आयपीएल २००९

Submitted by नंदिनी on 16 March, 2009 - 01:49

आयपीएल परत सुरू होतय. यंदा निवडणूका आणि अतिरेकी हल्ले यात आयपीएक गर्तेत आहे असं वाटतय. पण मागच्या वर्षीसारखे क्रिकेट याहीवेळेला बघायला मिळेल ही अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा अख्खा दिवस तो ब्लॉग वाचण्यात गेला.
मॅच जबरदस्त झाली. माझे पाचशे रूपये गेले Sad (करशील परत बेटिंग???)

असो. आज द्रविड विरूद्ध युवराज. बहुतेक मोहाली जिंकेल. Happy
--------------
नंदिनी
--------------

केदार, चिअर लिडर्सचे फोटो कुठे बघायला मिळतील??? Wink Biggrin

उत्थप्पा चा इरफान ने वडा केला आणि झेलबाद केले. पण बाकीचे दोघे चांगले खेळत आहेत. तरी वाटते... आज बेंगलुरु च्ची टीम ला परत हारणार.

मागच्या वर्षी मुंबईच्या टीमने चिअर लिडर्स म्हणु शामक दावर चा डान्स ग्रुप आणि लेझिम पथक आणले होते. ह्या सिझनला पण तसेच लेझिम पथक आहे का?

१६८ म्हणजे तशी बरी total आहे......
चांगल्या बोलिंग ने जिंकता सुद्धा येइल.....
कॅलिस ला अखेर कळाले कसे खेळायचे ते.......:P बिचारा गोंधळून गेल्यासारखाच खेळायचा....आजचा खेळ मात्र सुंदर होता.....

मोहालि कोण किंवा काय?
बंगलोर हरले. किंग्ज ११ पंजाब जिंकले. रवी बोपारा ८४! कालिस ४-०-५१-१

नंदिनी, पावसात एक तत्पुरता तंबू उभारून चीअरलीडर्स चा शो ठेवा ना! शिवाय जास्तीचे पैसे लावून त्यांचीच चढाओढ ठेवा.

नि जरा investigative reporting करून IPL चे किती पैसे शरद पवारांच्या खिशात अथवा त्यांच्या पक्षाला मिळाले ते पण शोधून काढा!! धमाल येईल. पण स्वतःला सांभाळा!

केदार, चिअर लिडर्सचे फोटो कुठे बघायला मिळतील >> अरे मला काय माहीती बॉ. हा पण पोरी पाहायच्या असतील तर ये इकडे. मिळून बघू. व्हर्चूवल वल्ड मध्ये कशाला राहतोस. Proud

महागुरु - काल एकदम फॉर्मात. Happy

काही म्हणा- तिकडे सा अ मध्ये आयपीएल ची एवढी मजा येत नाही, ज्वरच चढला नाही अजुन.

संपली मॅच Sad
शक्य होते त्याला अवघड करुन ठेवले

साडे सात मिनिटाचे मध्यंतर भोवले! चांगले खेळणारे तेंडूलकर नि दुमिनी बाद झाले नि नंतर नुसती हजेरी.

आज पण बेंगलोर चे काही खरे दिसत नाही!
बाय द वे, द्रविड का खेळत नाहिये आज?

बंगलोर हरले! दिलशान ६७.

कॅप्टन बदलुन झाला, प्लेयर बदलुन झाले, कोच पण बदलुन झाला तरी बेंगलोरच्या टीमचे नशीब काही उघडत नाहिये!
बहुतेक आता विजय मल्ल्यालाच बदलुन टाका Happy

राजस्थान रॉयल्स गडगडले
४७/६ इन १० ओव्हर्स!

पंजाब १३९/६. संगक्कारा ६०, ईर्फान पठाण ३९. राजस्थान हरले! ११२/७, जडेजा नि वार्न यांची ६० धावांची भागीदारी. जडेजा ३७, वार्न ३४ नाबाद.
अब्दुल्ला ४-०-२१-३.
बेगाने शादीमे अब्दुल्ला दिवाना!

साडे सात मिनिटाचे मध्यंतर भोवले! चांगले खेळणारे तेंडूलकर नि दुमिनी बाद झाले नि नंतर नुसती हजेरी>> नाचता येइना अंगण वाकडे.

>कॅप्टन बदलुन झाला, प्लेयर बदलुन झाले, कोच पण बदलुन झाला तरी बेंगलोरच्या टीमचे नशीब काही उघडत नाहिये!
ते काय म्हणतात ते.. बाटलीत नाही तर गग्लासात कुठून येणार...
अर पन तुमी चियर लिडर चे खेळ सोडून काय येड्यावानी क्रिकेट खेळ बघता..? उसळी मारणारे चेंडू कसे टा़कायचे शिका म्हणाव थोड त्यांच्याकडून.. Proud

अरे त्या kkr team मधे जाम झोल चाललाय म्हणे. खरे आहे का ते? काहीतरी उठाव वगैरे होणार आहे म्हणे? Happy
कुठे गेली नंदिनी ?
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

योग, मीपण "नजर" ठेवूनच आहे रे!!

