
(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
जागुचे बरोबर अहे... मंडळी मी
जागुचे बरोबर अहे... मंडळी मी जरा घाईत आहे आता. गावी जातेय. पुढच्या गुरवारी भेट होईल आपओली.. मोबाईलवरुन बघत राहिनच..
साधनाताई मजा आहे तुमची भरपुर
साधनाताई मजा आहे तुमची भरपुर आंबे, फणस, करवंद आणि काजु खा
पण खाताना आमची आठवण काढ 
साधना, आम्ही तुला मिस करु!
साधना, आम्ही तुला मिस करु! आलीस के ही पाने २२ वरुन किती पुढे गेलेली असतील
प्रवासासाठी शुभेच्छा.
साधने, मला विसरू नको ग.
साधने, मला विसरू नको ग.
साधनाताई मजा आहे तुमची भरपुर
साधनाताई मजा आहे तुमची भरपुर आंबे, फणस, करवंद आणि काजु खा
आंबोलीला फक्त थंड ह्वा आनि करवंदे मिळतील...
गुलबक्षीच्या बिया म्हणजे
गुलबक्षीच्या बिया म्हणजे लहानपणीच्या खेळातले मिरीदाणे.
गोव्यात, या कुंभाचे दोन प्रकार दिसतात. दोन्हीची फुले अशीच पण एका प्रकारात
पाकळ्यांमधे लाल रंगाचा एक पट्टा असतो. असे झाड अग्वाद किल्ल्याच्या दारात आहे.
बी, त्या लोणार सरोवराचे दर्शन मी फक्त नागपूर मुंबई, विमानातून घेतलेय. मला
नक्की माहित नाही, पण त्या सरोवराचे वर्णन बघुतेक, मेघदूतात आहे. असे खुप
उंचावरुन बघितल्याशिवाय त्याचा गोलाकार लक्षात येणार नाही आणि त्यामूळे
त्या काळात विमाने असावीत, असे काहितरी वाचल्याचेही आठवतेय.
अफ़्रिकेत अशी खारी सरोवरे आहेत. त्यात खुपदा फ़्लेमिंगो वस्तीला असतात. त्यांच्या
लांबलचक पायांमूळे त्याना त्या क्षाराचा त्रास होत नाही. पण मातीचा ढीग करुन
बांधलेल्या घरट्यातील पिल्लू त्यात पडले तर मात्र त्याला धोका असतो.
या तळ्यातील अल्गी खाऊनच त्यांच्या पंखाना तो चमकदार गुलाबी, केशरी रंग येतो.
दिनेश, लोणार सरोवरोचा आकार
दिनेश, लोणार सरोवरोचा आकार खोलगट बशीसारखा आहे आणि ते सरोवर दुरनही छानच दिसते. उलट जवळ जाऊन पाहिले की वाटते ह्याचे महत्त्व आपल्या सरकाराला काहीच नाही. सरोवर इतके खोल आहे की खूप खडकाळ दगडधोंडे खाली उतरवून मग कुठे सरोवराचा काठ गाठता येतो. नाहीतर वरतून नुसते एखादी विहिर आपण जशी बघतो तसे होते. उतरायला पायर्या देखील नाहीत. हात टेकवत उतरावे लागते.
सध्या कुत्रे कसे माणसाच्या
सध्या कुत्रे कसे माणसाच्या सोबतीशिवाय जगूच शकत नाहीत, तसे बिबट्याचे
झाले तर ?
कल्पना करा, एखाद्या सोसायटीत रखवालदार म्हणून दोनचार बिबटे ठेवले आहेत.
सोसायटीतली मुले त्याच्याशी दिवसभर खेळताहेत. सोसायटीतले भटके कुत्रे, घुशी
इतकेच नव्हे तर सोसायटीमधल्या लोकांनी टाकलेले मांसाहारी पदार्थाचे टाकाऊ
भाग खाऊन तो मजेत जगतोय.
रात्री मात्र तो रखवाली करतोय. कुणा चोराची हिंम्मतच होणार नाही, त्या सोसायटी
कडे वाकडी नजर टाकायची.>>>>>>>>>>>>>
दिनेशदा, पण मला वाटतं की कुठल्याही प्राणी किंवा पक्ष्याला त्याच्या त्याच्या नैसर्गिक वातावरणातच राहू द्यावं. माणसाने खरंतर कुठल्याच नैसर्गिक गोष्टींमधे ढवळाढवळ करू नये. अशा हस्तक्षेपामुळे आपण किती संकटं ओढवून घेतली आहेत हे सर्व अपण चांगलेच जाणून आहोत. (मला खात्री आहे हे तुम्ही केवळ एक गंमतीशीर विचार म्हणूनच लिहिलंय!!)
अरे बापरे! दोन दिवस नि.ग्.वर
अरे बापरे! दोन दिवस नि.ग्.वर येता आल नाही तर किती पाने पुढे जातात. !
किती वेळा बारसं करून घेशील ?
आता ही माना कोण ?
दिनेशदा बिबट्याची कल्पना मस्तच !
हो शंकली, सहज एक शक्यता
हो शंकली, सहज एक शक्यता म्हणून.
पण आता कुत्र्याचे काय झालेय ते बघतोयच ना ? स्वतः शिकार करुन पोट भरायची क्षमताच नाही
राहिली त्याच्याकडे.
कोंबड्या, गरज नसताना भरमसाठ अंडी देताहेत. गायी २०/२५ लीटर दूध देताहेत्...सगळं मानवासाठी !!
आता ते प्राणीपक्षी न राहता, यंत्रे झाली आहेत.
ते लोक न चुकता चुकीची माहिती
ते लोक न चुकता चुकीची माहिती टाकतात. एक उदाहरण मी वर दिलेय. मागे एकदा एका पक्ष्याचे नाव चुकीचे टाकलेले.>>>>>>>>>>
जागू, तुझ्याकडे ते आंबेमोहोराचं पान (आपलं रोप) आहे का? पहिल्यांदाच कळालं ह्या अशा पानाबद्दल! मला फक्त ते ऑलस्पाईस माहीत होतं! फोटो टाकता आला तर टाक ना इथे...
दिनेशदा, सध्या बर्याच ठिकाणी
दिनेशदा, सध्या बर्याच ठिकाणी ही अशी भिरभिर्यासारखी दिसणारी टरफलं/शेंगा दिसताहेत. कशाच्या असतील बरं ह्या?
१) दुरिअन- फणसासारखे एक फळ.
१) दुरिअन- फणसासारखे एक फळ. मलय भाषेत दुरियन म्हणजे taste like heaven and smells like hell!!!
2) निसर्गनिर्मित होडी
3) निसर्गनिर्मित होडी

