Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मने ओले काजू आणि हे असले काजू
मने ओले काजू आणि हे असले काजू भिजवून दोन्हीच्या चवित जाम फरक असतोच.

मी माझ्या उभ्या आयुष्यात ओल्या काजुची उसळ खाल्लेली नाहिये.
थूत माझ्या जिन्गानीवर.
ओल्या काजुची उसळ खाल्लेली
ओल्या काजुची उसळ खाल्लेली नाहिये.
थूत माझ्या जिन्गानीवर.>
अरे बापरे. दक्षे कोकणची सैर करच आत. पण काजुच्या दिवसात.
आम्ही बनवतो काजुची उसळ. पण ओल्याच. सुके काजु कितीही शीजवलेत तरी ओल्या काजु सारखे मउ शिजत नाहीत आणि ती चवही येत नाही.
हे ट्राय करु शकतेस
http://www.flavorsofmumbai.com/paneer-indian-recipe/
दक्शिणा पुण्यात टिळक
दक्शिणा पुण्यात टिळक स्मारकच्या कँन्टीन मधे बाराही महिने ओल्या काजूची उसळ मिळते.ओले काजू सिझनला फ्रीज करून ठेवतात अशी माहिती कळली.ट्राय करायला हरकत नाही.मी टिळक स्मारकजवळच राहाते कधी येताय मग काजूची उसळ खायला?
ओले काजू वाळवून पण ठेवतात.
ओले काजू वाळवून पण ठेवतात. हवे त्या वेळी कोमट पाण्यात भिजवून (सोलून) उसळ करता येते.
तयार रॉस्टेड काजू (साधारण बदामी रंगाचे असतात ते) वापरुन पण उसळ चांगली होते. अशा वेळी मीठ
मात्र जपून घालावे लागते.
कोकणातले नसलेल्यांसाठी,
काजूच्या बोंडाला जी बी असते ती हिरवी किंवा मऊ असताना, ती फोडून त्यातला गर काढतात तो ओला काजू.
फळ पूर्ण पिकले कि वरच्या फळाचा खाण्यासाठी / रसासाठी / दारूसाठी उपयोग करतात. खालची बी एव्हाना
कडक झालेली असते. ती भाजून त्यातला गर काढतात. तो नेहमीचा काजूगर.
भाजून काढताना खुपदा बी आक्रसते किंवा जळते. यावर उपाय म्हणून आता संपूर्ण बी वाफेने गरम करतात. व आतली बी काढतात. ही बी रंगाने शुभ्र व आकाराने मोठी असते.
बी तून गर काढण्याची क्रिया अत्यंत कौशल्याने करावी लागते, त्या चिकाचा स्पर्श हाताला झाल्यास, त्रास होतो, त्यामुळे अनुभव नसताना, हे प्रकार करु नयेत.
बाजारात लाल रंगाच्या ओल्या
बाजारात लाल रंगाच्या ओल्या जाडसर मिरच्या मिळतात त्याचे काय करतात? लोणचे माहित आहे पण त्याशिवाय भाजीत वैगरे वापरता येतात का?
त्याचा लसुण व लिंबु रस घालुन
त्याचा लसुण व लिंबु रस घालुन ठेचा. यम्मी. कुठे मिळाल्या तुला? मला नाही मिळतेत.
सालन करता येईल.. पण गूळ
सालन करता येईल..
पण गूळ बडीशेप वगैरे घालुन केलेले लोणचे छानच लागते. शिवाय टिकतेही.
मोनालि अग चेम्बुर मार्केट मधे
मोनालि अग चेम्बुर मार्केट मधे होत्या . त्याच्या भरल्या मिर्च्या करता येतात का?
भरल्या मिरच्या करता येतील.
भरल्या मिरच्या करता येतील. सारणात सुके खोबरे, बडीशेप,चारोळी, तीळ, खसखस, गूळ असा सालन टाईप
मसाला घ्यायचा.
सामी, इकडे पहा
सामी, इकडे पहा
सायीचं दही थोडं तरी आंबट
सायीचं दही थोडं तरी आंबट करण्यासाठी काय करावे?
खाणार्या दोघांनाही सायीची चव अजिबातच आवडत नाही, बाकी डाएट वगैरेची भीतीही काही नाहीये. पण दही एव्हढं झालंय की चवीसाठी फेकायची हिंमत मुळीच नाहीये...
चव बदलावी म्हणून मी त्यात अमूल ताजाचं दाट दूध + अमूल मिल्क पावडर टाकून झालंय. त्यामुळे दही दाट आहे, पण आंबट कसं करू? लिंबू/व्हीनेगर पिळून/टाकून वगैरे?
