निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता आमच्या गल्ली मधे गुलाबी रंगाचं डबल चेरी फुललं आहे Happy

चेरी च्या जाती अशा टप्याने फुलतात - सर्वात आधि माझ्या शेजार्‍यांच्या अंगणात एकेरी चेरी फुलतं गुलाबी रंगाचं. हे अगदी नाजुक फुल असतं - मग जरा मोठ्या आकाराचं चेरी फुलतं आणि दुहेरी पांढरं (ह्यांचे फोटो मी दोन पानांपूर्वी टाकले होते)

आणि सद्ध्या हे - Happy

DoubleCherryBlossom.JPGDoubleCherryBlossom2.JPG

.दिनेशदा, माचुपिचू आणि इंका संस्कृतीवर मीना प्रभूंच्या 'दक्षिणरंग' पुस्तकांतही छान माहिती आहे.
.साखर वर्ज्य केल्याने मी यावर्षी लिंबू आणि गुळाचं सरबत करुन ठेवलं आहे. कोकम सरबतही गुळाचे चांगले लागते. पन्हं तर साखरेपेक्षाही गुळ घालून अधिक छान लागते.

तहानलेली व्यक्ती पैसे देऊन पाण्याची बाट्ली घेऊन त्रूप्त होऊ शकते, पण मुक्या प्राण्यांनी करायचे काय?

पाण्याचे पाणवठे सुकल्यामुळे प्राण्यांनी गावांकडे मोर्च्या वळवला , यवतमाळच्या दिग्रज येतील घटना,
एक माकडीण आपल्या पिलासोबत पाण्यासाठी फिरत असताना तिला बादलीभर पाणी दिसले त्याच्या बाजुला पाण्याचा लोटा पडलेला होता,माकडीण बादलीत पाणी पित असताना पिल्लाने लोट्याने पाणी प्यायला सुरवात केली. त्यात तो लोटा पिल्लाच्या डोक्यात फसला. तो त्याला व त्याच्या मातेलाही काढ्ता आला नाही.
वनविभाग कर्मचारी १० दिवस त्याच्या पाठी काट्या घेऊन फिरत होते पण त्यांना पकडुन तो लोटा काढु शकले नाहीत कारण आवश्यक साधन सामग्रीचा अभाव.
तब्बल ११ दिवस आपल्या डोक्यात अडकलेल्या लोट्यासह माकडीणीचे पिल्लु आपल्या मातेच्या कवेत रखरखत्या उन्हात चटके सोसत फिरत होते कुणीतरी आपल्या मदतीला येईल म्हणुन हैदोस घालत होते, अखेर त्यात स्थितीत त्या पिल्लाने गुदमरुन / भुकेने/ तहानेने प्राण सोडला. Sad
हि आपली शोकांतिका नाहीतर काय.

आईग बिचारे पिल्लु. Sad

पण १० दिवस प्रयत्न करुनही वनविभागासारख्या प्रशिक्षीत लोक असलेल्या डिपार्ट्मेंटला १ माकड पकडता येउ नये Uhoh

अरेरे बिचार पिल्लु.

शोभा काय बहर आलाय बहाव्याला मस्तच.

दिनेशदा सब्जाच झाड माझ एकदम फेव्हरेट. लहनपणापासूनच त्या झाडाचे पान काढून त्याचा वास घ्यायला मला खुप आवडतो. पुर्वी काहीजण सब्जा म्हणून तुळशीचे बी पण वापरत असत सरबतात.

ईनमीन तीन, ही बातमी मी टिव्ही वर पाहिली होती. तेव्हा फार वाईट वाटल आणि राग ही आला. त्या वानरीच्या मागे फिरण्यापेक्षा, गुंगीच इंजक्षन, वगैरे काही उपायाने त्या वानरीला पकडून, तिच्याकडून ते पिल्लू काढून, प्रयत्न करायला पाहिजे होते. ते केले गेलेच नाहीत. संताप येणारी आणखी गोष्ट म्हणजे बघणारे लोक पण "हेल्मेट घातलेले माकड" म्हणून हसत होते. Angry बिचार ते पिल्लू गेलेच. Sad

शोभा काय बहर आलाय बहाव्याला मस्तच.>>>>>हो जागू, असा फुललाय ना, की बघतच रहावस वाटत. (चिमुरी कुठे आहे? तिला सांगायचाय बघायला. ) Happy

दिनेशदा, सब्जाचं बी पेराव लागेल ना? :स्मित:(म्हणजे झाड्/फांदी वगैरे लावायची नाही ना? किती ते अज्ञान?)

शोभा सब्जा नुसता कुंडीत टाकलास तरी निघेल. अर्थात पाणी टाकाव लागेलच Happy

इन्डीगो फुले सुंदरच आहेत.

इन्डीगो सुरेख फोटो.

ईनमीन तीन, जीव कळवळला!

अशीच एक घटना: मी सहावीत असताना एक गाभण (दिवस असलेली) बकरी रस्त ओलांडत होती. तिचे दिवस पुर्ण भरले असताना तिला लवकर रस्ता ओलांडता आला नाही. दुपारच्या वेळी भरवेगानी एक जीप आली आणि तिच्या ...

पुढे लिहवत नाही Sad लहानपणी असे दृष्य बघून मनावर खोल चरे पडतात आणि आपण अगदी हळवे होतो.

एकदा आमच्या चाळीत कोंबडा कापायचा होता. मला माहिती नव्हते लोक कोंबडा का पकडत आहेत. मला ती पकडापकडी बघायला मजा आली. पण नंतर बघतो तर कोंबड्याचे डोके उडवून कोंबडा डोक्याशिवाय जागच्या जागी पाच मिनिटे तडफडला.

