Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तांदूळ आणि डाळींना बोरिक
तांदूळ आणि डाळींना बोरिक पावडर लावून ठेवले तर पोरकिडे होत नाहीत. वर्षभर उत्तम टिकतात. डाळींना शक्य असेल तर ऊन दाखवावे. तांदूळ उन्हात ठेवू नये, थेट बो. पा लावून साठवावेत. वापरण्याआधी डाळी/ तांदूळ स्वच्छ दोनतीनदा धुवून घ्यावे म्हणजे पावडर निघून जाईल.
गव्हाला ऊन देऊन एरंडेलाचा हात लावावा. एरंडेल पोटात गेले तरी चालते. किंवा गव्हात धान्यरक्षक गोळ्या घालून ठेवाव्यात. दळायला देताना गोळ्या काढून घ्याव्या.
हॉटेलातून कोळंबी ग्रीन मसाला
हॉटेलातून कोळंबी ग्रीन मसाला नामक पदार्थ मागवला. घट्ट ग्रेव्ही आहे. चव एकदम मस्त आहे पण कोळंबी कच्ची राहिली आहे असे वाटते. हे सुधारण्याची काही युक्ती आहे का ? सरळ पाणी घालून उकळू का?
लवकर मार्गदर्शन मिळाल्यास मदत होईल.
ती कच्ची राहिली असण्यापेक्षा
ती कच्ची राहिली असण्यापेक्षा अति शिजवल्याने चिवट झाली असण्याची शक्यता आहे.
नक्की कच्ची असेल तर ग्रेव्हीतून बाजूला काढून शिजवा आणि पुन्हा ग्रेव्हीत टाका.
धन्यवाद. >>>ती कच्ची राहिली
धन्यवाद.
>>>ती कच्ची राहिली असण्यापेक्षा अति शिजवल्याने चिवट झाली असण्याची शक्यता आहे
हे कसे ओळखायचे ? चावायला श्रम घ्यावे लागत आहेत, त्यामुळे मला वाटले की कच्ची आहे. आणि तसे असेल तर चिवटपणा घालवण्याचा काही उपाय आहे का ?
चावायला श्रम घ्यावे लागत
चावायला श्रम घ्यावे लागत आहेत>> म्हणजे लोला म्हणतेय तसं जास्त शिजवल्याने चिवट झाली आहे. तो चिवटपणा घालवण्यासाठी काहीही करता येणे शक्य नाही. Ask me how I know! :p
सप्रि. काही नाही करता येणार,
सप्रि.
काही नाही करता येणार, निदान मला तरी माहीत नाही.
चावून चावून खायची.
हॉटेलवाल्याला परत करा!
हॉटेलवाल्याला परत करा!
सिरियसली! फोन करून कळवा तरी. दमडे मोजून पदार्थ विकत घेतला तर तो खाण्याजोगा तरी असावा!
बहुतेक मासे हे पटकन शिजतात.
बहुतेक मासे हे पटकन शिजतात. पण जास्त शिजवले तर मोडतात तरी किंवा शेल वाले असतील तर वातड होतात. ही ग्रेव्ही हॉटेलवाल्याने परत गरम करुन दिली असण्याची शक्यता आहे. सुधारणा होणे नाही.
जीएस कोळंबी जास्त शिजवली की
जीएस कोळंबी जास्त शिजवली की वातडच होते. अगदी रबरासारखी लागते. तळली तरी तशीच वातड. त्यामुळे पुढे काळजी घ्या.
मुळात जीएस असले प्रश्न
मुळात जीएस असले प्रश्न विचारतोय याचेच मला आश्चर्य वाटतेय. मला वाटलेले तो पाककलेतला जाणकार आहे...
तो पाक(खा)कलेतला जाणकार आहे !
तो पाक(खा)कलेतला जाणकार आहे ! वातड लागतेय ते कसे बरोब्बर ओळखलेन त्याने.
मधुमेह असणार्यासाठी चालतील
मधुमेह असणार्यासाठी चालतील अशा रेसिपी इथे आहेत का? नसतील तर प्लिज सुचवाल का?
शिवाय मधुमेहासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, थालिपिठ भाजणी याचे काही करता येते का?
सावली, असा काही खास विभाग
सावली,
असा काही खास विभाग नाही. माझी आई गेली अनेक वर्षे, मधुमेहाचे व्यवस्थापन करतेय. सध्या डॉक्टर
कुठलाही पदार्थ वर्ज्य करा असे सांगत नाहीत. पण सर्व दिवसाच्या आहारमानात बसेल एवढेच खा, असे
सांगतात. म्हणजे एखादे दिवशी आंब्याची एक फोड जास्त खावीशी वाटली, तर खावी (कारण इच्छा असूनही
ती न खाल्यास जो ताण येतो, त्याने जास्त नुकसान होते ) पण मग त्या दिवशी कमी जेवावे.
