युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स,
मी मागच्या महिन्यात हा लेख वाचून माझ्या personal mail मध्ये save करून ठेवला होता. तोच इथे दिला. ती लिंक परत शोधते. सापडली की नक्की देईन.
पण माहिती मस्तच आहे.

तुम्ही दिला नव्हता हा लेख कुठे छापायला? त्या लेखात नवीनचंद्र दासांचा फोटोही छापला होता लेखाबरोबर आणि पुढे त्यांच्या मुलाने ते मिठाई चे दुकान पुढे कसे वाढवले याचीही माहिती होती.
ती लिंक शोधायचाच काम करतीये.

मी दोन्ही लेखांतले फक्त पहिले परिच्छेद ताडून पाहिले तेव्हा त्यांत फरक आढळला.

लोक्सत्तामध्ये सध्या हेच एक सदर चालू आहे : http://loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=bl...

लोकसत्तामधला मजकूर सामान्यत: गुगल सर्चमध्ये सापडतो.

नवरा आज एक फणस घेउन आला आहे. सुरीला अणि हाताला तेल लाउन चिरेन. आजुन काही काळजी घेउ का? कोणी आमेरिकेत आठिळा भाजल्या आहेत का? कश्या? ओवन मधे का स्टोव्ह वर?

मधुरा, शक्यतो खोबरेल तेल लावून, आणि एका वाटीत जास्तीचं तेल हाताशी ठेवून मग घे चिरायला. गोड्या तेलापेक्षा खोबरेल चांगलं. आणि १-२ थर रद्दी खाली पसर म्हणजे नंतर आवरायला सोपं जाईल.

हे जरा अवघड आहे Happy
बाबा हाताने टिचकी मारून बघतात. जर टणक लागला तर कच्चा. मऊ लागला नि आवाज बद्द असा आला तर पिकलाय. (हा बद्द आवाज इथे कसा सांगू? Happy )

प्रज्ञा+१, 'बद्द' आवाजाच्या भा.पो. Wink
फणस पिकलाय हे कळण्याची अजून एक युक्ती म्हणजे फणसाचा दरवळ घुमतो.

साबुदाणा खिचडी बनवायची आहे. पण जो साबुदाणा घरी आहे तो कसाही भिजवा गच्चं गाळ होतो... उद्या सकाळी साबुदाणा खिचडी प्रेमी यायचेत.... ते गच्चं गाळ होणं कसं टाळता येईल?

धारा...माझ्याकडे असाच साबुदाणा होता. मी तो चाळणीत भिजवायचे. जास्त कोरडा वाटला तर त्यावर थोडे पाणी शिंपडायचे.

धारा अशा साबुदाण्यात थोडे कोमट पाणी घालायचे आणी १० ते १५ मिनिटानंतर साबुदाणा रोवळीत / चाळणीत निथळुन घे. आधी पाहिजे तर डावभर साबुदाणा नमुन्यासाठी भिजवुन बघ, म्हणजे सगळा वाया जाणार नाही. मात्र अगदी कोरडाच होईल असे निथळुन घेऊ नकोस.थोडा ओलसर असु दे.

i la! टुन्टुन चक्क रिय्यल फीमेल असिंग! :खुदु खुदु: ;;)
(इकडतिकडचे प्रतिसाद वाचून संभ्रमात पडलेला माजी संभ्रमी) इब्लिस

.

सोनाली, टुनटुन, वेका, धन्यवाद सर्वांचे!

मी काल रात्री साबुडाणे भाजून घेतले. थंड झाल्यावर चाळणीत भिजत घातले.
आज सकाळी बराच फडफडीत दिसत होता... मग बटाटे किसून घालून खिचडी बनवली. (कुरकुरीत होण्यासाठी)
थोडी भगराळ वाटत होती तेव्हा दूध शिंपडले. दिसायला खूप्च चांगली होती. पण तोंडात टाकल्यावर थोडीशी गोळा वाटेल अशी लागली. Sad असो.

आता त्या लॉटच्या(२ कि) साबुदाण्याचे काय करू? सध्या तरी खीर्/वडे ह्या ऑप्शन्स आहेत. पण मुळात आम्ही साबुदाणे प्रकार २ महिन्यात एकदा करणारे प्राणी आहोत. दुसरं काही थोडं फार हेल्दी आणि खराब न लागलं तर बरं, असं काहीतरी सुचवाल का?

मा़झ्याकडे एमटीआर चे रवा ईडलीचे पीठ उरले आहे. मला त्या ईड्ल्या बिलकुल आवडल्या नाहित. ते वापरुन आप्पे करता येतिल का? का इतर काही ?

भिजवलेले कडधान्य म्हणजे मोड आलेले किंवा हरभर्‍यासारखे फ्रिझमध्ये साधारण किती दिवस टिकते ? कारण मी ३ दिवसापूर्वी छोले भिजवुन ते पाण्यातुन निथळुन स्टीलच्या डब्यात ठेवले, पण काही ना काही कारणांमुळे ते बनवणे लांबतच गेले. त्याला काही वास तर नाही येत, पण घरात मी आणी नवरा सोडले तर बाकी साबा आणी साबु खात नाहीत. कदाचीत आता तर ते वाया जाणारच. पण पुढे असे होऊ नये याकरता विचारतेय. जाणकार कृपया मार्गदर्शन करा.

आश्चर्यच आहे. याविषयी कुणालाही काहीच माहिती नाही? एर्‍हवी इतर मायबोलीकर भगिनींच्या प्रश्नांना इथले एक्स्पर्ट सतत मार्गदर्शन करीत असतात. Sad

टुनटुन, अनएक्सपर्ट लोकांचं उत्तर चालेल का?
३ दिवस जुनं कडधान्य वापरायला माझ्या मते काहीच हरकत नाही. तुमच्या मनात शंका असल्यास कुकरला लावण्यापूर्वी स्चच्छ धुवून घ्या.

सायो+१! २-३ दिवस तर आरामात टिकू शकते कडधान्य. त्यातून वापरताना पाण्यात मीठ घालून स्वच्छ धुवून घ्यायचे. योगेशनाही अनुमोदन. कडधान्य उकडून, कोरडे करून हवाबंद डब्यात फ्रीजात ठेवलेलेही ३-४ दिवस टिकू शकते.

Pages