युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करवंटीच्या तूकड्याचा उपाय आहेच, तसाच थोडे तेल घातले तरी कडधान्य मऊ शिजतात.
अर्थात त्या पुर्वी भिजत घातलेली असतील तर उत्तमच. कधी कधी कडधान्ये फार जुनी असतील तर ती नीट शिजत नाहीत.

काळे चणे थर्मासमधे/कँसेरालमध्ये टाकून वर उकळते पाणी टाकून भिजवणे.दुसर्‍या दिवशी ते निम्मे पाऊण शिजलेले असतात!मी छोले ह्या पध्द्तीने भिजवते.लवकर भिजतात आणि सोडाही घालावा लागत नाही ही टिप बरेच वर्षापूर्वी फेमिनात आली होती! वर लिहिल्या नारळाच्या करवन्टीचा तुकडा/अख्खी छाली सुपारी(पान्ढरी) ही घालतात पदार्थ लवकर शिजावा म्हणून ! ट्राय करून बघा.शक्यतो सोडा वापरू नका.

हो हो सोडा नकोच. निदान ७-८ तास भिजवून मग तेल्/करवंटी वापरून शिजवा..
शिवाय मी असं ही ऐकलंय की कोणताही पदार्थ शिजत आला की शेवटी मीठ घालायचं. मीठ अगदी सुरूवातीला घातल्यानेही म्हणे पदार्थ नीट शिजत नाही. :खखोदेजा:

मी नेहमी काळे चणे आदल्या रात्री भिजत ठेवते, दुसरया दिवशी कुकरमध्ये ३ शिट्या काढते नंतर मंद गॅसवर थोडयावेळ ठेवते, मस्त मउ बनतात. मुग,मटकी,सफेद्-हिरवे वाटाणे,चवळीसारख्या नाजुक कडधान्यांना एक शिटी काढुन थोडयावेळ मंद गॅस वर ठेवते. हे नेहमी केले की अंदाज येतो की कोणत्या कडधान्याला किती वेळ मंद गॅसवर ठेवायचे. कारण गॅस बंद करुन कुकर थंड होईपर्यतदेखील पदार्थ थोडा शिजत असतो. थोडा अंदाज चुकला तर पुर्ण पीठ तयार होउ शकते. पण हे एकदा जमले की सोडा,करवंटी कशाची गरज लागत नाही.

मध बाहेर ठेवला तर मुंग्या लागतात म्हणून फ्रिज मध्ये ठेवला. पण आता तो घट्ट झाला आहे. साखरे सारखा रवाळ लागतोय. मध परत पुर्ववत पातळ करण्यासाठी काही उपाय आहे का ?

सुनिता मुंग्या लागल्या? Sad बाटलीला मधाचे ओघळ वगैरे आले होते का?
मध गरम करू नका.. यापुढे हा रवाळ मध कॉफी/दूध/ ब्रेडला लावून संपवा. पुढच्या वेळी आणलात की मधाची बॉटल पाण्यात ठेवा.

१. माझा strawberry jam जरा जास्त झाला आहे (करपट वास नाही पण घट्ट झाला आहे , पाक जास्त झाला तर कसा होईल तसा) . टोस्टला सहज नाही लावता येत आहे. मी सध्या दुधात घालुन पिते आहे. अजुन काही कल्पक उपयोग सुचले तर सांगा!

२. सोयाचे नगेट्स सूप मध्ये वापरता येतिल का? आधी शिजवून घ्यावे लागतिल का?

मधुरा, थोड्या पाण्यात तो मिसळून, अनफ्लेव्हर्ड जिलेटीन वापरून जेली करता येईल. कष्टर्ड मधेही वापरता येईल.
थोड्या प्रमाणात आईसक्रिम टॉपिंग म्हणून कसा लागतो, ते बघून मन वापरता येईल.

सोया नगेट्स वापरता येतील पण शिजवून घ्यावे लागतील. सुपमधे शिजवले तर सूप घट्ट होईपर्यंत शिजणार नाहीत पण क्लीयर सूप असेल तर त्यात शिजतील.

