
(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
इंडीगो मस्त फोटो.
इंडीगो मस्त फोटो.
आज च्या अग्रोवन मधील एक लेख -
आज च्या अग्रोवन मधील एक लेख -
बोअर पक्षी चक्क शेती करतात!
-
Friday, April 27, 2012 AT 04:00 AM (IST)
Tags: agro vision
अन्न मिळवण्यासाठी वनस्पतींची लागवड करणे, हे काही केवळ मानव प्राण्याचेच काम नाही, तर अनेक कीटक पक्षी अन्न मिळविण्याच्या दृष्टीने विविध प्रकारची शेती करत असल्याचे या आधीही आढळून आले आहे; मात्र आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाला प्रथमच बोअर पक्षी अन्नाशिवाय सजावटीसाठी फळांची शेती करत असल्याचे आढळून आले आहे. नर बोअर पक्षी त्यांच्या घरट्याशेजारी मोठ्या प्रमाणात फळे येणाऱ्या रोपांची वाढ करत असल्याचे दिसून आले आहे. ते ही फळरोपांची वाढ त्यांच्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी करतात. हे संशोधन इंग्लंडमधील ............एक्सेटर विद्यापीठ, जर्मनीतील पोस्टडॅम विद्यापीठ व ऑस्ट्रेलियातील डिकिन आणि क्वीन्सलॅंड विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या केले असून, "करंट बायोलॉजी' या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. ................................
पुर्ण लेख येथे आहे - http://agrowon.com/Agrowon/20120427/5363656947850708303.htm
इन्डीगो सुंदर प्रची आंब्याचा
इन्डीगो सुंदर प्रची आंब्याचा कुसुंबी रंगही खुप सुंदर आहे.
माझी रिक्षा
माझी रिक्षा
http://www.maayboli.com/node/34553
उंबराच्या फुलाने सांगली झाली
उंबराच्या फुलाने सांगली झाली एप्रिल फूल
सांगली - शतकातून एखाद्या उंबराला फूल लागण्याचा चमत्कार घडतो या पिढीजात अंधश्रद्धेचा नेमका फायदा घेत विश्रामबागमधील ज्योतिषाचार्य सी. व्ही. जोशी यांनी साऱ्या सांगलीला उल्लू बनवले. उंबराचे फूल पाहण्यासाठी दिवसभर नागरिक, महिला, राजकीय नेत्यांची अक्षरशः रीघ लागली. वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुरेश गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन ही लबाडी उघडकीस आणल्यानंतर सारेच स्वतःच्या मूर्खपणावर हसत परतले. एव्हाना व्हायचा तो परिणाम झाला. मोबाईल, मेसेज तसेच काही अतिउत्साही माध्यमांनी या घटनेचा सर्वत्र बभ्रा केल्याने अंधश्रद्धेचा पूर दिवसभर वाहत होता. सुदैव इतकेच, की पोलिसांच्या तत्परतेमुळे उंबराच्या फुलाचा "दूध पिणारा गणपती' झाला नाही.