मंजूडी छान लिन्क दिलीस Thanks
मंजूडी छान लिन्क दिलीस Thanks
विरजण जरा वेळ उन्हात किंवा ऊन
विरजण जरा वेळ उन्हात किंवा ऊन नसेल तर चार तास नुसतंच गॅसपाशी वगैरे (ऊबदार जागी) ठेव. होईल आंबट.
धारा, दही फ्रिजमधे ठेवू नकोस.
धारा, दही फ्रिजमधे ठेवू नकोस. तू राहतेस तिकडे हवामान कसं आहे?
हवामान? दमट... महादमट.. ऊन
हवामान? दमट... महादमट..
ऊन दिसतं पण गरम वाटत नाही अजिबात, उगाच आपल्याला ट्यॅव ट्यॅव करून ठेंगा दाखवतं.
दमटपणा घाम काढतो मात्र.
दमटपणा आहे म्हणजे दही चांगलं
दमटपणा आहे म्हणजे दही चांगलं आंबट होईल, पाच सहा तास फ्रिजबाहेर ठेव.
चव बदलावी म्हणून मी त्यात अमूल ताजाचं दाट दूध + अमूल मिल्क पावडर टाकून झालंय. त्यामुळे दही दाट आहे, पण आंबट कसं करू?>>> तू लावलेल्या दह्याबद्दल विचारत्येस की विरजणाबद्द्ल विचारत्येस?
दही होऊन एक-दोन दिवस झाले असतील तर त्यावर आणखी प्रयोग करू नकोस. ज्या चवीचं आहे तसंच वापरून टाक. पुढच्यावेळी सायीला विरजण लावशील तेव्हा दही लागल्यावरही दोन-तीस रूम टेंपरेचरलाच असू दे, फ्रिजमधे टाकायची घाई करू नकोस.
आत्ताच टेस्ट केलं... दही कडू
आत्ताच टेस्ट केलं... दही कडू लागतंय... खराब झालं का?
लावलेल्या दह्याबद्दल
लावलेल्या दह्याबद्दल विचारतेय.
दमटपणामुळे येणार्या मुंग्या दही बाहेर टिकू देत नाहीत. त्यामुळे फ्रीजमध्ये लागेल तेव्हढंच... किंवा रात्री दह्याचं भांडं पाण्यात ठेवायचं... मग काही मुंग्या आपला जीव देऊन त्यांच्या शरीराचा पाण्यावर पूल बनवतात दह्यातल्या भांड्यापर्यंत पोचायला आणि इतर मुंगी समाज त्या बलिदानाची आठवण ठेवून सकाळपर्यंत दही फस्त करतात.
खराब झालं का? >> हो.
खराब झालं का? >> हो.
त्यामुळे फ्रीजमध्ये लागेल तेव्हढंच... >> दही लागण्यासाठी आवश्यक ते तापमान मिळत नाहीये.
विरजण लावल्यावर त्या भांड्याभोवती रॉकेलमधे बुडवलेल्या कापसाच्या बोळ्याने एक वर्तूळ काढ - लक्ष्मणरेषा
मुंग्या लागणार नाहीत.
धन्यवाद मंजूडी.
धन्यवाद मंजूडी.
धारा दुधात विरजण घातल्यावर ते
धारा
दुधात विरजण घातल्यावर ते कधीच लग्गेच फ्रिजात नाही टाकायचं. ७-८ तासात सुंदर दही लागतं. आंबट हवं असेल तर १२ तास ठेव. पण पुढे अजून ठेवशिल तितकं आंबट होत जाईल.
पण बेसिक दही लागण्याच्या प्रक्रियेला पुरेसा वेळ न देता जर ते फ्रिजात ठेवलं तर ते दही लागणारच नाही, आंबट होणं तर दूर की बात.
धारा, कॅसेरोलमध्ये दही लावत
धारा, कॅसेरोलमध्ये दही लावत जा.
एकतर कॅसेरोलमध्ये दही उत्तम लागते. शिवाय, घट्ट झाकण असल्याने मुंग्याही लागणार नाहीत.
मुंग्यांसाठी अजून एक उपाय :
मुंग्यांसाठी अजून एक उपाय : दह्याचं भांडं एका प्लेटमध्ये ठेऊन प्लेटमध्ये पाणी टाकायचं.
बाजारातून मशरुम्स आणले आहेत.
