विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वानखेडे स्टेडीयमवर आज पर्यत एकुन १४ एकदिवसीय आंतराष्ट्रीय सामने खेळले गेले पैकी भारत ८ वेळा विजयी झाला आहे.

थोडक्यात दिल्लीच्या फिरोहशहा कोटलावर जी भारताची हारण्याची परंपरा दिसते तशी इथे नाही.

श्रीलंकेविरुध्द भारत याच मैदानावर दोन वेळा एकदिवसीय आंतराष्ट्रीय सामने खेळला आहे पैकी एकदा भारताचा विजय तर एकदा श्रीलंकेचा विजय झाला.

१) वानखेडे स्टेडीयमवर भारत जे सामने जिंकला किंवा हरला ते डे नाईट होते की दिवसभराचे होते ?
२)भारत पहिली बॅटींग घेउन जिंकला किंवा हरला ?
३) जिंकला किंवा हरला त्या वेळी भारतीय खेळाडुंचा फॉर्म कसा होता

यावर कुणी प्रकाश टाकु शकेल काय ?

काल संध्या ६.३० ला cnn ibn वर ईम्रान चा मुखमंडळ फार फुललेला दिसत होता (आम्ही आता जिंकणारच हा आवेश होता), पण रात्री मॅच हरल्यानंतर थोबाड बघण्यासारख (न बघण्यासारख) झालं होतं. Proud

जय हो.

८३ ची मजा पुन्हा अनुभवणार आम्ही. त्यावेळेस ज्या मित्राच्या घरी मॅच पाहिली, त्याचा कालच फोन आला. वर्ल्ड कप जिंकायची असेल तर माझ्या घरी मॅच पहायला ये. Happy रिचर्डस चा कॅच झेलल्यावर मॅच पुनः पहायला लागलो. नाहीतर बाहेर रेडिओवर कॉमेंट्री ऐकत बसलो होतो.

जय हो.

दोन बेस्ट टीम मध्ये फायनल.

फुल बेल्टर बॅटिंग विकेट पेक्षा कालच्या व ऑस्ट्रेलियाच्या मॅच सारखी स्लो टर्नर विकेट आपल्याला सोयीची पडेल व तशीच असेल. तश्या विकेटवर आपली डेप्थ कामाला येइल. जशी काल आली तशी. श्री लंके चा फक्त तेवढाच एक वीक पॉइंट मला दिसतोय. आपल्या येवढी डेप्थ त्यांच्या बॅटिंग मधे नाही. मुरलीला घाबरायच कारण नाही. अजाथाला आपल्या विरूद्ध खेळवणारही नाहीत. मलिंगाला जपून खेळल की झाल. पण त्याची काळजी सेहवाग घेइल.

साहेबांना उत्कृष्ठ संधी. यावेळेस मात्र या संधीचे ते सोने करतील आणि आपल्या कारकिर्दीत एक सोनेरी मुगुट घालून भारतीय क्रिकेट इतिहासात एक सोनेरी पान लिहिले जाइल याची संपूर्ण खात्री आहे मला.

तो मिसबाह आऊट होता होईना, मला आणि आईला झहीर अब्बास आणि जावेद मियाँदाद ची आठवण झाली. धस्स्स्स झालं.

झहीर अब्बास, जावेद मियाँदाद आणि ईम्रान खान ह्या त्रिकुटाचे मला नेहमीच धस्स्स्स वाटत आली आहे.
ईम्रान अजुन ही छान दिसतो.

<< ८३ ची मजा पुन्हा अनुभवणार आम्ही. >> विक्रमजी, तुमच्या तोंडात साखर पडो ! [ '८३ व '११ मधे मला हाच एक फरक जाणवतो - तेंव्हां साखर बिनधास्त खात होतो, आतां जरा धास्तीनेच खातों ! तेंव्हा बेफाम होऊन नाचलो होतो, आतां भान ठेऊन नाचावं लागणार !! Wink ]

<< तो मिसबाह आऊट होता होईना >> म्हमईकरजी, पण मिसबाह सारख्या अनुभवी व खंद्या फलंदाजाने खूप आधीच 'ओपन अप' व्हायला पाहिजे होतं असं नाही वाटत ? षटकामागे १२ धावा हव्या असताना शेवटच्या दोन फलंदाजाना घेऊन ५०-६० धांवा असल्या विकेटवर करायला थांबणं ही स्वतःची व संघाची फसवणूकच होती !

<<एक सोनेरी मुगुट घालून भारतीय क्रिकेट इतिहासात एक सोनेरी पान लिहिले जाइल याची संपूर्ण खात्री आहे मला. >> विक्रमजी, व तेंही घरच्या मैदानावर, मराठी जल्लोषात !! शुभेच्छा, भारतीय संघाला व सचिनला !

