युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, अरुंधती आणी योगेश तुम्हा तिघांचे मनापासुन धन्यवाद. आणी सायो तुला अनएक्स्पर्ट कोण म्हणेल? तुझी मलई बर्फी नं १ आहे माबोवर. :स्मितः

आता भारतात रात्र झालीय. उद्या बघते शिजवुन.

इथे (अमेरिकेत) इं. ग्रो. मध्ये ज्वारी मिळते का? मी शोधली (एकाच दुकानात) पण दिसली नाही. त्याला काही वेगळं नाव आहे का?
आई इथे आली आहे तोवर तिच्या पद्धतीने थालीपीठ भाजणी करून ठेवायची आहे त्यासाठी ज्वारी हवी आहे.

हं. ज्वारीच्या पीठाच्या पाकिटावर jowar लिहिलेलं असतं त्यामुळे मी दुसरं काही पाहिलं नाही. बघते आता.

शूम्पी, ज्वारीला इंग्लिशमधे सोरगम (sorghum) म्हणतात. मिलेट हे जेनेरिक नाम आहे ज्वारी, बाजरी, नाचणी, सावा इ. चा यात समावेश होतो.

टुनटून. तीन दिवसात काहीच नाही होणार. स्टीलच्या चाळ्णीत ठेवायचे. उक्डून घेऊन छोले सलाड एक दिवस बनविता येइल. मग दोन दिवसांनी छोले बनवून संपविता येइल. मी सुपरमार्केटातून असले
मोड आलेले शनिवारी वगैरे आणते आणि गुरुवारी वगेरेइ बनविते उसळ.

अगं मी घरी दळणार. माझा ब्लेंडर खूपच पॉवरफुल आहे. बस ज्वारी मिलने की ही देर है! Happy

शुम्पी , इथे मिळते ना ज्वारी,बाजरी,गहु. तु ऑनलाईन का शोधत आहेस? Uhoh

बिल्वा, छान आहे साईट ती. ह्युस्टनला दुकान आहे त्यांच.कुणी गेल तर बघुन यायला सांगते. निदान ज्वारीच ताज पीठ तरी मिळेल.

टुनटुन मी बर्‍याचवेळा शनिवारी तीन ते चार कडधान्य भिजत घालते व रात्री चाळणीत उपसून ठेवते, रविवारी सकाळी टप्परवेअरच्या कूल अ‍ॅड फ्रेश डब्यात घालून ठेवते,आठ ते दहा दिवस उत्तम टिकतात. मोडही येतात.मोडाचे कडधान्य तयार असलेकी आयत्यावेळी बरेच पदार्थ करता येतात व भाजीचा प्रश्न सुटतो!छोले ख्रराब होत नाहीत कोरडे असतिल तर.

शुम्पी कुठला ब्लेंडर वापरतेस..अगदी पीठ होत का त्यात धान्याच. मी आता ह्याच विकांताला जावून आले हुस्टनला आधी चंद्रीकाची माहिती असती तर काही आणता आल असत...

शुम्पी,तुला थालीपिठसाठी ज्वारीचे पिठ मावेत कोरडेच भाजुन ते वापरता येईल्.मी ब्लेंटेक च्या मिक्सरवर थालीपिठाची व चकलीची भाजणी केली आहे.फक्त थोडा पसारा होतो जास्त.२-३ वेळा चाळावी लागते.त्यामुळे नंतर च्या वेळेस मी हवी ती पिठे आणुन मावेत भाजुन घेतली.व धने-जिरे वेगळे भाजुन्,मिक्सरमधे वाटुन घातले.थालीपिठाला चव छान आली.मेहनत ही कमी लागली.

ते भिजवलेले छोले थोडे भीत भीतच केले, पण खराब झाले नव्हते, वासही आला नाही. धन्यवाद सायो, योगेश आणी अरुंधती.

आश्विनीमामी आणी सुरचिता तुम्हा दोघींना पण धन्यवाद युक्ती सुचवल्याबद्दल. मावेचे डबे किंवा स्टीलच्या डब्यात मी हे ठेवत होते.

