युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रचु,
सॉल्टी क्रॅकर्स क्रश करून पॅटिस वगैरे करताना रवा/ब्रेड क्रम्ब्स ऐवजी वापरता येतिल. फक्त त्याय मिठ असल्यामुळे पॅटिस मधे मिठ घालताना थोदे कमी घाल.

सॉल्टी क्रॅकर्स क्रश करून स्प्राऊट सॅलड मध्ये एकदम भारी लागतात.. मीठ मात्र बेताच घाल.. खर म्हणजे नाही घातलस तरी चालु शकेल..

मनी बहुदा 'योजक' चा तयार आम्रसाचा गोळाच मिळतो, गुळाच्या ढेपेसारखा असतो. अर्थात तुला घरचा आमरसच वापरायचा असेल तर घरीच शिजवावा लागेल वर मंजुने म्हटलेय तसे.

हे थोडं अपघाताने शोधलंय मी पण कदाचीत आणखी कुणाला उपयोगी पडू शकेल....:)

माझ्याकडे देशातून आलेले राजगिरा पाकिट्स होते..मुलाला दुधात नको होते मग त्याच्या प्~अन केक आणि वॉफल मिक्स मध्ये एक कप मिश्रणाचं करायचं असेल तर पाव कप हे राजगिरे असं घातले...कळलं तर नाहीच प्लस हेल्दी वॉफल्स/प्~अनकेक खायला पण मस्त लागले....ट्राय करा... Proud

इथे ठाण्यात तोफु कुठे मिळेल?

आणि इथे जे अमुलचे चीझ ( क्युब्स आणि स्प्रेड दोन्ही ) मिळते त्याला दुधाचा एकप्रकारचा वास येतो. तसा वास नसलेले चीझ मिळते का? वेगळा ब्रँड वापरु का? चीझ चे इतर प्रकार (चेडार, स्मोक्ड) इ. मिळतात का ? कुठे?

सावली मी सध्या 'गो' cheddar चीज आणलंय. पण निर्मलमधल्या फूडराईटमधून. तिथे बाकीचे सर्व इंपोर्टेड चीज प्रकार आहेत.... क्राफ्ट, फिलाडेल्फिया क्रीम चीज वगैरे पण प्रचंड महाग आहेत.
बायदवे मला मुलुंडमध्ये बेगल कुठे मिळतील?

ओके वर्षा. निर्मलमधे बघेन गेले कि. बाकीचे फार प्रकार मी वापरत नाही पण चेडार आणि स्मोक आवडते. अमुलचीझ चा वास फारसा आवडला नाहीये.
बेगल Happy कुठे माहिती मिळाली कि सांगेनच

कोरमला का स्टार बाझार - आर मॉल, ठाण्याचा फुड सेक्शन मधे बरेच ब्रेडचे प्रकार आहेत.

सावली तुला पण त्या स्टार बाझार मधे चिज चे ऑप्शन मिळतील.

माझ्या फ्रिजमध्ये बारिक चिलटं दिसतायत, ती ही भाजीच्या ट्रेच्या बाहेर बाकी कुठे नाही. मागच्या आठवड्यात शुक्रवारी संपुर्ण फ्रिज पुसुन काढला.. स्वच्छ केला पण अजुनही दिसतातच. कुठुन येत असतील? ती जाण्यासाठी उपाय सुचवू शकाल का?

दक्षे, फ्रिजमधे चिलटे म्हणजे फ्रिज नक्कीच उघडा रहात असेल किंवा त्याच्या दरवाज्याच्या लाईनिंगला फट असेल.
वीज रोज जाते का ? फ्रिजचे तपमान अगदी कमी ठेवतेस का ?

