आयपीएल २००९

Submitted by नंदिनी on 16 March, 2009 - 01:49

आयपीएल परत सुरू होतय. यंदा निवडणूका आणि अतिरेकी हल्ले यात आयपीएक गर्तेत आहे असं वाटतय. पण मागच्या वर्षीसारखे क्रिकेट याहीवेळेला बघायला मिळेल ही अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> एकाने विचारलः क्रिकेट मधे लाँग लेग कुठे असतं? तर बयेने चक्क शिल्पा शेट्टीकडे बोट दाखवल

ते ऐकल्यावर दुसरी उत्तेजनसुंदरी (किंवा प्रोत्साहनसुंदरी म्हणा हवं तर) म्हणाली,

"वेडी ग S S S वेडी. ते लॉन्ग लेग नाही काही वेडाबाई. अग खुळे, त्याला सिली पॉईन्ट म्हणतात."

बेंगलोर जिंकल एकदाच!
सोप्पी मॅच अवघड करुन ठेवली आणि मग मरत मरत जिंकले!
असो पीटरसनच फेअरवेल चांगल झाल Happy ..... आता कोण कॅप्टन म्हणे?.... कुंबळेला संधी दिली पाहिजेल!

मुंबई १२/२ -- तेंडुलकर आणि जयसुर्या आउट Sad

हो का?
अरेरे... आमच्या इकडे नेमकी लाइट गेलिये Sad

-

मुंबई १३/३ (५ ओव्हर्स) ....धवन आउट
१२० धावांचे सोपे वाटणारे आव्हान मुंबई संघाने अवघड करुन ठेवले

१८ बॉल्स २६ रन्स ..थोडे अवघड आहे पण अशक्य नाही.

अमेरिकन मरिन्स चे एक प्रसिद्ध वाक्य आहे - जे कठीण आहे ते लगेच करू, जे अशक्य आहे ते करायला थोडा वेळ लागेल.

तेंव्हा जे सोपे आहे ते अवघड करू नि जे अवघड आहे ते अशक्य करू.

अमेरिकन मरिन्स क्रिकेट खेळतात का? मंदीत काय बी होतय बघा

कोलकत्ताचा अजुन एक पराभव....
गांगुली परत एकदा फ्लॉप!
कोलकत्ताला चान्स होता जिंकायचा पण मॅकल्लमने घाण केली... फुकट रनआउट केल हॉजला!

कुंबळे बेंगलोरचा नवा कॅप्टन Happy

सहा चेंडूत सहा षट्कार मारणारा नि लागोपाठ तीन चेंडूत तीन गडी बाद करणारा खेळाडू कोण? (मला उत्तर माहित आहे)

झक्की,
किती हो अवघड प्रश्न विचारता तुम्ही!

त्या टीव्हीवरच्या कॉन्टेस्ट बघता का काय?

हुर्रे!... बंगलोर जिंकले Happy
कुंबळे रॉक्स!

द. आफ्रिकेतले सामने भारतातल्या मागच्या वर्षीच्या सामन्यांपेक्षा चांगले व चुरशीचे होत आहेत. या खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना चांगली संधी मिळत आहे. नुसतीच तडातडी बघण्यापेक्षा असे सामने चांगले. आतापर्यंत झालेले बहुतेक सगळे सामने अल्प धावसंख्येचे होते. द. आफ्रिकेतल्या खेळपट्ट्यांवर धावसंख्येचा पाठलाग करणे खूपच अवघड आहे. पहिली फलंदाजी करून १४० धावा केल्या की विजयाची शक्यता ९० टक्के आहे. आतापर्यंत फक्त दोनदाच १४० पेक्षा अधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता आलेला आहे. एकदा राजस्थानने १४३ धावा पाठलाग करून जिंकल्या (याचे सर्व श्रेय युसुफ पठाणच्या ३० चेंडूतल्या नाबाद ६२ धावांना आहे) व दिल्लीने डेक्कनविरुद्ध १४८ धावांचा यशस्वी पाठलाग केला. इतर सर्व संघ १४० पेक्षा अधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करू शकलेले नाहीत.

