आयपीएल २००९

Submitted by नंदिनी on 16 March, 2009 - 01:49

आयपीएल परत सुरू होतय. यंदा निवडणूका आणि अतिरेकी हल्ले यात आयपीएक गर्तेत आहे असं वाटतय. पण मागच्या वर्षीसारखे क्रिकेट याहीवेळेला बघायला मिळेल ही अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयपीएल भारताबाहेर...
इंग्लंड अथवा साऊथ अफ्रिकेत होण्याची शाक्यता...
सामन्याच्या वेळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४ आणि रात्री ८ अशाच असणार...
ठरलेल्या दिवसांमधेच स्पर्धा होणार...

(इंग्लंड मधे होऊ दे.... जाऊन बघता येईल... :डँबिस हसणारी बाहुली:)
_______
रिंद पोश माल गिंदने द्रायि लो लो...!!!
WELCOME SPRING...!!!

कुठेही होऊदेत. मला फक्त माझ्या मुंबई टीम आणि त्यातल्या त्यात सचिन, पोलॉक, जयसुर्या यांना खेळताना बघण्यात interest आहे. मुंबईचे यंग खेळाडु सुद्धा छान खेळतात.
यावेळी सचिनला शेर्ने वॉर्नला सिक्सर मारताना बघायचय. बरीच वर्ष झाली. अजुनही त्या दोन शारजातल्या वन डे मॅचेस आठवतायत.

जर भारताबाहेर होत असेल, तर ती खेदाची गोष्ट आहे Sad
कारण आयपीएल, ही जगतली सगळ्यात मोठी पैश्याची उलाढाल असणारी स्पर्धा होउ पहतेय आणि गेल्या वर्षी आशिया मधली तर १ no. स्पर्धा बनली आहेच!!..

पण निवडणुका आल्यामुळे लोक रिस्क घेत नाहीत, आणि राज्कारणी लोक मुद्दाम अडवणुक करुन वहात्या गंगेत हात घुवु पहात आहेत..तरी पण कोठेही होउदे, cancel होत नाही ही त्यतिल जमेची बाजु.
egarely awaiting for IPL megaevent!! Biggrin

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

आयपीएल या वर्षी तरी भारता बाहेर Sad सर्व मॅचेस बघ्ण्याची संधी फुकट गेली.

मला सचिन आणि जयसूर्याला परत एकदा ओपनिंग करताना बघायचय. मागच्या वर्षी धमाल उडवली होती त्यानी.
--------------
नंदिनी
--------------

मागच्या वर्षी राजस्थान रॉयल्स एक surprize package होते...ती टीम खूपच छान खेळली
या वेळी English Players मुळे अजुनच भर पडली आहे..पण आपला सचिन्-जयसुर्या आणि,
सेहवाग - युवी पण चांगलेच Fom मधे आहेत..
पण चेन्नै सुपर किन्ग्ज माझी fevourate आहे..बघु काय होते ते..

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

सर्व मॅचेस बघ्ण्याची संधी फुकट गेली. >> की सर्व मॅचेस फुकट बघण्याची संधी गेली... Proud

IPL OUT झालं हे पोलिसांच्या दृष्टीने बरचं झालं म्हणायच...

मी यावेळेला दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि मुंबई इंडियन्सवर भरोसा ठेवतेय. Happy मागच्या वेळेला खेळाडूचा लिलाव झाल्यावर हैद्राबाद नंबर वन असेल म्हणून हजार रूपयाची बेट लावली होती. अजून आठवतेय
. Sad Sad
--------------
नंदिनी
--------------

नंदिनी...

हैद्राबाद नंबर वन आलंच की... शेवटून का होईना...
बघ हे कारण देऊन हजार रुपये परत मिळवता येतात काय....
_______
रिंद पोश माल गिंदने द्रायि लो लो...!!!
WELCOME SPRING...!!!