विश्रामबागमधील गणेश मंदिराशेजारी शंभर फुटी रस्त्यावरील फेडरल बॅंकेच्या मागील बोळातील एका अपार्टमेंटमध्ये परमपुण्याची पर्वणी अवतरली. अपार्टमेंटच्या अग्नेय कोपऱ्यात म्हणजे जोशी गुरुजींच्या दारासमोरील कुंपण भितींलगतच चार पाच फुटाचे उंबराचे छोटे झाड आहे. या झाडाची जोशीगुरुजी रोज पूजा करतात. नेहमीप्रमाणेच ते भल्या सकाळी पूजा करताना ते फूल दिसले. आज गुरुवार, दत्ताचा वार. गुरुजींना कोण आनंद झाला. त्यांनी तत्काळ या अभूतपूर्व चमत्काराची वार्ता इतरांना सांगितली. जो तो इतरांना सांगत सुटला. पुण्याईची ही पर्वणी साधण्यासाठी ज्याला त्याला घाई झाली; शिवाय गुरुजींनी घरात स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे साग्रसंगीत पूजन केले होते. लोक फूल लागलेल्या औदुंबराचे दर्शन घेऊन पुन्हा गुरुजींच्या घरात दर्शनाला जात होते. येथे भक्तीचा महापूर आला आणि नकळतपणे अनेकांचा खिशात हात गेला. औदुंबराच्या बुंध्याशी नोटा-पैसे पडू लागले. गुरुजी नको नको म्हणत असतानाही पैसे काही पडायचे थांबत नव्हते. मग त्यांनी औदुंबराशेजारीच दोरी बांधून संरक्षक कुंपण तयार केले. जो तो आपल्या मोबाईलमधील कॅमेऱ्यात उंबराच्या फुलाची प्रतिमा साठवत होता. एक महिला कटोरी भरून पेढे आणून वाटू लागल्या. लोक भक्तीभावाने पेढा घशाखाली सोडत गुरुजींच्या पाया पडत पैसे टाकू लागले. हळदी-कुंकूचे कार्यक्रम सुरू झाले. कुणी फळांचा हार आणून औदुंबराला घालू लागला, तर एकाने चक्क साडी आणून औदुंबराच्या बुंध्याशी ठेवली. आजूबाजूच्या अपार्टमेंटमधील शिकले सवरलेले लोकही धावत पळत येऊन गुरुजींच्या औदुंबराचे दर्शन घेऊन गेले. विठ्ठल पाटील, दिगंबर जाधव या नेतेमंडळींनी अन्य भाविकांसमवेतच सपत्नीक दर्शन घेतले. ही वार्ता समजलेले विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद जांभळे यांनी सकाळीच जाऊन दर्शन घेतले आणि गुरुजींच्या कुटुंबीयांनी दिलेला प्रसादरूपी पेढा प्राशन केला. साहेब येऊन गेले, हे गुरुजी प्रत्येकाला सांगत होते. एका भक्ताने तर औदुंबराच्या शेजारीच खुर्ची टाकून प्रत्येकाला मोबाईलमधून फोटो काढून देण्याची जबाबदारी स्वयंस्फूर्तपणे स्वीकारली. या गोंधळात फुलाला कोणीही हात लावणार नाही, याची पक्की खबरदारी गुरुजी घेत होते.
ही वार्ता वृत्तपत्रांकडे पोहोचली. छायाचित्रकार घटनास्थळी धावले. वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक गायकवाड यांना ही वार्ता आमच्या बातमीदाराने कळवली. गायकवाड घटनास्थळी आले. बारकाईने पाहता ते फूल "मार्च लिली'चे असल्याचे लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला पाहिले तर अपार्टमेंटच्या शेजारीच मार्च लिलींने कुंडी फुलली होती. त्यांनी हा प्रकार काही लोकांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. लिलीचे फूल उंबराच्या फांदीला चिकटवल्याचा हा प्रकार होता. ही माहिती अधीक्षक रवींद्र शिसवे यांना कळवण्यात आली. त्यांनी तत्काळ वाहतूक शाखेचे निरीक्षक विजय कुंभार यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. ते फौजफाट्यासह घटनास्थळी आले. यावेळी त्यांना पाहून काही महिला साहेब दर्शनासाठी "वळ लावा' अशी विनंती करू लागल्या. श्री. कुंभार यांनी गुरुजींना गर्दीतून बाहेर आणले. श्री. गायकवाड यांच्याशी त्यांचा थेट संवाद घडवून आणला. गुरुजींनी आज सकाळी फूल दिसले, एवढेच पालुपद लावले. श्री. गायकवाड यांनी शेजारच्याच कुंडीतील लिलीचे फूल आणण्यास सांगितले. ते फूल गुरुजींच्या उंबराच्या फुलाप्रमाणेच होते हे लक्षात आणून देण्यात आले. त्याचवेळी गुरुजी त्यांना झालेल्या आणखी एका चमत्काराचा दाखला देऊ लागले. श्री. कुंभार यांनी "तुम्ही हे फूल चिकटवले आहे. त्यामुळे तुम्हीच ते काढून टाका' असे बजावले. गुरुजींचा फूल काढण्यास विरोध होता. मात्र, पोलिसांनी योग्य तो संदेश दिल्यानंतर ते राजी झाले. त्यांनीच पुढे होत चिकटवलेले फूल पोलिसांच्या हवाली केले. आजूबाजूला जमा झालेल्या जमावाला शांत करण्यासाठी निरीक्षक कुंभार यांनी शेजारचीच लिलीची आणखी काही फुले दाखवत फसगतीचा प्रकार साऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. जमावापुढे येत त्यांनी "उंबराचे फूल कुणाला हवे असल्यास तीस हजारांना घेऊन जा' असे सांगताच लोकांची हसता पुरेवाट झाली. आपला लोच्या झाल्याचे लक्षात येताच जो तो स्वतःवरच हसत काढता पाय घेऊ लागला. श्री. कुंभार यांनी जोशी गुरुजींना वाहतूक पोलिसांच्या गाडीत विराजमान होण्यास सांगितले आणि अफवा पसरून फसवणूक केल्याप्रकरणी ज्योतिषाचार्यांची वरात पोलिस ठाण्यात गेली.
'वड, अंजिर, उंबर अशा सुमारे 65 झाडांच्या जाती "फायकस' फॅमिलीचे प्रतिनिधित्व करतात. या झाडांना लागणाऱ्या फळातच फुले असतात. उंबर कापले तर आतमध्ये पुकेसर दिसतात. मार्च लिली या झाडाची फुले फिकट गुलाबी किंवा पांढरट असतात. मार्च महिन्यात ती फुलतात म्हणून मार्च लिली. लिलीचे हे फूल तोडल्यानंतर दोन-तीन दिवस ताजेतवाणे राहते. जोशी गुरुजींनी या वैशिष्ट्याचा फायदा घेत लिलीचे फूल गुरुवारचा मुहूर्त साधून उंबराला चिकटवले. उंबराच्या फुलाबद्दल हिंदू धर्मात अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. ते फूल शतकातून एकदा रात्री अपरात्री उमलते. अशा अख्यायिकांचा नेमका फायदा जोशी गुरुजींनी घेतला.''
- प्रा. सुरेश गायकवाड, वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक
'उंबराच्या फुलाची अफवा पसरवण्याचा प्रकार फसवणूकच आहे. लोकांच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याच्या या प्रकाराबाबत निरीक्षक विजय कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांना माहिती घेण्यास सांगितले आहे. जोशी गुरुजी यांनी फूल कुणीतरी चिकटवले असावे, असे लेखी लिहून दिले आहे. नागरिक पुढे आल्यास रीतसर गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात येईल.''
- डॉ. रवींद्र शिसवे, जिल्हा पोलिस अधीक्षक
हाहाहा...मी आत्ता हीच बातमी
हाहाहा...मी आत्ता हीच बातमी टाकाय्ला इथे आले होते.