सर्वांना धन्यवाद, आज तेल आणि सुपारी चा प्रयोग करुन पहाते (करवंटी नाही आहे Sad ) आणि सांगते कशे शिजले ते...खुप खुप आभार...

दिनेशदा, धन्यवाद!
सूप स्लो कुकर मध्ये करणार आहे (मेक्सिकन स्टाईल चे बिन्स सूप) ५ तास 'low' setting वर करायचा plan आहे.

मधुरा, थोडा एकतारी पाक करुन त्यात थोडा जॅम टाकुन तो विरघळतो का ते बघ. किंवा अजुन थोडे स्ट्रॉबेरी घेउन त्यात साखर टाकुन शिजव. ते मिश्रण पातळ असेल तेव्हा हा घट्ट झालेला जॅम टाकुन बघ. पण मग हा असा जॅम जास्त टिकणार नाही किंवा स्मुदी मधे वापरुन बघ. दिनेशदांनी सांगीतल्याप्रमाणे आईस्क्रिम (व्हॅनिला) मधे वापर.

एक अनाहुत सजेशन!

दिनेशदा,
तुम्ही रुचिरा-२ किंवा असंच काहि नांव देऊन पुस्तक लिहायला काहीच हरकत नाही. कित्ती खास सजेशन्स असतात तुमच्या! लै भारी. मनापासून विनंती. खरेच लिहा. अन्नपूर्णेच्या रुचिरानंतर बल्लवाचार्यांचे किमान जिभली तरी यावेच :x

दिनेशदा,
तुम्ही रुचिरा-२ किंवा असंच काहि नांव देऊन पुस्तक लिहायला काहीच हरकत नाही. कित्ती खास सजेशन्स असतात तुमच्या! लै भारी. मनापासून विनंती. खरेच लिहा. अन्नपूर्णेच्या रुचिरानंतर बल्लवाचार्यांचे किमान जिभली तरी यावेच :x
>>
हज्जारो मोदक.. वर तुपाची धार.

दिनेशदा हौन जौद्या... मी पहिली कॉपी घेईन साईन करून...
खरच..
तुमचं ह्या कलेवरचं प्रेम जगापुढे येऊद्या... एक कला म्हणून. तुमच्या रेसिपीजना, क्लृप्त्यांना एक घरगुतीपणा आहे... अगदी रुचिरा-बिचिरापेक्षाही जास्तं.
घ्याच मनावर.
रच्याकने (कध्धीपासून हा शब्दं वापरायचा होता, बै)... जिभली हे नाव खरच मस्तय. (इब्लिस, तुलाच दिलेत ते मोदक)

इब्लिस / दाद

खरंच एकदा तूम्हाला स्वतः सांधून काहीतरी खाऊ घालावेसे वाटतेय.
माझे सगळे लेखन, इथेच मायबोलीवर आहे. कुणी मनावर घेतले तर होऊनही जाईल.

दिनेशदा खरच मनावर घ्या . मी दुसरी असेन कॉपी वर साईन करून घ्यायला. माबो वरील ईतर अनेक लोक ही उत्सुक असतीलच
तुम्हाला कल्पना नाही, तुमच्या रेसिपीज आणि ज्या आवडीने तुम्ही बनवता ते वाचून स्वयंपाक करायला न आवडणार्या मला स्वयंपाक करणे ही आवडीची गोष्ट असू शकते हे कळले आणि वळले पण.

वरच्या कडधान्य शिजवण्या बद्दल युक्त्या वाचून आठवले.
बकर्याचे मटण कुकर मध्ये खूप वेळा शिजत नाही. कधी कधी जास्त शिट्या घेतल्या की खूपच शिजते.
कुकर मध्ये मटण शिजायला ठेवल्या वर शिटी न लावता कुकर चे झाकण लावून ५ मिनिटे मोठ्या आचेवर ठेवावे. वाफ वेगाने बाहेर जावू लागली की शिटी लावावी आणि फक्त दोन शिट्या येऊ द्याव्यात . मटण बरोबर शिजते.