त्यामूळे कुठलाही पदार्थ पण कमी प्रमाणात तसेच तेल तूप (आणि मीठही) अगदी कमी प्रमाणात खावे.
भाज्या तेलात तळून / परतून शिजवणे टाळावे. त्या ऐवजी पाण्यात / प्रेशर पॅनमधे शिजवणे चांगले.
बाहेरचे खाणे शक्यतो नकोच, पण खास करुन मधुमेहींसाठी जे डायेट चिवडा, बिस्किटे असे प्रकार मिळतात
ते घरात ठेवावेत. जेवण कमी घेऊन, दर दोन तासाने तसे पदार्थ खाणे योग्य.
फळांमधे आंबा, चिकू, केळी अशी अतीगोड फळे टाळावीत. पण पपई, संत्री, मोसंबी, कलिंगड वगैरे खावीत.
मुंबईत, माहीमला रहेजा हॉस्पिटलमधे आहार तज्ञ आहेत. एकंदर प्रकृती बघून, ते दिवसभराचा आहार ठरवून
देतात. तो पाळला, औषधे व व्यायाम नियमित ठेवला, तर अगदी आनंदाने जगता येते.
मधुमेहासाठी ज्वारी, बाजरी,
मधुमेहासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, थालिपिठ भाजणी याचे काही करता येते का? >> धिरडी, उकड, भाकरी.
बाजारात नाचणीची मधुमेहींसाठीची बिस्किटे मिळतात. ज्वारीच्या लाह्या खाता येऊ शकतात.
भाकरी / फुलके + पालेभाजी / फळभाजी + डाळ / घट्ट वरण + सॅलड / कोशिंबीर / रायते, ताक / कढी / सार हा मेन्यू मधुमेहींना चालतो. त्यात साखर / गूळ, बटाटे इ. पदार्थांवर हात अर्थातच आखडता घ्यायचा. भाज्यांमधील तेलाचे प्रमाण कमी करायचे. उसळींमध्ये पिवळे / हिरवे मूग पचायला चांगले.
डॉक्टरांच्या परवानगीने पातेल्यात मोकळा शिजवलेला व पहिली पेज पूर्ण काढलेला भात मर्यादित प्रमाणात खाता येऊ शकतो. गवार, मेथी, वांगं, कार्ले यासारख्या भाज्यांचे प्रमाण आहारात वाढवायला काही डॉक्टर्स सांगतात.
याशिवाय डॉ. च्या परवानगीने कार्ल्याचा रस, जांभळाचा रस सकाळी घेता येतो. काहीजण आहारात जवस - कारळे - लसणाची चटणी खायला सांगतात. मोड आलेली कडधान्ये (मूग, मटकी) आहारात असू द्यावीत.
खाद्यपदार्थांमध्ये बेकरी प्रॉडक्ट्स, लोणची, पापड इ. वर नियंत्रण कधीही चांगलेच. बाहेरच्या पदार्थांमध्ये साखर, तेल/ तूप यांचे प्रमाण कितपत आहे ते कळत नाही त्यामुळे बाहेरचे पदार्थ टाळलेले जास्त चांगले.
फळांमध्ये पेरू, वेलची केळं (सोनकेळं), पपई, संत्री, मोसंबी, जांभळं खाता येतात. किन्वा चे पदार्थही करता येतात. तांदळात काहीजण लाल तांदूळ / उकड्या तांदळाचा भात करून खातात. रव्याचे तिखट प्रकार, मिश्र पिठांचे तिखट प्रकार, भेळ, चणे-फुटाणे-लाह्या इ. खाऊ शकतात.
दिनेशदा, अरुंधती धन्यवाद (
दिनेशदा, अरुंधती धन्यवाद
( बरेच वर्ष मधुमेह असुनही ) त्यांच्याकडे भात रोजच खाल्ला जातो. नाश्ता वगैरेला इडली, कुरमुरे इ. असतात म्हणजे पुन्हा तांदुळच. आणि आता डॉ. ने तांदुळ ( किमान साखर कमी होई पर्यंत तरी ) पूर्ण बंद सांगितला आहे. म्हणुन बाकिचे उपाय सुचवायचे आहेत. बाजरी, ज्वारी, राजगिरा हे पदार्थ त्यांना माहित नाहीत ते सांगेनच. शिवाय कसे करायचे ते ही सांगावे लागेल.
बासमती तांदुळाची Glycimic
बासमती तांदुळाची Glycimic Index अतिशय कमी असते त्यामुळे फक्त हा एकच तांदुळ मधुमेही बिनधास्त खाउ शकतात. बाकीचे तांदुळ अतिशय कमी प्रमाणात खावे. Glycimic Index कमी करायचा अजून एक नामी उपाय म्हणजे फायबर वाढवण. It interfears with the absorption of sugar in blood.