"..... ही एक साखळीच असते. ती
"..... ही एक साखळीच असते. ती सुरुच राहिली आहे. एकातून दुसरं निघत गेलं, वाढत गेल. ही वाढ होताना निसर्गाशी नातं कोणी तोडलेलं नाही. आजकालच्या काळातच आपण निसर्गाशी मायेनं वागत नाही. निसर्गाला आजचा माणूस ओरबाडून घेतोय. त्यामुळं सृष्टीच्या चक्राचा तोल ढळला आहे. पण आजच्या हावरट माणसाला हे कळत नाही. पण आपल्या परंपरेत निसर्गाशी आपले संबंध प्रेमाचे, आदराचे होते. आपल्या सगळ्या पुराणकथा, दंतकथा, मिथ्यकथा, आख्यायिकाच काय; पण अगदी वेदकाळापासून ते आतापर्यंत आपल्या साहित्य, कलांमध्ये पशुपक्षी, झाडपेडं, बदलणारे ऋतु यांना महत्वाचे स्थान आहे. हिंदू धर्म हा एकच धर्म असा आहे, की ज्यामध्ये विशिष्ट झाडं, फुलं, पशू, पक्षी यांना देवत्व दिलेलं आहे. पिंपळाचं पान, वडाचं झाड, कमळ, नंदी, वानर यांचं विशिष्ट स्थान आहे. ती आपली संस्कृती आहे." - ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी - प्रतिभा रानडे.
मोनाली, सश्या, शशांक मस्त
मोनाली, सश्या, शशांक मस्त पोस्ट्स..
जिप्सी, तुला रिक्षा फिरवायची गरज आहे का रे??
ईन्डीगो, सुरेख आहेत फोटो. मला
ईन्डीगो, सुरेख आहेत फोटो. मला तर कुसुंबी हा शब्दच फार आवडतो
स_सा: नंतर वाचेन तुझे पोष्ट.
दिनेशदा, सरबतांची लिस्ट मस्त.
दिनेशदा, सरबतांची लिस्ट मस्त. सेव्ह करुन ठेवलि आहे.
पुण्यातील लोकांसाठी एक बातमी. म्हात्रे ब्रिजजवळ्च्या १०० फुटी रोड वर एक प्रदर्शन 'Exotic Fish and Bird Expo' लागले आहे. ईच्छुकांनी लाभ घ्यावा. प्रदर्शन आजपासुन १ मेपर्यंत आहे.
शशांक, मी एवढा लेख (उंबरामधले
शशांक, मी एवढा लेख (उंबरामधले किडे मकोडे) लिहिला होता, त्याची कॉपी द्यायला पाहिजे होती त्यांना !!
इन्डिगोने जो चेरीच्या फुलांचा फोटो टाकलायना, तशी फुले बदामाच्या (खर्या बदामाच्या) झाडाला पण येतात. ते झाड तसे गुलाबाच्या कुळातलेच आहे.
मला इन्डिगो नावावरुन आठवलं. आपण पुस्तकात महात्मा गांधीनी निळ कामगारांसाठी
उठाव केल्याचे वाचलेले असते. पण ते निळीचे झाड मला अजून प्रत्यक्ष बघायला
मिळालेले नाही. आधी वाटायचे, त्याला छान निळी फूले येत असतील. पण नाही
नेटवर दिसताहेत ती, जांभळट गुलाबी फुले.
मग अशीच काही नेहमीच्या ऐकण्यातली / वापरातली झाडे आठवली, जी मला
अजून बघायला मिळाली नाहीत.
१) हिंग. हे गाजराच्या कुळातले आहे. आणि तशाच दिसणार्या त्याच्या मूळापासून
हिंग मिळतो.
२) वेत. वेताचे नुसते फर्निचरच बघितलेय. हि झाडे (वेली) सह्याद्रीत, इतकेच नव्हे
तर मुंबईच्या आसपास पण आहेत. त्याच्या फुलांचा फोटो बघितलाय. पण झाड /वेल
नाही.
३) ताग. तागाची गोणपाटे लहानपणापासून बघतोय. बांगला देशातून कोट्यावधी
रुपयांचा ताग, मी कंपनीसाठी आयात केला. पण झाड नाही बघितले अजून.
४) झाडू. म्हणजे नारळाच्या झाडापासून करतात ती केरसुणी नाही, साधा कुंचा.
त्याचे गवत मी अजून बघितले नाही. त्याला पिवळा फुलोरा येतो, हे पण माहिती
आहे. पण झाड नाही बघितले..
झाडू. म्हणजे नारळाच्या
झाडू. म्हणजे नारळाच्या झाडापासून करतात ती केरसुणी नाही, साधा कुंचा.