हैद्राबाद नंबर वन आलंच की... शेवटून का होईना... >>>> Rofl good one
सचिन, पोलॉक, जयसुर्या....विषेशतः सचिन आणि पोलॉक यांना एकत्र एकाच टीममध्ये बघुन मला ईतका आनंद होतो की काय सांगु. दोघेही माझे फेवरेट आहेत. पण "मुंबई ईंडीयन्स" ह्या नावापेक्षा "मुंबई वॉरीयर्स" हे नाव कींवा असच काहीस छान नाव आवडल असत मला.

<>
अहो केदार्-जपान, का उगाच इंग्रजी शब्द वापरता? स्पेलिंगचा खून करता की हो तुम्ही! त्यापेक्षा लागल्यास जपानीत लिहा, पुष्कळांना तुमचे अज्ञान दिसणार नाही!

आता निवडणुकीसाठी नि आयपीएल साठी सुरक्षा दले नेमली की सिनेमा नटनट्यांसाठी सुद्धा नेमावी लागतील. म्हणजे सामान्य लोकांवर २६/११ सारखा हल्ला झाला तरी चिंता नाही. भारतातले महत्वाचे लोक सुखरूप राहिले की झाले. बाकीच्यांना कोण विचारतो?

या वर्षी आयपीएल च्या कुठल्या टिम मधे कोण कोण प्लेयर्स आहेत टाका कोणी तरी !
गेल्या वर्षी मला युवि ची टिम आवडली होती.:), धोनी ची टिम पण चांगली होती.
राजस्थान रॉयल्स नी एकदम सही बाजी मारली आपेक्षा नसताना, मजा आली होती पण सगळ्याच मॅचेस पहाताना Happy

इंग्रजीमधून टाकत असल्याबद्दल माफी असावी. पण हे कॉपी पेस्ट केलेले आहे.
हे फायनल प्लेइंग टीम्स नसून "यापैकी" फायनल प्रत्येक टीम निवडेल. यावेळेला एकही पाकिस्तानी खेळाडू नाही. प्रत्येक टीममधे १० विदेशी खेळाडू आहेतच तसेच फायनल्टीममधे ४ च विदेशी खेळाडू असतील.

The squads are as follows:
Royal Challengers, Bangalore:
Overseas players: Jacques Kallis, Mark Boucher, Dale
Steyn, Dillon Du Preez, Cameron White, Nathan Bracken, Ross
Taylor, Kevin Pietersen, Jesse Ryder and Roelof van der Merwe.
Indian players: Rahul Dravid, Anil Kumble, Robin Uthappa,

Praveen Kumar, Virat Kohli, Wasim Jaffer, Manish Pandey,

Srivats Goswami, R Suteesh, Pankaj Singh, Vinay Kumar,

Bhuvanesh Kumar, Karan Sharma, Saurav Bandekar, Tinu Yohannan,

Bharat Chipli, B Akhil, Devraj Patil, J Arun Kumar, KP

Appanna, Sunil Joshi, Gaurav Dhiman, Jitendra Patil, Udit

Patel, A Mithun, S Aravind, Kedar Jadhav, C M Gautam, Raju

Bhatkal, Rajesh Bishnoi, Ishank Jaggi and Rohit Sabharwal.


Chennai Super Kings
:
Overseas players: Muthiah Muralitharan, Matthew Hayden,

Michael Hussey, Albie Morkel, Makhaya Ntini, Jacob Oram,

Stephen Fleming, Thilan Thushara, Andrew Flintoff and George

Bailey.

