विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भेटूयात आता... अंतिम सामना संपल्यावर ( या वेळी तरी सामना बघायला वेळ मिळावा. सेमी फायनलला भारताच्या बॅटिंगची शेवटची पाच षटकं पहायला मिळाली फक्त)

अरे इथे कोणी मला स्टार क्रिकेटवरचे सिद्धु ,इयान चॅपॅल व हर्षा भोगलेचे सामन्याच्या आधीचे व नंतरचे विश्लेषण बघण्याची लिंक देइल काय? (अमेरिकेत बघता येइल असे)

विलो टी व्हि चे प्रक्षेपण हाय क्वालिटीचे आहे हे खरे पण ते महाबोर आहेत.. अगदि सामन्याच्या आधी २० सेकंद फिड सुरु करतात.. सामन्याच्या आधीचे व नंतरचे अवांतर विश्लेषण कधीच दाखवत नाहीत..

भिब्ररा.. मलाही वाटत आहे की युसुफ पठाणला कसातरी टिममधे फिट करावा.. जरी तो जुगार ठरला तरी ... आपण हे लक्षात ठेवले पाहीजे.. नो रिस्क्..नो रिवॉर्ड! गंभिरची जागा ही एकच डिस्पोजेबल जागा दिसत आहे टिममधे.. गंभिरने २०-३०-५० अश्या रन्स केल्या आहेत खर्‍या पण कुठल्याच सामन्यात त्याची बॅटिंग मला कन्व्हिन्सींग वाटली नाही.. नाहीतर खर म्हणजे त्या २०-३०-५० रन्सचे त्याने एकदातरी शतकात रुपांतर करायला पाहीजे होते.. संघात त्याला त्यासाठीच घेतले आहे.. असो.. पण आता ऐन फायनलला धोनी गंभिरबाबत प्रयोग करेल अस वाटत नाही.. पण युसुफला कस टिममधे आणायचा याचा टिम मॅनेजमेंटने जरुर (निदान) विचार करावा...

नेहराचे बोट तुटले म्हणे.. मग आश्विनचा मार्ग सुकर झाला.. पण जर नेहराने पाकिस्तानविरुद्ध जशी बॉलिंग केली त्याची जर तो पुनरावृत्ती फायनला करु शकला तर नक्कीच आपल्याला कप जिंकायला सोप पडल असत!

एनिवे.. टिम मॅनेजमेंटपुढे बरीच डोकेदुखी आहे.. पण जी काही टिम ते निवडतील... त्या टीम इंडियासाठी... बेस्ट लक!

आधिच्या सामन्यात, सेहेवागने गुलला चांगलाच गुलाल लावला होता. सेहेवाग - सचिन २५ ओव्हर खेळपट्टीवर टिकावेत :स्मित:.

भारताच्या संघाला शुभेच्छा....

मुकुंद,
मी extracover.net या वेबसाईट वर बघते. ही फ्री आहे. इथे ते सिध्दु, हर्षा भोगले, अजित आगरकर बोलतात.

वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान देश (भारत किंवा श्रीलंका) जिंकणार आहे. >>>> १९९६चा विल्स वर्ल्ड कप हिंदुस्थान, पाक्डे आणि लंकाने आयोजीत केला होता आणि श्रीलंकाने बाजी मारली होती.

खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असणार आहे. पिचवर नंतर दव पडू नये, म्हणून केमिकल स्प्रेही मारणार आहेत. हे वाचा-

http://72.78.249.107/Sakal/1Apr2011/Normal/PuneCity/page16.htm

नेहराचं मधलं बोट फ्रॅक्चर झालंय परवा क्षेत्ररक्षण करताना. ९९% नाही खेळू शकणार.
खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असली, तर अश्विन आत नक्की.

<< अजित आगरकर पण बोलू लागला का हल्ली? >> कुणीही बोलावं, हीच तर क्रिकेटची खासियत व गंमत आहे ! Wink
माझ्याही कानावर आलेलीं कांही "फायनल" मतं इथं मांडावीशी वाटतात; त्यांतलं एक -finalexpert.JPG

>>> गंभिरची जागा ही एकच डिस्पोजेबल जागा दिसत आहे टिममधे.. गंभिरने २०-३०-५० अश्या रन्स केल्या आहेत खर्‍या पण कुठल्याच सामन्यात त्याची बॅटिंग मला कन्व्हिन्सींग वाटली नाही.

