Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षिणा पाऊस पडतो आहे,
दक्षिणा पाऊस पडतो आहे, त्यामुळे उन नाही आणि बत्त्याने फुटत नाहीये.

कुकरला लावला आहे. बघते काय होत ते कळवते
पाकच करायचा होता, तर थेट
पाकच करायचा होता, तर थेट पातेल्यात गरम करता येईल. अगदी चमचाभर तूप टाकायचे.
( अर्थात सगळ्या गुळाचा करायचा असेल तरच )
गुळ घट्ट आहे म्हणजे चांगलाच आहे. लोखंडाने फोडला तर आणखी पाघळतो, लाकडी साधनाने फोडायचा तो.
एकदा कूकरमधे शिजवला, कि मग बाहेर टिकणार नाही !
कुकर मधे पण काही झाले नाही
कुकर मधे पण काही झाले नाही त्या मठ्ठ गुळाला ! पण जरा हाताळण्यायोग्य झाला आहे अस वाट्तय आता तसाच पाक करून बघते.
तुम्हाला कल्पना नाही, तुमच्या
तुम्हाला कल्पना नाही, तुमच्या रेसिपीज आणि ज्या आवडीने तुम्ही बनवता ते वाचून स्वयंपाक करायला न आवडणार्या मला स्वयंपाक करणे ही आवडीची गोष्ट असू शकते हे कळले आणि वळले पण.
>> +२००
आभार अवनी,, करता करता, मला
आभार अवनी,, करता करता, मला करणे आणि लिहिता लिहिता, मला लिहिणे ही असेच आवडायला लागले.
मी पहिल्यांदाच अनारसे करते
मी पहिल्यांदाच अनारसे करते आहे. इथेच कृती वाचून. २ वाट्या जुने तांदूळ ३ दिवस भिजवले, रोज पाणी बदलले, मग त्याचे पिठ केले. वजनाने पिठीइतका म्हणून पावणे २ वाट्या गुळ त्यात मिक्स केला व मिश्रण काल डब्यात घालून ठेवले. आत्ता मिश्रणाची कन्सिस्टन्सी (ह्याला पर्यायी मराठी शब्द?) म्हणजे वळले तर लाडु बांधता येतो आणि एक धक्का दिला तर परत त्याचा भुगा होतो अशी आहे. तर आता अनारसे करण्यासाठी हे पिठ कधी तयार होईल? व ह्यात केळे किती घालावे लागेल? प्रत्यक्ष अनारसे करतेवेळी पिठाची कन्सिस्टन्सी कशी असते ह्याबाबत सुगरण्-सल्ला हवाय. कृपया कोणी सांगु शकेल का?
दिनेशदा खरच मनावर घ्या . मी
दिनेशदा खरच मनावर घ्या . मी दुसरी असेन कॉपी वर साईन करून घ्यायला. माबो वरील ईतर अनेक लोक ही उत्सुक असतीलच
तुम्हाला कल्पना नाही, तुमच्या रेसिपीज आणि ज्या आवडीने तुम्ही बनवता ते वाचून स्वयंपाक करायला न आवडणार्या मला स्वयंपाक करणे ही आवडीची गोष्ट असू शकते हे कळले आणि वळले पण.>>>>>>>>>> मी पण
आणखी एक आगाऊ पणाचा सल्ला दिनेशदा.. रेसिपिज तर लिहाच, पण माझ्यासारखे जे करयला गेले गणपती आणि झाले...... कॅटेगरी वाले असतील (च) त्या लोकांसाठि पण वेगळ पुस्तक लिहा. हमखास न चुकणार्या रेसिपिज पण चुकवण्यात हातखंडा आहे माझा. मी अत्ताच कॉपीचा क्लेम ठेवतेय.
टोस्ट चा खुप चुरा आहे त्याचे
टोस्ट चा खुप चुरा आहे त्याचे काय करता येईल?
अखी, कटलेटसाठी वापरा.
अखी, कटलेटसाठी वापरा.
माझ्या अनारश्यांना कोणीतरी
माझ्या अनारश्यांना कोणीतरी वाचवा....
अंड्याचा पिवळा बलक
अंड्याचा पिवळा बलक पांढर्यातून बाजूला करायचाय? घ्या अंडी, दोन पसरट भांडी आणि पाण्याची एक रिकामी बाटली (प्लस्टिक).......
http://www.youtube.com/watch?v=_AirVOuTN_M
सुमेधा............काय झाले ग
सुमेधा............काय झाले ग तुझ्या अनारशांना.........हसले काय??? तर त्यात थोडे तांदूळ पिठ घालून पुन्हा मळून घे.......केळ जास्त घालू न्कोस.......आणी अनारसा थापताना खसखसीबरोबर थोडी साखर घालावी - जाळी चांगली पडते...
अन्जलि, मी पण चुकत माकतच
अन्जलि, मी पण चुकत माकतच शिकलो, आता इतरांच्या हातून तशा चुका होऊ नयेत, म्हणुन इथे लिहत असतो.
सुमेधाव्ही, इथे दिवाळीच्या फराळात सविस्तर चर्चा आहे.
तो बदमाश गूळ कमी पॉवरवर
तो बदमाश गूळ कमी पॉवरवर मायक्रोवेव्ह मधे ठेवला तर? माझ्या राशीला नम्रं (नरम्)च गूळ आल्याने हे करून बघितलं नाहीये.
