Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरंच, सईच्या हाताला चव आहे.
खरंच, सईच्या हाताला चव आहे. तिच्याकडचे अगदी साधे जेवण पण रुचकर लागते.
मंजू, मी कधीच वेलची सोलत
मंजू, मी कधीच वेलची सोलत नाही. नुसती तव्यावर गरम करुन घेते आणि थोडी साखर घालून मिक्सरला फुर्र करते. ज्यांना सालीसकट वेलची पूड आवडत नाही त्यांनी साली कॉफिच्या बाटलीत टाकाव्यात. कॉफीला मस्त वास लागतो.
आता चिंगीच्या आयडियेप्रमाणे तुपात गरम केली पाहिजे.
मनिमाऊ ने लिहीलेले मी नेहमीच
मनिमाऊ ने लिहीलेले मी नेहमीच करते, मस्त रवाळ होतं तूप होतं त्याने. एक कण साखर घातली तरी तसाच इफेक्ट येतो. पण मला गोडसर तूप आवडत नाही म्हणून मी मीठ घालते, त्यामुळे बेरीला पण मस्त चव येते. ज्यांना फक्त गोडाच्या पदार्थांत तूप वापरायचे आहे त्यांनी साखर घालुन पहायला हरकत नाही.
सगळ्यांनाच माहित आहे वाटतं.
सगळ्यांनाच माहित आहे वाटतं. मला वाटलं मी एकटीच हुश्शार ! म्हणजे माझी भन्नाट युक्ती, इथल्यांसाठी शिळी बातमी आहे तर. झालं इथे पण आमचा आपला शेवटचा नंबर. ::उदास::
धन्स गार्गी, दिनेशदा!
धन्स गार्गी, दिनेशदा!
फोडणीनंतर आमटीवर तवंग
फोडणीनंतर आमटीवर तवंग आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर (चिमुटभर) घातली की आमटीला तेलाचा तवंग येतो.. (अनुभवसिद्ध आहे.. :))
<<मी बाजारचे तयार तूप पण असे
<<मी बाजारचे तयार तूप पण असे कढवून ठेवतो.>> दिनेशदा याबद्द्ल एक विचारू का... तयार तूप परत कढवताना तिच प्रोसिजर करायची का... म्हणजे कढल्यावर खायचे पान , किंवा वर सांगितल्याप्रमाणे मीठ, साखर वापरायचे का ?
हो जूई, तसेच करायचे. पण हे
हो जूई, तसेच करायचे. पण हे तूप कढायला फार वेळ लागत नाही. आणि शिवाय असे परत कढवले तर लवकर खराब होत नाही. कढवून बाहेरच ठेवायचे, फ्रिजमधे नाही. म्हणजे कणी धरते.
धन्यवाद दिनेशदा
धन्यवाद दिनेशदा
dsj14 आहारशास्त्र व पाककला
dsj14
आहारशास्त्र व पाककला ग्रूपवर गेलात की तिथे उजव्या बाजूला 'सामील व्हा' असा पर्याय दिसेल तो वापरून तुम्हाला या ग्रूपमध्ये सामील होता येईल.
अमेरिकेमधे घट्ट दहि
अमेरिकेमधे घट्ट दहि लागण्यासाठी काही युक्त्या आहेत का?
म्हणजे माझी भन्नाट युक्ती,
म्हणजे माझी भन्नाट युक्ती, इथल्यांसाठी शिळी बातमी आहे तर. झालं इथे पण आमचा आपला शेवटचा नंबर. ::उदास::<< नाही गं मला पहिल्यांदाच कळली ही युक्ती . तस्मात उदास होऊ नकोस.
मिक्सर वर दाण्याचा कुट करताना
मिक्सर वर दाण्याचा कुट करताना तो अडद बोबडा ( असेच म्हणतात ना, ) कसा करायचा....
थोडासा फिरवला तर फार जाड होतो, अजुन जास्त फिरवला तर आहे त्याच्या निम्मा जसा हवा तसा आणी निम्मा एकदम बारीक होतो...... ( बैच साइज चा प्रोब्लेम...;-))
मंगेश, मला तरी तो शब्द
मंगेश, मला तरी तो शब्द 'अर्धबोबडा' असा माहितीये

मिक्सरच्या भांड्यात खूप दाणे नका घालू. थोडे थोडे दाणे घालून (म्हणजे साधारण मुठभर एकावेळी ) ऑन ऑफ करत फिरवले तर अर्धबोबडे दाण्याचे कुट मिळेल
स्पेशली खिचडीसाठी मस्त लागतं असं कुट किंवा काकडीच्या कोशिंबिरीला...
धन्स अंजली.....
धन्स अंजली.....

