे
दाक्षिणात्य पद्धतीची उडदाची / हरभर् याची डाळ घालून चटणी
ओह थॅक्स! बघते करून..
ओह थॅक्स! बघते करून..
़काल रात्री मुठीया केले पण
़काल रात्री मुठीया केले पण यावेळी नेहमीपेक्षा मिश्रण घट्ट भिजले. त्यामुळे मुठीये थोडे दडस झालेत. आता त्यात काही सुधारणा होउ शकेल का? आतुनही थोडे कच्चे वाटत आहेत . तर त्यावर पाणी शिंपडुन अजुन वाफवले तर सुधारणेला काही वाव आहे का?
मायक्रोवेवमधून काढा.
मायक्रोवेवमधून काढा.
त्याचे काप करा, तीळ, मोहरी,
त्याचे काप करा, तीळ, मोहरी, कढीपत्ता, मिरची अशी मस्त फोडणी करा त्यात ते ढकला आणि परता. वरतुन खोबरे, कोथिंबीर, शेव घाला आणि खावा
धन्यवाद लोला आणि लाजो. लाजो,
धन्यवाद लोला आणि लाजो.
लाजो, काल तसेच केले होते. छोटे काप करुन फोडणीत शॅलो फ्राय करून वगैरे पण बाहेरून शिजलेले आणि आतुन कच्चट वाटले:(. आता लोलानी सांगितल्याप्रमाणे मायक्रोवेव्ह करुन मग तू सांगितलस तस सर्व्ह करीन.
वेका दिनेश फ्रिज व्यवस्थित
वेका
दिनेश फ्रिज व्यवस्थित पुसला होता मागच्या आठवड्यात. आता रवा बिवा कोंबते त्यात. आणि सेटींग ही वाढवते. माझ्यापेक्षा ती चिलटं पाहून बाईलाच जास्ती त्रास होतोय माझ्या, तीच पुसुन काढते रोज
आता जरा प्रमाण कमी कमी व्हायला लागलंय. सुलेखाने ईमेलीतून सोडा आणि लिंबू घालून पुसायचा सल्ला दिलाय शिवाय झंपीने त्याला दुजोरा दिलाय. ते येत्या शनिवारी करून पाहते.
दक्षे, एकदा डेटॉल पाण्यात
दक्षे, एकदा डेटॉल पाण्यात घालुन त्याने पुसुन घे फ्रिज....
अग ती चिलटं आण्खी कुठे जाउन
अग ती चिलटं आण्खी कुठे जाउन बसलीत का ते पण चेक कर ...
बिचारा फ्रीज
उरलेल्या गाजर किसाचा गाजर
उरलेल्या गाजर किसाचा गाजर हलवा मस्त व लवकर होतो!
सुचरीता कसा करतेस तू? माझा
सुचरीता कसा करतेस तू? माझा होपलेस झाला होता..कारण गाजरं रस काढल्यामुळे पुचाट होतात न गं??
गव्हाचं पीठ डब्यात भरुन ठेवलं
गव्हाचं पीठ डब्यात भरुन ठेवलं होतं त्यात अचानक टोके दिसायला लागले. म्हणुन चाळुन पुन्हा डबा साफ करुन भरुन ठेवलं. तरी काल २ टोके सापडले. कशामुळे होत असेल असं? पीठात काही टाकता येईल का तिरफळं वगैरे??
कांदा कापण्याच्या /
कांदा कापण्याच्या / किसण्याच्या वेळी एक्झॉस्ट फॅन लावला तर डोळे झोंबत नाहीत. ( बहुतेक हा आश्चिगने इथेच कुठेतरी दिलेला सल्ला आहे ) नेहेमीच उपयोग होतो.
बरं त्या चिलटांसाठी काय करायचे ते खरच सांगा. ( फ्रिजमधली नाही) ओट्याजवळ दिवसभर दिसतात. वैताग येतोय. रोज लायझॉलने ओटा पुसुन अगदी धुवूनही काही फरक नाही.
योडी, पिठात टोक्यांची सूक्ष्म
योडी, पिठात टोक्यांची सूक्ष्म अंडी आहेत. ती जसजशी उबवतील तसतसे टोके बाहेर येतील. पिठ फार नसेल तर फेकून देणेच उत्तम.
सावली, सिंकच्या ड्रेनचे छिद्र, कव्हरने बंद करुन ठेवायचे. तसेच कचर्याचा डबा नेहमीच बंद ठेवायचा. या दोन जागी जास्त चिलटे असतात. ओलसर जागा नष्ट झाल्या कि काही दिवसांनी चिलटे येणे बंद होतील, दरम्यान ओट्याची स्वच्छता हवीच.