<< शनिवारच्या लंकादहनासाठी टीम ईंडियाला शुभेच्छा.!!!!! >> अशुतोषजी, हनुमानाच्या शेपटासारखा आतां आपल्या संघाचं शेपूटही पेटून उठलंय; तेंव्हा इतिहासाचीच नव्हे तर पुराणाचीही पुनरावृत्ती होण्याची सुवर्णसंधी !! Wink

वानखेडे स्टेडीयमवर आज पर्यत एकुन १४ एकदिवसीय आंतराष्ट्रीय सामने खेळले गेले पैकी भारत ८ वेळा विजयी झाला आहे.>>>

आजपर्यंत फक्त १४ सामने? की विश्वचषकातले १४ सामने? की भारत-श्रीलंका १४ सामने?

हाईला! आमच्या ऑफिसातून वानखेडे दिसतं. आता नुसती नजर तिकडे गेली तरी उचंबळून येतंय... शनिवारपर्यंत कसे दिवस काढावेत?? Happy

काल गोलंदाजी एकदम अचूक पडली.
शनिवारी फलंदाजीही खणखणीत पाहिजे. विरू किमान २५ षटकं टिकून राहण्याच्या दृष्टीने का खेळत नाही? Sad श्रीलंकेपुढे दणदणीत आव्हान ठेवलं पाहिजे.
धोन्या, टॉस जिंक आणि पहिली फलंदाजी घे!

फायनल ला श्रीलंका विरुध्द टीम अशी असावी :-

विरेंद्र सेहवाग
सचिन टेंडुलकर
गौतम गंभीर
विराट कोहली
युवराज सिंह
महेंद्रसिंह ढोणी
सुरेश रैना
युसुफ पठाण
हरभझन सिंह
झहीर खान
आर अश्विन

काल अश्विनला घेतला नाही आणि त्यान्चे फिरकी चालले, तेव्हा वाटल झाला घोळ. पण धोनी नशीबवान आहे!
बघूया आता !

मिडल ऑर्डर बेभरवशाची म्हणून तीनच गोलंदाज? नेहरा, मुनाफने अचूक गोलंदाजी केली काल. करायचा, तर एकच बदल. भज्जीला काढून अश्विन आत. नाहीतरी भज्जी पहिल्या दहा ओव्हरमध्ये बॉल हातात घेत नाही. शेवटची ओव्हर टाकत नाही. रडका चेहरा घेऊन वावरत असतो. कुठे गेला तो 'पेटलेला' भज्जी? लंकन धूतील त्याला!

१९९६ ची सेमी फायनल मी पुण्यात असताना पाहिली ती श्रीलंका वि. भारत होती कोलकत्याचय ईडन गार्डन वर झालेली. किती घायाळ करुन सोडले होते लंकेनी आपल्याला. लोकांनी तर दारुच्या बाटल्या भारतीय खेळाडुंना फेकून मारल्या होत्या. ह्यावेळी भारत ह्या सर्वांचा बदला घेवो!

ती मॅच अझरने फिक्स्ड केलेली होती. ईडन गार्डनचं पीच सगळ्यांना मुखोद्गत आहे, टॉस जिंकुनही त्याने पहिली बॅटिंग लंकेला दिली. कांबळी रडला होता ऑट झाला तेव्हा...

सर्वप्रथम भारतिय टीमचे अभिनंदन! काय मस्त जिंकले..

आणी मायबोलीवरच्या क्रिकेट्प्रेमींमधले जे सगळे ऑप्टिमिस्ट व पॉझिटिव्ह थिंकर्स आहेत त्यांचेही अभिनंदन.. खासकरुन पन्ना... कालच्या मॅचच्या मध्यांतरानंतर कोणी तरी तिला विचारले होते की अजुनही भारत जिंकेल अशी आशा तिला आहे? त्यावर तिने विश्वासाने सांगीतले होते की हो आहे म्हणुन.. दॅट्स द स्पिरीट पन्ना... Happy (मला वाटत केदारही बोलला होता वाटत.. की लोकहो अजुन ५० ओव्व्हर्स बाकी आहेत या मॅचमधे..))

पण मायबोलिवरचे कॉमेंट्स व सगळ्यांच्या एकापेक्षा एक मस्त घोषणा(चक दे इंडिया वगैरे...) वाचत मॅच बघताना १०० हत्तिंचे बळ येते (व मजाही) हे मात्र नक्की..:) बाकी पराग बोलला ते खरच आहे.. सगळ्यांनी आजची मॅच बघताना ज्या विनिंग पोझिशन्स घेतल्या होत्या त्या नक्की लक्षात ठेवा हो... उगाच आपल्याकडुन कसलीच नर्टी लागायला नको...

आता फायनलबद्दल.. तस बघीतल तर आपली टीम या स्पर्धेत श्रिलंकेच्या टीमपेक्षा जास्त तावुन सुलाखुन निघाली आहे यात वादच नाही.. इंग्लंड बरोबरची जबरदस्त टाय मॅच.. साउथ आफ्रिकेबरोबरचा अटितटिचा हरलेला सामना..ऑस्ट्रेलियाबरोबरचा (कठीण) क्वार्टर फायनलचा सामना व कालचा पाकिस्तानबरोबरचा अतिशय प्रेशर फिल्ड सामना... त्याउलट श्रिलंका.. पाकिस्तानबरोबर पराभव.. ऑस्ट्रेलियाबरोबर वॉश आउट.. इंग्लंडबरोबरचा एकतर्फी सामना व न्युझीलंडबरोबरचा थोडासा अटितटिचा सामना..

