Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>> मास्तुरे... ३ नंबरवर येउन
>>> मास्तुरे... ३ नंबरवर येउन गंभिरने अडखळत केलेल्या ४०-५० धावा व ७ व्या नंबरवर येउन पठाणने केलेल्या दणदणीत ४०-५० धावा... यात मी दुसर्या ऑप्शनलाच निवडीन...
पठाणने ७ व्या क्रमांकावर येऊन दणदणीत ४०-५० धावा केल्या तर त्याचे संघातले स्थान अढळ राहिल. परंतु तो फक्त १०-१५ च धावा करतो. या स्पर्धेत त्याने एकदाच नाबाद ३० धावा केल्या. उरलेल्या ५ डावात मिळून त्याने फक्त ४४ धावा केल्या आहेत (सरासरी - ८.८).
>>> मान्य आहे पठाण ६-७ इनिंग्समधे १-२ वेळाच धावा करतो पण जेव्हा करतो व ज्या पद्धतीने तो त्या करतो .. मोर ऑफन दॅन नॉट.. इट हेल्पस इंडियाज विनिंग कॉज!
तो १०-१२ सामन्यांतून कधीतरी एकदा चांगला खेळतो. त्याच्या खेळीमुळे भारत एक दोनदाच जिंकलेला आहे. त्याने ५१ एकदिवसीय सामन्यातल्या ३७ डावात फक्त ११ वेळा २५ किंवा अधिक धावा केलेल्या आहेत. त्यात ३ अर्धशतके व २ शतके आहेत. म्हणजे ३७ पैकी २६ डावात (७० टक्क्यांहून अधिक डावात) त्याने २५ पेक्षा कमी धावा केल्या आहेत. या २६ डावांपैकी १७ डावात त्याने ९ किंवा ९ पेक्षा कमी धावा केल्या आहेत (त्यात ७ वेळा O धावा). म्हणजे जवळपास निम्म्या डावात तो एक आकडी धावा करतो. ७ व्या क्रमाकांवर येऊन १०-१२ चेंडू खेळून जेमतेम १५-१६ धावा करणार्या खेळाडूचा फारसा उपयोग नाही.
२०१० च्या आयपीएल मध्ये सुध्दा त्याने १४ पैकी फक्त २ सामन्यात चांगल्या धावा केल्या होत्या.
>>> एक महान विनोदी लेख!
>>> एक महान विनोदी लेख!
सचिनचा मत्सर वाटणारे काही महाभाग आहेत. राजू परूळेकर हा त्यांच्यातलाच एक मूर्ख.
राजू परूळेकर हुशार
राजू परूळेकर हुशार आहे...याआधीपण असले प्रसिध्दीचे उद्योग वॉर्न, गिलख्रिस्ट, मांजरेकर,... यांनी केले आहेत. त्यांनाही रिटायर झाले तरी पोट चालवायच आहेच कि.
धोनी कि ढोणी ?
धोनी कि ढोणी ?
राजू परुळेकर... अरे कय मुर्ख
राजू परुळेकर... अरे कय मुर्ख माणुस आहे हा..लिहिता येत म्हणुन काहि लिहाव काय ?
सचिन स्वत:ला आंतरराष्ट्रीय
सचिन स्वत:ला आंतरराष्ट्रीय अशा इमेजमध्ये ठेवू इच्छितो. त्यामुळे तो कधीच महाराष्ट्र धर्माचा होणार नाही. कारण डॉ. आंबेडकर आणि महर्षी कर्वे हे दोन ‘भारतरत्न’ अगोदरच मुंबई मराठी माणसाची आहे, असं म्हणून गेलेत. सचिन तर अजून ‘पद्मविभूषणच’ आहे!
ग्लॅडिएटर म्हणूनही गांगुली आणि सचिन यात गांगुली श्रेष्ठ आहे. कारण तो जाणीवपूर्वक बंगाली माध्यमं व माध्यम प्रतिनिधींना अत्यंत जवळ ठेवतो. स्थानिक बंगाली चॅनल्स व भाषेतच जास्त करून बोलतो आणि शेवटी अकरा काय किंवा अकरा कोटी काय त्यांचा नेता बनणं हे मोठय़ा ग्लॅडिएरचं काम आहे. ते गांगुलीने यशस्वीपणे केलंय
<< बाप रे ..
उगीच काही मिळत नाही म्हणून शोधून काढतात सचिन विषयी लिहायला !
महाराष्ट्र धर्म काय घेऊन बसलेयेत परुळेकर काका..प्रांतवाद अॅन्ड व्हॉट नॉट.. अंतरराष्ट्रीय आहेच सचिन आणि तसाच रहावा !
म्हणूनच जग भर सगळ्यांना आवडतो, जग भर लोक मानतात त्याला !