त्याचे गवत मी अजून बघितले नाही. त्याला पिवळा फुलोरा येतो, हे पण माहिती
आहे. पण झाड नाही बघितले..>>> हे बहुदा नेरळ ला सगुणा बागेत आहे. (नक्की खात्री करते परत, पण बहुदा तेच होते तेथे)
दिनेशदा - तुम्ही जी वर यादी
दिनेशदा - तुम्ही जी वर यादी दिली आहे - जी अजून तुम्ही बघितली नाहीत- यावर मला असे म्हणावेसे वाटते की अशी यादी मी "बघितलेल्या झाडांची" देउ शकेन...... तुमच्या तुलनेत मी एक शतांश काय एक लक्षांश ही झाडे पाहिलेली नाहीत...
माझे एक साधे गणित आहे - ज्या मंडळींनी भरपूर झाडे, पशूपक्षी, कीटक पाहिलेत ते सारे प्रचंड भाग्यवान...... (बाकीच्यांनी (त्यात मी आलोच) वाईट वाटून घेउ नये - जे जे आपल्या समोर, आसपास दिसेल ते ते झाड, पशूपक्षी, कीटक - पहात राहू - एकमेकांना सांगत राहू....... मुख्यतः त्याचा आनंद घेऊ....)
monalip हो आहे. मी पाहिलयं.
monalip
हो आहे. मी पाहिलयं.
ते झाडूचे झाड पण खुप कॉमन
ते झाडूचे झाड पण खुप कॉमन असणार, कारण इथेही तेच गवत वापरतात. अगदी नव्या झाडूला तो वासही येतो.
शशांक, आपण न बघितलेल्या झाडाबद्दल खुप उत्सुकता असते ना. ज्यांनी अननस
झाडाला कसा लागतो ते बघितले नसते, त्यांच्या भन्नाट कल्पना असतात !!
काही ठिकाणी सगळा खजिना एकत्र बघायला मिळतो. सिंगापूरला, स्पाईस गार्डन,
सेंट गार्डन (सगळी सुगंधी फुलांची झाडे) हर्ब्ज गार्डन बघितले.
ऑकलंडला किचन गार्डन आहे तिथे सगळ्या भाज्या, फळे बघायला मिळतात.
गोव्याला पण स्पाईस गार्डन आहे.
सगळ्या औषधी वनस्पतिंचे उद्यान मात्र बघायचे आहे अजून !
दिनेशदा, इथे (पुण्यात) खूप
दिनेशदा, इथे (पुण्यात) खूप ठिकाणी बदामाची झाडे आहेत , ती खर्या बदामाची नाहीत का .
जंगलात पाणझरीच्या जवळपासच
जंगलात पाणझरीच्या जवळपासच खारमातीचे चाटण (सॉल्टलिक) पण नेहमीच असते. तृण्भक्षी प्राण्यांना गवत व पानांमधून मीठ मिळत नसल्याने त्यांना असे वेगळे मीठ खारमातीवर चाटणे आवश्यक ठरते. त्यामुळे सगळीच जनावरे खारमातीच्या ठिकाणी यतात. खारमातीची ठिकाणे दोन प्रकारची असतात. नैसर्गिक खारमाती व बनवलेली खारमाती. नैसर्गिक खारमातीच्या चाटणावर हरणे, कुरंग, रानगवे, वानरे खारमाती चाटायला येतात. ट्या ठिकाणी त्यांच्या चाटण्यामुळे खड्डा पडतो. अस खड्डा अगदी गुळगुळीत दिसतो. जनावरांनी सतत इथली माती चाटल्याने हा खड्डा मोठा होत जातो. मेळघाट व्याघ्रप्रकल्पात अर मी कंबरीवढे खोल खड्डे पाहिले आहेत. इथली माती सांबर व रानगवे चाटत होते. जनावरांना मीठ प्रिय असते त्यामुळी खारमातीजवळ बहुतेक सगळ्याच तृण्भक्षी जनावरांच्या खुरांचे व पावलांचे ठसे दिसतात.
