निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे. दोन आठवडे नव्हतो तर केवढ्या पोस्टी! वाचताना मजा आली पण.

दिनेश, निसर्गावरच्या क्लिपा, माहितीपट, चित्रपट यांकरता एक वेगळा बाफ काढा ना. इकडच्या वाळूत सुई सापडणे कठीण जाते. Happy याच ग्रूपमध्ये काढा.

सेनापती, माझ्याकडे आहे निळे/जांभळे कृष्णकमळ. देइन तुला (पण तू तर सगळी झाडे कोणाला तरी देऊन टाकण्याच्या विचारात आहेस ना ? Happy ) तू मला लाल दे.

मीराधा आज बघतो ते BBC बाहेरचे झाड. अजून आहे का मोहोर त्याला?

इंडिगो, चेरीची फुले आणि कुसुंबी रंगाच्या छटा मस्तच. मला पण जाम आवडलाय तो रंग. आधीच मीराबाईच्या भजनाने तो डोक्यात रुतून बसला होता. शशांक आणि जिप्स्यामुळे तो बघायला मिळाला आणि एकदम आवडून गेला.

जिप्सी, आजच येतोय ऑफिसला. अजून बहर आहे का मुचकुंदाचा?

शशांक, दुर्गाबाई Happy 'तेथे कर माझे जुळती' अशा काही मोजक्याच (सैनिकेतर) माणसांपैकी एक. त्यांचे 'दुपानी' पण वाचा. आहेत छोटे लेखच पण प्रत्येक लेख वाचायला भरपूर वेळ लागतो इतके विचारांचे वादळ निर्माण करतात ते लेख.

माझा कृष्णकमळाचा वेल खुप वाढला आहे. कुंपणावरच पसरला आहे. रोज त्याचे निरिक्षण करत होते पण कळी-फुल काही दिसायचेच नाही. परवा अगदी संपुर्ण वेल पाहताना लक्षात आल वेल आंब्याच्या झाडावर चढलाय आणि तिथे फुले लागली आहेत. खुप आनंद झाला.

ज्ञानेश्वरी या सुप्रसिद्ध ग्रंथात माऊलींनी ज्या सुंदर सुंदर उपमा, दृष्टांत दिले आहेत ते वाचले की आपण चकित होऊन जातो. माऊलींची सौंदर्यदृष्टी, रसिकता, नेहेमीचीच्याच गोष्टीकडे वेगळेपणाने पहाणारी अलौकिक प्रतिभा - या व अशाच अनेक गोष्टी पाहिल्या की नतमस्तक होण्यापलिकडे दुसरे काही उरतच नाही आपल्या हातात.......

अध्याय पहिला - जैसे शारदीयेचे चंद्रकळे | माजि अमृतकण कोवळे | ते वेचिती मने मवाळे | चकोरतलगे ||५६||
तियापरी श्रोता | अनुभवावी हे कथा | अतिहळुवारपण चित्ता | आणूनिया ||५७||

ज्ञानेश्वरी ग्रंथ कसा वाचावा (अनुभवावा) या करता अंतःकरण किती हळुवार असावे हे सांगण्याकरता माऊली म्हणतात - शरद ऋतूमधील अमृतमधुर चांदण्याचे प्राशन / सेवन चकोरपक्ष्याची पिले ज्या हळुवारपणे करतात तेवढे हळुवारपण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचताना श्रोत्याच्या (वाचकाच्या) चित्तात असावे म्हणजे ही कथा (भगवद् गीता / ज्ञानेश्वरी ) अनुभवता येईल.

निसर्गातील कित्येक गोष्टी माऊलींनी ज्ञानेश्वरीत सहजी उधृत केलेल्या आढळतात.

शुभदुपार. Happy
जागू, मस्त आलेत फ़ुले. फ़ुले पहाताना मी अगदी, माझ्या ८वी, ९वी पर्यंत माग गेले. खारेपाटणला आमच्या वर्गासमोरच मांडव घालून कृष्णकमळाचा वेल लावला होता. दर दिवशी पूर्ण मांडव भरलेला असायचा फ़ुलांनी. तो पानांचा हिरवा रंग आणि फ़ुलांचा निळा रंग खूपच छान दिसायचा. Happy

ज्ञाने. अध्याय पहिला -
या गीतार्थाची थोरी | स्वये शंभू विवरी | जेथ भवानी प्रश्नु करी | चमत्कारौनी ||७०||
तेथ हरु म्हणे नेणिजे | देवी जैसे का स्वरुप तुझे | तैसे नित्यनूतन हे देखिजे | गीतातत्व ||७१||

गीतार्थाची थोरवी सांगताना माऊली म्हणतात - प्रत्यक्ष महादेव त्याची थोरवी पार्वतीदेवीला सांगत असतात - हे गीतातत्व किती नित्यनूतन आहे तर हे देवी तुझे रुप कसे नित्यनूतन आहे तसेच........ मीदेखील या ठिकाणी नेणता आहे..

