
(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
मागील आठवड्यात आमच्या समुद्र
मागील आठवड्यात आमच्या समुद्र किनारी गेले होते तेंव्हा एकाच वेळी चंद्र व सुर्यदर्शनाचे टिपलेले हे फोटो.
हा चंद्रोदय.

त्याच्याच अपोझिट होता सुर्यास्त.

ओ वॉव जागु..सुपर्ब!!!
ओ वॉव जागु..सुपर्ब!!!
हि डोंगररांग माझ्या घरातूनच
हि डोंगररांग माझ्या घरातूनच टिपलीय बरं का >>>> अप्रतिम नजारा दिसतोये तो.
जागू, छान. तूमच्या गावचाच ना
जागू, छान. तूमच्या गावचाच ना ?
वर्षू, पतेकी बात !!
बी, हि फळे नाही खात, कुठले पक्षी खातात ते पण माहित नाही.
तसेही आत फक्त लाल रंगाची बी असते. बकुळीची फळे खातात,
पण फार गोड लागत नाहीत ती, आणि जास्त खाल्ली तर घसा
धरतो.
मोनाली, आफ़्रिकन रांगडे सौंदर्य आहे ते !
दिनेशदा, ढगांची रांग मस्तच.
दिनेशदा, ढगांची रांग मस्तच.


पद्मजा मी पण येणार दिनेशदांकडे.
जागू, कोकणात फोटो काढताना, असा फोटो काढता येईल का? असा विचार आला होता डोक्यात. ती इच्छा तू पूर्ण केली.
नैरोबीच्या पश्चिमेला हि एक
नैरोबीच्या पश्चिमेला हि एक डोंगररांग आहे. या डोंगराच्या पायथ्याची नॅशनल पार्क आहे.
परवा या डोंगरांनी असे ढग अडवून ठेवले होते ! >>> दिनेशदा मस्त प्रचि, ते ढग अगदी सुनामी प्रमाणे भासताहेत.
बी - मस्त प्रचि हे दुरियन
बी - मस्त प्रचि हे दुरियन म्हणजे नीरफणस का ?
माझ नाव काय आहे?
माझ नाव काय आहे?
तो चित्रक. यात आकाशी, पांढरा
तो चित्रक. यात आकाशी, पांढरा आणि दुर्मिळ असा लाल रंग असतो. पण तो
फार हाताळू नये. त्रास होतो. (खरजेवर वापरतात !)
होय दिनेशदा आपण गटगला गेलेलो
होय दिनेशदा आपण गटगला गेलेलो तोच हा समुद्रकिनारा.
तो चित्रक. यात आकाशी, पांढरा
तो चित्रक. यात आकाशी, पांढरा आणि दुर्मिळ असा लाल रंग असतो.>>>>>> दिनेशदा - तुम्ही व शांकली, जागू, साधना यांना कायमच सगळ्यात शेवटी उत्तर द्यायला संधी आहे......