Indian players: M S Dhoni, Parthiv Patel, Suresh Raina, S

Badrinath, L Balaji, M Vijay, Joginder Sharma, Manpreet Singh

Goni, Sudeep Tyagi, Viraj Kadbe, Shadab Jakati, R Ashwin,

Abhinav Mukund, Anirudha Srikkanth, Vidyut Sivaramakrishnan,

Palani Amarnath, K B Arun Karthik, N Einstein and Suresh

Kumar.
Delhi Daredevils:

Foreign players: A B de Villiers, Daniel Vettori, Owais

Shah, Paul Collingwood, David Warner, Andrew McDonald, Dirk

Nannes, Glenn McGrath, Farveez Maharoof and T Dilshan.
Indian players: Virender Sehwag, Gautam Gambhir, Dinesh

Kartik, Manoj Tiwary, Rajat Bhatia, Mithun Manhas, Avishkar

Salvi, Ashish Nehra, V Yo Mahesh, Pradeep Sangwan, Umesh

Yadav, Yogesh Nagar, Tejashwi Yadav and Amit Mishra.
Deccan Chargers, Hyderabad:

Foreign players: Adam Gilchrist, Herschelle Gibbs, Scott

Styris, Andrew Symonds, Ryan Harris, Fidel Edwards, Dwayne

Smith, Chamara Silva, Chaminda Vaas and Nuwan Zoysa.
Indian players: VVS Laxman, Rohit Sharma, RP Singh,

Pragyan Ojha, Venugopal Rao, D Ravi Teja, T Suman, Arjun

Yadav, D Kalyankrishna, P Vijay Kumar, Manvinder Bisla,

Jaskarandeep Singh, Harmeet Singh, Sarvesh Kumar, Halahar Das,

Syed Mohammed and Shoaib Ahmed.
Mumbai Indians:

Foreign players: Lasith Malinga, Jean Paul Duminy, Graham

Napier, Ryan McLaren, Dilhara Fernando, Sanath Jayasuriya,

Dwayne Bravo, Mohd Ashraful, Kyle Mills and Luke Ronchi

Indian players: Sachin Tendulkar, Zaheer Khan, Harbhajan

Singh, Shikhar Dhawan, Abhishek Nayar, Dhawal Kulkarni, Jude

Singh, Jaydev Shah, Rahil Shaikh, Yogesh Takawale, Pinal Shah,

Ajinkya Rahane, Chetanya Nanda, Rohan Raje and Saurabh Tiwary.
Rajasthan Royals:

Foreign players: Shane Warne, Graeme Smith, Shane

Watson, Dimitri Mascarenhas, Morne Morkel, Robert Quiney,

Tyron Henderson, Shaun Tait, Shane Harwood and Lee Carseldine.
Indian players: Mohd Kaif, Munaf Patel, Yusuf Pathan,

Sidharth Trivedi, Swapnil Asnodkar, Niraj Patel, Mahesh Rawat,

Anup Revandkar, Ravindra Jadeja, Dinesh Salunkhe, Naman Ojha,

Sidharth Chitnis, Paras Dogra, Amit Singh, Ahad Malek, Raphi

Vincent Gomez, Kamran Khan, Ashraf Makda, Paul Valthaty,

Srideep Mangela, Mohd Arif, Gajendra Singh, Atul Sharma,

Pratmesh Salunkhe and Pushkarraj Chavan.
King's XI Punjab:

Foreign players: Brett Lee, James Hopes, Shaun Marsh,

Luke Pomersbach, Simon Katich, Kumar Sangakkara, Mahela

Jayawardene, Burt Cockley, Ravi Bopara and Jerome Taylor.

Indian players: Yuvraj Singh, Irfan Pathan, S

Sreesanth, Ramesh Powar, V R V Singh, Piyush Chawla, Karan

Goel, Uday Kaul, Wilkin Mota, Ajitesh Argal, Tanmay

Srivastava, Sunny Sohal, Ryan Ninan and Yash Gandhi.

झक्की, प्रश्न खेळाडूच्या सुरक्षिततेचा नसून प्रेक्षकाच्या सुरक्षिततेचा आहे. Happy

--------------
नंदिनी
--------------

प्रश्न खेळाडूच्या सुरक्षिततेचा नसून प्रेक्षकाच्या सुरक्षिततेचा आहे.>>
कोण म्हणते असे??
पहा
http://ipl.timesofindia.indiatimes.com/News/News/Shifting_of_IPL_matches...

