
(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
शशांक मी थोडी वाढवते. १] माझा
शशांक मी थोडी वाढवते.
१] माझा एक मित्र शक्यतो सायकलच वापरतो - स्वतःपासून का होईना पण हवा प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न.
२] प्लॅस्टिक पिशवीचा वापर न करणे.
३] ऑफिसमधे कमीत कमी स्टेशनरीचा उपयोग - कागदाकरता प्रचंड वृक्षतोड होते
४] उन्हाळ्यात पक्षांकरता पाणी व धान्य ठेवणे
५] पुण्यात एक स्मृतिवन म्हणून उद्यान तयार केले आहे - आपल्या वाढदिवशी किंवा अशाच काही कारणाने नागरिक तिथे येउन झाडे लावू शकतात
६] अशा उद्यानात अनेक स्वयंसेवक काम करतात
७] आपल्या घरातील कचर्याचे नियोजन - बागेसाठी वापर
८] आपल्या घरातील पाण्याचे, वीजेचे, वाहनांच्या इंधनाचे नियोजन -शहरात हे सर्व मुबलक असला तरी बेफाम वापर उपयोगाचा नाही
९] कुणाच्या वाढदिवसाला किंवा समारंभाला झाडे किंवा निसर्गाला अनुकुल अश्या वस्तू देणे. फ्लॅट मध्ये रहात असतील तर सरळ कुंडीसकट झाडच द्यावे.
१०] घरातील कडधान्ये, किंवा इतर भाज्या वगैरे धुवण्याचे पाणी झाडांना घालणे.
शशांक, प्लॅस्टीकच्या बाबतीत
शशांक, प्लॅस्टीकच्या बाबतीत पणजीत एक नियम आहे (होता.) हातात प्लॅस्टिकची पिशवी दिसली तर ५०० रुपये दंड होत असे. तिथले भाजीवाले, भाज्या वर्तमानपत्राच्या कागदात बांधून देत असत. तागाच्या सुंदर पिशव्याही मिळत. बाजारात जाताना, घरूनच पिशवी घेऊन निघायचे, हि सवय जडली होती, तिथे असताना.
प्लॅस्टीकमधे थर्मोकोल पण धरायला पाहिजे ना ? गणपति विसर्जनानंतर मखराचे खांब
तसेच सगळीकडे पडलेले दिसतात. त्यांचेही विघटन होत नाहीच.
मध्यंतरी प्लॅस्टिकचे विघटन करु शकेल, असे जिवाणू सापडल्याचे वाचले होते. पुढे काही बातमी ?
शशांक, प्लॅस्टीकच्या बाबतीत
शशांक, प्लॅस्टीकच्या बाबतीत पणजीत एक नियम आहे (होता.) हातात प्लॅस्टिकची पिशवी दिसली तर ५०० रुपये दंड होत असे. >>>>> पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी ५००० रु दंड करायला पाहिजे. माझ्या लहानपणी सर्व किराणा सामान कागदात बांधूनच देत असत व तेलाला बरणी न्यावी लागे - हे सगळं परत सुरु व्हायला पाहिजे - कोणालाही कितीही त्रास पडला तरी..... प्लॅस्टिक पिशव्यातील वेफर्स, चॉकलेट्स, बडीशेप वगैरेसारख्या गोष्टी, मिनरल पाण्याच्या बाटल्या, थर्माकोलच्या सगळ्या गोष्टी (प्लेटस, ग्लासेस) तर ताबडतोब बंदच करायला पाहिजेत एक वटहुकूम काढून.......
वरील यादीत -
दररोजच्या जेवणातील तसेच पार्टीज, बुफे येथिल अन्नाची नासाडी पूर्णपणे थांबवणे.
निसर्गात सहज विघटन होतील अशा
निसर्गात सहज विघटन होतील अशा वस्तू वापरणे कधीही चांगले.
त्याबद्दल काही.
१) स्वित्झर्लंड मधे मला एक कागदी पिशवी मिळाली होती. अगदी मजबूत. पण ती
पाण्यात विरघळून जायची.
२) ऑकलंड विमानतळावर अंघोळीसाठी साबण आणि टॉवेल घेतला होता. वापरून
राहिलेला साबण आणि टॉवेल परत करायचा होता. तोच टॉवेल परत वापरतात का
अशी शंका आली, म्हणून मुद्दाम लेबल वाचले. तर तो टॉवेलच पूर्ण विरघळणारा
होता.
३) पुर्वी जेवणासाठी पत्रावळी व द्रोण वापरत असत. पण ते तितके मजबून नसत.