अजून एक गोष्ट. व्होडाफोनच्या कार्टूनच्या जाहिराती मस्त आहेत. ते रोज एक नवीन जाहिरात दाखवितात.

काल पंजाबला बहुतेक प्रेटी झिंटाने हरविले!
ती पंजाब जिंकले तर पार्टी देणार होती आणि उत्कृष्ट खेळणार्‍या संघातील खेळाडू समवेत नृत्य करणार होती!

युवराज संधी साधणार असे वाटल्याने बहुदा त्याच्या सहकार्‍यांनी हाराकिरी केली! Proud

"आमच्याविरूद्ध हरलात तर एक आठवडा फुकट मद्य" अशी मल्ल्याने पंजाबला ऑफर दिली असेल. म्हणून तर काल पंजाबवाले हरले. हरल्यामुळे झिंटा बरोबर नृत्य चुकले असेल पण पार्टी तर नाही ना चुकली.

झिंटा, शिल्पा व शमिता शेट्टी, शाहरूख व जुही चावला, नीता आणि टीना यांनी आपापला तोटा कमी करण्यासाठी प्रोत्साहन नृत्यात भाग घ्यायला हरकत नाही. मल्ल्याला सुद्धा आपला तोटा कमी करण्यासाठी प्रत्येक सामन्याच्या वेळी मैदानाबाहेर किंगफिशर बार्लीजल व इतर द्रव्यांचा स्टॉल टाकता येईल.

माझ्या आवडत्या संघात एक सिंह आहे.आणि तो खेळलातर त्याला सर्व जग घाबरत
बोलेतो अपुन्का सचिन दा..
आणि तो नाही खेळला तर रविना घाबरते.

हा बॉलिवूड व क्रिकेट-धंद्यांचा संगम बघितला, की ते जर एकत्र झाले तर त्यांच्या जवळील पैशाने ते सगळे जग चक्क विकत घेऊ शकतील! Happy

पण मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. हे सर्व नवीन खेळाडू फलंदाजीमधे घाईघाईने खेळून, धोकादायक फटके मारून, त्यांचा खेळ सुधारतील की खराब करतील.

बरेचसे फलंदाज नको त्या चेंडूला बॅट लावून, झेल देऊन, किंवा चुकीच्या रीतीने फटका मारताना बाद झाले आहेत. गोलंदाज काही फटके मारावेत म्हणून गोलंदाजी करत नसतात, कित्येक चेंडू सोडून द्यावे, किंवा नुसतेच तटवावे या सारखे असतात.

म्हणजे सामन्यांखेरीज त्यांना इतरत्र सराव करावा लागेल. माझी आशा आहे की, त्यांचे प्रशिक्षक त्यांच्या बाद होण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून त्यावर उपाय काय हे त्यांना शिकवतील, नि ते शिकतील. तितके लक्ष घालून शिकण्याची त्यांची तयारी आहे का?

कोलकत्ता परत एकदा हरले!

आता सही मॅच सुरु होतेय... मुंबै वि बंगलोर!

द्रवीड इज बॅक!

वॉव!.... मलिंगाला १७ रन्स चोपल्या एका ओव्हर मध्ये कॅलिस आणि उथाप्पाने Happy
कमॉन बंगलोर Happy

तथाकथित टेस्ट टीम जिंकली.....
मुंबईचा पार कचरा केला कुंबळेच्या टीमने Happy

आयपीएलची चुरस वाढतच चाललीय.... कोलकत्ता सोडुन बाकी सगळ्यांना संधी आहे!