अतुल धामनकर - अरण्यवाचन.
दिनेशदा, इथे (पुण्यात) खूप
दिनेशदा, इथे (पुण्यात) खूप ठिकाणी बदामाची झाडे आहेत , ती खर्या बदामाची नाहीत का .>>>> रावी - या बदामांना खोटा बदाम म्हणतात, हा खरा बदाम नाही.
दुर्मिळ मासे आणि पक्षी
दुर्मिळ मासे आणि पक्षी पहाण्याची संधी - २७ एप्रिल ते १ मे सिद्धी गार्डन समोर, म्हात्रे पुलाजवळ,पुणे
आवश्य भेट दया
उद्या दुपारी ११ ते ४ भेट देणे शक्य असल्यास मासे तज्ञ अमित देसाई यांच्या बरोबर पहाण्याची दुर्मिळ संधी
शशांक उतार सुंदर आहे.
शशांक उतार सुंदर आहे.
नाही, रावी तो जंगली किंवा
नाही, रावी तो जंगली किंवा बंगाली बदाम. तो खरा असता तर व्यापार्यानी असा मातीत मिसळू दिला नसता. पण खरा बदाम आता मिळतो बाजारात. फिक्कट हिरव्या
रंगाचे, किंचीत केसाळ फळ असते.
त्या जंगली बदामाच्या बिया मी, मालदीव मधे विकायला ठेवलेल्या बघितल्या आहेत.
(रच्याकने मालदीववासी रुणूझुणू (डॉ. प्रज्ञा ) कुठे आहे ? फेसबुक वर चौकशी करुनही उत्तर नाही.)
जागू, तृणभक्षी प्राण्यांना आहारातून मीठ मिळत नाही, म्हणून हा उपाय त्यांनी शोधलाय. इथे केनयात हत्तीनी, क्षारासाठी मोठमोठ्या गुहा करुन ठेवल्यात.
हो दिनेशदा मागे तुमची त्यावर
हो दिनेशदा मागे तुमची त्यावर पोस्ट होती.
शशांक , दिनेशदा > धन्यवाद.
शशांक , दिनेशदा > धन्यवाद. मी मुलाला हेच बदामाचे झाड म्हणून सांगितले होते. बदाम कसे काढतात माहिती नाही , नेटवर बघून सांगते असेही सांगितले होते. आता चुकीची दुरूस्ती करणार !
बीबीसी चा गंगेवरचा माहितीपट
बीबीसी चा गंगेवरचा माहितीपट (गँजेस) बघितला का ? तो बघून मला अनेक
नद्यांवर असे माहितीपट बनावेत असे वाटते. तिच्या उगमापासून मुखापर्यंत सुंदर चित्रण केलेय.
यांगत्से, मेकाँग, ब्रम्हपुत्रा, नाईल, अमेझॉन, मिसिसिपी, व्होल्गा, नर्मदा अशा कितीतरी नद्या आहेत. गुगल अर्थ वर मी एखादी नदी पकडून, तिचा पूर्ण प्रवाह बघतो, पण त्यात ती मजा नाही.
खुप वर्षांपूर्वी, दूरदर्शनवर पंजाबमधील बियास (व्यास ?) नदीवर सुंदर माहितीपट
बघितला होता. आता तर तो दूरदर्शनच्याही संग्रहात नसेल.
एक नदी पूर्ण संस्कृती पोसते, नव्याने निर्माण करते आणि लयालाही नेते.
रामायणकाळात गंगा आणि महाभारत काळात सरस्वति या नद्या वाहत्या होत्या, त्यातूनच तर तो इतिहास घडला.
दिनेशदा आता काही पवित्र
दिनेशदा आता काही पवित्र नद्यांची अवस्था पाहवत नाही. पवित्रतेच्या नावाखाली नदीत निर्माल्य वगैरे टाकून पार गढूळ केल्या आहेत नद्या.