बाजारातून मशरुम्स आणले आहेत. पण ते १ दिवसांपेक्षा जास्त फ्रिजमधे टिकत नाहीत असे मैत्रीणीने सांगितले. कोणाकडे काही टीप्स आहेत का २-४ दिवस टिकवण्याकरता? सगळ्यात छोटे पाकीट पण पाव किलोचे आहे व परवा मला त्याची भाजी करायची आहे.
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
दक्षिणा,
<<<< दुधात विरजण घातल्यावर ते कधीच लग्गेच फ्रिजात नाही टाकायचं. >>>> लगेच टाकत नाही गं, पण ४-५ तासानंतर(दिवसाचे) ठेवावंच लागतं इथे.
<<< ७-८ तासात सुंदर दही लागतं. >>>> इथल्या हवामानात ते खूप जास्त आंबट होतं.
प्राची, तसा घट्ट झाकणवाला कॅसेरोल नाहीये गं माझ्याकडे.
मी नुकत्याच बंद केलेल्या मावेमध्ये ठेवते.
भान, तुझ्या उपायाला आमच्याकडच्या मुंग्याचं उत्तर मी आधीच दिलंय की....
<<<< रात्री दह्याचं भांडं पाण्यात ठेवायचं... मग काही मुंग्या आपला जीव देऊन त्यांच्या शरीराचा पाण्यावर पूल बनवतात दह्यातल्या भांड्यापर्यंत पोचायला आणि इतर मुंगी समाज त्या बलिदानाची आठवण ठेवून सकाळपर्यंत दही फस्त करतात. स्मित >>>>>
भान, तुझ्या उपायाला
भान, तुझ्या उपायाला आमच्याकडच्या मुंग्याचं उत्तर मी आधीच दिलंय की....
दहि एवढं चवीष्ट बनतय का? मुंग्या जीव देतायत ते चाखायला 
<<<< रात्री दह्याचं भांडं पाण्यात ठेवायचं... मग काही मुंग्या आपला जीव देऊन त्यांच्या शरीराचा पाण्यावर पूल बनवतात दह्यातल्या भांड्यापर्यंत पोचायला आणि इतर मुंगी समाज त्या बलिदानाची आठवण ठेवून सकाळपर्यंत दही फस्त करतात. स्मित >>>>>>>>>>> हे वाचलच नव्हतं
खुप दिवस हा प्रश्न कुठे
खुप दिवस हा प्रश्न कुठे विचारावा कळत नव्हते...
तूर डाळ आणी गहू साठवणी साठी घेतलेत ... टोके होउ नयेत म्ह्नुन काय करावे...
तान्दुळ पन घेतलेत ... त्याना बोरिक पावडर लावली . काही अपाय नाही ना होत?
मुंग्या जीव देतायत ते चाखायला
मुंग्या जीव देतायत ते चाखायला स्मित >>>> हो ना... अगं, इथल्या मुंग्या एक मीठ सोडून अगदी मसाल्याच्या डब्यातल्या तिखटासकट सगळं फस्त करतात.. तरीच मी म्हणतेय 'बाप रे, आपण सुगरण वगैरे झालो बरं का.. इतकं फटाफट वर राहिल तो पदार्थ संपतो म्हणजे काय ना... ?'
मुंग्या जीव देतायत ते चाखायला
मुंग्या जीव देतायत ते चाखायला स्मित >>>> हो ना... अगं, इथल्या मुंग्या एक मीठ सोडून अगदी मसाल्याच्या डब्यातल्या तिखटासकट सगळं फस्त करतात.. तरीच मी म्हणतेय 'बाप रे, आपण सुगरण वगैरे झालो बरं का.. इतकं फटाफट वर राहिल तो पदार्थ संपतो म्हणजे काय ना... ?'
>>>>>>>>
दीपाली, तूर डाळीत आणि
दीपाली,
तूर डाळीत आणि गव्हातही पार्याच्या गोळ्या, एका पातळ कापडात प्रत्येक १ अशी बांधून, किलोला ३/४ या हिशेबात, मिसळून ठेवायच्या. तूर डाळ जर आधीच तेल लावलेली असेल, तर ती तशीही टिकेल.
तांदुळ प्रत्येकवेळी नीट धुवून घ्यायचे. तसे घेतले तर अपाय होत नाही. तांदळातही वरीलप्रमाणे पार्याच्या गोळ्या टाकता आल्या असत्या.
या गोळ्या अशा कापडात बांधल्या असल्याने, निवडताना काढून टाकणे सोपे जाते.
Pages