आयपीएल २००९

Submitted by नंदिनी on 16 March, 2009 - 01:49

आयपीएल परत सुरू होतय. यंदा निवडणूका आणि अतिरेकी हल्ले यात आयपीएक गर्तेत आहे असं वाटतय. पण मागच्या वर्षीसारखे क्रिकेट याहीवेळेला बघायला मिळेल ही अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात निवडणूका आणी आयपीएल दोन्ही एकदम हे अतिमनोरंजन झाले असते म्हणून मायबाप सरकारने त्यांना साऊथ आफ्रिकेत हाकलले
>>>> एकदम चूक. >>
Lol हे अकबरी सारखे झाले, नंदिनी. Happy

मुंबई इन्डीयन्स जिंकले एकदाचे.

जय हो तेंडुलकर !
द्रविड काका पण पेटले होते, पण त्यांच अवघड आहे.

राजस्थान रॉयल्स ४७-७. आजचा दुसरा ही निकाल धक्कादायक लागणार की काय ?

रा.रॉ - सर्व बाद ५८.
बेंगलुरु झिंदाबाद !!

राजस्थान सर्वबाद ५८. द्रविड ने कमालच केली आज......

उद्याचे गेम बघितल्यावर समजेल कौन कितना पानी मे है..
Happy यावर्षी मुंबई जिंकणार.. माझा अंदाज. "
--------------
नंदिनी
--------------

उद्याचे गेम्स सुद्धा जोरदार होतील असे वाटत आहे.......
आजतर राजस्थानला अक्षरक्षः धूळ चारली........

राहुल "मॅन ऑफ द मॅच" ! कुंबळे ५ धावा देऊन ५ बळी ! मुंबई इंडियन्स येस्स्स!

दोन्ही निकाल मागच्या वेळेच्या मानाने उलटे लागले ना? मस्त मॅचेस पहिल्या दोन्ही.

उसगावकरांना www.directv.com आणि www.willow.tv हे दोन्ही ऑप्शन्स आहेत. पहिल्या मधे टीव्ही वर आहे पण त्यांची डिश आणि बहुधा एक दोन वर्षाचे डील घ्यावे लागेल. सिग्नल येतो का ते ही बघावे लागेल.

विलो वर इंटरनेट वर आहे, ज्यांच्या टीव्हीला सोय आहे त्यांना तेथे ही लावून बघता येइल. मी पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सिरीज यावर बघितल्या आहेत (फक्त कॉम्प्युटर वर, टीव्ही ला जोडून नाही). माझा अनुभव चांगला आहे. मुख्य म्हणजे interactive scorecard ही सोय एकदम चांगली आहे. कारण कोणत्याही विकेट वर, फोर्/सिक्स वर क्लिक करून तेवढाच भाग बघता येतो. तसेच interactive commentary मधे कोणत्याही बॉल च्या वर्णनावर क्लिक करून तेवढाच बघता येतो. म्हणजे कॅच सोडला असेल किंवा एकदम चांगला बॉल असेल तर ते ही दिसते. नाही तर डिश किंवा इतर लोक मठ्ठपणे आख्खी मॅच परत लावून ठेवतात. ही interactive ची सोय आयपी एल ला विलो वर आहे का नाही माहीत नाही पण बहुधा सगळ्याच सिरीज करता आहे आता.

जरा दम धरला तर दुसर्‍या दिवशी क्रिकेट व्हिडियो वर हायलाईट्स दाखवतात. मी भारत न्यूझी सामने असेच बघितले. २०-२० झाले तरी अख्खा सामना म्हणजे कंटाळवाणाच.
बाकी बेसबॉल पेक्षा बरा. त्यात ते थुंकणार, खाजवणार, पंचांशी भांडणार नि खरे तर बराच वेळ काहीच करत नसतात. त्या मानाने क्रिकेटचे खेळाडू बरे.
फक्त ते एकमेकांशी काय बोलतात मैदानामधे ते ऐकू नये. मधे एकदा गौतम गंभीर नि कुणि पाकीस्तानी यांच्यातला 'संवाद' ऐकला! नुसती घाण!

झक्की 'क्रिकेट व्हिडीयो' वर म्हणजे कोठे? साईट आहे का? का टीव्ही चॅनेल आहे कोणते?