वाढलेले अन्न असलेली पत्रावळ, उचलणे केवळ अशक्य. पण गोव्यात सुपारीच्या
पानाच्या देठापासून बनवलेली पत्रावळ आणि द्रोण बघितले. ते मजबूत तर असतातच
पण कोरड्या पदार्थांसाठी परत परत वापरताही येतात.
४) आफ्रिकेत पाणी वगैरे भरून ठेवण्यासाठी खुपदा सुकवलेला आणि कोरलेला दुधी भोपळा आणि कलाबाश नावाचे फळ वापरतात. त्यात ताक वगैरेही ठेवता येते.
५) जेवण शिजवण्यासाठी मातीची भांडी आणि इतर कामासाठी लाकडी वाडगे, खलबत्ते सर्रास वापरतात.
प्लॅस्टीकचे, हजारो लाखो वर्षांनंतर विघटन होऊन परत खनिज तेल होईल का ?
ते काळच ठरवेल म्हणा.
तो बुलबुल पुन्हा कधीतरी आठवण
तो बुलबुल पुन्हा कधीतरी आठवण म्हणुन तुमच्या अंगणात एकदा चक्कर मारेल
दिनेशदा,
खरंच ते अजब लोक आणि त्यांच ते अजब,अवाढ्व्य कर्तुत्व !
इकडच्या किल्ल्यांवरील बांधकाम पाहताना तर अशा शिळा पाहुन ते लोक्,त्यांचा पराक्रम यांचा अंदाज येतो
सर्व गोष्टी आपल्याला करता येणे शक्य नसले तरी खारीचा वाटा आपण नक्कीच उचलू शकतो. वेगवेगळ्या मंडळींच्या अनुभवातूनही शिकत जाऊ व मुख्यतः आचरणात आणू
शशांकजी,
नक्कीच आपण छोटी का होईना सुरुवात करु शकतो, तुम्ही दिलेल्या या माहितीवजा उदाहरणामुळे मला,इतरांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल यात शंका नाही
अधिक माहिती नेटवर पहायला
अधिक माहिती नेटवर पहायला मिळेल - 'गुलमोहर दिनाचे कॅमेर्याला आव्हान'
(जिप्सी याचा नक्की विचार करेल...)
http://marathi.yahoo.com/गुलमोहर-दिनाचे-कॅमेर्-याला-आव्हान-042151175.html
मला सर्पगंधा आणि अश्वगंधा या
मला सर्पगंधा आणि अश्वगंधा या नवस्पतिंच्या नामःकरणाचे नवल वाटते. त्यांना अनुक्रमे
(कैर्यांसाठी). मोगरा सुंदरच ग.

सर्पाचा आणि घोड्याचा गंध असतो. घोड्याचा गंध एकवेळ समजू शकतो, पण सापाला
कसा वास येतो, ते कुणी पहिल्यांदा अनुभवलं असे.>>>>दिनेशदा हे माहीत नव्हत. त्यामुळे फुलाचा वास घेतलाच नाही.
जागू
सारिका, खूप छान काम केलस. पुण्य मिळाल तुला नक्कीच.
दिनेशदा सुंदर माहिती.धन्यवाद.
शशांक, सुंदर उपक्रम
मागच्याच आठवड्यात ऐकले, अगदी
मागच्याच आठवड्यात ऐकले, अगदी प्लॅस्टीक सारखे दिसणारे, पिशवी बनवण्यास उपयुक्त पण ३० दिवसात विघटन होणारे एक मटेरियल बनवले गेले आहे. अर्थात अजुन तरी ते तसे प्लॅस्टीकपेक्षा महागच असणारे.
पण स्पष्टपणे सांगावे वाटते की बाहेर जाताना काहि घ्यायचे असो नको एक कापडी पिशवी न्यायला लाज वाटावीच का?
तसेच मुलांवर (व मोठ्यांवरही) रस्त्यात काही कचरा टाकु नये ह संस्कार करावा. सामाजीक जबाबदारी हल्ली फार कमी दिसते
पण स्पष्टपणे सांगावे वाटते की
पण स्पष्टपणे सांगावे वाटते की बाहेर जाताना काहि घ्यायचे असो नको एक कापडी पिशवी न्यायला लाज वाटावीच का?
तसेच मुलांवर (व मोठ्यांवरही) रस्त्यात काही कचरा टाकु नये ह संस्कार करावा. सामाजीक जबाबदारी हल्ली फार कमी दिसते >>>> प्रचंड अनुमोदन.