अतिशय फालतु लेख
चांगली माहिती आहे मास्तुरे,
चांगली माहिती आहे मास्तुरे, पठाण बद्दल. बरोबर आहे, भावनेच्या आहारी जाऊन काही उपयोग नाही. धोनी तसा नाही आणि त्याला तेवढी मुभा ही नसावी.
सगळेच आपापल्या परीनी चांगले खेळायचा प्रयत्न करतायत हे बघून भारी वाटतं! मागच्या मॅचला सगळ्यांनीच काढल्या विकेट. एकटा भज्जी उरला होत तर त्यानी ही एइन वेळी रज्जाक ची अफलातून विकेट काढली!
बॅटिंग अजून थोडी फायर झाली ना, पहिली बॅटिंग असताना तर आपण "ऑल सेट " आहोत जिंकायला. चुकून माकून त्यांचा २७०+ वगैरे स्कोअर झाला तर आपण चेस कसे करू ह्याच्या कडे लक्ष लागून राहतय सारखं.
मंजे, मैदान तेच आहे फक्त
मंजे, मैदान तेच आहे फक्त खेळपट्टी वेगळी आहे. मैदान होतं तिथचं आहे. काहीही अगदी.. >>>
बी! अरे तुला क्रिकेट मध्ये काही माहिती नाही तर स्टेटमेंट कशाला?
भावापेक्षा देखना आहे. >>
आता हे पण निवड समितीला पाहावे लागणार.
वानखेडे कुंडली
http://stats.espncricinfo.com/ci/engine/ground/58324.html?class=2;orderb...
२००० नंतरच्या मॅचेस.
http://stats.espncricinfo.com/ci/engine/ground/58324.html?class=2;spanmi...
मला नाही वाटत वानखेडे पाटा असेल, उलट ती नेहमीच ती साधारण स्लो पिच होती त्यामुळे २७० वगैरे विनिंग टोटल असू शकते. न्यूझीलंडविरुद्ध मुरलीने धमाल उडविली होती. त्यामुळे नेहरा असो वा नसो अश्वीन असणारच असे दिसते. (जरी खेळपट्टी नवीन असली तरी साधारण अंदाज येईलच.) मुनाफ डेक टू डेक असतो त्यामुळे तो असावा असे मला वाटते. बकरा फक्त युवी होऊ शकतो नव्हे होईल असा अंदाज कारण त्यांचे वरचे चौघेही मस्त स्पिन खेळतात.
चावला असावा ह्या भाऊंच्या मताशी मी सहमत आहे. पण प्रश्न असा की कोण निघणार? त्यामुळे तो नसेल.
गंभीर असायला हवा. तो वेल सेट आहे. पहिले तिघे नेहमीच चांगले खेळत आले आहे. आपले साधारण अॅव्हरेज १५० वर दोन असते व कधीकधी तीन त्यामुळे पहिल्या तिघांना बसवणे केवळ अशक्य आहे. फक्त गंभीरने प्रत्येक बॉलवर पुढे येऊन प्लेड करणे बंद करावे. त्याची गरज नाही. तो जागेवरून ही बॉल व्यवस्थित काढू शकतो हे त्याचे त्याला पटले पाहिजे.
धोणी, युवी फिक्स.
रैनाने दोन्ही वेळेस खूप चांगल्या खेळी करून भारताला विजयी केले. त्याला बसवून पठाण सारख्या बेभरवश्याच्या माणसाला घेणे चुक ठरू शकते.
अश्वीनला खेळपट्टी मुळे घेतले तर मात्र नेहरा वा मुनाफ मध्ये नेहरा फिट असेल तर तो बाजी मारेल.
विराटलाही बसवू नये, तो फिल्डींग साठी असावाच (किंवा बसवले तर तो १२ वा ठेवून फिल्डींगसाठी आणायलाच हवे) तो बसण्याच्या लिस्ट मध्ये मात्र येऊ शकतो कारण त्यांचा परफॉर्मन्स. पठाणला खेळवणे मस्ट असेल तर विराट वर प्रश्नचिन्ह आहे. कारण हे दोघेही खूप धावा काढत नाही आहेत, पण परत विराटला टेक्नीक मुळे घेण्यात येईल.
>>मी स्वत: क्रिकेट फार क्वचित
>>मी स्वत: क्रिकेट फार क्वचित बघतो
असं लिहून परूळेकरने पुढे सचिन वर (वाट्टेल ते) पानभर लिहीलं आहे .... जाऊदे झालं..
(रच्याकने: पोटाची सोय होत नसेल तर udrs च्या कामासाठी अर्ज करावा: तिथे मेंदू देखिल वापरावा लागत नाही.)
तो लेख विनोदी क्याटेगिरीचा पण
तो लेख विनोदी क्याटेगिरीचा पण नाही. सचिन अन त्याची तुलना तो उकडीच्या मोदकासोबत अन क्रिकेटची तुलना गेमबॉय, पि एसपी सोबत. गंमत आहे.
