
(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
आणि हा एक फोटो... मुद्दाम इथे
आणि हा एक फोटो... मुद्दाम इथे टाकतोय.
निसर्गाची कमाल..
मानवी आकृती दिसते का बघा..
सेना, तिकोनावरचा फोटो आहे ना
सेना, तिकोनावरचा फोटो आहे ना वरचा
होय रे... दरवाजामधुन आत शिरलो
होय रे... दरवाजामधुन आत शिरलो की लगेच डाव्या बाजुला आहे हे झाड.
काही झाडात "हरित्"द्रव्य
काही झाडात "हरित्"द्रव्य हिरव्या रंगाचे असते. त्यातला प्रकार दिसतोय हा. आमचाकडे निळे (ओके, निळसर हिरवे) गवत दिसते.
यू ट्यूबवर Extraordinary Birds असा एक माहितीपट आहे.
भारतातील एक गाव आणि तिथल्या गावकर्यांचे स्थलांतरीत पक्ष्यांशी नाते, हमिंग बर्डस ची अनोखी
दुनिया, शेतातील उंदरांचा बंदोबस्त करणारी पाळीव घुबडे, G I JOE नावाचे एक कबुतर.. असे अनोखे
काहीतरी बघायला मिळेल.
अगं मला आपलं वाटतं की
अगं मला आपलं वाटतं की सगळ्यांबरोबर ऑनलाईन गप्पा माराव्यात........ (अर्थात ते शक्य नाहीये हे मलाही माहीत आहे..)
सेनापती, तो फोटो सही आलाय!! आणि ते लाल रंगाचं गवत सुंदरच आहे.
जिप्सी, मोगर्याचा सुगंध इथपर्यंत आला. आणि.............हात.......:स्मित:
दिनेशदा, हा माहितीपट पण जरूर बघायला पाहिजे.
मी एक काळ्या तुळशीचे रोप आणले
मी एक काळ्या तुळशीचे रोप आणले होते. पण त्याला येणारी नवीन पाने हिरवीच आहेत. आता तर ती तुळस संपूर्ण हिरवीच झाली आहे. सुर्यप्रकाश, पाणी पण पुरेसा मिळत आहे.
असे का बरे झाले असेल?
माझ्याकडे काळी तुळस आहे, ती
माझ्याकडे काळी तुळस आहे, ती आईकडे नेल्यावर हिरवी होते. तिच्याकडे तुळशीला सकाळ ते संध्याकाळ पुर्ण वेळ सुर्यप्रकाश मिळत नाही हे कारण आहे असे मला तरी वाटते. दिवसातले काही तासच जर सुर्यप्रकाश मिळत असेल तर तुळस काळी होत नसावी.
तुळशीला आपण जरा जास्तच पाणी
तुळशीला आपण जरा जास्तच पाणी घालतो. शिवाय खुपदा पाण्याचा निचराही होत नाही. जरा पाण्याचा ताण दिला, तर ती आपले रंग, गंध खुलवते.
सध्या आमच्याकडे अशा मोहोराची झाडे बहरलीत. झाड छान दिसते पण सुगंध अजिबात नसतो. मग
या झाडाला सुपारीएवढी टणक फळे लागतात. ती पण झाडाखाली पडलेली असतात, म्हणजे प्राणी, पक्षी खात नाहीत.
वर्गाच्या बाहेर उभे रहायची शिक्षा मिळालीय वाटतं !
नो कॉमेंट्स
दिनेशदा, पानं
दिनेशदा, पानं क्रायसोफायलमसारखी आणि फुलं बेहडा किंवा धावड्यासारखी असं काहीसं कॉम्बिनेशन आहे नै त्या पांढर्या फुलांचं?
वर्गाच्या बाहेर उभे रहायची शिक्षा मिळालीय वाटतं !>>>>>>>>>:हाहा:
बिचारे शिक्षा भोगणारे पक्षी !
बिचारे शिक्षा भोगणारे पक्षी !
ती फुले मस्त आहेत.
दिनेशदा, 'नेचर साउंड १७ ' ही क्लीप सुद्धा खूप छान आहे. पण ती सलग एकता येत नाही. त्यासाठी काय करायचे?
प्रज्ञा, ती रेकॉर्ड करुन
प्रज्ञा, ती रेकॉर्ड करुन घ्यायची. मी करुन ठेवतो.
जिप्सी, मोगर्याचे फोटो
जिप्सी, मोगर्याचे फोटो अप्रतिम आलेत.