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

नंदे, स्पर्धा नक्की कुठे ते ठरले का नाही अजुन.. इंग्लंड, साऊथ आफ्रिका की दुबई......
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

मनु. तुमच्या लिंकचा संबंध समजला नाही. जेटली मुख्य करून आयपीएल देशाबाहेर गेल्याबद्दल बोलत आहेत आणी मी लिहिलं होतं ते आयपीएल देशात असताना. खेळाडूची सुरक्षा निकोल्स स्टीन या कंपनीकडे आहे (मागच्या वर्षीपण त्याच्याकडेच होती.)

पण यावर्षी निवडणूका असल्यामुळे आणि
घातपातीची शक्यता असल्यामुळे स्टेडियमम्धे असलेल्या प्रेक्षकाची सुरक्षितता हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. भारत सरकारच्या मते त्याना इतक्या लोकाना सुरक्षा देणे जमणार नाही आणि यावर्षी सुरक्षिततेमधे कसलीही ढिसाळ ठेवणे त्याना परवडणारे नाही. म्हणून आयपीएल फक्त यावर्षीसाठी देशाबाहेर नेली जातीये.

हिम्स, इंग्लंड किंवा साऊथ आफ्रिका. आयपीएलचे अधिकारी सध्या दोन्ही देशाबरोबर चर्चा करत आहेत. उद्यापर्यंत नक्की समजेल. Happy

--------------
नंदिनी
--------------

थोडे अवान्तर, पण महत्वाचे!
>>>> भारत सरकारच्या मते त्याना इतक्या लोकाना सुरक्षा देणे जमणार नाही .....
हे भारत सरकारचे मत की निवडणूकीच्या तोन्डावरील आय-कॉन्ग्रेसचे मत? Proud
हेच जर "अधिकृत सरकारी" मत असेल, अन तशीच वस्तुस्थिती खरच असेल, तर अवघड आहे या देशाचे! Sad
[नशिब, काल नॅनो चे उद्घाटन बघताना मला राहुन राहुन वाटत होते की सरकारने या सोहळ्याची देखिल सुरक्षेच्या कारणास्तव गोची कशी काय केली नाही??? अर्थात केली अस्ती तरी टाटान्नी ती जुमानली नस्ती हेही तितकेच खरे! आयपिएलचे त्रान्गडे तसे नाही ना!]
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

माझ्या मते आय पी एल सौदी अरेबिया येथे न्यावी. म्हणजे काय होईल, की तिथे पैसेहि खूप जास्त मिळतील नि घातपाताची शक्यता नाहीच! किंवा मग चीनमधे. सध्या ते दोनच देश मुसलमानांच्या अतिरेकी हल्ल्यांपासून सुरक्षित आहेत.

मुळात हे आय पी एल वाले काय मूर्ख आहेत का? निवडणुकीच्या वेळी आय पी एल! खरे तर जरा एक महिना पुढे ढकलले असते तरी चालले असते. उन्हाळा वाढला तर सामने डेहेराडून, सिमला, ऊटी अश्या ठिकाणी घ्यावेत किंवा संध्याकाळी सात नंतर बरीचशी शहरे सुसह्य होतात, जसे नाशीक.
असो. काही करा! सगळ्याचा नुसता घोळ घालायचा! नि मग राडा!

LT, त्यातील पक्षीय राजकारण सोडले तर सरकार ने निवडणुकांच्या आसपास एवढी मोठी स्पर्धा भरवू नये असे म्हंटल्यास काय चूक आहे कळले नाही. यातील बरेच सामने एखाद्या ठिकाणी ज्या दिवशी मतदान आहे त्याच्या २-३ दिवस अलिकडे पलिकडे असणार होते. आयपीएल ने नंतर बदललेल्या प्लॅन नुसार कसे आहेत माहीत नाही.

