निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडच्या सोनचाफ्याला आलेली जरा वेगळी फळे !
दिनेशदा,
सुरुवातीला मला ती द्राक्षाचे (काळे आणि हिरवे-पिवळसर लहान मणी असलेले) लहान घड वाटले
सोनचाफ्याला अशी फळे असतात हे देखील समजलं ...!
निदान तुमच्याकडचा पाऊस बघायचा जमेल न जमेल,सध्या इकडचा तरी पाऊस अनुभवण्याची दाट इच्छा आहे

मला सर्पगंधा आणि अश्वगंधा या नवस्पतिंच्या नामःकरणाचे नवल वाटते. त्यांना अनुक्रमे
सर्पाचा आणि घोड्याचा गंध असतो. घोड्याचा गंध एकवेळ समजू शकतो, पण सापाला
कसा वास येतो, ते कुणी पहिल्यांदा अनुभवलं असे.

आणि केनयाचे आमंत्रण सगळ्यांना आहे, बरं का ?
माझे गोव्याचे घर पाहुण्यांना धर्जिणे होते, अनेक मायबोलीकर तिथे राहून गेले.

जागूSSSSSSSSSSSS कुफेहेपा?................... कट्टी फू!!
मस्त लागल्याएत कैर्‍या...

>>जागूSSSSSSSSSSSS कुफेहेपा?................... कट्टी फू!!
शांकली, कित्ती गोड प्रतिसाद Happy

जागू, कैर्‍या तों.पा.सू. - चैत्रातल्या हळदी कुंकवासाठीच्या डाळीसाठी तुला घरच्या कैर्‍या - करून झाली की नाही अजून कैरीची डाळ ? Happy

आज पेपर का आला नाही म्हणून अगदी सकाळीच लेटर बॉक्स बघायला गेले तर अंगणात एक बुलबुल पाय वर करुन चोच उघडी ठेऊन पडला होता, मला आधी तो मेला आहे असेच वाटले, जवळ जाऊन बघितले तर त्याच्या तोंडातून रक्त येत होते, तो थरथरत होता, धावत जाऊन ओंजळीतच पाणी आणले चार पाच थेंब त्याच्या चोचीत टाकले, पठ्ठ्याला लगेच तरतरी आली, लगेच उठला, मी पाणी एका भांड्यात घेऊन त्याच्याजवळ नेले तर भुर्रर्रर्रकन उडला..
मला खुप खुप छान वाटलं.. Happy

कैर्‍याSSSSSSSSSSSS ... काय मस्तं दिसतायत....
जागुताई.... तुझ्या घरी यायचा प्लॅन करायला हवा आता.... Proud

सारीका... Happy
मला खुप खुप छान वाटलं.>>> मला पण... वाचुन Happy Happy

वा सारिका - किती योग्य भान राखून जीव वाचवलास त्या बुलबुलाचा....... ग्रेट, सिंपली ग्रेट....

खरं तर मी काहीच केलं नाही, त्याची जगण्याची जिद्द माझ्या मदत करण्याच्या भावनेपेक्षा कितीतरी जास्त होती.. Happy

सारीका, खुप पुण्याच काम केलस. खरच आपण माणसे कित्ती साठवणुक करतो किती हव्यास धरतो. बिचारे प्राणी व पक्षी कसे जगतात नाही.

" या सृष्टीचक्रातील मीदेखील एक कडी आहे, विश्वचैतन्याशी मी जोडलेली आहे, याचे पूर्ण भान मला आले. माणसाचे निसर्गाशी अगदी जवळचे नाते आहेच. आज आपल्याला त्याचा विसर पडलाय, हे आपले दुर्दैव आहे. प्राचीन मानव, आदिवासी यांनी हे नाते नेहमीच जपलेले आहे. " - ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी - प्रतिभा रानडे.

सुप्रभात.

डबलचा मोगरा.

सारीका गुड.

पद्मजा ये ग.

सारिका, आजवर मी १२ घरे बदललीत (भारत ३, ओमान २, नायजेरिया २, दुबई १,
केनया ५ ), शिवाय देशोदेशीच्या किमान १०० हॉटेल्समधून वास्तव्य केले आहे. त्या अर्थाने हे विश्व माझे घर आहे !!!