ज्वारीच्या लाह्याचे पिठ,
ज्वारीच्या लाह्याचे पिठ, राजगिर्याच्या लाह्या हा चांगला पर्याय आहे. ज्वारीच्या लाह्याचे पिठ, लोणी काढलेल्या ताकात भिजवून छान लागते. राजगिर्याच्या लाह्या दूधात भिजवून (हव्या तर थोड्या शिजवून) छान लागतात.
पण अगदी एक आग्रहाची विनंती, आता आहार घ्यायचा ते औषध म्हणून. शक्यतो याबाबतीत आसक्ती
सोडणे गरजेचे असते. काय ते बेचव जेवण, असा विचार करत राहिले तर त्रासच होतो. इतर गोष्टीत मन रमवणे, फार गरजेचे असते.
दूध फ्रीजमध्ये २-३ दिवस
दूध फ्रीजमध्ये २-३ दिवस राहिले तर कडू होऊ शकते का?
इथल्या एका मैत्रिणीला अचानक ३-४ दिवस घराबाहेर जावे लागले. बाईने पहिल्या दिवशी आलेले दूध तापवून फ्रीजमध्ये ठेवले. आता मैत्रिण आल्यावर पाहिले तर ते चक्क कडू लागले. दुधाची थिकनेस वाढली होती, साय अतिजाड आणि पिवळी होती. (आमच्या इथले दूध अतिपातळ असते... आणि साय आपोआपच बारीक असते, आणि कधीच पिवळी होत नाही.)
पातेलं स्वच्छ घासलेलं होतं का
पातेलं स्वच्छ घासलेलं होतं का मुळात?
असं दूध तातडीने फेकून देणे..
असावं असा अंदाज आहे.. मैत्रिण
असावं असा अंदाज आहे.. मैत्रिण घरी नव्हती आणि बाईने घासलेल्या पातेल्यातच आलेलं दूध तापवलं असणार. तशी बाई खूपच चांगली (स्वच्छ+नीटनेटकी) आहे.
अगं नाही, कधी कधी एखादा
अगं नाही, कधी कधी एखादा साबणाचा कण असेल राहिलेला किंवा आणखी कशाचा हात लागलेला असतो.. म्हणून विचारलं. नाहीतर मग दूधच खराब होतं..
हो. ते आलं लक्षात. दूध तसंही
हो. ते आलं लक्षात. दूध तसंही फेकलंच तिने लगेच... पण कारण कळलं तर बरं, असं वाटलं म्हणून इथे विचारलं.... आता लक्षात येतंय नको होतं विचारायलाच.... त्याची कारणं हज्जार असू शकतात.
दूध फ्रीजमध्ये २-३ दिवस
दूध फ्रीजमध्ये २-३ दिवस राहिले तर कडू होऊ शकते का?
>> हो. होऊ शकते. अगदी पिशवीतले दूध असले त॑री एक्स्पायरीडेट नंतर खराब होऊ शकते.
धारा तापवलेलं दुध फ्रिजात
धारा तापवलेलं दुध फ्रिजात चांगलं टिकतं, पण ते नीट उकळून गार केलेलं असेल, शिवाय या दोन तिन दिवसात जर सिग्निफिकंट टाईम पिरियड साठी लाईट गेली नसेल तरच. अन्यथा फ्रिजात सुद्धा दूध नासू शकतं.
.
.
रस्गुल्ल्यान्विषयी छान माहिती
रस्गुल्ल्यान्विषयी छान माहिती वाचली. सगळ्यांना वाचायला आवडेल म्हणून इथे टाकतीये, चालेल न?