मंगेश, मिक्सरचं मध्यम आकाराचं
मंगेश, मिक्सरचं मध्यम आकाराचं भांडं वापरा ज्यात पाती थोडी लांब अंतरावर असतात. शिवाय शेंगदाणे घातले की घुंई घुंई
असं दोन तीनदा करून भांडं काढून नखशिखान्त हलवून पुन्हा करायचं... एक सलग... म्हणजे घुंईईईईई असं फिरवलं की शेंगदाण्याचं पीठच हाती येतं..
फार उत्साह असेल तर खल-बत्ता घेऊन करा..
बासुंदी जरा जास्तच गोड
बासुंदी जरा जास्तच गोड झालीये. आता काय करता येईल? अर्ध्या लिटरपेक्षा जरा जास्तच आहे आणि घरात फक्त ३ मोठे, एक लहान इतकेच लोक आहेत. कशी संपवू आता?
अल्पना दोन ग्लास दूध थोडं
अल्पना दोन ग्लास दूध थोडं आटवून त्याला थोडा खवा लावून मिक्स करून पहा.. उरली तरी फ्रिज मध्ये चांगली राहिल. उलट शिळी होत गेली की अजून क्रिमी होते.. यम्मी!!!
काही काही मिक्सर मध्ये इंचरचा
काही काही मिक्सर मध्ये इंचरचा ऑप्शन असतो. स्पीड सिलेक्टर असतात, तो नॉब डावीकडे (उलट दिशेने फिरवायचा), जेवढा वेळ धरुन ठेवू तेवढा वेळच मिक्सर चालेल.
pulse technique : processing of the food should be done in short bursts than continuously. This can be done by switching the machine 'on' and 'off' intermittently through inching swich.
अल्पना... आधी प्रत्येकाला एक
अल्पना...
आधी प्रत्येकाला एक एक चमचा साखर खायला द्या, नंतर एक एक वाटी बासुंदी द्या म्हणजे गोड लागणार नाही....
ऑन द लाइटर साइड...
.
बाकी दक्षिणाने सांगितलेला उपाय योग्य आहे....
मुठभर दाण्याचेच कुट करायचे
मुठभर दाण्याचेच कुट करायचे असेल, तर लाटण्यानेही झटपट होते. प्लॅस्टीकच्या पिशवीत ठेवून करायचे.
>>शिवाय शेंगदाणे घातले की
>>शिवाय शेंगदाणे घातले की घुंई घुंई असं दोन तीनदा करून भांडं काढून नखशिखान्त हलवून पुन्हा करायचं... एक सलग... म्हणजे घुंईईईईई असं फिरवलं की शेंगदाण्याचं पीठच हाती येतं..
पण ही पद्धत अगदी बरोबर आहे. हल्ली इंचर असतो प्रत्येक मिक्सरला. त्यामुळे घुंई घुंई
इंचर म्हणजे काय? च्यामारी
इंचर म्हणजे काय?
च्यामारी इतकी वर्षं मिक्सर वापरून सुद्धा मी

अजून सुद्धा अडाणीच?
दक्षिणा वर लिहिलंय ना मी.
दक्षिणा वर लिहिलंय ना मी. जुन्या मिक्सरना नसायचा इंचर.
अल्पना, त्यात थोडे चॉकोलेट
अल्पना, त्यात थोडे चॉकोलेट इसेन्स घालून फ्रीज केले तर आइस क्रीम होईल. अर्थात पहिला फ्लेवर फार जास्त नसेल तर. किंवा कुल्फी साठी बेस म्हणून वापरता येइल.
अल्पना, शेक करून किंवा
अल्पना, शेक करून किंवा मिक्सरमधे फिरवून थोडे दूध आणि (अजून) थोडे ड्राय फ्रूट्स घालून मसाला दूध किंवा मिल्क शेक म्हणून देता येईल. पदार्थ सुधरवायला शक्य तितके कमी एफर्ट्स घेतलेले बरे. कारण नवीन पदार्थ बिघडला की अजून कष्ट आणि रिसोर्सेस वाया जातात.
एलॅबोरेट हवे असेल तर बासुंदीत मावेल तितक्या मैद्यात (किंचित मीठ टाकून) मळून शंकरपाळे कर. अतिशय खुशखुशीत आणि चविष्ट होतात.
दाण्याच्या कूटाचा विषय
दाण्याच्या कूटाचा विषय निघालाच आहे म्हणून माझ्या मावशीने सांगितलेली एक युक्ती. दाणे भाजून झाल्यावर त्यांना सोलणे हा महाउपद्व्याप वाचवायचा असेल तर भाजलेले शेंगादाणे एका कापडी पिशवीत घालून पिश्वीचे तोंड बंद करायचे आणि किचन ओट्यावर / डायनिंग टेबलवर पिशवी आपटायची. दाण्याची नाकंही मस्त निघतात (याने अॅसिडिटी होते म्हणे) . नंतर फक्त सुपात घेऊन पाखडलं की झालं
हो स्वप्ना. अश्या पद्धतीने
हो स्वप्ना. अश्या पद्धतीने ४-५ मिनीटात दाणे सोलले जातात.
कुटाचा विषय निघालाच आहे
कुटाचा विषय निघालाच आहे तर....
गॅस पेटवून कढई व्यवस्थित तापवून त्यात शेंगदाणे टाकावेत, भाजताना अतिशय मंद आचेवर ठेवावेत, त्यामुळे इतरत्र लक्ष देऊन इतर कामे ही करता येतात.... शेंगदाणे बर्यापैकी भाजले गेले की त्यावर पाण्याचा हलकासा शिडकावा करावा... व पुन्हा थोडावेळ मंद गॅसवरच भाजावेत... भट्टीत भाजल्यासारखे भाजले जातात आणि सालं ही पटकन निघतात... अर्थात घाईच्या वेळी हा उपाय योग्य नाही...
रवा सुद्धा असाच मंद आचेवर भाजला तर शिरा/उपमा रंगाने शुभ्र आणि एकदम हलका होतो. शिवाय त्यात आळी होत नाही. एरवी मग रवा कच्चा असेल तर तो फ्रिजात ठेवावा लागतो...
दाण्याची सालं काय मस्त लागतात
दाण्याची सालं काय मस्त लागतात पण...ती का काढतात...मी सतत दाणे चेपते, सालासकट - त्यात फायबर असतं असं ऐकीवात...
Pages