अभिमान म्हणून नाही सांगत - पण एक व्रत म्हणून का होईना मी स्वतः ९० -९८% वेळा का होईना प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळतोच टाळतो - घरच्यांनाही या गोष्टी करायलाच लावतो. १००% वेळा हे जमावे म्हणून जन्मभर प्रयत्न करीनच करीन. हे सांगण्यातही फार मोठे भूषण नाहीच - ही काळाची गरजच आहे, आपली सर्वांची जबाबदारी आहे.
माझे एक प्राध्यापक बस अथवा पायी जाणे हे जन्मभर करीत आले - सांपत्तिक स्थिती उत्तम असूनही ते टू व्हिलर अथवा फोर व्हिलरने प्रवास करीत नाहीत. खादीचेच कपडे वापरतात.
डॉ. सानेमॅडमचे उदाहरण तर आहेच आहे - घरात ना इलेक्ट्रीसिटी ना स्वतःचे वाहन (पूर्वी सायकलवरुन कॉलेजला यायच्या). हे जरी टोकाचे वाटले तरी त्यातून इतर काहीजण काही तरी बोध घेतीलच घेतील.
"आरण्यक" मधे डॉ. वाटवे
"आरण्यक" मधे डॉ. वाटवे म्हणतात - लाकडी फर्निचर, स्टेशनरी, इ.च्या नावाखाली आपण शहरी मंडळी निसर्गाची जी प्रचंड लुटालूट करतो त्यापुढे बिचारे आदिवासी काहीच नाहीत - ते आदिवासी एकवेळच्या जेवणाकरता जे थोडे लाकूड नेतात तेव्हढेच, बाकी काही नाही. ते लाकूडही वाळलेले, एरव्ही जंगलात कुजून जाणारे असेच.
तरी त्यातून इतर काहीजण काही
तरी त्यातून इतर काहीजण काही तरी बोध घेतीलच घेतील.>>> हल्ली कोणी बोध घेत नाही हो. उलट हसुन, खिल्ली उडवुन पुढे जातात लोक. स्पेशली हल्लीच्या तरुण पिढीला मोबाईलवर गप्पा मारण्यात व कानात इयरफोन खुपसुन गाणी ऐकण्यात च भुषण वाटते. त्यांना हे असे काही सांगितले जरी तरी ते आपलीच आपल्यासमोर टर उडवायलाही कमी नाही करत.
असो विषयांतर झाले.
शशांक आणि जागुच्या यादीत हे
शशांक आणि जागुच्या यादीत हे घालता येईल का नाही माहित नाही पण रासायनिक पदार्थांचा वापर थोडा कमी करत आणला आहे.
मॉलमधील चकचकीत फळे घेण्यापेक्षा कोपर्यावरच्या फळवाल्याकडुन घेते . थोडी महाग मिळाली तरी.
कोल्डिक्स च्या ऐवजी कोकम किंवा लिम्बु सरबत. (यात दुहेरी फायदा असा की आपले आरोग्य ही चांगले रहाते आणि कदाचित या पदार्थांची मागणी वाढली तर आपल्या आजुबाजुंच्या लोकांना त्याचा फायदा होइल)
थोडक्यात, गो ग्रीन .... गो फॉर हर्बल ... गो फॉर नॅचरल
शशांकजी,मोनालीजी सध्याच्या
शशांकजी,मोनालीजी
सध्याच्या पिढीत बोध घेणारे कमी आहेत,हे खरं आहे
पण हेही खरं आहे,तुमच्या सारखी आदर्श (आधी केले मग सांगितले) माणसं समाजात आजकाल (स्वस्तात) सामान्यांना सहसा भेटत नाहीत, त्यामुळे प्रबोधन ज्या ताकदीने व्हायला हवं तस होत नाही.
आस, अशी अनेक पारंपारीक सरबते
आस, अशी अनेक पारंपारीक सरबते आपण विसरलो आहोत. त्यातली काहि.
१) बेलफळाचे सरबत (बेलफळाचा गर, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ)
२) रातांब्याच्या गराचे सरबत (पाण्यात कोळलेला गर, मीठ, साखर, जिरेपूड)
३) फालसांचे सरबत. (हि फळे आता मिळतच नाहीत, यांचा रस आणि मीठ +साखर)
४) आंबाडीच्या बोंडाच्या पाकळ्यांचे सरबत (आपण जी भाजी खातो तिला पिवळी फूले
आणि मग लाल बोंडे येतात. त्याच्या पाकळ्या पाण्यात कुस्करून त्यात साखर व मीठ
घालून... याचा रंग फार सुंदर येतो)
५) चिंचेचे सरबत (पाण्यातला कोळ + गूळ)
६) कच्च्या कैरीचे सरबत (पाण्यात किसून, त्यात मीठ, साखर आणि अर्थातच पन्हे)
७) कवठाचे (फळ फोडून त्यातला गर पाण्यात कोळून, गूळ व मीठ घालून)
८) धण्याचे सरबत (धणे पाण्यात रात्रभर भिजवून, मग त्या पाण्यात खडीसाखर घालून)
९) आवळ्याचे सरबत (उकडून गर पाण्यात कोळून, त्यात मीठ व साखर)
१०) काकडीचे सरबत (किसून, पिळून त्यात मीठ व साखर घालून)
११) ताकात भरपूर पाणी घालून, त्यात मीठ व हिंग घालून.