4)हेच का ते करमळ जे खात नाहीत?

5)त्या करमळाची पाने. मला त्यावरील रेषा फार आवडतात.

6)पुन्हा दुरिअन

7)दुरिअन विकणारा चिनी दुकानदार..

8)केळीचे घळ. अरे... हे चित्र दिसत का नाही?

9)वार्यावर हिंदाळणारे कुंडीतले फुल.. शेजारच्या चिनी मावशींकडचे फुल...

10) शेजारी लावलेले कुंडीतले एक फुलझाड...

11)पांदान

12)दुरिअन

अर्रेच्या, मागे एका पानावर
अर्रेच्या, मागे एका पानावर साधनाने त्या आंबेमोहोराच्या पानाचा (पांदानाचा) फोटो टाकलाय की! मीच तो मिसला!
बी, फोटो मस्तच! ती होडी छान आहे. आणि दुरियन फळ पण पहिल्यांदाच बघितलं! त्या चिनी मावशींच्या कडची कुंडी सुंदरच आहे हं!
शांकली, आमच्याकडे टिपूआना
शांकली, आमच्याकडे टिपूआना टिपू नावाचे एक झाड असते, त्याच्या शेंगा अशा असतात. उंचावरुन फेकल्या तर मस्त भिरभिरत जातात.
बी, या दूरियानला उगाचच बदनाम केलेय असे नाही वाटत तूला. तूमच्याकडे तर ते सार्वजनिक
वाहनात पण नेता येत नाही.
मी खाल्लेय हे फळ. चवीला सुंदर लागते. आणि वास फणसासारखाच असतो की !
आणि तेच मोठे करमळ. खात नाहीत असे नाही, खाता येते पण खुप आंबट असते. लोणचे करतात त्याचे.
नैरोबीच्या पश्चिमेला हि एक
नैरोबीच्या पश्चिमेला हि एक डोंगररांग आहे. या डोंगराच्या पायथ्याची नॅशनल पार्क आहे.
परवा या डोंगरांनी असे ढग अडवून ठेवले होते !
दिनेशदा, सुपर्ब फोटो
दिनेशदा, सुपर्ब फोटो
कल्पना करा, एखाद्या सोसायटीत
कल्पना करा, एखाद्या सोसायटीत रखवालदार म्हणून दोनचार बिबटे ठेवले आहेत.>>>>>> मला आवडेल वाघ पाळायला...
ते लोक न चुकता चुकीची माहिती टाकतात. एक उदाहरण मी वर दिलेय. मागे एकदा एका पक्ष्याचे नाव चुकीचे टाकलेले.>>>>>>>> अगदी.. कोणत्याही पिवळ्या फुलांच्या झाडाला बहावा म्हटलेलं मी वर्तमानपत्रात वाचलं आहे...
सगळेच प्रचि अन माहिती छानच आहे..
पावश्याच्या खुलाश्याबद्दल धन्यवाद..
मला आवडेल वाघ पाळायला... >>>
मला आवडेल वाघ पाळायला...
>>> वाघ, बिबटे पाळायचे असतील तर त्यांची संख्या कुत्र्यांप्रमाणे वाढ्वावी लागेल आधी...
वाघ, बिबटे पाळायचे असतील तर