किती बोलताय रे ? जरा एक मॅच
किती बोलताय रे ? जरा एक मॅच निवांत घ्या. धोनी नि कर्स्टनला ठरवू दे कोणाला घ्यायचे नि कसे कुठे खेळवायचे ते कधी तरी ...
http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/current/sto...>>धोनी काय विचार करतोय ते इथे बघा. sluggish wicket असेल तर SL चे पारडे पण तेव्हढेच भारी आहे. They are master at exploiting it. मुरली marble वर पण बॉल वळवेल तेंव्हा spinning track ची खास गरज नसावी
seaming track असेल कुलसेकरा is can be handful. He is within top 5 ballers in ODI for last one year. Another silent assassin ? तेंव्हा ज्यांनी कोणी पिच बनवले असेल त्यांनी home team advantage ह्या द्रुष्टीने विचार केला असेल अशी आशा धरूया.
तोवर सर्वांनी नाना नि परुळेकर ह्यांच्या उद्गारचिन्हांचा आनंद लुटा
मंदिरातील देवीलाच विजयासाठी
मंदिरातील देवीलाच विजयासाठी घातला टी-शर्ट
अतिशय निषेधार्थ बातमी.
http://72.78.249.107/esakal/20110402/4928340937329093797.htm
देवीलाच घातला टी-शर्ट >>
देवीलाच घातला टी-शर्ट >> काहीही...आणि मुर्ख पुजार्याचपण समर्थन आहे म्हणे याला
परुळेकर डोक्यावर पडलाय.
परुळेकर डोक्यावर पडलाय. सगळ्यात जबरी हसलो ते लेखातल्या शेवटच्या वाक्याला.. २० वर्षांची कारकिर्द म्हणे
असो!
आज मोठ्ठी दिवाळी!
साहेबांचं शतकांच शतक होणारच आणि आपण विश्वकप जिंकणारच!
यप्प!
रच्याकने, साला झोप खरंच पळालिये.. अजून १२ तास..
मंदिरातील देवीलाच विजयासाठी
मंदिरातील देवीलाच विजयासाठी घातला टी-शर्ट
http://72.78.249.107/esakal/20110402/4928340937329093797.htm
अरेरे अतिशय निषेधार्थ बातमी.
<<<

चिल पब्लिक..!!! क्रिकेट फिवर आहे, उगीच धार्मिक भावना दुखावून घेउ नका !
गणपती उत्सवात असतात कि पोलिसाच्या ड्रेस मधे, इडियन आर्मीच्या ड्रेस मधले गणपती !
एक दिवस देवीचा ड्रेस कोड बदलला तर ते पण समजुन घ्या ..शेवटी मूर्ति माणसानीच बनवली, आज एखाद्या कमकुवत मनाच्या माणसालाच गरज पडली असेल प्रेरणा म्हणून देवीकडे विजयाचं साकडं घालताना टिम इंडियाच्या ड्रेसकोड मधली देवी बघायची .. तसही नेट वर सचिन चं डोकं असलेल्या श्रीकृष्णाची वगैरे अनेक चित्रंही फिरतच आहेत.. त्याला हसण्यावारी नेता तसच हे पण.. आणि टिम इंडियाच्या ड्रेस मधल्या सचिन ला पण देव मानताच ना..
असो .. विषयान्तर थांबवते.. पण अगदीच रहावलं नाही
गणपती उत्सवात असतात कि
गणपती उत्सवात असतात कि पोलिसाच्या ड्रेस मधे, इडियन आर्मीच्या ड्रेस मधले गणपती ! >> मान्य.
पण देवीला या रुपात कधी पाहिलं नसल्यामूळे राहवलं नाही. असो
तसही नेट वर सचिन चं डोकं
तसही नेट वर सचिन चं डोकं असलेल्या श्रीकृष्णाची वगैरे अनेक चित्रंही फिरतच आहेत.. त्याला हसण्यावारी नेता तसच हे पण.. >>हम्म अनुमोदन
सांजसंध्या | 1 April, 2011 -
सांजसंध्या | 1 April, 2011 - 11:29
धोनी कि ढोणी ?
लाडाने बोलवायचे असेल तर धोनी .
चिडल्यावर ढोण्या!
सामना मधील बातमी: मुंबई :
सामना मधील बातमी:
मुंबई : उद्या पहिली ३० मिनिटे जर सचिन टिकतोय तर ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचे १०० वे शतक झालेच म्हणून समजा, ही प्रतिक्रिया आहे वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर व कसोटीपटू सुधीर नाईक यांची.
महागुरु बरोबर बोललो होतो कि
महागुरु बरोबर बोललो होतो कि नाय अपुन सचिन १० च्या आत आउट होइल नाहीतर शतक करेल.