१२) ईडलिंबाचे सरबत ( लिंबाप्रमाणेच)
१३) भोकराचे सरबत (भोकराचा गर, लिंबू, मीठ व साखर पाण्यात घोळून)
१४) कोरफडीचे सरबत (गर पाण्यात घोळून त्यात लिंबू, मीठ व साखर घालून)
१५) गावठी तांदळाचे (पावडर वगैरे न लावलेला, गावठी तांदूळ पाण्यात भिजत
घालून, चारपदरी फडक्यातून गाळून घेऊन)
१६) गव्हाचे (गहू २/३ दिवस पाण्यात भिजत घालून, ते पाणी गाळून)
१७) गाजराचे (गाजराचा किस अधिक वाटलेली मोहरी पाण्यात रात्रभर ठेवून, त्यात काळे मीठ घालून)
१८) नारळाचे पाणी
१९) ताजी नीरा
२०) ऊसाचा रस + दूध
२१) दूधीचा रस + मीठ + साखर + लिंबू
हि सगळी आरोग्यपूर्ण सरबते आहेत
आस अगदी. अनिल तुमचे मत पटले.
आस अगदी.
अनिल तुमचे मत पटले.
कोल्डिक्स च्या ऐवजी कोकम
कोल्डिक्स च्या ऐवजी कोकम किंवा लिम्बु सरबत.>>>> अतिशय गरजेचे आहे हे. शहाळे, नीरा, लस्सी, ताक हे देखील खूप आरोग्यदायी आहे. सर्व कोल्ड्रींक्स (कार्बोनेटेड) आरोग्याला घातकच.
प्रिझर्व्हेटिव्हज वापरलेले सर्वच खाद्यपदार्थ व पेय ही टाळावीच, क्वचित प्रसंगी (इलाजच नसल्यास) खाल्ले तर ठीक पण सतत असले खाऊन आरोग्य कशाला धोक्यात आणायचे ......
माझा एक कॅनडास्थित मित्र कधीही प्रिझर्व्हेटिव्हज वापरलेले फळांचे रस पीत नाही, नेहेमी ताजी त्या त्या हंगामातील (बाजारात उपलब्ध असलेली) फळेच खातो व इतरांनाही तसेच करायला उद्युक्त करतो.
प्रिझर्व्हेटिव्हज वापरलेले सॉस, केचप, लोणचीही खाणे कृपया टाळावे..... पूर्वी आपली आई, आजी काहीही प्रिझर्व्हेटिव्हज न वापरता लोणची करायचे ना.......
कोरफडीचे सरबत (गर पाण्यात
कोरफडीचे सरबत (गर पाण्यात घोळून त्यात लिंबू, मीठ व साखर घालून)>>> दिनेशदा - कोरफड फार कडू असते असे ऐकले होते मग हे सरबत?????
शशांक, इतके कडू नसते ते. इथे
शशांक, इतके कडू नसते ते. इथे त्याचा रस बाटलीत मिळतो. याचे सरबत आता टिनमधेही मिळते.
त्याचा रस आटवून, काळा बोळ करतात तो मात्र कडू असतो.
दिनेशदा, तुमची सरबतांचीही
दिनेशदा, तुमची सरबतांचीही लिस्ट मी कॉपी करून ठेवली!
पण सगळेजण दिवसभरात गप्पा मारून घेता.........:राग:..........मी शेवटी असते इथे
कोल्डिक्स च्या ऐवजी कोकम
कोल्डिक्स च्या ऐवजी कोकम किंवा लिम्बु सरबत. (यात दुहेरी फायदा असा की आपले आरोग्य ही चांगले रहाते आणि कदाचित या पदार्थांची मागणी वाढली तर आपल्या आजुबाजुंच्या लोकांना त्याचा फायदा होइल)
आस,
यात आणखी एक म्हणजे कोल्डिक्सच्या प्लास्टिक च्या बाटल्यामूळे प्रदुषण होत नाही...
दिनेशदा,
इतक्या सरबतांची यादी वाचुन त्यातले १-२ प्रत्यक्ष पिल्याचं समाधान लाभलं ..