संपूर्ण स्पर्धेत धोनी, कोहली व पठाण (६ सामन्यात एकूण ८४ धावा) हे फलंदाजीत फ्लॉप ठरलेले आहेत. गंभीरने अडखळत का होईना पण बर्‍यापैकी धावा केलेल्या आहेत (त्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे). तो फिरकी पठाणपेक्षा चांगली खेळतो. तो डावखोरा असल्याचाही फायदा आहे. कोहलीची क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचे आहे. धोनी कप्तान असल्यामुळे तो बाहेर जाऊ शकत नाही. पठाणला मुरली मामा बनवेल. तसेच तो मलिंगाचे यॉर्कर खेळू शकणार नाही. त्याचे क्षेत्ररक्षण गंभीर इतकेच चांगले किंवा वाईट आहे. त्याचा पूर्वोतिहास बघितला तर तो १०-१२ सामन्यातल्या एखाद्याच सामन्यात बर्‍यापैकी धावा करतो. उरलेल्या सामन्यात तो फ्लॉप असतो. त्याच्यापेक्षा अडखळत का होईना पण ४०-५० धावा करणारा गंभीर बरा वाटतो.

माझा पण पाठिंबा गंभीरला.
या स्पर्धेत हाय स्कोरिंग मॅचेस तशा कमीच झाल्यात.
सेहवाग सोडला तर बाकीच्यांनी विकेट सांभाळून धावफलक हलता ठेवला तरच उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. इथे गंभीरच बरा. फक्त ते रनिंग बिटवीन द विकेट्स कसं जमायचं?

विश्वचषक आपणच जिंकणार!! हर हर महादेव!!

माझी एक इच्छा आहे, जरी विश्वचषक आपण जिंकला तरी स्पर्धेनंतर धोनीला "जीपीएल" देऊन कर्णधारपदावरून हाकलण्यात यावे.

मास्तुरे... ३ नंबरवर येउन गंभिरने अडखळत केलेल्या ४०-५० धावा व ७ व्या नंबरवर येउन पठाणने केलेल्या दणदणीत ४०-५० धावा... यात मी दुसर्‍या ऑप्शनलाच निवडीन...

परवाचेच उदाहरण बघा ना.. सुरुवातीला सेहवाग ने ज्या दणदणीत पद्धतीने ३०-४० धावा केल्या त्याने पाकिस्तानचा बेस्ट बोलर पार कोलमडुनच गेला आणी तो परत सावरलाच नाही.. सेहवागने त्याचे अगदी मानसि़क खच्चीकरण करुन टाकले व त्यांच्या बेस्ट बोलरला इक्वेशनमधुनच बाहेर काढले.. पठाणमधेही अगदी तशीच क्षमता आहे.

धोनी-पठाण यांनी ७ सामन्यात फक्त ७५ धावाच केल्या या स्टॅस्टिस्टिक्सला माझ्या दृष्टीने फारसा अर्थ नाही.. ३५-४० ओव्हर्स नंतर ६-७- नंबरवर येउन १-२-३ नंबरवर आल्यासारखे बॅटींगचे रेकॉर्ड पाहीजेत हा हट्ट बरोबर नाही.. बॉल तेव्हा सॉफ्ट झालेला असतो.. पिचही स्लो होत चालले असते. त्यामुळे अगदि सहज धावा करता येत नाहीत.या वर्ल्ड कपमधले टॉप १० रन गेटर्स जर तु पाहीलेस तर ते सगळे ओपनर किंवा वन डाउन बॅट्समनच आहेत.. ६-७ नंबरवरचा एकतरी बॅट्समन त्या यादीत मला दाखवुन दे... उलट ६-७ नंबरवरच्या बॅट्समनने केलेल्या २०-३० धावासुद्धा संघाला विजय मिळवुन देउ शकतात...आता हेच बघ ना..... गेल्या २ मॅचमधे ७ नंबरवर आलेल्या रैनाच्या३०-३५ धावांनीसुद्धा दोन्ही वेळेला विजयास मोठा हातभार लावला आहे..