आभार सामी,

आणि वरची जी कूकर वापरायची रित आहे ती अगदी शास्त्रीय तर आहेच आणि कूकर उत्पादक पण असेच शांगतात. हॉकिन्स म्हणतात जर या पद्धतीने मटण शिजवले तर किंचीत जून असलेले तूकडेही व्यवस्थित शिजतात.
फक्त शिट्यांच्या ऐवजी, वेळ मोजायचा. कारण आच प्रखर असली तर शिट्या पटापट होतात.

आणि अगदी शास्त्रीय पद्धत म्हणजे, शिट्टी होऊ न देणे. केवळ सूं सुं असा आवाज येत, शिट्टी गोल गोल फिरत राहणे
अपेक्षित आहे. शिट्टी झाली कि आतली वाफ बाहेर जाते आणि परत तेवढी वाफ ( व तेवढा दाब ) तयार व्हायला वेळ आणि उष्णता द्यावी लागते.

दिनेशदा, खरोखर तुम्ही पुस्तक लिहा, आणि मला खात्री आहे इथे खूप जणांना ते हवेच असेल
तुमच्या अगणित पंख्यात मी हि एक आहे Happy

गीतू अग हुशार व्हायचा प्रयत्न करतेय Happy .. मायबोली चा खूप वाटा आहे त्याच्यात.
अजून पूर्वी सारखीच आहे ग....पण आता अजून एक हॉबी वाढलीय. इथल्या रेसीप्या वाचून घर्च्यान वर एक एक एक्स्पेरीमेन्ट करणे Happy

Thanks दिनेशदा

मी आहेच कि इथे.

आपल्याला कडधान्य खायची लहानपणापासून सवय असल्याने फारसा त्रास होत नाही. पण ज्यांना त्रास होतो त्यांनी, कडधान्य उकळल्यावर दहा मिनिटांनी ते पाणी फेकून, परत पाणी घालून ती शिजवावीत असा सल्ला देतो.

चण्याची डाळ, उडदाची डाळ, वाल, हरभरे जसे आपण खाऊ शकतो, तसे भारताबाहेरचे लोक नाही खाऊ शकत !

मी काल काला चना ३ शिट्या व १ चम्चा सोडा घालुन शिजवला, तरिही नीट नाही शिजला (माझा ईनो बहुतेक खुप जुन होता म्हणुन असेल) पण मी पुढच्या वेळी सुपारी आणि तेलाची ट्रिक करणार आहे...पाहु...

स्वार्थ आधी तो चना १२ तास भिजवला होता का? तसे करून बघा. नक्की शिजेल. आयत्यावेळी होणार नाही.

माझ्याकडे गूळ आहे तो फार म्हणजे फार कडक आहे. मला तो पाक करायला वापरायचा आहे. पण तो किसला किंवा चिरला जाताच नाहीये. काय करता येईल ? कुकर मध्ये ठेवून काहीतरी करतात असे ऐकले आहे. कोणाला माहिती आहे का ?

मोठ्या पातेल्यात थोडे पाणी घेऊन त्यात तो गुळाचा खडा ठेवला तर विरघळेल. मग त्यातच पाक करता येइल. फ्रिज मध्ये हे पातेले ओवर नाइट ठेवता येइल.

दीपा पांढर्‍या सुती कपड्यात गुंडाळून अर्धातास सकाळच्या उन्हात ठेव, हवंतर थेट ठेवू नको, डब्यात घालून (थोडा जास्त वेळ) ठेव, बघ काही फरक पडतोय का.
नाहीतर सरळ बत्त्याने फोड.

ओह ... घट्ट झाकणाच्या डब्यात गुळ ठेवायचा आणि कुकर मधे एक शिट्टी करायची असे इथेच मागे कुठेतरी वाचलेले आठवते आहे... अनुभव नाही Happy जरा मागची काहि पानं चाळुन बघ बरं....

Pages