अहाहा - काय रसिकता असावी माऊलींच्याठिकाणी..... एखादा नवीनच लग्न झालेला नवराही अशी उपमा देउ शकणार नाही......
प्रत्यक्ष महादेवांनीही या ओळीला दाद दिली असेल.....

ही सृष्टी ही किती नित्यनूतन आहे हे देखील माऊली सहज सांगून जातात......

सर्वच फुलं सुर्रेख आहेत..
Happy जागु मस्त फुललाय तुझा कृ क वेल.. सुंदर
मोगर्‍याचा तर नुसता फोटो सुद्धा पाहून फ्रेश वाटून जातं

@माधव-
बहर आहे पण थोडा कमी आहे.
मला वाटले सर्वजन विसरुन गेले त्या झाडाला.आकृतीच्या माळ्याने मला त्याचे नाव कामनी (कामीनी नव्हे)असे सान्गितले. गुगुलुन पहिले तर वेगळेच झाड कामनी नावाने सापडले.डहानुकरांची ,दुर्गा भागवतांची बहुतेक सर्व पुस्तके चाळुन झाली. रोज विचार करते ह्या झाडाचा नाद सोडायचा ,पण परत संध्याकाळी त्या सुगंधाच्या ओढीने तिथे जातेच.

नाही आकाशनीम नक्किच नाही.फुले पांढरी ,कुंतीच्या फुलासारखी पण थोडि मांसल आहेत्.टपोरि कळी मोगर्यासारखीच दिसते पण थोडि पोकळ आहे ,बोटाने थोडे दाबले तर पटकन उमलली.
बहार साधारण गेल्या १० दिवसांपासुन आहे.>>>> पान १७

@माधव-
बहर आहे पण थोडा कमी आहे.
मला वाटले सर्वजन विसरुन गेले त्या झाडाला.आकृतीच्या माळ्याने मला त्याचे नाव कामनी (कामीनी नव्हे)असे सान्गितले. गुगुलुन पहिले तर वेगळेच झाड कामनी नावाने सापडले.डहानुकरांची ,दुर्गा भागवतांची बहुतेक सर्व पुस्तके चाळुन झाली. रोज विचार करते ह्या झाडाचा नाद सोडायचा ,पण परत संध्याकाळी त्या सुगंधाच्या ओढीने तिथे जातेच.>>> याविषयीच विचारणा चालू आहे ना - खूप सुवास असेल तर नक्कीच कुंती (कामिनी), Murraya paniculata या नावाने गुगलून पहा तेच आहे का ते.....

माधव पान १७ वर तुमची पोस्टच नाही. परत फोटो टाकता का ?

हे सुरुचे झाड आहे की दुसरे कसले ? आमच्याइथे उगवले आहे.

नुकतेच गोवा आणि कारवारला जाऊन आलो. गोव्यात आम्ही जिथे जातो तिथे आणि कर्नाटकातही एक जाणवलेली गोष्ट म्हणजे तिथे प्लॅस्टीकचा कचरा अगदीच नगण्य असतो. त्यामुळे तो परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर दिसतो कारण बाकी आपण ज्याला कचरा समजतो तो निसर्गाकरता कचरा नसतो. तो कोणालातरी उपयोगी असतोच.

गोव्याला मनसोक्त बोंडू (काजूची फळे) खाल्ले. तसे ठाण्याला बाजारात मिळतात पण ते इतके सुकटलेले असतात की खायची इच्छाच होत नाही. गोव्याला मात्र झाडावरचे रसरशीत बोंडू हाताने तोडून खायला मिळाले. सुट्टी सार्थकी लागली. Happy

कर्नाटकात कारवार ते शिरसी (यल्लापूर मार्गे) हा प्रवास खूप सुंदर होता. तुरळक वस्ती आणि दाट (काही ठिकाणी तर घनदाट) जंगल असाच रस्ता होता. त्यामुळे ऐन वैशाखात भर दुपारी पण घामाचा एकही थेंबही न येता प्रवास झाला. गाडीतले एसी अर्थातच बंद ठेवले होते. अनेक ओळखीची तसेच अनोळखी झाडे बघितली. तुम्हा सगळ्यांची खूप आठवण झाली तो निसर्ग बघताना. एके ठिकाणी डोंगर उतारावर सगळी झाडे सुकली होती पण मधून मधून बहावा बहरला होता. करड्या रंगावर तो पिवळा रंग - अप्रतिम दृश्य होते.

कर्नाटकात यंदा भर्पूर आंबे आहेत. पण अजून फळ कच्चेच आहे. पण एवढे लगडलेले झाड महाराष्ट्रात पहायलाही मिळत नाही हल्ली. मनसोक्त कैर्‍या खाल्ल्या. फणस, नीरफणसही भरपूर बघितले. एकदा नि.ग.वाल्या मंडळींनी तिकडे सहलीला गेले पाहिजे. ठरवूयात का?