मान्य आहे पठाण ६-७ इनिंग्समधे १-२ वेळाच धावा करतो पण जेव्हा करतो व ज्या पद्धतीने तो त्या करतो .. मोर ऑफन दॅन नॉट.. इट हेल्पस इंडियाज विनिंग कॉज! आणी मी म्हटलेच आहे की त्याला घेणे जुगार होउ शकतो पण त्याचा दांडपट्टा जर चालला तर गॉड सेव्ह द अपोनंट्स! माझ म्हणण एवढच आहे की संघात सुरवातीला सेहवाग व मग ७ नंबरवर पठाण असे २ डिस्ट्रक्टिव्ह प्लेयर्स संघात असण हा फार मोट्ठा प्लस पॉइंट असु शकतो... शिवाय गंभिर डावखुरा असल्यामुळे मुरली-मेंडिसचे ऑफ स्पिन त्याला त्रास देउ शकतात..

आणी मी गंभिरला काढलेच पहीजे असेही म्हणत नाही.. तो अगदिच बिनकामाचा खेळाडु नाही. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे.. बिगर द रिस्क्--बिगर द रिवॉर्ड!

मंजु,पौर्णिमा.. भविष्याच्या व वानखेडेच्या पिच रिपोर्टच्या लिंक बद्दल धन्यवाद.. गोचडीचे भ्रमण..:हहगलो:

शुगोल तुलाही लिंकबद्दल धन्यवाद.. उद्या नक्की ट्राय करतो ती लिंक...

फायनल मधल्या दोन्ही संघाचे कर्णधार विकेटकीपर असण्याची ही पहिलीच वेळ असावी. (नसतील तर इथले सांगतीलच म्हणा)

आणि उद्या आपण जिंकणारच असल्यामुळे धोनी T20 आणि वन डे च्या वर्ल्ड कप जिंकणारा पहिला कर्णधार ठरेल का?

काल आफ्रिदीच्या मुलींचा इंटरव्हू दाखवला. असतील ९ - १० वर्षाच्या. मोठी रडत होती. छोटी म्हणाली उनके पास बहुत अच्छे अच्छे लोग है इसलिये वो जीते. हम मिसबाह की वजह्से हारे. वो बहोत स्लो खेले. और उनको जब होश आया तो देर हो चुकी थी. :). नउ वर्षाच्या मुलीच मॅच संपल्या संपल्या हे अ‍ॅनॅलिसीस.

काल बोलता बोलता शास्त्री म्हणून गेला. ही साहेबांची शेवटची वन डे असू शकते. Sad मुरलीच्या स्वॅन साँग बद्दल त्याला प्रश्न विचारला होता.

गंभीर उद्याची मॅच खेळण्याचेच चान्सेस कमी आहेत.. परवाच फिल्डींग मध्ये नव्हता... काल पण म्हणे त्यानी प्रॅक्टीस केलेली नाहीये... तेव्हा गंभीरच्या जागी पठाण असायचे चान्सेस भरपूर आहेत..

आणि नेहराचे उजव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झालय त्यामुळे तो पण बहुतेक बाहेर असेल.. कारण चुकून बॅटींगची गरज पडलीच तर त्याला बॅट धरता पण येणार नाही.. आणि फिल्डींगचे पण वांदे होतील.. त्याच्या ऐवजी श्रीसंतला संधी मिळायची शंका वाटतीये...

वानखेडेचे पीच नवीन आहे.. बहुतेक ही पहिलीच मॅच आहे.. म्हणजे खेळपट्टीचा काहीच अंदाज नाही.. उद्या सकाळी खेळपट्टी बघूनच खेळाडू ठरणार... आणि जर चुकून थोडे जरी गवत असेल तर अश्विन ऐवजी श्री ला संधी जास्त आहे..