सावली, ती चिलटं
सावली, ती चिलटं पावसाळ्यातल्या कुंद, दमट हवेमुळे येतात. शक्य असेल तर सतत धूप लावून ठेव ओट्याजवळ सलग तीन-चार दिवस.. मग ह्या घरात आपल्याला थारा नाही असं समजल्यावर जातील आणि परत येणार नाही
खरंच, स्वानुभव!
पिठ फार नसेल तर फेकून देणेच
पिठ फार नसेल तर फेकून देणेच उत्तम.
>>
पाच किलो पिठातलं जवळपास २ किलोच संपलं असेल. मागे तांदळातही असेच टोके झालेले. अंडी वगैरे असतील म्हणुन ते वापरायचेच बंद केलं पण आता ह्या इतक्या पीठाचं काय करु??
दक्षिणा,कुठेतरी वाचलेले
दक्षिणा,कुठेतरी वाचलेले आठवतेय की जायफळ पुड थोडी चिलटे जिथे येतात तीथे शिंपडायची....
चिलटे जाण्यासाठी....
योडी, तांदूळ आणले कि त्यात
योडी, तांदूळ आणले कि त्यात पार्याच्या गोळ्या किंवा बोरीक पावडर टाकली तर नव्याने टोके होत नाहीत व असलेले मरतात. (पार्याच्या गोळ्या नेहमीच पातळ कापडात बांधून टाकायच्या, म्हणजे तांदूळ धुवायला घेताना काढता येतात.) पण तांदूळ आपण निवडून / धुवून घेऊ शकतो.
पिठ एकदा मैद्याच्या चाळणीने चाळून घेता येईल. म्हणजे टोके निघतील (पण अंडी नाही.) कोंडाही जाईल. आताही पार्याच्या गोळ्या टाकता येतील (वरीलप्रमाणे बांधूनच) आणि प्रत्येकवेळी पिठ चाळूनच घ्यावे लागेल. पुढ्यच्यावेळी, डबा नीट कोरडा करून, खाली पार्याच्या गोळ्या टाकून वर पिठ भरायचे.
दिनेश, पार्याच्या गोळ्या
दिनेश, पार्याच्या गोळ्या म्हणजे कोणत्या?? मेडिकलमध्ये काय नावाने मिळतील??
पिठ एकदा मैद्याच्या चाळणीने चाळून घेता येईल. म्हणजे टोके निघतील
>>
पीठ परवाच्या दिवशीच चाळुन घेतलं पण काल डबा बघितला तर २-३ टोके मिळालेच वर.
योडी, पीठ घट्ट झाकणाच्या
योडी, पीठ घट्ट झाकणाच्या कोरड्या डब्यात ठेवा.
मला वाटत ३ किलो पिठ उरल आहे तुमच्याकडे त्याचे चुर्मा लाडू बनवा आणि ववि ला न्या. सहज संपतील.
दिनेशदा, सिंकच्या ड्रेनचे
दिनेशदा, सिंकच्या ड्रेनचे छिद्र बंद करुन पाहिन. बाकी दुपारी सगळे कोरडेच असते पण येतातच ते.
आता मंजूडीचा उपायही करुन पहाते. आज अगरबत्ती लावुन ठेवते. मग धुप आणुन तो लावुन ठेवेन.
जायफळ पुडीला मुंग्या येतील ना?
नाही ते मात्र खात्रिशीर सांगु
नाही ते मात्र खात्रिशीर सांगु शकते.. जायफळ पुडीला नाही येत मुन्ग्या..
मुंग्या नाहीत धनश्री, चिलटं
मुंग्या नाहीत धनश्री, चिलटं आहेत घरात.
अगं ए दक्षे, सावलीच्या
अगं ए दक्षे, सावलीच्या <<जायफळ पुडीला मुंग्या येतील न>> या प्रश्नाचं उत्तर आहे ते...
दक्षे, तुला खूपच बेजार करत असतील तर त्या चिलटांना डास मारायच्या रॅकेटने घाऊकरीत्या मार.. चिलटं खरंच परत येणार नाहीत.
हा मंजुचे बरोब्बर आहे...
हा मंजुचे बरोब्बर आहे...
@ योडी, मेडिकल वर त्या
@ योडी,
मेडिकल वर त्या गोळ्या झंडु पारद टिकडी नावाने मिळतात.
Pages