बुलबुलला बहुतेक कावळ्याने जखमी केले असणार. निसर्गात तर त्याला पाण्याचे चार थेंबही मिळाले नसते. मानवाने एवढे चार थेंबाएवढे काम केले, तरी खुप होईल.

शशांक छानच आहे तो उतारा.

सारीका.. छान वाटलं Happy
जागु च्या कैर्या पाहून धावत जाऊन तिखटमिठाची वाटी घेऊन यावसं वाटलं... स्स्स्स्स्स्स......
फोटोकडे पाहात खाल्लं असतं Proud

जागू - सध्या तुझ्याकडील बाग फुलांनी ओसंडून वहातीये वाटतं....... संध्याकाळी अगदी सुगंधी वातावरण होत असेल ना......

त्या अर्थाने हे विश्व माझे घर आहे !!!>>>>> हे विश्वचि माझे घर । ऐसी मति जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपणचि जाहला ॥ - म्हणूनच तुम्हाला सर्व झाडे-झुडपे-प्राणी-पक्षी यांविषयी अपार प्रेमच प्रेम आहे......

सर्व निसर्गप्रेमीना सुप्रभात !

दिनेशदा,
सातारा परिसरात गुलमोहोर खुप पहायला मिळतो,निसर्गप्रेमीसाठी एक छान बातमी

उन्हाळ्यात बहरणार्‍या फुलझाडांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सातार्‍यातील कलावंत व पर्यावरणप्रेमींतर्फे दरवर्षी एक मे रोजी हा दिन साजरा करण्यात येतो. जारुळ, गुलमोहर, बहावा, नीलमोहर, पळस, काटेसावर अशा फुलझाडांवर आधारित चित्रकला स्पर्धा, काव्यवाचन, व्याख्यान असे या सोहळ्याचे स्वरूप असते. यंदा प्रथमच उन्हाळ्यात फुलणार्‍या फुलांच्या छायाचित्रांची स्पर्धा घेण्यात येणार आहे

अनिल, चांगली बातमी. यानिमित्ताने या झाडांचा गौरव होतोय ते छानच.

दक्षिण अमेरिकेतील, माचुपिचू या भागाबद्दल एक माहितीपट काल यू ट्यूबवर
बघितला. (हा भाग रजनीकांतच्या रोबो, चित्रपटात एका नाचात दिसतो. पण
यू ट्यूबवर तो भाग, चुकीने किलिमांजारो असा दिलेला आहे.)

तर या भागात साधारण ५०० वर्षांपूर्वी तिथल्या लोकांनी अजस्त्र बांधकाम करुन
ठेवले आहे. प्रचंड पाऊस, भूकंप असे सगळे सोसूनही, हा भाग अजूनही व्यवस्थित
आहे.
या सगळ्या बांधकामाचे नवल म्हणजे, तिथे वाहून नेलेल्या टनावारी वजनाच्या शिळा,
हा भाग खुप उंचावर आहे. आणि त्या शिळा, कुठलेही माध्यम न वापरता (सिमेंट, चुना,
शिसे ) एकमेकावर फक्त रचलेल्या आहेत. त्यासाठी केवळ मानवी श्रम वापरले आहेत.
त्या लोकांना घोडा माहित नव्हता. (तो स्पॅनिश लोकांनी तिथे नेला. घोडा बघितला
नसल्याने, घोडेस्वार हा त्यांना एकसंध प्राणी वाटला.) त्यांच्याकडे लोखंडी अवजारे
नव्हती (सोन्याची होती !!) त्यांनी चाकाचा वापर केला नाही, कारण चाक जरी त्यांना
माहीत होते, तरी ते त्यांच्या सूर्यदेवाचे प्रतीक म्हणून वापरले जात नव्हते.
तसेच हा भाग, डोंगरकड्यावर असल्याने, या बांधकामाला सावरण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे.
इतकेच नव्हे तर पाणीपुरवठ्याची व्यवस्था आहे, तीदेखील आज शाबूत आहे.

निसर्गाला असे भिडणारे मानवसमूह, आज कुठे आहेत ?