कालच्या सामन्यात सचिनेचे डावपेच समजतच नव्हते. अभिषेक नायरसारख्या सामान्य गोलंदाजाला त्याने पूर्ण ४ षटके दिली. नायरने प्रत्येक षटकात वाईड चेंडू टाकले. शेवटच्या ७ षटकात बंगलोरला ५८ धावा हव्या असताना व झहीर आणि मलिंगाची २-२ षटके उरलेली असताना त्यांना न आणता स्वतःला व जयसूर्याला गोलंदाजी दिली व धावा रोखण्याची संधी वाया घालविली. झहीरची २ आणि मलिंगाचे १ षटक वाया गेले.

माझ्या माहितीप्रमाणे झहीर जखमी होउन मैदानाबाहेर गेला होता आणि मलिंगाला कॅलिसने खुप चोपल्यामुळे सचिनने असे केले असावे Happy

असो...
आज चेन्नई फुल्ल सुटलीय.... डेक्कन चार्जरचे ३ गडी तंबूत Happy

डेक्कन चे बाद झालेले तिन्ही खेळाडु शुन्यावर बाद झाले आहेत.

अमेरिकेत रहाणार्‍यांसाठी एक झकास बातमी...

अमेरिकेत म्हणे APL चालू होते आहे.. आणि त्याचे मुख्य कार्यकारी सर रिचर्ड हॅडली आहेत म्हणे..
ICC चा अमेरिकेत काही तरी करायचा बेत चालू असतानाच.. ही APL ची घोषणा झाली आहे.. अजून एक बंडखोर लीग चालू होणार असे दिसतय एकूणातच...
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

मला तर आता या आय पी एल चा कंटाळा यायला लागला आहे. वेडी वाकडी बॅट फिरवायची, बसला तर छक्का, नाहीतर चंद्रापर्यंत चेंडू पोचवायची स्पर्धा. क्षेत्ररक्षण तर इतके विनोदी! फक्त गोलंदाजी चांगली आहे.
त्यातून जिंकायलाच पाहिजे असे काहीच नाही. पैसे मिळतातच. कदाचित जिंकल्यावर किंवा सामन्याचा महत्वाचा खेळाडू म्हणून काही जास्त पैसे मिळत असतील. पण पैशाला हपापलेले लोक नाहीत हे! मजा करायला आले आहेत.

जाऊ दे झाले. कित्येक खेळाडू देशाकरता तरी खेळतातच असेहि नाही, ज्याला त्याला स्वतःच्या विक्रमांची काळजी. अग्दी सगळ्या देशातल्या सगळ्या खेळातील काहि खेळाडूंबद्दल हेच ऐकू येते. खेळणे हा धंदाच झाला आहे, त्यामुळे अर्थातच पैसे महत्वाचे!

तरीपण क्रिकेटची ओढ स्वस्थ बसू देत नाही. मधून मधून चांगले फटके बघायला मिळतात.

महाराष्ट्र प्रिमिअर लीग उर्फ एम पी एल सुरू झाला आहे हे माहीत आहे का तुम्हाला. ? पुण्यात. कॉटन कि.न्गने स्पोन्सर केलय. इन्टरेस्टिन्ग आहेत म्हणे मॅचेस. आणि स.न्घाची नावेही सुन्दर आहेत.

आता काहि दिवसांनी पी पी एल (पुणे प्रिमिअर लीग) व नंतर एस पी पी एल (सदाशिव पेठ प्रिमिअर लीग) अशाही स्पर्धा सुरू होतील. पुणे प्रिमिअर लीगमधल्या संघांची संभाव्य नावे अशी असतील.

- भाऊ महाराज बोळ बुल्स
- कोथरूड कॅट्स
- हडपसर हरिकेन्स
- जगोबादादा तालीम जॅग्वार्स
- मंडई माचोज
- खडकमाळ आळी किलर्स
- रविवार पेठ रॉयल्स
- लकडी पूल लायन्स
- दगडूशेठ डेअर डेव्हिल्स
- टण्णूंचा वाडा टायगर्स
.
.
.

Pages