आयपीएल २००९

Submitted by नंदिनी on 16 March, 2009 - 01:49

आयपीएल परत सुरू होतय. यंदा निवडणूका आणि अतिरेकी हल्ले यात आयपीएक गर्तेत आहे असं वाटतय. पण मागच्या वर्षीसारखे क्रिकेट याहीवेळेला बघायला मिळेल ही अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई जिंकणारच आणी ते ही द्णदणीत !!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

अरे तो मोदी इकते पैसे वाटतोय प्रत्त्येक सामन्यामधे आणि नंतर. जरा थोडे पैसे हवामान तपासून स्थळ काळ ठरविण्यात घातले असते तर ही अशी पाऊस फजिती झाली नसती... सगळ्या मेहेनतीवर शब्दशः पाणी पडतय ..
(काय त्या चियर गर्ल्स, तीन तिघाडा काम बिघाडा चा मामला आहे सगळा. मला वाटतं सचिन, द्रविड, लकी, दादा, पहिल्यांदाच निर्धास्त होवून खेळत असतील, कारण भारतात जितकं हार्-जीत ला महत्व देतात प्रेक्षक तितकं इथे कुणी विचारतही नाहीये.. त्यामुळे बेटे करार केलाय तर खेळतायत.)
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

अरे तो मोदी इकते पैसे वाटतोय प्रत्त्येक सामन्यामधे आणि नंतर. जरा थोडे पैसे हवामान तपासून स्थळ काळ ठरविण्यात घातले असते तर ही अशी पाऊस फजिती झाली नसती... >>> योग, दुसरे कुठले स्थळ सुचवले असतेस्स तू??
शेड्युल बदलता येत नव्हतं कारण एफटीपी फुल आहे. आणि भारतात आयपीएल होउच द्यायची नाही असा सरकारचा निर्णय.

आणि हो, आयपीएलमधे सचिन द्रविड आणि दादा सोडल्यास अजून पण खेळाडू आहेत आणि ते पण बिचारे खेळतायत (दिवे घ्यालच!!)
--------------
नंदिनी
--------------

चांगलं इंग्लंडात आणायचं आयपीएल...
सध्या तर इथे पाऊस पण नाहिये...
याच कारणासाठी डावललं होतं इंग्लंडला आणि साअ ला गेले...
भिजा लेको...
_______
आला रे...!!!

>योग, दुसरे कुठले स्थळ सुचवले असतेस्स तू??
अर्थातच दुबई... Happy
seriously, that would have been better.
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

<<आयपीएलमधे सचिन द्रविड आणि दादा सोडल्यास अजून पण खेळाडू आहेत >>
अनेक भारतीय तरुण खेळतात, त्यांना चमकायची चांगलीच संधि आहे. शिवाय चढाओढीने खेळावे लागत असल्याने प्रत्येकाला आपला खेळ जास्तीत जास्त सुधारावा लागेल. शिवाय पूर्वी भारतीय संघात असलेले पण आता नसलेले असेहि पार्थिव पटेलसारखे लोक आहेत. त्यांना खेळ सुधारून परत संघात यायला संधि मिळेल.मग जो भारतीय संघ तयार होईल, तो पूर्वीच्या ऑस्ट्रेलियासारखा अनेक वर्षे जगावर राज्य करील, जर खेळाडू निवडण्यात राजकारण आणले नाही तर!

<<भारतात आयपीएल होउच द्यायची नाही असा सरकारचा निर्णय. >>
पण मी सुचवले तसे निवडणुकीचा तमाशा संपल्यावर उरलेले अर्धे सामने (निदान २० तरी) भारतात खेळायला काय अवघड आहे?

नाहीतर चक्क अमेरिकेत आणा. इथली सुरक्षा व्यवस्था जाम टाईट. कुणाची हिंमत नाही चावटपणा करण्याची! नि पैसे पण मिळतील.

गिल्ख्रिस्ट पेटला आहे! ३५ चेंडूत ५८. पहिल्या दोन षटकात २६! लक्ष्मण मात्र ५ वर बाद!

अहो थोडा पाउसपाण्याचा त्रास होणारच. मुंबईची मॅच वाहून गेल्याने थोडे वाईट वाटले.....
<<अनेक भारतीय तरुण खेळतात, त्यांना चमकायची चांगलीच संधि आहे>>
बरोबर. त्यामुळे अनेक चांगले खेळाडू तयार होणार......
<<नाहीतर चक्क अमेरिकेत आणा>>
नको. इथल्या लोकांना आधी शिकवा काय असते ते. इथे अजून क्रिकेट म्हणजे ५ दिवसाचा खेळ अशी समजूत आहे

प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरूख यांच्या टीम ढेपाळल्यासारख्या वाटत आहेत. जर या तिघांनी आपल्या संघाच्या सामन्यात चीअर लीडर बनून नृत्य केले तर जिंकतील कदाचित.

