
(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
आणि माणसांना जी सापडतात, ती
आणि माणसांना जी सापडतात, ती "सांबरशिंग" औषध म्हणून वापरतात !
ओ..जागु रंजक माहिती.. हां मग
ओ..जागु रंजक माहिती..
हां मग सांबरशिंग फारच रेअर वस्तू असेल..
दिनेशदा, इथे (पुण्यात) खूप
दिनेशदा, इथे (पुण्यात) खूप ठिकाणी बदामाची झाडे आहेत , ती खर्या बदामाची नाहीत का .>>>> रावी - या बदामांना देसी बदाम, इंडियन बदाम अशी नावे आहेत - Terminalia catappa हे याचे बोटॅनिकल नाव (Combrataceae family).
खरा बदाम म्हणजे - Prunus dulcis (family Rosaceae).
खरा बदाम -
शशांक मस्तच. हेच ओले बदाम
शशांक मस्तच. हेच ओले बदाम बाजारात विकायला येतात ना ?
मलाही खरे बदाम खोटे बदाम
मलाही खरे बदाम खोटे बदाम आत्ता कळले. इथे सिंगापुरात तर चहुकडे बदामाची झाडे बघायला मिळतात. खरे बदाम पहिल्यांदा बघत आहे. लव दिसते छान बदामावर.
यांगत्से, मेकाँग, ब्रम्हपुत्रा, नाईल, अमेझॉन, मिसिसिपी, व्होल्गा, नर्मदा अशा कितीतरी नद्या आहेत>> दिनेशदा, मेकाँग ही नदी कंबोडिया आणि लॅओस ह्या देशात वाहते. मेकाँग तिकडे Mighty River Mekong म्हणतात. तुम्ही वेळ मिळाला की Tonnle Sap बद्दल वाचा नेटवर आणि मेकाँगला Mighty का म्हणतात ते जाणा.
बी, त्याबद्दल पण माहितीपट
बी, त्याबद्दल पण माहितीपट बघितल्यासारखा वाटतोय. एकंदर ५ देशांतून वाहते ना
ती ? मी तर मेकाँग म्हणजे, माँ गंगा असे तर्कट पण वाचलेय.
भरभराटीस आलेली अनेक शहरे नदीच्या काठानेच वसली आहेत. लंडन, पॅरीस, कोलकाता, दिल्ली, पणजी आणि कधीकाळी मुंबई पण.
धन्यवाद शशांक . आता लेकाला ही
धन्यवाद शशांक . आता लेकाला ही माहिती दाखवते. बदामाच्या फुलांच्या पाकळ्या काय नाजुक दिसताहेत. मस्तच !
varil list madhe ek naav
varil list madhe ek naav ajoon add karavese waatle..."Naagzira" this great book is written by Vyankatech Madgulkar. Atishay chan nisargaachi mahiti aslele pustak aahe...krupaya koni ADD karaal ka ? mazya manaat hya pustaka vishayi khoop bhavana aahet ..mhanoon hi vinanti...chu.bhu.dya.ghya !
मी वाचलय हे पुस्तक. खुप वर्षे
मी वाचलय हे पुस्तक. खुप वर्षे झाली त्याला. त्याकाळात सुंदर फोटो वगैरे नसत, पण लेखकमंडळी मोजक्या शद्बातून ते सगळे वातावरण डोळ्यासमोर आणत.
पुणे शहर देखील मुळामुठेच्या
पुणे शहर देखील मुळामुठेच्या दोन्ही बाजूस वसलेले आहे. मेकॉंगबद्दल मी नक्की वाचेन सविस्तर. त्या नदीला कंबोडियामधे खूप मानतात. आमचे एक स्नेही दरवर्षी एका नदीचा प्रवास करुन येतात. मागे ते नाईल फिरुन आले होते.
दिनेशदा, तुम्ही जी माहिती
दिनेशदा, तुम्ही जी माहिती देता ती खूपदा अचूक असते. हे वाचा: http://en.wikipedia.org/wiki/Mekong
आणि हा त्यातला उतारा: In English the river is called "the Mekong River", derived from "Mae Nam Khong", a term of both Thai and Lao origin. In the Lao-Thai toponymy, all great rivers are considered "mother rivers" signalled by the prefix "mae", meaning "mother", and "nam" for water. In the Mekong's case, Mae Nam Khong means Khong, Mother of Water[3]. "Khong" is derived from the Sanskrit "ganga", meaning the Ganges. Many Northern Thai and Laos locals refer to it as the "River Khong". Such is the case with the Mae Nam Ping in Chiang Mai which is known as the "Ping River". The Tonle Sap in Cambodia is a similar example – where Tonle translates as "Great lake or river", making the Tonle Sap River an unnecessary repetition of what is in fact the "Sap River".
नाईल, आमच्याकडच्या लेक
नाईल, आमच्याकडच्या लेक व्हीक्टोरियात उगम पावते ना ! पण तिने इजिप्तचा अजोड
विकास करुन दिला. गुगल अर्थ वर बघशील तर सगळा देश त्या नदीच्या दोन्ही
तीरावरच वसलाय. अर्थात अस्वान डॅमचे महत्व कमी नाहीत. तब्बल ५५० किमीचे
बॅकवॉटर क्षेत्र आहे. म्हणजे साधारण मुंबई ते गोवा, एवढे अंतर.