दिनेशदा, पक्षांचा फोटो मस्त आलाय.
मस्त प्रचि... सेनापतीच्या
मस्त प्रचि...
सेनापतीच्या फोटो मधली मानवी आकॄती मला सापडली नाही.. कोणीतरी तेव्हडा भाग हायलाईट करुन दाखवता का?
जिप्सी, ओंजळीतल्या
जिप्सी, ओंजळीतल्या मोगर्याच्या फुलांचा फोटो मलाही फार आवडला.
दिनेशदा, सगळेच फोटो छान. तुम्ही सांगितलेल्या पक्षांच्या माहितीपटाची झलक पाहिली - युट्युबवर बघायच्या माहितीपटांची माझी यादी वाढत चालली आहे
अगं.. तटबंदीतील झाडाचे खोड
अगं.. तटबंदीतील झाडाचे खोड बघ..
सही प्रचि.... मानवी आकृती
सही प्रचि....
मानवी आकृती दिसते का बघा.>>> मला दिसली.....
अरे... माझी पोस्ट टाकेपर्यंत
अरे... माझी पोस्ट टाकेपर्यंत उत्तर सांगितले....
सेनापती आलं लक्षात
सेनापती आलं लक्षात
व्वा!. मस्त फोटो.
व्वा!. मस्त फोटो.
त्या एक्स्ट्राऑर्डिनरी बर्ड
त्या एक्स्ट्राऑर्डिनरी बर्ड या क्लीपमधे हमिंग बर्डच्या वेगवेगळ्या प्रजाती दाखवल्यात.
त्यांची चोच, ते ज्या फुलातला मधुरस पितात, त्या फुलाच्या आकाराची होते, असे
दाखवलेय. एका प्रजातीत तर चोच शरीरापेक्षा लांब आहे.
नेमक्या कुठल्या हंगामात फुले फुलणार यांचा त्यांना अचूक अंदाज येतो आणि त्यानुसार ते स्थलांतर करतात. अलास्का पासून मेक्सिको आणि परत. एकूण प्रवास
५,००० किलोमीटर्सचा !
ससाण्याच्या भागात, त्याचे आणि कुत्र्याचे को ऑर्डीनेशन लाजबाब आहे. पक्ष्यांना
कसे शिकवतात, हा भाग पण मजेशीर आहे.
(No subject)
वा, केदार. मस्त रंग आहे.
वा, केदार. मस्त रंग आहे.
केदार, सुरेख फोटो - कळी चा
केदार, सुरेख फोटो - कळी चा रंग आणि आकार खूपच सुंदर आहेत !
मी परवा ज्या डोंगररांगेचा
मी परवा ज्या डोंगररांगेचा फोटो टाकला होता, तिने आजही ढग अडवले होते, पण मग सोडून दिले..
दिनेशदा, मस्त नजारा! तुम्ही
दिनेशदा, मस्त नजारा! तुम्ही दिलेल्या extraordinary birds ही क्लीप फेवरीटमधे अॅड करून ठेवलेय. नंतर बघते.
वा सगळ्यांचे फोटो मस्त आहेत.
वा सगळ्यांचे फोटो मस्त आहेत.
सुप्रभात.
सुप्रभात.

जागू, रोज एक नवं फूल !
जागू, रोज एक नवं फूल ! मस्त.
---
इथिओपिया, इराण, पाकिस्तान, नायजर, जॉर्जिया, सुदान, बोलिव्हीया, पेरु, लिबिया आदी देशांची नावे आपण फक्त ऐकलेली असतात. क्वचित ऑलिंपिक च्या मिरवणुकीत हे देश दिसतात. पण प्रत्यक्ष त्या देशांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसतेच.
पण या देशाची मस्त सैर, यू ट्यूबवर जर्नीज टू द एन्ड ऑफ वर्ल्ड या मालिकेत आहे.
या देशातील अनोखा निसर्ग, प्रथा यांचे सुंदर दर्शन होते यात. या प्रवासांना काही धार्मिक वा ऐतिहासिक संदर्भांची जोड आहे. (माझ्याकडे हे सर्व माहितीपट आहेत आता.)
घरी फुललेला मोगरा धन्यावाद
घरी फुललेला मोगरा धन्यावाद माबोकर्स

दिनेशदा केदार छान आहे मोगरा.
दिनेशदा
केदार छान आहे मोगरा.
Pages