ईन मीन तीन -- मला फक्त फणस
ईन मीन तीन -- मला फक्त फणस इतकेच माहिती आहे. दुरिअन म्हणजे फणस नाही. चव सारखीच असते. पन दुरिअनची भाजी करत नाहीत. फणसाची भाजी करतात. फणसाची गोड गरे तशीच खातात. फणसाच्या गरांपासून फणसपोळी पण तयार करतात. दुरिअनचा वास अत्यंत उग्र असतो. म्हणून दुरिअन घेतल्याघेतल्या लगेच खाल्ले तर बरे नाहीतर तो वास उग्र असल्यामुळे सहन होत नाही कुणाला.
बी, दुरीयनचे तळलेले गरे मी
बी, दुरीयनचे तळलेले गरे मी थायलंड मधे खाल्ले आहेत. छानच होते चवीला. तूमच्याकडे
पण नक्कीच मिळत असतील. मी गेल्यावेळी सिंगापूरला सुकवलेले ताडगोळे, लिंबाच्या
गोड चकत्या, घेतल्या होत्या. दोन्ही मस्त होते. दोन्ही पदार्थाचे रंग आणि स्वाद, सुकवल्यावरही
टिकून होते. ते तंत्र अजून भारतात आलेले दिसत नाही.
मलकापूर-साखरपा रस्त्यावर एक मोठी नर्सरी आहे, तिथे अनेक नवीन फळझाडांची रोपे
विकायला होती. त्यात हे झाड बघितल्यासारखे वाटतेय.
दिनेशदा, इथे इतक काहीबाही
दिनेशदा, इथे इतक काहीबाही मिळत आणि चिनी लोकात इतकी चिकाटी असते की हे सर्व तेच करू जाणे.
ओळखा पाहू .. कसला कोन आहे
ओळखा पाहू .. कसला कोन आहे हा..
ओळखा पाहू .. कसला कोन आहे
ओळखा पाहू .. कसला कोन आहे हा..>>>>> कुठलातरी पराठा वाटतोय......
शशांक.. नाही रे.. पराठा न्हाई
शशांक.. नाही रे.. पराठा न्हाई
जागु, इन मीन तीन छान
जागु, इन मीन तीन छान प्रचि..
वनी प्रचिंची जागा चुकली काय??
छान दिसतय जे काही आहे ते... 
चिमुरी.. असच गं
चिमुरी..
असच गं गम्मत..
कोणत्याही पिठाचा उपयोग न करता केलेला हा कोन आहे
साऊथ अमेरिकेला खाल्ला.. कच्च्या केळ्यापासून हा कोन बनवून ,क्रिस्प तळून त्यात फेटा चीज, ऑलिव्ह्ज,काकड्या,चिकन कीमा इ.इ. पदार्थ भरतात..
जागू, मस्तच गं!! कसलं सही ना,
जागू, मस्तच गं!! कसलं सही ना, एका दिशेला चंद्रोदय तर दुसर्या दिशेला सूर्यास्त! तुला इकडे बघू की तिकडे बघू असं झालं असेल ना?
वर्षूतै, तो कोन कसा बरं बनवला असेल नै!! पण खाताना छान वाटत असेल.
ते ढग अगदी सुनामी प्रमाणे भासताहेत.>>>>>>>>>> अगदी अगदी... दिनेशदा आम्हीपण येणार!!
सोनचाफ्याची फळं खूपच वेगळी
सोनचाफ्याची फळं खूपच वेगळी आहेत हं!
आणि ती स्कार्लेट स्टार्स फुलं (मागे १ ल्या भागात तुम्ही ह्यांचा फोटो दिला होता.) (मी ह्यांचं बारसं केलं बरंका!! :स्मित:) खूपच क्यूट! हवामानाचा अंदाज वनस्पतींना अचूक येतो आणि त्या त्यानुसार त्यांचं वेळापत्रक पुढे मागे करतात ही गोष्ट किती अचंबित करण्यासारखी आहे नाही? (खरंतर सगळंच अचंबित करणारं आहे म्हणा!!)
बी, करमळांच्या पानांचा फोटो
बी, करमळांच्या पानांचा फोटो मस्तच - आणि बाकीचे पण सगळे फोटो छान - त्या कुंडीतली फुलं 'पेटुनीया' जातीच्या फुलांचा एक प्रकार वाटतो आहे - केळ्याच्या घडांची मांड्णी फारच कलात्मक !
जागू, चंद्र आणि सूर्य दर्शन एकाच वेळेला - मस्तच - छान फोटो आहेत.
दिनेशदा, तो पॅनारोमिक फोटो खुपच भारी आला आहे
इन्डिगो, इथे कलात्मक मांडणी
इन्डिगो, इथे कलात्मक मांडणी कशातही असते. अगदी रचून, नीटनेटके ठेवून, त्याला गुंडाळून हे सर्व इथे कायम दिसत राहत.
माझे ईंडोनेशियाचे फोटो बघ. तेही तुला आवडतील. माझ्या रंगीबेरंगीमधे लिहिले आहे.
सुप्रभात.
सुप्रभात.

शुभ दुपार.
शुभ दुपार.



जागु,सूक्ष्म..
जागु,सूक्ष्म.. सुप्रभात्,सुदुपार...
प्रसन्न करणारी आहेत फुलं !!
सुक्षम सुंदर प्रची आहेत.
सुक्षम सुंदर प्रची आहेत.
Sir David Attenborough यांची
Sir David Attenborough यांची द लॉस्ट वर्ल्ड हि माहितीपटांची मालिका, यू ट्यूबवर
४ भागात आहे (माझ्या यादीत आहे.)
त्यात जीवाष्म कसे तयार होतात, ते कसे शोधतात, कुठे मिळू शकतात, मिळाल्यावर
त्यावर काय प्रक्रिया करतात आणि त्यावरुन त्या मूळ प्राण्याबाबत किंवा वनस्पतिबाबत
काय अनुमाने काढता येतात, हे सविस्तर दाखवलेय.
या जीवाष्मांवर प्रक्रिया करण्यासाठी किती चिकाटी लागते (त्यात २/३ वर्षे जातात )
ते बघून थक्क व्हायला होते.
त्यांचा लौकिक एवढा मोठा आहे कि, त्यांना कुठल्याही संग्रहातील दुर्मिळ जीवाष्म
हाताळायला मिळते आणि ते आपल्याला त्याचे जवळून दर्शन घडवतात.
अंबर (एक प्रकारचा डिंक) मधे छोटे छोटे किटक कसे अडकतात त्याचे तर प्रत्यक्ष
चित्रण आहे. लहान मूलांना अवश्य दाखवावेत असे हे भाग आहेत.
यू ट्यूबवर ती क्लीप सुरु झाली कि, खाली लाल चौकटीत cc अशी अक्षरे येतात. त्यावर क्लीक केले कि ते निवेदन, पडद्यावर लिखित रुपात दिसते. अर्थात, अटेंबरोंचे
इंग्रजी सहजसोपे असल्याने, ते समजण्यात कुठलीच अडचण येत नाही.
दिनेशदा, जागू, ही फ़ुले कसली
दिनेशदा, जागू, ही फ़ुले कसली सांगा ना.

सूक्ष्म - ही पांढरी फुले
सूक्ष्म - ही पांढरी फुले बहुतेक सर्पगंधा आहेत (Rauvolfia serpentina). दिनेशदा नक्कीच सांगू शकतील - हे उत्तर बरोबर का चूक...
Pages