जागू, कृष्णकमळाचा वेल असाच पसरत राहतो. (या कूळातले सगळेच वेल.)
ते झाड सुरुचेच वाटते आहे.
मी राधा, पाने कशी आहेत झाडाची ? कडीपत्त्यासारखी आहेत का ?

माधव. मी ते सगळे रेकॉर्ड करुन ठेवलेत. येताना घेऊन येईन. भारतात ते सलग दिसणे अवघड आहे, याची कल्पना आहे मला.

शशांक, त्या श्रोत्यांच्या अध्यायातच, काडवात, कमळाचे केसर असे पण दृष्टांत आहेत.
माऊलींनी १८ वर्षात जे अनुभवलं ते आपल्याला ८० वर्षांत जमणार नाही.

संजय गांधी नॅ पार्कात जेथे लायन-टायगर सफारीची तिकिटे मिळतात तेथील व बाजुच्या झोके वगैरे असलेल्या ग्राउंड मधील आंब्याच्या झाडांवर / फांद्यांवर बरीच बांडगुळे वाढली आहेत.

आर्या, अशाच उड्या माराव्या लागतात, ती फुले तोडण्यासाठी.

मी राधा, आता सेनापती येईल तिकडे. त्याला फोटो काढायला लावू.

मोनालि, आंब्याचे झाड भारीच कनवाळू. खडबडीत फांद्या म्हणजे बांडगूळांना आमंत्रणच !

नमस्कार मंडळी !! लंडन च्या थंडीतून डायरेक्ट मुंबापुरी गाठली आहे. आता तुम्ही सगळ्यांनी वारंवार लिहिलेली राणीची बाग आणि त्यातली झाडं नक्की पहाणार.
हा धागा वाचायचा राहिलाच आहे पॅकिंग आणि प्रवासाच्या गडबडीत. वाचेन.
कालच्या DNA ह्या इंग्रजी व्रुत्तपत्रात बहावच्या पिवळ्या फुलांचा रस्त्यावर सडा पडलाय अस फोटो होता. पण त्याखाली बातमी काय तर म्हणे 'गुलमोहराच्या फुलांनी रस्ता सजवलाय' Happy नि.ग. धाग्यावर आले नाही तरी लोकांना गुलमोहोर तरी ओळखता यावा असं मला वाटतं.

जिप्सी ...ओंजळीतल्या मोगर्‍याचा फोटो एकदम मस्त!
जागु.... कृष्णकमळ, त्याच्या मागचे हिरवे पान खुप छान आले आहे.
दिनेशदा.... निसर्ग नाट्य मस्त रंगले आहे.

मंगल प्रभात.

दिनेशदा नाट्य सुंदर आहे.
आर्या माझ्याकडे इतक्याच उंचावर लागल आहे कृ.क. उडी मारायला ये.

शकुन Happy

आर्या, अशाच उड्या माराव्या लागतात, ती फुले तोडण्यासाठी. >> Lol
दा - निसर्ग नाट्य सुंदर दुसर्या प्रचित तर सोन वितळतय असेच वाटतेय.

गोव्याला मनसोक्त बोंडू (काजूची फळे) खाल्ले. तसे ठाण्याला बाजारात मिळतात पण ते इतके सुकटलेले असतात की खायची इच्छाच होत नाही. गोव्याला मात्र झाडावरचे रसरशीत बोंडू हाताने तोडून खायला मिळाले. सुट्टी सार्थकी लागली. स्मित>>>>>>>माधव मी पण खाल्ले. पण ताजे, रसरशीत नाही. काकूने आधीच काढून ठेवले होते. आणि ताजे खायचे ल़क्षातच आले नाही. साखरजांभ, हिरवे काजू, हे सगळं फोटो काढताना, खायचे विसरले. Uhoh

वरच्या फोटोत जे झाड दिसतय ते आहे टोकफळाचे (शांकलीने, फोटो टाकला होता)
माझे घर आहे सहाव्या मजल्यावर, माझ्या घरातून बसल्या बसल्या हे झाड दिसतेय म्हणजे केवढे वाढलेय ते बघा.

झाडावरुन, फळे तोडून खायचा आनंद काही आगळाच. कधी कधी झाडाखाली पडलेली फळे गोळा करायचा पण !! पण आमच्याकडे अशी बरीच झाडे दिसतात, त्यांना भरपूर फळे लागतात. पण ती तशीच मातीत मिसळून जातात. कुणीच खात
नाही.

मग मला काळजी वाटते, या झाडांचा प्रसार कसा होणार ? पण हि झाडेही भरपूर
दिसतात. बीजप्रसार वाहत्या पाण्याद्वारे होत असेल का ? शक्यता आहे.
अशा झाडांचे फोटो टाकतो.
बरं इथले पक्षीसुद्धा आपण टाकलेले पदार्थ खात नाहीत. अगदी कावळे, चिमण्याही
स्वतःचे अन्न, स्वतः शोधून खातात.

Pages