आयपीएल २००९

Submitted by नंदिनी on 16 March, 2009 - 01:49

आयपीएल परत सुरू होतय. यंदा निवडणूका आणि अतिरेकी हल्ले यात आयपीएक गर्तेत आहे असं वाटतय. पण मागच्या वर्षीसारखे क्रिकेट याहीवेळेला बघायला मिळेल ही अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे! कुणि अश्या खोखो, किंवा हुतुतु किंवा आटापाट्या अश्या अस्सल भारतीय खेळांच्या स्पर्धा ठेवल्या तर? अहो ते खेळ खेळायला पण खूप सराव, खूप कौशल्य लागते. पण लक्षात कोण घेतो?

माढेकर तुम्ही सारखे सारखे एडिट करताय हं. माझं लक्ष आहे. पण नावे भारी शोधलीत Proud

माढेकर सगळीच नावे फार भारी बरका. Happy

माढेकर .... १ नंबर.... झक्कास Happy
आणि त्यांचे स्पॉनरर्स कोण? चितळे बंधु, काका हलवाई, दाजीकाका गाडगीळ, कलमाडी भाऊ, दुर्वांकुर फेम मानकर बंधू वगैरे लोक का?
मज्जा आहे....
थेट प्रक्षेपण बघायला विसरु नका हॅथवे सिटी केबलवर Happy

(तळटीप :- एस्ट्रा इनिंग मध्ये असतील पुण्याचे लाडके सुधीर गाडगीळ)

मग चीअर गर्ल्स नऊवारी साड्या नेसून का? Proud

आरं पन ग्राउंड कुटले? का त्या नदीकाटी सर्कशीच्या ग्राउंडावर खेलनार. मंजे ओंकारेश्वराचे कावळे येतीन चियर कराया.

पी पी एल चे सामने नेहरू स्टेडियमवर होतील तर एस पी पी एल चे सामने शिवाजी मंदिरच्या छोट्या पटांगणात होतील (सर्व सामने हाफ पिच होणार असल्याने मोठ्या मैदानाची गरज नाही).

मुंबई इंडियन्सच्या.. ना****
भंगार आहेत लेकाचे एक जात सगळे.. हातातल्या मॅचेस कशा घालवायच्या त्या ह्यांच्या कडून शिका..
तिसरी मॅच घालवली आहे अशी....

रोहित शर्मासारख्या ट दर्जाच्या बॉलरची पण हॅटट्रिक होऊ शकते ते केवळ ह्यांच्याचमुळे...

जयसूर्या आणि सचिनची विकेट अत्त्युच्च दर्जाच्या होत्या... जयसूर्याचा कॅच अफाटच झेलला आणि सचिनला टाकलेला बॉल पण महान होत.. कोणाचीही दांडीच उडली असती त्या बॉलवर..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

मुंबई इंडीयन्सनी फार निराशा केली खरच. या वेळी ते जिंकतील अशी आशा होती. सचिन, सनथ आऊट झाल्यावर चक्क सगळे "तू चल, मी आलोच" असे जातात. Sad पैसा, स्टार खेळाडु, उत्तम कोच असल्यानीच जिंकता येते असं नाही हे २००८ मधेच सिद्ध झालय.यावेळी पण चिंगुमिंगु राजस्थान रॉयल्सनी सगळ्यात जास्त धावसंख्या बनवलीय. कलकत्त्याचं नाईट्मेअर संपण्याची चिन्ह नाहीत. क्षेत्ररक्षणासाठी स्वतंत्र कोच असतांना इतकं खराब प्रदर्शन! तो झेल कसे सोडायचे हे शिकवतो का त्यांना?
सतिश तुमची लिस्ट झक्कास आहे. Happy

सतीशच्या विनोदाचा भाग सोडला तर मस्तच चाललीय एम पी एल. स्थानिक पातळीवर छान करमणूक आणि विशेशतः वशिलेबाजी अन मक्तेदारी मुळे दाबले गेलेले टेलेन्ट्ला वावही मिळतोय्..अन्यथा वन डे आणि कसोटी वगळता रणजीलाही ग्लॅमर आणि प्रेक्षक राहिले नव्हते... लोकही रस घेताहेत .आता खेलातली कला आणि नजाकत जाणार हेही खरे पण पॉप म्युझिकचे जसे चालालय तसेच हे. हे चांगले की वाईट कोण ठरवणार...

<<चांगले की वाईट कोण ठरवणार...>>
कुणासाठी चांगले की वाईट? खेळाडूंबद्दल म्हणाल तर पाच पाच दिवस खेळून काही पैसे घेण्यापेक्षा, पाच दिवसात तीन, चार चार तासाचे सामने खेळून जर तेव्हढाच पैसा मिळत असेल तर खेळाडूंसाठी चांगले. विशेषतः एक देश वि. दुसरा असे सामने ठेवायायचे नि मग हरले तर सगळा देश शिव्या देतो, त्यापेक्षा हे आय. पी. एल. बरे नाही का? पैसे मिळतातच, हरले तर दुसर्‍या देशाच्या माणसाकडे बोट दाखवता येते. जिंकले तर माझ्यामुळे, म्हणजे मी शून्यावर बाद झालो असेन, पण क्षेत्ररक्षणात माझ्या मुळे इतरांना उत्साह आला!!!

आता शास्त्रीय संगिताला जास्त लोक जातात की पॉप संगिताला? पैसे कुणाला जास्त मिळतात? चांगले म्हणजे काय? ते व्यक्तिसापेक्षच नाही का?

तर हा सगळा धंदा आहे, यात चांगले वाईट फक्त पैशावरून ठरते.