उन्हाळ्यात बहरणार्‍या फुलझाडांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सातार्‍यातील कलावंत व पर्यावरणप्रेमींतर्फे दरवर्षी एक मे रोजी हा दिन साजरा करण्यात येतो. जारुळ, गुलमोहर, बहावा, नीलमोहर, पळस, काटेसावर अशा फुलझाडांवर आधारित चित्रकला स्पर्धा, काव्यवाचन, व्याख्यान असे या सोहळ्याचे स्वरूप असते. यंदा प्रथमच उन्हाळ्यात फुलणार्‍या फुलांच्या छायाचित्रांची स्पर्धा घेण्यात येणार आहे>>>>>>> वा अनिल खूप प्रेरणादायी व उत्तम गोष्ट आहे ही....

निसर्गाविषयी प्रेम, कृतज्ञता व्यक्त करणारे वेगवेगळे मार्ग अनेक मंडळी कायमच शोधत असतात याची आपण एक छोटी यादी अथवा जंत्री केली तर त्यातील अनेक गोष्टी आपल्याला वैयक्तिक अथवा सांघिक पातळीवर राबवता येईल असे वाटते -
१] माझा एक मित्र शक्यतो सायकलच वापरतो - स्वतःपासून का होईना पण हवा प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न.
२] प्लॅस्टिक पिशवीचा वापर न करणे.
३] ऑफिसमधे कमीत कमी स्टेशनरीचा उपयोग - कागदाकरता प्रचंड वृक्षतोड होते
४] उन्हाळ्यात पक्षांकरता पाणी व धान्य ठेवणे
५] पुण्यात एक स्मृतिवन म्हणून उद्यान तयार केले आहे - आपल्या वाढदिवशी किंवा अशाच काही कारणाने नागरिक तिथे येउन झाडे लावू शकतात
६] अशा उद्यानात अनेक स्वयंसेवक काम करतात
७] आपल्या घरातील कचर्‍याचे नियोजन - बागेसाठी वापर
८] आपल्या घरातील पाण्याचे, वीजेचे, वाहनांच्या इंधनाचे नियोजन -शहरात हे सर्व मुबलक असला तरी बेफाम वापर उपयोगाचा नाही
ही खूप लांबलचक, न संपणारी यादी होउ शकेल - सर्व गोष्टी आपल्याला करता येणे शक्य नसले तरी खारीचा वाटा आपण नक्कीच उचलू शकतो. वेगवेगळ्या मंडळींच्या अनुभवातूनही शिकत जाऊ व मुख्यतः आचरणात आणू.....
फारच प्रवचनात्मक झाले नाही ना.......;) Wink

काल सकाळी ऑफीसला (नविन रस्त्यांनी) येताना वाटेत एका मामांना रस्ता विचारण्यासाठी एका मोठ्या झाडाखाली थांबलो,तर झाडावरुन काही अंडी पडली,वर पाहिल तर कोकिळा दिसली.

मग लगेच इथं मिळालेल्या माहितीचा साक्षात्कार झाला.

सारीका, गुड जॉब.. Happy

ही खूप लांबलचक, न संपणारी यादी होउ शकेल >>>>>> होउद्या की... यादी अपडेट करत राहुया.. म्हणजे प्रत्येकाला जेव्हडं करणं शक्य आहे तेव्हडं करता येइल.. बर्‍याचश्या गोष्टी आपल्या लक्षातही येत नाहीत.
रच्याकने, तो उतारा छान आहे.

जागु मोगरा सुंदर गं..

सर्पगंधा, अश्वगंधा ही नावाप्रमाणेच आहेत हे माहित नव्हतं.. तसंही बरच काही माहित नाहिये त्यामुळे दिनेशदांनी सांगितलेलं सगळंच ऐतेन या उत्सुकतेने वाचलं जातं... आणि सांगण्याची हातोटी पण इतकी सोपी आहे की बर्‍याचदा एकदा वाचलेलं पण लक्षात राहतय Happy

दा, अनिल, शशांकजी वाअतिशय सुंदर माहीती. Happy

त्याची जगण्याची जिद्द माझ्या मदत करण्याच्या भावनेपेक्षा कितीतरी जास्त होती. >>
शाब्बास सारीका - अतिशय छान काम केलेस. Happy

Pages