हे पहा nilima_v | 31 March,
हे पहा
nilima_v | 31 March, 2011 - 09:25
पठाणने मुरली, मेंडीसला आयपीएलमध्ये फुल्ल् धुतंलय.
>> एकदम बरोबर गौतम आणि त्याला बसवल्यामुळे थोडा नीट पण खेळेल.
साहेब या सामन्यात १०च्या आत जातील नाहीतर शतक करतील.
दिलशानला तरन्गा जास्त सोडु नका
अरे काय फायनलची एक्साईटमेंट
अरे काय फायनलची एक्साईटमेंट नाही दिसते!! पोस्ट्स टाका लोकहो!!!
आपण नक्की जिंकणार!! अटीतटीची होईल मॅच(व्हायलाच हवी!) पण कप आपलाच!!
चक दे इंडीया!!

दे घुमाके... !!
लोक्स, मला जरा सगळ्या लिंका
लोक्स, मला जरा सगळ्या लिंका द्या, ज्यावर मी मॅच बघू शकेन. लॅपटॉपवर एकही मॅच बघितली नव्हती, आज बघायचिये. जेवढ्या विश्वासार्ह असतील तेवढ्या चांगल्या! :), म्हणजे व्हायरसची भीती नको.
इतकं सगळं बोलून झालय, आता
इतकं सगळं बोलून झालय, आता काही सुचत नाही. फक्त टॉस जिंकून बॅटिंग घ्यम, अर्धी मोहीम फत्ते!!!!
कोणाला घेतलं कोणाला बसवलं काही पत्ता लागला का? नेहरु गॅरंटीड बसणार आहे ना? अश्वीन आला का आत? बाकी स्क्वाडचे काय?
अश्विन इन , युसुफ स्टील
अश्विन इन , युसुफ स्टील तळ्यात-मळ्यात, अंपायर - अलिम दार आहे बहुतेक.
गणपती बाप्पा मोरया जीतेगा भाई
गणपती बाप्पा मोरया
जीतेगा भाई जीतेगा
ईंडिया जीतेगा
ईंडियाआआआआआआआ ईंडिया
ईंडियाआआआआआआआ ईंडिया
सचिईईईईईईईईईईईईईईन सचिन
सचिईईईईईईईईईईईईईईन सचिन
विरूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ विरु
विरूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ विरु
युवीईईईईईईईईईईईईईई युवी
युवीईईईईईईईईईईईईईई युवी
भज्जीईईईईईईईईईईईईईई भज्जी
भज्जीईईईईईईईईईईईईईई भज्जी
अश्वीन इन? पेप्रात आलय की
अश्वीन इन? पेप्रात आलय की टिव्ही वर दाखवतायत? क्रिक इन्फो वर अश्वीन की श्रीसंत नक्की नाही म्हंटाला धोनी पण ती बातमी जुनी असेल. असो, चला बरं झालं!!!
आता असं करा, आता पर्यंत जे नाही खेळलेय चांगले, त्यांनी जरा दणकेबाज खेळ करा! धोनी, गंभीर आणि सरवात मोठा हुकमी एक्का विरु!!!! हा भाऊड्या जर का फायर झाला तर त्याच्या शिंगल हातानी लंका ढासळवू शकतो!
हम होंगें कामयाब, हम होंगें
हम होंगें कामयाब, हम होंगें कामयाब
हम होंगें कामयाब, आजके दिनssss
मन में हैं विश्वास, पुरा हैं विश्वास
हम होंगें कामयाब, आजके दिन!!!
भारताच्या बलाढ्य वीरांनो, आपल्या सर्व सामर्थ्यानिशी खेळा, एकजुटीने खेळा आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्या!! आम्ही सर्व चाहते तुमच्या बरोबर आहोत! विजयश्री आपलीच आहे!!
हर हर महादेव!!!!
देवा, व्हतं न्हवतं त्यें समदं
देवा, व्हतं न्हवतं त्यें समदं आमचं ख्येळातलं श्यानपन झालंय बाबा उगाळून इथं, आतां -
ढोण्याला श्रीसंत आवडत नाही
ढोण्याला श्रीसंत आवडत नाही (:अओ:), त्याच्यावर विश्वास नाही, म्हणून अश्विन आत म्हणे- असे संकेत त्याने काल प्रेस कॉन्फमध्ये दिलेत. आज २ वाजताच काय ते कळेल आता.
आज वीकेन्ड. इथे त्यामुळे आत्ता पोस्टी कमी. दुपारनंतर पडतील धोधो परवासारख्या.
परवाचं फीलींगच वेगळं होतं.. लढाऊ, पेटलेलं असं. आज आत्मविश्वास आहे, आणि थोडं कूलही
भाऊ, मस्त!
असेच होवो (होईल)!
Pages