रोशोगुल्ल्यांची जन्मकथा -
नवीनचंद्र दासांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात १८४५ साली झाला. पण वडिलांचे निधन लवकर झाल्यामुळे, नवीनचंद्र त्या वाड्यात आश्रितासारखे वाढले. काकांनी वाड्याबाहेर हाकललं नाही इतकंच. विसाव्या वर्षी स्वतःच्या मामांबरोबर त्यांनी कोलकात्याच्या जोडाशांको भागात मिठाईचं दुकान सुरू करावं, असं त्यांच्या आईनं सुचवलं. पण व्यवहाराचा गंध नसल्यामुळे ते दुकान मोडीत निघालं. पुढे दोन वर्षांनी अनेक ठिकाणांहून कर्ज घेऊन बागबाजारात त्यांनी नवं दुकान उघडलं. त्या काळी दुकानांत मिळणार्या मिठाया म्हणजे दोनतीन प्रकारचे संदेश किंवा जिलबी, लवंगलतिका यांसारख्या बेसनाच्या आणि खव्याच्या मिठाया. सणासुदीला घरी केले जाणारे गोड पदार्थ दुकानांमधून विकण्याची आणि विकत घेण्याची फ्याशन नव्हती. त्यात परत रोखीचा व्यवहार चालत नसे. ग्राहकानं मिठाई विकत घेतल्यावर त्यानं लगेच पैसे दिलेच पाहिजेत, असं काही बंधन नव्हतं. पुढे कधीतरी पैसे चुकते केले जात. नवीनचंद्र मुखदुर्बळ. ग्राहकाला पैसे मागायचे कसे? त्यामुळे या दुकानाचीही बुडण्याच्या दिशेनं अगदी दमदार वाटचाल सुरू होती. एकदा या गर्दीतले एक आजोबा तोंडात संदेशाचा तुकडा टाकत नवीनचंद्रांना म्हणाले, "मुला, सकाळची मिठाई रात्री खाण्यात काही मजा नाही. हा संदेश बघ. सकाळी इतका मऊसूत, आणि आता निव्वळ भुगा. हे काही खरं नाही. मिठाई कशी कधीही तोंडात टाकताक्षणी विरघळायला हवी. बघ काही करता आलं तर". नवीनचंद्रांनी त्या आजोबांच्या मुखी संदेशाचा भुगा लागू नये, म्हणून प्रयोग सुरू केले. संदेश तयार करण्यासाठी साखर आणि छाना कढईत एकत्र परतत. त्याऐवजी छाना साखरेच्या गरम पाकात टाकला तर? पाकात टाकल्यावर छाना पाकात विरघळला. आता काय करावं? छाना वेगळ्या पद्धतीनं तयार केला तर? हुगळी नदीच्या काठी राहणारे पोर्तुगीज दुकानदार छाना तयार करण्यासाठी व्हिनेगर वापरत, आणि छाना तयार झाल्यावर त्यातलं सगळं पाणी काढून टाकत. नवीनचंद्रांनी युरोपीय पद्धतीनं छाना तयार करून बघितला. पण तरीही छान्याची तीच गत. या छान्याला घट्ट बांधून ठेवणारं काहीतरी हवं होतं. त्यांनी तांदळाचं पीठ वापरून बघितलं. पण तरीही छान्यानं बंड पुकारलं. मग नवीनचंद्रांना आठवलं, कोलकात्यातले युरोपीय लहान मुलांना, वृद्धांना एका झाडाच्या मुळाच्या पावडरीची लापशी देत. दुसर्या दिवशी त्यांनी दुकानातून आरारोटाची पावडर आणली, आणि छान्यात मिसळली. साखरेचा पाक केला, आणि त्यात छान्याचे गोळे उकळले. यावेळी आरारोटाच्या कृपेनं छाना पाकात विरघळला नाही. नवीनचंद्र आनंदले. पण या मिठाईला काय नाव द्यावं बरं? हा काही संदेश नव्हता. ही नवीनच मिठाई होती. रसातल्या या शुभ्र गोळ्यांना त्यांनी नाव दिलं रसगोला. रसातले गोळे. कामानिमित्त वरचे वर कोलकात्याला येणारे रंगूनचे अतिश्रीमंत व्यापारी रायबहादूर भगवानदास बागला रसगुल्ले आवडले. त्यांनी तिथल्या तिथे दुकानातले सारे रसगुल्ले विकत घेतले. महिनाभरातच बागलाशेठांच्या कृपेनं कोलकात्यातल्या श्रीमंत बंगाली आणि युरोपीय घरांत नवीनचंद्रांचे रसगुल्ले रोज विकत घेतले जाऊ लागले. नवीनचंद्रांच्या प्रयोगशीलतेचीही कोलकात्यातल्या भद्रलोकानं दखल घेतली. बागबाजारेर नोबिनदास, रोसोगोल्लेर कोलंबस असा त्यांचा गौरव केला गेला. loksatta
कमाल आहे! मायबोलीवरचीच बातमी
कमाल आहे! मायबोलीवरचीच बातमी मायबोलीवरच
चैत्राली ही माहिती चिनूक्सच्या 'अन्न वै प्राणा:' या मालिकेतली आहे.
दुनिया गोल है, रोशोगुल्ले की
दुनिया गोल है, रोशोगुल्ले की तरह.
माहिती तीच आहे, पण मजकूर/शब्द वेगळे आहेत.
sorry , मला माहित नव्हते. मी
sorry , मला माहित नव्हते. मी हा लेख लोकसत्ता मध्ये वाचला मागच्या महिन्यात. मग त्यांनीच लिहिलाय का तो लोकसत्ता मध्ये पण ?
मजकूर किंवा शब्द वेगळे कुठे?
मजकूर किंवा शब्द वेगळे कुठे? हे सगळं माझ्याच लेखातलं आहे.
चैत्राली,
कृपया लोकसत्तेतल्या या लेखाची लिंक देणार का?
Pages