पण या बाबतीचा आपल्याला फायदाही होउ शकतो किंवा तोटाही! फायदा असा की आपण ऑलरेडी भयंकर मानसीक दबावाचा सामना केला आहे व त्यामुळे फायनलला त्या अनुभवाचा फायदा होउ शकतो आणी तोटा अश्यासाठी की एवढ्या सार्‍या प्रेशर मॅचेस फायनलच्या आधीच खेळल्यामुळे आपले खेळाडु मेंटली एक्झॉस्ट पण होउ शकतात..

तसच सामना मुंबईला असल्यामुळे सचिनला त्याचे लहानपणचे.. शिवाजी पार्कवरचे, आचरेकर सरांबरोबरचे दिवस आठवतीलच.. त्या शाळकरी दिवसांमधे ज्या मुंबईत त्याने क्रिकेटचे बाळकढु घेतले. त्याच मुंबईत वर्ल्ड कप फायनल जिंकुन आपल्या शिरपेचात वल्ड कप विनर हा मानाचा तुरा खोचायला तो प्रचंड उत्सुक असेल यात वादच नाही.. त्यामुळे त्या एक्स फॅक्टरचा फायदा आपल्या संघाला होणारच!

आणी तस बघायला गेल तर आपली टीम अजुन कोणत्याही मॅचमधे एकत्रीत पेटुन उठुन खेळलेली नाही.. खासकरुन धोनी व विराट कोहली त्यांच्या पोटेन्शियलला साजेसे अजुन खेळलेच नाहीत.. त्यामुळे फायनलला जर सगळी भट्टी जमुन आली तर कप जिंकायला कठीण नाही.. शिवाय मुरली १००% फिट नाही.. व मेंडिसची जादु आपल्या बॅट्समनी ओळखली आहे त्यामुळे न्युझिलंड -इंग्लंड पेक्षा आपण त्यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी करु असे मला वाटते.

नेहराने काल अतिशय चांगली बॉलिंग टाकुन फायनलला आश्विन का तो असा मोठा यक्षप्रश्न उभा केला आहे.. आणि त्यामुळे फायनलसाठी युसुफ पठाणचे नावही विचारात घेतले जाईल की नाही याची शंकाच आहे.. पण परवाच्या मॅचसाठी वानखेडेचा पिच रिपोर्ट कोणाला माहीत आहे का?स्पिनर्स साठी की फास्ट बोलर्ससाठी पिच अनुकुल असेल?

शिवाय मुंबईतल्या माहोलचे कोणी मुंबईचे मायबोलिकर वर्णन करु शकतील काय?

पण शेवटी त्या दिवशी जी टीं चांगली खेळेल व मानसीक दडपणाला बळी पडणार नाही तिच टीम जिंकणार...मी परत एकदा असच म्हणेन.. मे द बेस्ट टीम विन द वर्ल्ड कप.... अँड मे दॅट बेस्ट टीम बी टीम इंडिया.. गुड लक टीम इंडिया.....

वानखेडे स्टेडीयम चा इतिहास बघा.

http://stats.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/engine/records/te...

या लिंक प्रमाणे एकुण १४ एकदिवसीय आंतराष्ट्रीय सामने खेळले गेले पैकी भारत ८ वेळा विजयी झाला आहे. ६ वेळा पराभुत.

पैकी दोन श्रीलंके विरुध्द होते त्यात एकदा विजय एकदा हार.

संघात थोडाफार बदल झाला तरीही या संघाच्या बाबतीत काही आत्यंतिक महत्वाच्या गोष्टीत तरी आता बदल होणाची शक्यता नाही - सांघिक भावना, अप्रतिम क्षेत्ररक्षण, जिंकण्याची जिद्द व जबर आत्मविश्वास !! कुणालाही अभिमान वाटावा असंच आहे सध्याचं तरी या संघाचं स्वरूप !!!

कालची मॅच टीव्हीसमोरून न हालता पाहिली. माबोला कुलूप. आज 'त्या' धाग्यावरच्या कमेंट्स वाचताना खूप मनोरंजन झाले. शिव्या आणि काय काय!
काल मुनाफ पटेल बर्‍याच लोकांना रणवीर कपूरसारखा आणि नेहरा शाहिद कपूरसारखा वाटायला लागला.(ज्याने त्याने आपल्याला हवे ते नाव घालावे).

वर्ल्डकप संपल्यावर हेंगोव्हर उतरण्यासाठी प्रत्येकाने या तिन्ही धाग्यावरच्या स्वतःच्या सगळ्या पोस्ट्स वाचून त्या पोस्ट्सचे अ‍ॅनालिसिस करावे Happy

Pages