ज्या बिनपैशाच्या गोष्टी असतात, तिथेच चांगले वाईत अगदी लगेच कळते, तिथे मग व्यक्तिसापेक्षतासुद्धा कमी प्रमाणात महत्वाची असते.

मुंबई जिंकली एकदाची. रहाणे आणि जे. पी. झक्कास खेळले. पण तरीही मुंबई मध्ये धावांचा डोंगर रचण्याची क्षमता नाही हे खरे. कसे बसे १५० धावा करतात. पुढील सामन्यांत मुंबईचा कस लागेल. सेमी-फायनलमध्ये जाणे अवघड वाटते.

भंगार आहेत लेकाचे एक जात सगळे.. हातातल्या मॅचेस कशा घालवायच्या त्या ह्यांच्या कडून शिका..>>>>

म्हणून तर त्यांनी 'मुंबई इंडियन्स' हे नांव घेतलयं!!

आजचा सामना (कोलकता वि. बंगलोर) म्हणजे शेवटच्या जागेसाठी चुरस. वेडेवाकडे फटके, गलथान क्षेत्ररक्षण, धावचीत होण्यासाठी केलेले अनेक प्रयत्न, हे सगळे बघायला मिळेल. गांगुली तर गेलाच परत तंबूत. त्याला माहित होते हे असे होणार, उगाच कशाला जिवाची तडतड करा!

Happy Light 1

कोलकता इज व्हेरी कंसिस्टंट टीम.... मान गये!
केव्हढे परिश्रम घेतले त्यांनी आजची मॅच हारण्यासाठी Happy

पण मॅच जबरा झाली..... काय खेळलाय रॉस टेलर.... कातिल.... एकहाती मॅच फिरवली पठ्ठ्याने Happy

तिकडे मुंबई पण जिंकल्यात जमा आहे Happy

मुंबईने बाजी मारली! पण पुढील लढती कठिण आहेत.

रॉस टेलर रॉक्स!
गड्याने परत एकदा वाचवल बंगलोरला Happy

बंगलोर स्टील इन द रेस!

शेवटची काही षटके मुंबईनी चांगली टाकुन राजस्थानल रोखले. सचिन आणी जयसुर्या आज नीट खेळोत हीच श्रीचरणी प्रार्थना!! Happy

मुंबई इन्डियन्सचा आज परत सुसाईड .... Sad

नायर मस्त खेळला. शेवटच्या लोकांनी हाराकिरी केली.. Sad

जिंकू शकलो असतो. नायर जबरी खेळला.

दगडीचाळ रॉयल किलर्स
बेहरामपाडा सुपर बॉम्बर्स
धारावी शुटर्स
कुर्ला-सायन डॉजर्स
शिवाजी पार्क मॅव्हरिक्स
जुहू सुपर स्टार्स

ही नावं मला मुंबई साठी आवडली आहेत. Happy

नात्या शेवटच्या नाही पहिल्या ताकवले / रहाणे यानी हाराकिरी केली. वार्न बेस्ट कप्तान. मुबंईला आता काही चान्स आहेत का.

कालची मॅच मस्त झाली, सुरुवातीच्या बॅट्समननी वाट लावली. Happy
आता जर दुसर्‍या टीम हरल्या तर मुंबईला चान्स Sad कोलकता सर्व मॅच जिंकलीतर मुंबईला चान्स Sad

काय वेळ आणली मुंबईवाल्यानी स्वतःवर... टीम पॉइंट्स खालीलप्रमाणे.

Delhi 10 8 2 0 +0.36 16
Chennai 11 6 4 1 +1.07 13
Rajasthan 12 6 5 1 -0.33 13
Hyderabad 11 6 5 0 +0.29 12
Bangalore 12 6 6 0 -0.31 12
Mumbai 12 5 6 1 +0.49 11
Punjab 11 5 6 0 -0.56 10
Kolkata 11 1 9 1 -1.04 3

--------------
नंदिनी
--------------

रहाणे, ब्राव्हो, ताकवले यांना पुढे पाठवून आणि स्वतः व जयसूर्याला खाली ठेवून सचिनने काय मिळविले? पहिल्या हाणामारीच्या ६ षटकात मुंबई ३ बाद २६ होते तर १० षटकात ३ बाद ५४. पहिले ३ बळी झटपट गेल्यामुळे पहिली १० षटके बरीचशी वाया गेली व त्याचा परिणाम पुढच्या १० षटकात दिसून आला. चेतन नंदा क्लब लेव्हलचा सुद्धा वाटत नाही. त्याच्याऐवजी शिखर धवन किंवा अगदी रोहन राजे सुद्धा चालला असता.

मुंबईने पुर्ण वाट लावली. आताजर पहील्या ४ मध्ये नाही आलेतर मुंबईत परतल्यावर चपलांचा हार घातला पाहीजे सगळ्यांना. सचिनला खरच कॅप्टन्सी काडीचीही येत नाही. हातच्या मॅचेस घालवल्या. मुंबईची टीम म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत. तो कुंबळे बघा कसा बँगलोरसाठी जीव तोडुन खेळला. ईथे मुंबई महत्वाची आहे सचिन तेंडुलकर नाही हे त्या पुर्ण टीमला समजवायची गरज आहे.

पंजाब जिंकणार बहुतेक आज.....
दिल्ली फारच स्वस्तात आउट झाली यार आज!

व्हॉट अ स्पेल. जय नेहरा. ४-१-६-१ युवीला पण घेतला असता.

गो डेव्हील्स. (मुंबै साठी आवश्यक)

>>गो डेव्हील्स.
केदार तुला अनुमोदन Happy
(बंगलोरसाठी पण आवश्यक).... Wink

Pages