फा,
वेबसाईट आहेत ना.......bhejafry.com, apnaview.com, crickethighlights.info इ. इ.
गूगल केल्यास बर्‍याच साईट सापडतील.....

आय पी एल च्या पहिल्या दिवशी तरी सगळे ज्येष्ठ लोक चमकले....
आता आज बघू गांगुली आणि लक्ष्मण काय करतायत ते!

Live matches च्या cric7.com वर लिंक्स असतात.
(शक्यतो p2p लिंक्स वापरु नका)

दिल्ली वि. पंजाब. दोघांनाहि पावसाने धुतले! पंजाबने १२ षटकात १०४. पैकी शेवटच्या सहा धावा जमवण्यात दोन धावचित नि दोन बाद असे चारजण बाद झाले. नि सेहवाग नि गंभीरने ५ पेक्षा कमी षटकात ५८ धावा करून सामना जिंकला!

एक सुधारलेला डक्वर्थ लुइस करून दोन षटकातच डाव संपला असे करता आले तरी चालेल. नाहीतरी ५६ सामने आहेत, एक दोन गेले तर काय फरक पडतो?

२० २० ऐवजी १५ १५ षटकांचे सामने ठेवले तर तीन तासात संपतील.

कोलकत्ताची वाट लागलीय....
५ षटकात फक्त १५ धावा आणि दोन्ही आघाडीचे फलंदाज तंबूत....
गांगुली खेळतोय घाबरत घाबरत....

३ री विकेट पण पडली.....
गांगुली बाद!

कोलकत्याला झोपवत आहेत......:D
पण पावसाने आज घोळ केला सगळा.....

झोपवले. गिब्स नि शर्मा यांनी धुतले कोलकत्ता ला. आगरकरच्या एका षटकात १७ तर गेलच्या एका षटकात १४ धावा! अवघ्या १३ षटकात १०४. आहेक्काय्निनाहीक्काय!

सर्व बंगाली लोकानी कोलकाता नाईट रायडर्स ला dowown केलय. Proud
दादाची कॅप्टन्सी काढतो म्हणजे काय???

आज चेन्नई आणि बंगलोर. धोनी पाहूया काय चमत्कार करतो का???
--------------
नंदिनी
--------------

कालच्या मॅच मधे दादा ची पार दीदी झाली होती Proud

आज चेन्नै च्या टीम मधे मुरलीधरन खेळायला हवा...

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

कालच्या मॅच मधे दादा ची पार दीदी झाली होती
>>> तसा पण तो रडीचा खेळाडू आहे. मनात नसेल तर शून्यावर पण आऊट होउन घेइल तो.

--------------
नंदिनी
--------------

होय..त्याला कॅप्टन न केल्यानेच बिनसले त्याचे.... नशीब कुणाला रन्-आउट नाही केले त्याने..
नाहीतर स्वतः धावा न काढता समोरच्या फलंदाजाला आउट करायचा दादा.. Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

तसा पण तो (गांगुली) रडीचा खेळाडू आहे >> अनुमोदन Happy

गांगुलीचे नाव काढल्या काढल्या महा गुरू आलेच पाहिजेत Happy

--------------
नंदिनी
--------------

वाह!!!!!!
बेंगलोर ला जुन्या तडफेने खेळताना पाहून आज मन अगदी भरून आले. Biggrin
चेन्नईची घोडदौड सुरु..........

चेन्नै जिंकले.बंगलोर सर्व बाद ८७. द्रवीड २०. मुरलिथरन ४-१-११-३. हिमेश रेशमियाची नारिंगी टोपी आता द्रवीदकडून हेडनकडे. बिचार्‍या हेडनला वाटत असेल आपला बहुमान झाला. सगळे भारतीय खेळाडू त्याला हिमेश रेश्मिया म्हणून हसत असतील.

सगळे काही आजच व्हिडियो वर पाहिले, अगदी चीअर्लीडर्स सुद्धा!

बेंगलोर ला जुन्या तडफेने खेळताना पाहून आज मन अगदी भरून आले. >>>
निखिल Proud

आज आमची मुंबई वि. राजस्थान आणि कोलकाता वि. पंजाब
पंजाब आणि मुंबई जिंकतिल असे वाटत आहे Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

मुंबईच्च्च् जिंकणार्.......जरा tough जाईल असे वाटते.
पंजाब सहज जिंकले पाहिजे.......Gayle Mccullum वर सगळे अवलंबून आहे......

Pages