शुम्पीने ब्लेंडर घ्यायच्या आधीच चर्चा केली होती ती पाहिली होती का तुम्ही Wink

http://www.maayboli.com/node/35310

आता भाजणी करायचे अनुभव पण शेअर करुन टाक गो...हा का ना का Happy

भारतातून येताना आंब्याचा रस आणायचा आहे तर प्रीझर्व करायची काही पध्दत आहे कां?
सोडीयम बेंझोएट किंवा सायट्रिक अ‍ॅसिड वगैरे वापरून?
कुणाला माहीत असेल तर प्लीज सांगा...

मनी

अरेच्चा. मी सुलेखा आणि मनीचे इथले पोस्ट आत्ताच पाहिले.
तर आता भाजणी अपडेट. आईने ज्वारी आणि काळे उडीद गॅसवर कढईत भाजले आणि त्यासाठी ओट्याशी काही तास घालवले पण ते पाहून मी उशीराने सुचून का असेना पण अव्हन मध्ये तिला उरलेली कडधान्ये आणि धणे/जीरे भाजून दिले. ब्लेंद-टेक च्या मिक्सर मध्ये भाजणी उत्तम (आईच्या) मनासारखी दळली गेली. सुलेखा, मला ती चाळून पण घ्यावी लागली नाही गं. फक्त जास्ती वेळ मिक्सर फिरवावा लागला पण त्यात काहीच कष्ट नव्हते त्यामुळे नो प्रॉबलेम!
तर माझा लाडाचा ब्लेंडर खरोखर गुणी आहे हो. Happy

अरे हो, आणि वेका नी वर दिलेल्या लिंकवर मोस्टली फूड प्रोसेसर ची चर्चा आहे. भाजणी फू. प्रो वर दलली नसून ब्लेंड-टेक ह्या मिक्सर/ब्लेंडर वर दळली आहे.

Blendtec कितीचा आला? माझ्याकडे कॉस्टकोमध्ये ३५० पर्यंत मिळतो... पण याचा आवाज येतो कां खुप?? इकडे मी डेमो पाहीला तेव्हा फार मोठ्ठा आवाज आल्यासारखे वाटलेले...पण ब्लेंडर छान आहे...

माझ्याकडे एक मोठा "salty cracker" चा पुडा आहे, त्याचं काही करता येईल का? मला जरा ती जास्तच खारट वाटत आहेत. मी नुसती खायची म्हटलं तरी दोन खावु शकेन त्याच्यावर नाही. भाज्यांची/ फळांची टॉपीगंच ठेवुन चांगली लागतील का? अजुन काय करु शकते?

शुम्पी Lol
अगदीच सायलेंट नाही पण फारच भयानक मोठ्ठा नको Happy पण तसा आवाज येत नाही म्हटल्यावर घ्यायला हरकत नाहीये... भाजणी दळली गेली म्हणजे पावडर किंवा ओले मसाले पण छान बारिक वाटले जात असतील ना?

मनी, माझ्याकडे असा आमरस आणला गेला तर तो टिकतच नाही.....लगेच खाल्ला जातो... Wink

पण तू आमरस आणण्यापेक्षा सरळ साल काढलेल्य मोठ्या कापा/फोडी आधी तिथे डीप फ्रीज करून मग इथे आणून पुन्हा डीप फ्रीज केल्यास तर महिनाभर टिकतील. प्रयत्न कर..फक्त छोट्या सर्विंगच्या झिप लॉक/डब्बे असं वापर ठेवायला. म्हणजे काढताना हवं तित्कंच काढ आणि मग एकदा मिक्सरमध्ये फिरव ...रस तयार...

मी आणताना तशा कापा आणते म्हणून ही ट्रिक चालेल असं वाटतंय...बाकी म्हटलं तसं किती आणणार आणि किती दिवस टिकवणार .... Light 1 Proud

आंब्याचा रस खूप आटवून ठेवायचा कमीत कमी सहा महिने टिकतो. माझ्या आजोळी आमराई होती. एकदम आंबे पिकले की रस चूलीवर आटवून टिकवला जायचा. खूप पेशन्सचं काम आहे तसेच गरम रस हातावर उडून भाजू नये म्हणून हाताला फडके बांधाव लागे.

Pages