युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योडी कणीक रेडीमेड आणत असशील तर २-२ किलोच एका वेळी आणत जा आणि तांदुळांना एरंडेल लावून ठेव. Happy आम्ही गहू, तांदूळ, डाळी सगळ्यांना एरंडेल लावून ठेवतो. गव्हाचे पोटात जाते, तां.डाळी धुतल्या जातात. रवा, शेंगदाणे भाजून ठेवले जातात. कडधान्ये अगदी पाव-पाव किलोच आणून ठेवते-ह्याला पुन्हा कोण ए. लावणार. कधीकधी तु.डाळ तेली घेतो म्हनजे ए. लावने वाचते. Happy

पुर्वी बिब्बे पण कडधान्यात ठेवत असत. पण आता एकतर ते सहज मिळणार नाहीत शिवाय काही जणांना त्याची तीव्र अ‍ॅलर्जी असते.

बिब्ब्यांना भुंगे लागतात. मग भुंगे कसे घालवावेत? असा नवीन प्रश्न येईल.

हे भुंगे म्हणजे कमळावरचे नव्हेत! हे भुंगे म्हणजे पोरकिड्यांचा मोठा भाऊ.

मंजूडे तुला कित्ती माहिती आहे Happy थँक्स.. उद्या पासून २ दिवस सुट्टी आहे, हे चिलटं प्रकरण निकालात काढणारच आहे.
बाईला सांगून ठेवलंय ओला कचरा जाताना बाहेर ठेवून द्यायचा, अगदी कितीही कमी असला तरिही.

बाकरवडी (म्हणजे वरील पारी) कुरकुरीत कशी बनवायची ....हे सांगेल काय कोणी?

अगदी चितळेंसारख्या झाल्या पाहिजेत... Wink

स्वयपाकघरात जिथे चिलटं/सिंकचा वास/पावसाळी कोंदट पणा /बारीक झुरळं/मुंग्या असतील तिथे एक "ओडोनिल " थोडेसे उघडुन बॉक्स मधे पुन्हा ठेवुन दोरीने बांधुन लटकवुन ठेवावे..तसेच त्याआधी एक ओडोनिल जरा जास्त उघडुन ठेवावे.कीटक नाहीसे होतात पुन्हा होत नाहीत्.जर सिंक जवळ बान्धुन ठेवले तर वास ही येत नाही.मी बाराही महिने ओडोनिल प्रत्येक खोलीत ,बाथरुम मधे ठेवते.डास ही पर्यायाने कमी येतात .असा माझा अनुभव आहे.

वेका साजूक तुपावर गाजराचा कीस वाफवून थोडे दुध घालून शिजवते सा़खर घालून मिश्रण आळले की वरून थोडी मिल्क पावडर भुरभुरते.तुपावर वाफवल्याने हलवा मस्त होतो किस कोरडा असल्याने लवकरही होतो

पीठ फेकुनच द्यायचे असेल तर, (लागेल तसे) त्याने तेलकट्ट भांडी पुसुन घ्यावीत अन टाकुन द्यावे. भांडी लगेच स्वच्छ होतात.

वाचा आणि लिहा
http://www.loksatta.com/index.php?तुम्ही घडवलाय असा बिघडलेल्या पदार्थातून चविष्ट पदार्थ? काय झालं आणि कसं घडवला नवीन पदार्थ? चटकदार माहितीसह कळवा . पत्ता- लोकसत्ता, चतुरंग,
प्लॉट क्र . ईएल १३८ टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई ४००७१० आमचा ई-मेल
chaturang@expressindia.com

चिलटासाठी ते कुठलं तरी काडी काडी असलेलं हिरवं झाड असते. ते टांगतात. चिलटं त्याच्या टोकावर गोळा होऊन बसतात.

समोश्याचं कवर कुरकुरीत रहावं म्हणून काहि टिप्स? माझे समोसे थंड झाले कि नरम होतात.>>> समोसे थंड होऊ देऊ नयेत. गरमगरमच खावेत. Proud

भान, मी कधी समोसे करत नाही पण ही टीप वारंवार ऐकली आहे - कव्हराच्या पीठात तेल अगदी धूर येईपर्यंत गरम करून घालायचं. चमच्याने पीठ ढवळून ते गरम सगळ्या पीठाला लागेलसं बघायचं. आणि मग कव्हराची कणिक फ्रिजमधल्या थंडगार पाण्याने भिजवायची.

प्रयोग करून पहा, अनुभव नाही Happy

पिठात थोडा लिंबाचा रस पण घालतात. मी सामोसे केले नाहीत पण असे केलेले सामोसे खाल्ले आहेत ते थेट, अन्नपूर्णा मंगला बर्वे यांच्या लेकिच्या हातचे !

लाजोच्या पद्धतीच्या न्योकी करता येतील. साबुदाणा वडा करताना त्यात भर म्हणून घालता येईल. बटाटा पॅटीस करताना, कव्हरमधे भर म्हणून घालता येईल.

माझाही भाजणीचाच प्रश्न आहे..चकलीची भाजणी उरलीय त्याच चकल्या सोडुन
काय करता येईल्.थालिपीठ केली तर काही अजुन घालावे लागेल का?

Pages