दिनेश, नुसते वाचन आणि फिरणे
दिनेश, नुसते वाचन आणि फिरणे करायचे झाल्यास दहा जन्म कमी पडतील इतकी अफाट पुस्तके आहेत. नेटवर विकि उघडले की मला वेडच लागते. एक एक लिंक उघडता उघडता पन्नास पाने उघडून होतात नेटची. मी आत्ता मेकाँगवर टिचकी मारली तर कित्येक नद्यांची माहिती वाचली. गंगा नदीबद्दल केवढी अफाट माहिती लिहिली आहे विकिवर आणि जुनी चित्र पाहून असे वाटते १९०० पर्यंत गंगा नदी बरीच स्वच्छा होती. आज गंगा नंदी जगातील पाच नद्यांपैकी एक polluted नदी गणल्या जाते
हेच तर आयटीचे वरदान ना
हेच तर आयटीचे वरदान ना आपल्याला. बसल्या जागी जग फिरता येते.
आणि खरोखरीच आयूष्य अपूरे पडतेय असे वाटायला लागलेय.
मग याबाबतीत शशांकचा दृष्टीकोन आवडतो, प्रत्येक अनुभवाला भिडायचे, काय
मिळवायचे राहिले यापेक्षा, काय मिळाले यावर लक्ष केंद्रीत करायचे.
किती छान गप्पा रंगल्या
किती छान गप्पा रंगल्या आहेत!!
जागू, मस्त आहेत उतारे..... सध्या अरण्यवाचन चालू आहे वाटतं!
इंडिगो, किती सुंदर टिपल्या आहेत छटा! मस्त वाटलं बघून.
बापरे ! २४ तासाच्या आत दोन
बापरे ! २४ तासाच्या आत दोन पानं वाहिली !
सगळ्यांना कुसुंबी छटांचे फोटो आवडल्याचे ऐकून खूप आनंद झाला मला - अजून वेगवेगळे फोटो काढीन असा उत्साह वाढला आहे
शशांक, खर्या बदामाचे फोटो टाकलेत ते छान केलं - दिनेशदांनी बदामाच्या आणि चेरी च्या फुलांत साम्य असतं ते सांगितलेलं लगेच बघायला मिळालं.
दिनेशदा, रो़जच्या वापरातील
दिनेशदा, रो़जच्या वापरातील वनस्पतीं बद्दल ची माहिती आवडली !
जागू, पुस्तकातले उतारे इथे दिल्याबद्द्ल धन्यवाद- छान माहिती !!
खूप आवडतोय हा धागा!
खूप आवडतोय हा धागा!
माहितीपूर्ण!!
आज घरच्या कुंडीत जवळपास २५-३०
आज घरच्या कुंडीत जवळपास २५-३० मोगरा एकदम फुलले होते.
गॅलरीत उभं राहिल्यावर मस्त घमघमाट सुटला होता.
ओंजळभर फुले:

<<<पण सगळेजण दिवसभरात गप्पा
<<<पण सगळेजण दिवसभरात गप्पा मारून घेता...................मी शेवटी असते इथे >>>>
शांकली, एवढं वाईट वाटून घेऊ नकोस . तुझ्यानंतर मी येते ईथे.
<<<आत्ता माझ्या शेजारच्या
<<<आत्ता माझ्या शेजारच्या खूर्चीवर एक छोट फ़ुलपाखरू येवून बसल>>>
शोभा, तू नि.ग.चे पान वाचत असल्याने त्या फुलपाखराला वाटले असणार ही खरीच फुले आहेत.
सगळ्याचेच फोटो मस्त
सगळ्याचेच फोटो मस्त आहेत.
दिनेशदा, मी हिडन अलास्का हि लिंक आताच पाहिली. छान आहे.
वा.. एकदम सुंदर मोगरा आणि
वा.. एकदम सुंदर मोगरा आणि मोग-याचे हातही
<<<<<वा.. एकदम सुंदर मोगरा
<<<<<वा.. एकदम सुंदर मोगरा आणि मोग-याचे हात>>>>>
साधना +१
साधना +१
आहाहा... सुंदर सुवासिक
आहाहा... सुंदर सुवासिक दिस्तोय मोगरा... भरून घेतला सुवास...
जागु.. मेंदी घरची का?? तो
जागु.. मेंदी घरची का??
तो फोटो जिप्स्याने टाकलायं ना...
ओंजळीतल्या मोगर्याच्या
ओंजळीतल्या मोगर्याच्या फुलांचा फोटो फार आवडला.
जसजसा उन्हाळा चढतो, तसा
जसजसा उन्हाळा चढतो, तसा मोगर्याला जास्तच सुगंध येतो.
जिप्स्या, जाणवला तो सुगंध बरं का !
प्रज्ञा, काय अनोखे फोटो आहेत ना त्या, हिडन अलास्का मधे !
हे लाल रंगाचे गवत पवनाकाठी
हे लाल रंगाचे गवत पवनाकाठी पाहिले होते. नाव ठावूक आहे का कोणाला?
Pages