हेडन आणि रैना हे दोघेच सुपरकिंग्स ह्या नावाला जागुन खेळले. बाकी सगळे फक्त पेपरकिंग्स.
डी'विलियर्स च्या डेअरीगबाज खेळीने दिल्ली जिंकणार

माढेकरांना अनुमोदन. मी तर म्हणतो, पावसामुळे क्रिकेट खेळता येत नसेल तर पटकन एखादा तात्पुरता तंबू उभारून चीअर्लीडर्सची चढाओढ ठेवावी. खरे तर आय पी एल बरोबर चिअरलीडर्स चीहि अशीच एक साखळी स्पर्धा ठेवावी. गोर्‍या मुली इतक्या स्वस्त असतात, तरी त्या बघायला भारतातले लोक धावतील, नि पैसे देतील. म्हणजे जास्त फायदा होईल. कारण इतके पैसे देऊन हे खेळाडू चांगले खेळतीलच असे नाही. पण मुली मात्र नाचतील. शेवटी काय, पैसेच पाहिजे ना?

काहो नंदिनी, तुम्ही जरा investigative reporting करून या आय पी एल चे किती पैसे शरद पवारांच्या पक्षाला किंवा त्यांना स्वतःला मिळाले हे शोधून काढणार का? पण अगदी जपून हं, त्या कुठल्या सिनेमात 'सत्कार' करतात तसे काही होऊ देऊ नका.

राज ठाकरेंनी ह्या खेळाडुंचा मतदानाचा हक्क काढुन घेतला म्हणुन पवारांवर तोंडसुख घेतले होते.
ह्या खेळाडुंना तरी मतदानाबद्दल किती आस्था आहे ह्य उत्सुकतेपोटी गुगल महाराजांची मदत घेतली.
ह्या खेळाडुंपैकी कोणाचे मत कुठे वाचायला मिळाले नाही. पण बरेच माजी खेळाडुंनी (जसे अंशुमन गायकवाड वगैरे) "४-५ लोकांचे मतदान नाही झाले तर बिघडले कुठे?" असा सुर लावला. एका लेखामधे लिहले आहे की वरिष्ठ खेळाडुंनी मागणी केली असती तर बीसीसीआय ने हा खर्च उचलला असता आणि खेळाडुंना मतदान करायला मिळाले असते.
बहुतेक नोटांपुढे मतदानाचा कागद कुणालाच दिसत नाही. शेवटी द. आफ्रिकेत चाललेले आय.पी. एल. काय आणि भारतात चाललेले आयपीएल (ईंडीयन पॉलिटिकल लिग) काय, दोन्ही पैशासाठीच चालले आहे हेच खरे.

महागुरूंचे भविष्य खरे ठरले. पण तरी हा पहिलाच सामना बरेच दिवसांनी पूर्ण झाला. नक्कीच बघण्याजोगा झाला असणार. दिल्ली नक्कीच चांगले खेळले.

कुणि, उगाचच्या उगाच, लिहून ठेवेल का की कुणा खेळाडूला किती पैसे दिले नि त्यांनी काय 'पराक्रम' केले?

का हो महागुरू, आपल्याकडे अशी काही पद्धत नाही की मतदानाच्या दिवशी बाहेरगावी असल्यास तिथून पोस्टाने वगैरे मत द्यायचे? परदेशातील वकिलातीतील भारतीय लोक काय करतात? एव्हढे लाखो भारतीय लोक जगभर कामानिमित्त पसरलेले, त्यांनी कसे मत द्यावे?

नि मतदानाचा हक्क काढून घेणारे शरद पवार कोण? काही कायदे वगैरे आहेत की नाही? घटनेत असे नक्कीच असेल की काय कारणामुळे एखाद्याचा असा मूलभूत हक्क हिरावून घेतला जावा? जर तुरुंगातले लोक निवडून येतात, लोकसभेत मत देतात, तर यांनीच काय पाप केलय्?

इलेक्शन ड्युटीवर असणारे लोक, सीमेवर तैनात असलेले लष्करदलातील लोक आणि परदेशी वकिलातीतील कर्मचारी यांनाच पोष्टाने मतदानाचा हक्क आहे.