तसंही माझ्या राशीला मी रांधलेलं खाणारे सोडल्यास.. बाकी पदार्थं वगैरे सगळेच बर्यापैकी नम्र असतात... इतकं नम्र, सोज्वळ, सात्विक खायला घालूनही नेहमी खाणार्यांमधे ढिम्मं फरक नाही
कटलेट मधे संपण्यासारखा नाहीये
कटलेट मधे संपण्यासारखा नाहीये
ह्यात केळे किती घालावे लागेल
ह्यात केळे किती घालावे लागेल >>> अनारशांमधे केळं घालतात ???
दाद अखी, त्याचा चुरमा
दाद
अखी, त्याचा चुरमा लाडूसारखा प्रकार करता येईल.
माधवी, अनारश्याचे पिठ कोरडे वाटले तर आयत्यावेळी त्यात थोडे केळे कुस्करुन घालतात. तयार टिकाऊ पिठात नाही.
त्याचा चुरमा लाडूसारखा प्रकार
त्याचा चुरमा लाडूसारखा प्रकार करता येईल.
>> कसा करु?
सोया व्हीप क्रीम आईसक्रीम
सोया व्हीप क्रीम आईसक्रीम साठी वापरता येते का? येत असेल तर रेसिपी प्लीज. केक कराय्चा कंटाळा आलाय. अर्धा लिटर क्रीम आहे घरात. अजुन कशाला वापरता येइल
अखी, थोडे तूप टाकून तो जरासाच
अखी, थोडे तूप टाकून तो जरासाच भाजून घ्यायचा. भाजताना त्यावर थोडेसे दूध शिंपडायचे. तो आधीच गोड असल्याने बेताची साखर आणि वेलची पूड घालून लाडू वळायचे... सुका मेवा आवडीप्रमाणे. झाले.
ओके. आजच करुन बघते.
ओके. आजच करुन बघते.
अखी -- बघ बघ....चवीला इकडे पण
अखी -- बघ बघ....चवीला इकडे पण पाठव
सोया व्हीप क्रीम आईसक्रीम
सोया व्हीप क्रीम आईसक्रीम साठी वापरता येते का? येत असेल तर रेसिपी प्लीज. केक कराय्चा कंटाळा आलाय. अर्धा लिटर क्रीम आहे घरात. अजुन कशाला वापरता येइल >> मला चव नाही माहित, पण ताज्या कापलेल्या फळांवर घालता येइल... (?)
दिनेशदा, निवा...अनारश्याचे
दिनेशदा, निवा...अनारश्याचे पिठ गुळ घालून मळून ठेवल्यानंतर ४=५ दिवस थांबायचे असतेच का? की २ दिवसात केले तरी चालते? पिठ मळलेल्या कणकेप्रमाणे दिसते का फायनली तयार झाल्यावर..? दिनेशदा मी दिवाळी फराळ वाचले..पण हे जरा निट समजले नाहिये.
सुमेधा, थोडे दिवस थांबले कि
सुमेधा, थोडे दिवस थांबले कि पिठ जरा मऊसर होते. अगदी लगेच कूटलेले पिठ आणि गूळ मिसळून ठेवलेले जरा कोरडे ( म्हणजे गुलाबजामचा न मळलेला मावा कसा दिसतो, तसे ) दिसते.
करायच्या वेळी थोडे मळून घेतात म्हणजे ते चपातीच्या मळलेल्या पिठाप्रमाणे दिसते. मळताना थोडा तूपाचा हात लावतात. ते पिठ मऊसर झालेले नसले तर त्यात थोडे पिकलेले केळे किंवा साय घालतात. जर ते जास्तच मऊ झाले असेल, तर त्यात थोडे तांदळाचे पिठ घालायचे.
अगदी मऊ पिठ असेल, तर अनारसे तूपात तळायला सोडल्यावर, हसतात म्हणजेच पसरतात.
दिनेशदा, बाकी सर्वजण आणी
दिनेशदा, बाकी सर्वजण आणी मायबोली यांस अनेक धन्यवाद. आयुष्यात पहिल्यांदा केलेले अनारसे उत्तम झाले. आणि अनारश्यासारखा अति-अवघड प्रकार पहिल्या अटेम्प्टमधे चांगला जमला म्हणून कौतुकही झाले. मी तर फक्त कृतीत दिल्याप्रमाणे सगळे तंतोतंत करत गेले व अंतिम पदार्थ उत्तम झाला.
परवा तो गुळ दिनेशदांच्या
परवा तो गुळ दिनेशदांच्या सल्ल्याप्रमाणे तसाच कढईत तापवून पाक केला. लाडू चांगले झाले. धन्यवाद.
मी नवी मोहरी आणली आहे. तिची गरम तेलात टाकली की लाही होते आहे. काय दोष असावा मोहरीत ? अशी मोहरी वापली तर चालेल ना ? काही अपायकारक नसेल ना ?
योगेश पहाते करुन लाजो ,
योगेश पहाते करुन

लाजो , दिनेशदा , वर्षु द्याकी माझ्या प्रश्नाला उत्तर
मोहरीची लाही ? म्हणजे ती
मोहरीची लाही ? म्हणजे ती फुटते का ? चांगली आहे ती. वापरायला हरकत नाही.
वर्षा, सोया क्रीमचा अनुभव नाही. त्याला जो वास येतो तो नाही आवडत मला. पण फ्रुट सलाद मधे वापरता येईल, असे वाटतेय.
दिनेशदा , लाडू एकदम मस्त
दिनेशदा , लाडू एकदम मस्त झाले. कोणाला कळले पण नाही कसचे आहेत ते. २०-२५ लाडू झाले त्यातले निम्मे संपले पण
Pages