झक्की.. आयपीएल पुढे ढकलायला काहीच हरकत नाही हो. पण मग बाकीचे ठरलेले दौरे आहेत ना प्रत्येक संघांचे त्याचे काय.. तसेच इंग्लंड मध्ये Twenty20 world cup पण आहे जून ५ पासून.. कुठपर्यंत पुढे ढकलणार होते आयपीएल.. त्यापेक्षा बाहेर नेले तर बरे असे वाटले असेल आयोजकांना..

=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

अनुमोदन फारेंड.. आधीच निवडणुकीचा खूप ताण असणार आहे पोलिस आणि इतर सुरक्षा दलांवर.. त्यात IPL सारख्या eventsना सुरक्षा पुरवायची म्हणजे खूपच ताण येईल त्यांच्यावर..
सरकारी निर्णयांवर टीका करणे हे विरोधी पक्षांचे कामच आहे.. उद्या IPL मधे काही झाले तर हेच लोक IPL ला परवानगी का दिली अशी टीका करायला पुढेमागे नाही बघणार...

IPL या वर्षी नाही घेतली तर सगळ्या फ्रँचायजीज् चे खूप नुकसान होइल म्हणून इथे नाहीतर बाहेर असे आयोजकांनी ठरवलेले दिसते...

मूळात BCCI हि एक स्वायत्त संस्था आहे (असे तेच म्हणताहेत), परत त्यात IPL च्या franchises ह्या privately owned आहेत. त्यामूळे त्यांच्या events ला सुरक्षितता देण्याची जबाबदारी (जबरदस्तीने) सरकारवर नसावी. तशी पुरवता आली तर उत्तम पण त्याचा मोबदलाही दिला जावा (गेल्या वेळी पंजाब पोलिस आणी मोहाली assoc मधे ह्यावरून धुमःश्चक्री माजली होती). सरकारी सुरक्षेची पहिली जबाबदारी निवडणूका असली पाहिजे.

सरकारी सुरक्षेची पहिली जबाबदारी निवडणूका असली पाहिजे.
--- त्याच प्रमाणे जनतेची अहोरात्र निस्वार्थी बुद्धीने सेवा बजावणार्‍या आजी, माजी, होतकरु पुढारी नेत्यांच्या कोटीमोल प्राणांची. त्यांच्यासाठी झेड+++ पुरवण्यात कुठलिही कमतरता पडणार नाही.

असामी, आयपी एल ने ती तयारी दाखवली होती. पण जर कोठे हल्ला वगैरे झाला तर पुढची जबाबदारी आपोआपच सरकार वर येते, म्हणून बहुधा विरोध होता.
आणि मुळात निवडणुकीच्या काळात एखाद्या ठिकाणी ४०-५० हजार लोक जमणार असतील केवळ एखादी संस्था स्वतःची सुरक्षा देतेय म्हणून सरकार ला त्यापासून लांब राहता येणार नाही.

यंदाची आयपीएल दक्षिण आफ्रिकेत होणार...१८ एप्रिल ते २४ मे..उद्घाटन सोहोळा केप टाऊनला..
जोहान्सबर्ग, दरबान, सेंच्युरियन, पोर्ट एलिझाबेथ, इस्ट लंडन आणि केप टाऊन या सहा शहरांमध्ये स्पर्धेतील सामने...

लिंक >>> http://www.loksatta.com/daily/20090325/mp04.htm

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

आयपीएल ने नंतर बदललेल्या प्लॅन नुसार कसे आहेत माहीत नाही.
>>> बदललेल्या प्लानसुसार सर्व मॅचेस निवडणूकीच्या तारखेनंतर किंवा आधी ठेवल्या होत्या. तसेच १६ मेला कुठेही मॅच असणार नव्हती. तरीही चिदंबरम यानी ते शेड्युल नाकारले.
आयपीएल साऊथ आफिकेमधे होणार!!! Sad
--------------
नंदिनी
--------------

म्हणजे नंदू तू आता दक्षिण अफ्रिकेला जाणार का आयपीएल कव्हर करायला..
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