अहो पण.. पण.. पोटापाण्याच्या उद्योगासाठी बाहेरगावी गेल्यास लोकशाहीतील मूलभूत हक्कच कसा नाहीसा होतो? असो.

आणखी एक सामना पावसाच्या पायी धोक्यात!!

चेन्नई vs दिल्ली सॉलिड मॅच.........AB ने कमाल केली.......पण चेन्नई ला अजून कमी लेखू नका......
ते जोरात उसळतील परत.....
मला वाटते आपण चर्चा IPL आणि games पुरती मर्यादित ठेवावी. काय म्हणता लोकहो?????

मग आम्ही काय अंताक्षरी बद्दल चर्चा करत होतो का? आयपीएल आणि त्यात सहभागी झालेले खेळाडु यांच्या बद्दलच लिहले होते.

राजस्थान ने अगोदरच पांढरे निशाण फडकवले असताना ही गांगुली ला बॉलिंग साठी पाठवले. अर्थात राजस्थानच्या नवख्या खेळाडुंनी त्याला 7.67 रेट ने बडडुन त्याची गोलंदाजीतील जागा दाखवुन दिली.
कोलकत्ता सहज विजय मिळणार असे दिसतय.

मला नाही वाटत कोलकत्ता जिंकेल .. १२० रन्स पण भरपूर झाले त्यान्च्यासाठी. गेल सोडून अजुन कोणी चांगल्या फॉर्म मधे नाही ... मला तर वाटते की last position साठी ते प्रबळ दावेदार आहेत Happy

आणी १५० केलेच बघा ...

वरती वाचा......लोकशाहीच्या मूलभूत हक्कापर्यंत आली होती चर्चा.......मतदानाचे हक्कांबद्दल चर्चा करायची असेल तर कमीत कमी नाव तरी बदला धाग्याचे.......

१५० आव्हानात्मक आहेत कोलकाता साठी.....गेल आणि मॅकलम सोडून कोणीच नीट फॉर्म मधे नाही

आयपीएल बद्दल संबंधित काहीही असेल ते इथेच लिहु. मग ते मतदानाचा हक्क असो कि चिअरलिडर्स चा वाद, ललित मोदींचे राजकारण असो. प्रत्येक गोष्टी साठी वेगळा बीबी काढण्या येवढा वेळ नाही, तुम्हाला असेल तर खुशाल काढत बसा आणि अ‍ॅडमिन ला सांगुन हे तिकडे न्या.

मला इथे IPL बद्दलच बोलायचे आहे.....प्रत्येक गोष्टीसाठी बीबी काढायला वेळ नाही......पण चर्चा वाटेल तिथे भरकटत न्यायला वेळ आहे वाटते....

गेल ला जास्त संधी देणे महागात पडेल......वॉर्न ने स्वतः काहीतरी केले पाहिजे

निखिल थोडेफार चालते रे, त्यावर उपाय म्हणजे धागा पकडून मूळ चर्चे वर आणणे.

अगदी बरोबर.....मी पण फक्त मूळ चर्चेकडेच आणण्याचा प्रयत्न केला.......

.पण चर्चा वाटेल तिथे भरकटत न्यायला वेळ आहे वाटते.... >>भरकटली आहे असे वाटत असेल तर - हो आहे , त्या साठी वेळ आहे... तुमचे काय म्हणणे?
"असो" असे लिहुन झक्की यांनीच ह्या विषय बंद केला आणि सामन्यांबद्दल लिहायला चालु केले होते. तुम्ही उगाच फाटे फोडायला चालु केलेत

कोलकत्याचे खेळाडु अजुनही जिंकु शकतील असे उगिचच (दादाच्या भरवश्यावर) वाटते.

Happy गेल गेला ... आता कोण सावरणार कोलकत्ता ला?

आता कोण सावरणार कोलकत्ता ला? >> आमार सोनार दादा

आमार सोनार दादा >> captaincy गेल्यापासून दादा रूसले आहेत

फाटे फोडायला सुरुवात नाही केली......तुमचे फाटे फक्त थांबवायचा प्रयत्न केला......अजूनही सामन्यांबद्दल बोलावेसे तुम्हाला वाटत नाही त्यामुळे झक्कींनी जरी विषय संपवला असला, तरी आपण थांबला असतात असे नाही........
असो. Happy
अखेर गेल गेला......राजस्थानला अजून कष्ट करावे लागणार असे दिसते....

Pages