मी विचार करतोय.. समजा १ एप्रिलला फायनल खेळले असते आणि भारत हरल्यावर एप्रिल फूल म्हणाले असते तर काय झालं असतं? Proud

उद्याच्या सामन्याबद्दल मला प्रामाणिकपणे असं वाटतं -
पाकविरुद्धच्या आपल्या संघाच्या फलंदाजीत आता काहीही बदल करणं घातक ठरूं शकतं.
नेहरा दुखापतीमुळे खेळूंच शकत नसेल तर श्रीसांथला खेळवावा. नेहरा खेळत असेल तर त्याने अधुनमधून "ओव्हर द विकेट" गोलंदाजी करणं लाभदायक ठरूं शकतं. सचिनने लेग-स्पिनचीं कांही षटकं तरी टाकावीत. पाकविरुद्ध युवी ने चेंडूला उंची द्यायला सुरवात केली व त्याला मार पडला म्हणून तात्काळ त्याला बदलण्यात आले. मला वाटतं पाकला तेंव्हा धांव सरासरी वाढवायची घाई होती व युवीला एखादं षटक अजून दिलं असतं तर त्या घाईत त्याला एखादी विकेट मिळाली असती. केवळ एखाद्या षटकात धावा गेल्या म्हणून पॅनिक होऊन गोलंदाज बदललाच पाहिजे असं श्रीलंकेविरुद्ध करूं नये असं मला वाटतं कारण संगकारा कंपनी असल्या डावपेंचात वाकबगार आहेत.
विकेट स्पिनला निश्चितपणे अनुकूल असेल तर "सरप्राईज एलीमेंट" म्हणून धोका पत्करून मुनाफ ऐवजी अश्विनपेक्षाही चावलाला खेळवणं अधिक फलदायी होईल; दिलशान, संगकारा कंपनी मुनाफला लक्ष्य बनवतील असं मला ठामपणे वाटतं. "ऑर्थोडॉक्स लेगस्पिन" हल्ली कांहीसा दुर्मिळ झाल्याने अश्विनपेक्षा श्रीलंकावाले चावलालाच अधिक जपून व दबावाखाली खेळतील, अशी माझी धारणा आहे. अर्थात, हा प्रयोग विकेट निश्चितपणे स्पिनला अनुकूल असेल तरच !
उद्या सेहवागसाठी मलिंगाचे स्विंगींग यॉर्कर व दुसर्‍या बाजूने स्पिन असा मारा श्रीलंका करेल असा माझा अंदाज. श्रीलंकावाले वासला खेळवतीलच असं नाही पण तो खेळलाच तर आपल्या मधल्या फळीला फार जपून खेळावे लागेल. त्यामुळे सेहवाग व सचिनवरची जबाबदारी नेहमीपेक्षाही जरा अधिकच.
आपलं सुधारलेलं क्षेत्ररक्षण उद्या आपल्य विजयासाठी निर्णायक ठरूं शकतं. तिथं मात्र जराशीही ढिलाई खूपच महाग पडेल.
दोन तुल्यबळ व कसलेल्या संघांतील हा सामना रंगतदार होणं अपरिहार्य. भारतीय संघाला मनःपूर्वक शुभेच्छा !

अगदी खरं सांगायचं तर गेल्या दोन वर्षात श्रीलंका आणि आपण अजीर्ण होईल इतके सामने एकमेकांशी खेळलो आहोत... त्यामुळे दोन्ही टीम्सला एकमेकांचे डावपेच पूर्णपणे माहिती आहेत.. केवळ वर्ल्डकपची मॅच असल्यामुळे जरा वेगळेपण आहे..

<< त्यामुळे दोन्ही टीम्सला एकमेकांचे डावपेच पूर्णपणे माहिती आहेत >> हिरकुजी, खरंय. पण विश्वचषकाच्या अंतिम फेरीचं दडपण, सध्याचा फॉर्म इ. गोष्टी उद्याच्या सामन्यावर वेगळेपण लादतातच ! केवळ भारताचं आताचं क्षेत्ररक्षणही श्रीलंकेला चकीत करूं शकतं !! म्हणूनच नवीन कल्पक डावपेच, "सरप्राईज मूव्हज " इत्यादीना निर्णायक महत्व येऊं शकतं, असं नाही वाटत ?

उद्या वानखेडेचं नविन स्टेडियम, नविन खेळपट्टी हा मोठ्ठा सरप्राईज एलिमेंट असणार आहे दोन्ही संघांसाठी..

अरे बी,पण स्टेडियम नवीन आहे ना! चीनवरून आयात केलं आहे म्हणे हे नवे स्टेडियम! त्यातून खेळपट्टी ऑस्ट्रिलियावरून मागवली आहे म्हणे!

Pages