जागू, झालं गेलं गंगेला
जागू, झालं गेलं गंगेला मिळालं, अशी म्हणच आहे ना आपल्याकडे. या झालं गेलं ला बराच अर्थ आहे म्हणायचा !
या नद्या संभाळल्या तर वाहतुकीचा बराच मोठा प्रश्न सुटेल. भारतातही अनेक नद्यांत
अशी वाहतुक होत असतेच.
हुश्श्य!!! आत्तच सगळ्या
हुश्श्य!!! आत्तच सगळ्या पोस्टी वाचून झाल्या..
काय काय फोटो,माहिती..
इंडिगो ,कुसुंबी च्या खूप सुंदर शेड्स..
जागु..लहानपणी कान्हाकिसली अभयारण्यात अशीच मानवनिर्मीत खारमातीच्या मोठ्या ढेपा ठेवलेल्या पाहिल्यात. सांबर,चितळ या,न्च्या झुंडी मधून मधून येऊन चाटत होते.
वर्षू, काही आदीवासींना
वर्षू, काही आदीवासींना प्राण्यांची हि निकड माहित असते. मग ते जंगलातली एक
जागा ठरवून, तिथे सार्वजनिक "विधी" करुन ती जागा खारवून ठेवतात. प्राणी
बिचारे, आयतेच त्यात सापडतात.
जनावरांना मीठ प्रिय असते >>>
जनावरांना मीठ प्रिय असते >>> बहुतेक म्हणुनच , गावाकडे अधुन मधुन सुक्या गवतावर /चार्यावर मिठाचे पाणी मारुन नंतर ते गायी गुरांना खायला देतात.
हरीणवर्गातील प्राण्यांची
हरीणवर्गातील प्राण्यांची भारशिंगे दर्वर्षी ऑक्टोबरच्या सुमारास गळतात व पुन्हा नव्याने येतात. नवीन येणार्या शिंगांवर एक प्रकारचे मखमली आवरण असते. शिंगांची पुर्ण वाढ होईपर्यंत या आवरणामधून गेलेल्या रक्तवाहिन्यांद्वारे त्यांना रक्तपुरवठा होतो. शिंगे पुर्ण वाढल्यावर हरणे त्यावरचे मखमली आवरण काढायला बघतात. यासाठी ते टणक सालीच्या सागाच्या झाडाची निवड करतात. त्यावर आपली शिंगे घासून ती हळूहळू मखमली आवरण काढून टाकतात. त्यांच्या शिंगे घासण्यामुळे त्या झाडावरची साल पण निघते. त्याला घासण म्हणतात. जमिनीपासून घासणाच्या उंचीवरून ही सांबर किंवा चितळाची घासण आहे हे ओळखता येते. घासणीच्या खालीच मखमली आवरणाचे व कधीकधी शिंगाचेही तुकडे पडलेले आढळतात.
हरणे भारशिंग घासताना पण अशाच झाडांचा किंवा दगडांचा उपयोग करतात. त्यावेळी त्यांच्या शिंगांच्या बुंध्याशी खाज सुटते. त्यामुळे हरणे शिंगे बुंध्यावर घासुन पाडून टाकतात. अही गळलेली शिंगे जंगलत कधी कधी दिसुन येतात. नविन येणार्या भारशिंगांकरीता हरणांना कॅल्शियमची फार गरज असते. त्यामुळे काहीवेळा नर हरणे पडलेल्या शिंगांची टोके चघळतात. अशी पडलेली शिंगे जंगलात फार काळ टिकत नाहीत. साळींदरासारखे प्राणी ती शिंगे कुरतडून टाकतात. त्यातुन मिळणारे कॅल्शियम साळींदरांच्या काट्यांच्या वाढीकरीता आवश्यक असते.
अतुल धामनकर - अरण्यवाचन.
Pages