मला कुठ्ल्याही टीममधे काय चालू आहे ते माहित नाही!! तरीही आकाश चोप्रा आणि बांगरला केकेआरने परत पाठवायचा निर्णय घेतलाय. गंमत म्हणजे फायनल स्क्वाडमधे सर्वात जास्त खेळाडू केकेआरचेच होते. आधीच वाट लागलेल्या टीमची बुकानन अजून वाट लावतोय Proud फेक प्लेयरची संकल्पना कुणाची का असेना..ब्लॉग मात्र दिवसेंदिवस मजेदार होत चाललाय. Happy

--------------
नंदिनी
--------------

बरं आहे. शाहरूख च्या डोक्यात आता तरी प्रकाश पडेल जिथे आपला विषय नाही तिथे बोलू नये.
मला संशय येतोय की मुद्दामून ipl2 फेमस करायला (निदान त्या निमित्ताने तरी trp वाढेल) हे पिल्लू ipl management ने सोडलं असावं. Wink
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

नाही. हे पिल्लू आयपीएल २ चे नाहिये हे मी खात्रीने सांगू शकते Happy ललित मोदीचा ब्लॉग हे आयपीएलचे पिल्लू आहे. (iplt20.com वर कुठेतरी तो ब्लॉग आहे).

हा प्लेयर खरोखर टीममधे नसावा कारण त्याचे बरेचसे संदर्भ चुकतायत किंवा तो तेच लिहितोय जे मिडीयामधे आलेलं आहे.

बाय द वे, आज केकेआर विरूद्ध मुंबई. Happy आणि हैद्राबाद विरूद्ध चेन्नई
--------------
नंदिनी
--------------

नीदान आज तरी मुंबई जींकली पाहीजे. त्या दिवशीसारखी पुरती नीराशा केली नाही म्हणजे झाल. १० मिनीटांचा कसला तो डोंबलाचा स्ट्रटीजीक ब्रेक. आज SRKच्या टीमला पुरता धुवुन काढला पाहीजे. तो SRK जरा जास्तच स्वतःला शहाणा समजतो.

तो SRK जरा जास्तच स्वतःला शहाणा समजतो.
>> जरा????? दीडशहाणा समजतो स्वतःला Proud

--------------
नंदिनी
--------------

तो SRK जरा जास्तच स्वतःला शहाणा समजतो.
>>>

मागच्या आयपीएल मधे टीम चा परफॉरमंस कसा का असेना, आर्थिक फायदा त्यालाच सर्वाधिक झालाय... समजणारंच तो स्वतःला शहाणा...
_______
...मदहोश किये जाय!!!

थोडक्यात काय kkr ही एक अतीशहाण्यांची टीम आहे: शाहरुख, दादा, भुकानान, आगरकर, मॅकुल्लम. आज मुंबई आणि चेन्नई वर बेट लावलीये.. Happy महागुरू कुठे गेले? दादा वर बेट लावताय काय? Happy
सचिन पेक्षाही मला मॅथ्यू हेडन सर्वार्थाने भारी वाटतो. विव रिचर्ड नंतर अशी "मगरूर" बॅट कुणाची पाहिली नाही. या पिकल्या पानाचा देठ हिरवा काय पोपटी-पिवळा वगैरे आहे Happy
आयपिल फॉर्मॅट मधे मला हे x-11 बघायला आवडलं असतं:
रिचर्ड, बोथम, संदीप पाटील, लॉईड, गूच, सईद अन्वर, अरवींदा डीसील्वा, कपिल पाजी, बॉर्डर, हॅडली, वॉल्श.
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

दादा वर बेट फक्त त्या दिवशी लावलेली होती. परंपरेप्रमाणे दादा फक्त एका मॅचमध्ये ठीक म्हणत येईल असे खेळतो आणि बाकी सामन्यात सगळ्यांना झोपवतो. दादा बद्दल मला पूर्ण विश्वास आहे. Lol
फेक प्लेअर च्या धसक्याने शाहरुख ने लॅपटॉप, इंटरनेट वर बंदी घातली आहे म्हणे.
म.टा. वृत्तानुसार शाहरुख भारतात परत येणार आहे म्हणे. निमित्त मतदानाचे असले तरी नक्कीच काहीतरी जळत असावे.

डेक्कन नुसतेच चार्ज झाले नाहीत तर एकदम पेटलेत. मुरली आणि रैना सोडले तर चेन्नई च्या सगळ्या गोलंदाजाची पिसे काढताहेत.

हो-नाही करत एकदाचे डेक्कन चार्जर्स जिंकले. गिलीची खेळी पाहता मला वाटले होते १८ व्या षटकातच सामना संपेल.
आता मुंबई चा संघ कोलत्याच्या शाहरुख ची कशी वाट लावतोय ते पहायचे आहे.

डेक्कन चार्जर्स जिंकले. १६९/४. गिब्स नाबाद ६९. जोगिंदर शर्माच्या एका षटकात १४ तर बालाजी च्या साडेतीन षटकात ४१.

<<हे पिल्लू आयपीएल २ चे नाहिये हे मी खात्रीने सांगू शकते >>
कारण हे पिल्लू कुणा कं कडे IPL ची प्रसिद्धी करण्याचे काम आहे, त्यातल्याच एकाने (की एकीने) सोडले आहे. Light 1 Happy
काहो नंदिनी, त्या व्हिडिओज मधे मधून मधून शाहरुख खान आणि कुणि मुली दाखवतात, त्यातल्याच तुम्ही एक का? (म्हणजे चीअरलीडर्स नाही, प्रेक्षकात वसलेल्या)

हा सनथ जयसुर्या LTTE राग मुंबई इंडियन्स वर का काढत आहे? २५ च्या स्ट्राईक रेट ने खेळत आहे. 'सनथ
ऐवजी 'संथ' जयसुर्या असे म्हणायला हवे.

जयसुर्या महाराज एकदम सुटलेच .. 11 balls 22 runs Happy
गांगुलीच्या एका ओव्हर मधे १६ रन्स ...धन्यवाद दादा !

सचिन- जयसुर्या भारी खेळताय्त !!

Pages