सरबतांची प्रिण्ट काढली आहे,या भल्यामोठ्या यादीपैकी यापुढे निदान ४-५ सरबतं तरी घरी मिळाली पाहिजेत असा घरी गेल्या गेल्या सल्ला (विनंतीवजा दम) देणार आहे
>>पण सगळेजण दिवसभरात गप्पा
>>पण सगळेजण दिवसभरात गप्पा मारून घेता.........राग..........मी शेवटी असते इथे अरेरे
शांकली, मी तुझ्या ही नंतर पोहोचते.. असो - त्यामुळे दिवसभराच्या गप्पा एकत्र वाचायला मिळतात
सारिका, खूप छान - नक्कीच पुण्याचं काम केलस.
कुंडीतली रातराणी. घमघमाट
कुंडीतली रातराणी. घमघमाट सुटतो..

आणि हा चेरी ब्लॉसम. मागच्या महिन्यातच येऊन गेला..

तुझ्याकडे रातराणी आहे? कुठे
तुझ्याकडे रातराणी आहे? कुठे मिळाली? इथे काय म्हणतात?
दिनेशदा, सरबतांची इतकी मोठी
दिनेशदा, सरबतांची इतकी मोठी लिस्ट?? सहीच आहे... रोज एक घेतलं तरी महिनाभर ते रिपीट होणार नाही
रातराणी, चेरी ब्लॉसम बेस्ट..
आजकाल इथे फुलं बघितली आणि त्यांचा सुगंध जर माहित असेल तर फोटो बघताना तो सुगंध इतक्या तीव्रतेने आठवला जातो की असं वाटतं खरच सुगंध येतोय म्हणुन
दिनेशदा कोरफड आणि तांदळाचे
दिनेशदा कोरफड आणि तांदळाचे सरबत करतात हे माहीतच नव्हत अजून. धन्स.
मी उष्णता वाढली की धणे-जिर्याचे पाणी करते घरात. दोन वर्षापुर्वी मी वाळाही फिल्टरमध्ये टाकून ठेवायचे.
मी एकदा रायाआवळ्याचेही सरबत केले होते.
पुदीन्याचेही करतात ना सरबत !
उन्हाळ्यात आमच्याकडे नेहमीच सब्जा भरलेला असतो. लिंबू सरबतात किंवा कोणत्याही सरबतात मी सब्जा टाकते. किंवा दुधात घालून देते.
लोला, रातराणी आणि चेरी ब्लॉसम
लोला, रातराणी आणि चेरी ब्लॉसम सुंदर. इथे रातराणी भरभरुन फुलते पण अजिबात
म्हणजे अजिबातच सुगंध नसतो.
जागू, मक्याचे पण असेच सरबत करतात. ते गोडच लागते !
जिप्सी आहे का ?
यू ट्यूबवर हिडन अलास्का म्हणून एक क्लीप आहे. अलास्का भागातले अतिसुंदर फोटो, आणि त्यावर त्या फोटोग्राफरची कॉमेंट्री आहे. बघच !!
ही आमच्याकडील रातराणी.
ही आमच्याकडील रातराणी.

दिनेशदा, केवढी मोठी ती
दिनेशदा, केवढी मोठी ती शरबतांची यादी! आमच्याकडे बडीशेप घालून त्यात निंबू पिळून शरबत करतात ते शरबत फारच शीतल असते शरिराला. चवीला पण छान लागते.
माझ्याकदे की कोकम दोन तास भिजवून त्याचे शरबत करतो. वाळा घागरीत घालून त्याचे नुसते पाणी पिऊनच केवढे छान तृप्त वाटते जिवाला.
मी कंबोडियात असताना तिथे चिंचेचे शरबत प्यायलो आहे.
धन्याचे सरबत करता येईल मला इथे. सब्जा पाण्यात भिजवला कि तो इतका लिबलिबीत होतो की त्याला खाणे जमत नाही. तो प्यावाच लागतो.
===
लोला, रातराणी आणि चेरीचा बहर खूपच छान. ती फांदी रातराणीची वेल वाटते.
===
मी उद्याला कमळाची फुले टाकेन.
सुप्रभात. दिनेशदा, हा
सुप्रभात.

दिनेशदा, हा तुमच्यासाठी.

वा शोभा, बहावा फुलावा तर तो
वा शोभा, बहावा फुलावा तर तो असा !
बी, जागू, शोभा... तूम्ही सब्जा पेरुन बघितलाय का ? सहज उगवतो. आणि पानांना
मस्त वास येतो.
Pages