इतकी .. इतकी कमालीची घृणा दाटली तेंव्हापासून अजून बाहेर पडत नाही मी त्यातून.

माकडाच्या पिल्लाबद्दल, त्याच्या आईला खूप माया असते. त्याचा मृत्यू त्या स्वीकारू
शकत नाहीत. अनेकदा मृत पिल्लू घेऊनही, त्या फिरत राहतात.

-------
जागू, तुळशीचे बी पण सब्ज्याच्या जागी वापरता येते. जरा बारीक असते. पण तसेच
फुगते.
---------

बी, आपण भारतात प्राचीन काळी शेतीचा विकास करु शकलो, म्हणून आपल्याला शाकाहारी राहणे शक्य झाले. ध्रुवीय प्रदेशात, वाळवंटात जिथे शेती शक्यच नसते,
त्यांना मांसाहाराशिवाय गत्यंतरच नसते. तिथली मूले अगदी लहानपणापासून अशी
हिंसा बघायला सरावलेली असतात.
मलाही त्रासच होतो, पण आता थोडीफार मनाची तयारी झाली आहे.
मीपण अगदी लहानपणी कोंबडी कापताना बघितली, आणि त्यानंतर कधी मांसाहार
केलाच नाही.

होय दिनेशदा मी नुसते न फुगवताही चाळा म्हणून तुळशीचे बी खाते.

मांसाहाराने हिंसक बनतात मग मी किती हिंसक असेन ? Lol
माझ्यासाठी शाकाहार काय आणि मांसाहार काय सगळे अन्न हे पुर्ण ब्रह्म.

अनेकदा मृत पिल्लू घेऊनही, त्या फिरत राहतात>>>>.हो दिनेशदा, मी अ‍ॅनीमल प्लॅनेट्मधे पाहिल. एका वाघाने वानरांचा पाठलाग केला, बाकीचे झाडावर चढले. एक पिल्लू लहान होते. तेही झाडावर चढले, पण घाबरलेले असल्यामुळे. हात्/पाय सूटून खाली पडले. इकडे वानरानी त्या वाघाला पळवले होते. पण ते पिल्लू उंचावऋन पडल्यामुळे मृत झाले. होते. ती वानरी, त्या पिलाला एका हाताने पोटाला धरून, वावरत होती. ३ दिवस ती त्याला घेऊन सगळीकडे फिरली. पण शेवटी सत्य स्विकारून तिने त्या मृत पिलाचा त्याग केला. पण ३ दिवसांनंतर. Sad

गौरी देशपांडे ह्यांचे 'आहे हे असे आहे' असे एक ललित पुस्तक आहे. त्यातील पहिलीच कथा प्रेम ह्या विषयावर आहे. त्यात त्यांनी एका मुलीचे उदा. दिले की तिचे मांजर मरते मग ती कित्येक दिवस मेलेले मांजर कॉलनीभर कुशीत घेऊन फिरत असते. मला वरची उदा. वाचून त्या कथेची आठवण झाली आणि पुन्हा एकदा माझ्या आवडीच्या लेखिकेचीही.

काल मी लायब्ररीतून अतुल धामणकर यांच जंगलावरील लिखाणाच पुस्तक आणलय. खुप छान माहीती आहे त्यात. उद्या काही उतारे देते.

रातराणीचे रोप मैत्रिणीने दिले. तिला इथेच नर्सरीत मिळाले. नक्की कुठे ते विचारुन सांगते. त्याला Night blooming jasmine (Cestrum nocturnum) म्हणतात.
घरात मोठ्या कुंडीत आहे, खूप मोठे झाले आहे. फांदी कापून बाटलीत पाणी घालून त्यात ठेवली तर काही दिवसांनी मुळे फुटतात, मग कुंडीत लावता येते. मैत्रिणीने तर जमिनीत लावले आहे. इथे (व्हर्जिनियात) रहाते म्हणे.

जागू, बी, वेका धन्यवाद - चेरी आवडल्याचे कळवल्या साठी Happy

मागे शशांक आणि जिप्सी यांनी कुसुंबाचे फोटो टाकले होते - तो रंग मला इतका आवडला, की तेंव्हापासून मला कुठेही कुसुंबी रंगाच्या छटा दिसल्या, की मी त्या दिशेने जाऊन फोटो काढते Happy

सद्ध्या आमच्या गावात अनेक झाडा-झुडपांना नवी पालवी फुटते आहे. प्रत्येक वेळी त्या कुसुंबी छटांचे फोटो काढले गेले - आणि त्यांची ही एक झलक तुमच्या सगळ्यांसाठी -

आमच्या गावातील कुसुंबी छटा

प्र.चि.१
Kusumbi1.JPG

प्र.चि.२
Kusumbi2.JPG

प्र.चि.३
Kusumbi3.JPG

प्र.चि.४
Kusumbi4.JPG

प्र.चि.५
Kusumbi5.JPG

प्र.चि.६
Kusumbi6.JPG

वरच्या फोटोत मेपल चा कोंब आहे - आता त्याला पाने फुटली आहेत - ही बघा -
प्र.चि.७
Kusumbi7.JPG

हुश्श झाल्या वाचुन सगळ्या पोष्टी एकदाच्या Happy
नितिन, Sad
सर्वांचेच फोटो सुरेख. इंडिगो, चेरी आणि पालवीच्या छटा मस्तच Happy

Pages