दिनेश लायनिंग ला फट वगैरे नाही. मी ते सर्व तपासून पाहिलंय
असो फ्रिजचं तापमान अत्यंत कमी म्हणजे थंडाव्यासाठीचं म्हणताय का? Uhoh
कारण आतमध्ये एक चक्र असतं त्यावर १ ते ६ आकडे असतात. त्यातल्या १ वर असतं बटण.
दरवाजा उघडा रहात असेल तर पदार्थ ही नीत थंड नसते झाले, खराब झाले असते. पण तसं काही होत नाहिये. काही कळतच नाहिये कशाने चिलटं येतायत ते Sad

दक्षे, १ खूपच कमी आहे, त्यात फ्रीज खूप भरलेले असेल तर मग खूपच.

एकदा लवंग व लिंबू पाणी उकळलेलं घेवून बोळ्याने पुसून काढ दरवाजे.

झंपे तुझी विपु बंद आहे. Sad

असो, माझ्या फ्रिजात काहीही जास्त सामान नसते, म्हणून मी १ वर ठेवलंय सेटींग, किती वर ठेऊ? Uhoh
फ्रिजर तर सगळा पार रिकामाच आहे. Proud

२ आठवडे झाले, चिलटं माझ्याकडेही खूप झाली आहेत. फ्रीज मधे नाही ,पण किचन मधे. बहुतेक हवेचा परिणाम असेल.

दक्षे, फ्रिज रिकामा ठेवू नकोस. हवा थंड करण्यासाठी जास्त वीज लागते. सेटींग अगदी कमी नको, २ किंवा ३ चालेल. धान्ये, कडधान्ये, रवा, मैदा, बेसन फ्रिजमधे ठेवू शकतेस. खराब होणार नाही आणि जागाही भरेल. रवा, बेसन, मसाले हवाबंद डब्यात फ्रिजरमधेही ठ्वू शकतेस.
तपमान जास्त (सेटींग कमी) असल्याने चिलटे आतही जिवंत राहू शकताहेत. अर्थात एकदा साफ करायला पाहिजेच.

अश्विनी, आम्ही एकदा मॅगी मसाला क्युब्ज संपले म्हणुन चायनीज फ्राइड राइसमधे मॅगी मसाला वापरुन पाहिला होता. सगळ्यांना खुप आवडला होता. एकदा ट्राय कर.

मसाला पॅक्स उरतात कसे. एका नुडल केकला एक पॅकेट अशाच प्रमाणात देतात, म्हणुन विचारलं. Happy

अगं मुलांसाठी माईल्ड करायचे म्हणुन २ ला एकच पाकीट वापरते मी कधी कधी.

तुझ्या टीपसाठी धन्यवाद! करुन बघेन.

कांदा कमी कष्टात किसण्यासाठी काही युक्ती असते का ? कांदा किसून ग्रेव्ही छान होते. पण आधीच किसणे हे काम मला अजिबात आवडत नाही. त्यात कांदा किसताना त्याची सालं / लेयर्स सुटे होतात आणि नीट किसला जात नाही. डोळ्यांवर अत्याचार असतात ते वेगळेच. त्यापेक्षा कांदा उभा चिरुन वाटणे परवडते. पण काही रेसिपीजमध्ये किसून जे टेक्श्चर येते ते वाटलेल्या कांद्याने येत नाही.

तटी: फूड प्रोसेसर आणि नवरा ह्या दोन युक्त्या सांगू नयेत Proud

अगो, किसायला कांदा शक्यतो मोठाच घ्यायचा. त्याचे साल काढायचे पण देठ तसाच ठेवायचा. शेंड्याकडची एक पातळ चकती कापायची आणि त्या बाजूने किसायला घ्यायचा. जाड किसणी वापरली तरी चालते. मूळ शाबूत असल्याने सुटा होणे कमी होते.
किसायच्या आधी आणि सोलण्यापुर्बी अर्धा तास फ्रिजमधे ठेवला तर तेवढा झोंबत नाही डोळ्याला.
नेहमीच्या वापरातली किसणी घेतली तर ती जरा बोथट झालेली असते. कांद्याकडे (टक लावून) न बघता किसता येते.

Pages