बहुतेक नाही!!! Sad
कॉस्ट कटिंग.. फक्त सीनीअर लोके जातील. आम्ही इथे बसून कारकूनी करू (आणि मायबोलीवर टीपी करू)

--------------
नंदिनी
--------------

<<पण मग बाकीचे ठरलेले दौरे आहेत ना प्रत्येक संघांचे >>
पण मग सांगितले आहे कुणी एव्हढे धोके पत्करून एव्हढे सामने ठेवायला?! केवळ पैशासाठीच ना! हावरट लेकाचे!! नि परत यांना पैसा मिळावा म्हणून करदात्यांच्या पैशावर भार! नि ते बिचारे कुणी संरक्षक पोलीस अहोरात्र काम करतात त्यांना कुणि बोनस देणार आहेत का? निदान प्रिति झिंटा येऊन मिठी तरी मारेल का?
दुसर्‍याच्या जीवावर स्वतःची चैन करणारे माजलेले ढोंगी लोक! नाहीतरी भारतात जरा क्रिकेट कमी झाले तर बरेच. लोक जरा इतर उयोग करतील, जसे स्वच्छता. जो तो फक्त स्वार्थी विचार करतो.

>>>> मुळात निवडणुकीच्या काळात एखाद्या ठिकाणी ४०-५० हजार लोक जमणार असतील
फारेण्ड, स्पर्धेचे निमित्त वगैरे बाजुला ठेवू, साध पुण्या मुम्बईच्या लोकल ट्रेनमधुन किती हजार की लाख लोक प्रवास करतात ते बघितल ना, तर एखाद्या स्टेडियमवरील जमलेल्या लोकान्च्या सुरक्षिततेबाबत, एखाद्या नव्हे तर निवडक कॉन्ग्रेसची सत्ता असलेली राज्ये सुरक्षा देण्यास असमर्थता व्यक्त करतात तेव्हा त्याचे आश्चर्य अशासाठी वाटते की स्पर्धा सोडून, अन्य वेळेस आम्ही जनता जिथे जिथे एकत्र येतो, ते आमच्या सुरेक्षेसन्दर्भाने तसे "वार्‍यावरच" सोडलेले अस्तो, हेच सिद्ध होत नाही का?
दुसरी बाब गम्भिर की, या देशाची लोकसन्ख्येप्रमाणे किती सुरक्षाबले हवीत? अन तशी ती आहेत का? नसतील तर का नाहीत? याला सरकारी धोरण तर कारण नाही ना? खैरलान्जी च्या वेळेस झालेल्या "भावनिक सन्तापाच्या नक्षली" उद्रेकामुळे आख्खा महाराश्ट्र दोन दिवस ठप्प होता हा नजिकचा इतिहास आहे! अशा बाबी अनेक, मग का नाही सुरक्षाबले वाढवित? की बासस्टच्या चीन युद्धानन्तर जशी जाग आली सन्याबाबत, तसे काही घडल्यानन्तरच अन्तर्गत सुरक्षेबाबत सरकार पावले उचलणार? जर स्पर्धान्ना सुरक्षा देता येत नाही, तर लगेच पुढील वर्शातील राष्ट्रकुल स्पर्धा कोणत्या जादुच्या कान्डिद्वारेच्या सुरक्षाव्यवस्थेवर घेणार? काल तर कलमाडी म्हणत होते की ऑलिम्पिक देखिल भरवणार म्हणे! आयला, साध्या आयपीएल च्या पन्नास साठ हजार क्षमतेच्या गर्दीसाठि सुरक्षा नाही पुरवता येत, अन म्हणे ऑलिम्ब्पिक घेणार....... वा रे वा!
मला यात प्रचण्ड विरोधाभास दिसतो! म्हणुन मी ती पोस्ट तशी टाकली!
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

निदान प्रिति झिंटा येऊन मिठी तरी मारेल का? झक्की Lol

Pages