वाघ, बिबटे पाळायचे असतील तर त्यांची संख्या कुत्र्यांप्रमाणे वाढ्वावी लागेल आधी...>>>>>> पाळायला सुरुवात केली तर संख्या आपोआप वाढेल असं मला वाटतं.. फायदा असणार्या गोष्टींचं उत्पादन कसं वाढवायचं हे माणसांना चांगलं माहित आहे.. फक्त मग ते वर दिनेशदांनी म्हटल्याप्रमाणे यांत्रिक होईल सगळं... हे कितपत योग्य माहित नाही....
दिनेशदा ती धगांची लाटच वाटत
दिनेशदा ती धगांची लाटच वाटत आहे.
शांकली माझ काम बिने केल पानदानचा फोटो टाकुन माझ्याकडचाही टाकते नंतर.
हि डोंगररांग माझ्या घरातूनच
हि डोंगररांग माझ्या घरातूनच टिपलीय बरं का !
मी मागच्या आठवड्यात ज्या पांढर्या फुलांचा फोटो टाकला होता, ती वेल. आता मात्र
या वेलीवर फुले नाहीत.
हि पण "पाने"च, आत आहेत त्या पिटुकल्या कळ्या !
मी मागे या फुलांच्या झाडाचा फोटो टाकला होता, ती फुले आणि त्याची शेंग. इथला
उन्हाळा लांबल्याने या झाडाने एक झटपट मोहोर आणून शेंगा तयार करुन ठेवल्या.
एरवी हे पूर्ण झाड, फुलांनी बहरते. पण यावेळी अगदी मोजकीच फुले होती.
आमच्याकडच्या सोनचाफ्याला आलेली जरा वेगळी फळे !
हि डोंगररांग माझ्या घरातूनच
हि डोंगररांग माझ्या घरातूनच टिपलीय बरं का !>>>>>प्रत्यक्षात पहायला कधी येऊ???
हि डोंगररांग माझ्या घरातूनच
हि डोंगररांग माझ्या घरातूनच टिपलीय बरं का ! >> सह्ही
ये रे, कधीही ये. नुसते घरात
ये रे, कधीही ये. नुसते घरात बसले तरी वेळ मजेत जातो. नाहीतरी या धुवाँधार पावसात बाहेर जाणे होतच नाही.
दिनेशदा सर्व प्रची मस्तच.
दिनेशदा सर्व प्रची मस्तच.
ये रे, कधीही ये. >>> मी पण मी
ये रे, कधीही ये. >>> मी पण मी पण.... मला तुमच्या हातचे सगळे (व्हेज) पदार्थ खायचेत...
वॉव.. ढग मस्त दिसत आहेत
वॉव.. ढग मस्त दिसत आहेत
बी ने टाकलेल्या फोटोतल्या
बी ने टाकलेल्या फोटोतल्या शेंगांना 'पते' म्हणतात. या सोलून फक्त आतल्या बिया ,भाजीत वापरतात. पण या /पते. ना एक प्रकारचा विशिष्ट ,उग्र वास असतो. भल्याभल्या इंडोनेशिअन्सनाही हे पते आवडत नाहीत. 'पाडांग' जेवणात प्रॉन्समसाल्यात हे पते टाकतात... आमच्या मैत्रमंडळीपैकी कुणालाच सहन सुद्धा झाला नाही वास.. (मला खूप आवडतात पते )
इंग्लिश मधे तर या बीन्स ना स्टिंकी बीन्स हेच नाव आहे
फोटो नेटवरून साभार
सोनचाफा बराच फुलला म्हणायचा..
सोनचाफा बराच फुलला म्हणायचा.. ही फळे खातात का दिनेशदा? बकुळीचे फळे खातात ना? दांतासाठी चांगली असतात म्हणे.
Pages