विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौतमस्टारजी, म्हणूनच ओंजळींतून फुलं वहातात तसे झेल सोडले वाटतं सचिनचे !!!

<< शेवटी, असं म्हणतात की भारतात प्रत्त्येकाला क्रिकेट मधलं कळतं.. म्हणूनच या खेळाची गम्मत जास्त आहे >>योगजी, माझे एक क्रिकेटचे खरेखुरे जाणकार मित्र नेहमी म्हणतात, " भाऊ, क्रिकेट हा बहुधा एकमेव खेळ असावा ज्यावर कुणीही, कांहीही व कितीही वेळ बोलूं शकतं; पण त्याचबरोबर, some of the best minds also derive stimulus only from this game ! " . कुणाला पटेल ,कुणाला नाही पटणार !!

मग पिचपण नवीन आहे का? पिच बद्द्ल कोणी काहि प्रकाश टाका ..प्लिज..! >> बहुधा नसावे. फक्त स्टेडियमच्या रेनोव्हेशन बद्दल वाचले होते. वानखेडेमधे संध्याकाळी समुद्रावरून येणार्‍या वार्‍यांमूळे फरक पडत असे. नवीन orientation कसे आहे ह्याची कल्पना नाही. पिच पाटा असेल असा माझा अंदाज. स्पिन किंवा sluggish pitch लंका सुद्धा exploit करू शकते.

म्हणूनच ओंजळींतून फुलं वहातात तसे झेल सोडले वाटतं सचिनचे !!! >> हो ना...तसंच मिस-फिल्डपण बरीच केली...उमर गुल जो आधीच्या मॅचेसपर्यंत नायक होता तो एका मॅचमध्ये खलनायक झाला...तर मुन्ना, नेहराचं (बर्‍याच) मॅचच अपयश एका मॅचमुळे धुवुन निघालं...

मग पिचपण नवीन आहे का? >>हो नवीन पिच असल्याने मागील मॅचेसवरुन अंदाज करण अवघड आहे. पण मागच्या काही मॅचेसमध्ये सेकंड इनिंगला अवघड गेलंय ( भा.वि. ऑ. कसोटी लास्ट डे आणि ०७ मधली वन-डे)

युवीची डावखुरी फिरकी चालावी फायनलला (मुरली कार्तिक अनप्लेएबल होता मागील काही सामन्यात इथे)

वानखेडेचं पिच पाटा असेल तर अश्वीन हवाच. युवी वगैरे चालायचा नाही आजिबात. तो अकमल आठवतो ना कसा धुवायला लागला होता युवीला?

पाक विरुद्धच्या मॅच मध्ये पुष्कळ टाकले यॉर्कर्स पण मुंबईला आणखिन जास्त आणि अचूक टाकले पाहिजेत. पठाण पण हवा आहे खरं पण खुप मोठा जुगार असेल. गंभीर फारच बोअर मारतोय पण अगदीच बेभरवशाचा नाहीये त्यामुळे धोनी ठेवेल त्याला आतच.

युवी वगैरे चालायचा नाही आजिबात. >>चालेल, अकमलनी धुवायच्या आधी त्यान युनुस व शफिकला पण भारी आउट केलंय. आणि वानखेडेवर मागे कार्तिक, मायकल क्लार्क असे डावखुरे orthodox स्पिनर खुप चाललेत.

पठाण पण हवा आहे खरं पण खुप मोठा जुगार असेल. >> पठाणला घेणं खुप फायद्याच ठरेल. मुन्ना/नेहरा यांमधे नेहराला बसवावा आणि पठाणला घ्यावं. कारण लंकेकडे स्पिनर्स जास्त आहेत आणि पठाणने मुरली, मेंडीसला आयपीएलमध्ये फुल्ल् धुतंलय.

गंभीर बसणारच वाटतय, असाही फिल्डींगला दिसलाच नाही...एक दोन शॉटमध्ये ड्रेसिंग रुमध्ये साध्या कपड्यात बसुन आराम करताना दिसला

पठाणने मुरली, मेंडीसला आयपीएलमध्ये फुल्ल् धुतंलय.
>> एकदम बरोबर गौतम आणि त्याला बसवल्यामुळे थोडा नीट पण खेळेल.
साहेब या सामन्यात १०च्या आत जातील नाहीतर शतक करतील.
दिलशानला तरन्गा जास्त सोडु नका.

आणि पठाणने मुरली, मेंडीसला आयपीएलमध्ये फुल्ल् धुतंलय. >> जोरदार अनुमोदन !!! त्यात वानखडे एकदम छोटे मैदान ! रेल्वेट्रॅकवर भिरकावून देईल तो बॉल... एकच बदल हवाय.. गंभीरला बसवा.. पठाणला घ्या !

नि वानखडेला सुरवातीला वेगवान गोलंदाजीला चांगलेच सहाय्य करते...

नेहरा खेळू शकणार नाही म्हणे. आणि मुरलीधरन पण अनफिट आहे. चामिंडा वासला बोलावलं म्हणून एका चॅनेलवर दाखवत होते.

चामिंडा वासला बोलावलं म्हणून एका चॅनेलवर दाखवत होते.>> कैच्या काय.. कस्स शक्य आहे... Lol नि वास असेल तर त्याचा वानखडेवर चांगला रेकॉर्ड आहे ! निदान मी बघितलेल्या मॅचमध्ये !

चला आतापर्यत सर्व साहेबानी ठरवले त्याप्रमाणे झाले. विश्वकपामध्ये पैसा आला आणी आयपीएल मध्ये पैसे येण्याचा मार्गही मोकळा झाला. बाकि साहेबांना महागाही कमी करण्यात यश आले नाहि तरि बिसीसीआय अध्यक्ष असताना कप तरी आणण्यात येणार असे दिसते तेही स्वता: कडे क्रेडिट न घेता! Proud

दिलशान आणि संगकारा लवकर आउट होतील कारण लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजेस!
थरंगा आणि जयवर्धने त्यामुळे सुरुवातीला जरा जास्तच जपून खेळतील.
मुरली व मलिंगा डेंजरस नाहीयेत. त्याला मारता येत नाही इतकच. पण दोघांच्या २० ओव्हरीत ९० रन्स जमायला हरकत नाहीत. ३०० गाठायच्या असतील तर बाकीच्यांच्या ओव्हरीत २१० करायला लागतील. ते फार अवघड नाही पिच मोहालीसारखं नसेल तर.

मलिंगा बॉल जुना झाल्याशिवाय फारसा इफेक्टिव्ह नसतो. मुरली पहिल्या १५ ओव्हरीत सहसा बोलिंगला येत नाही. त्यामुळे पहिल्या १५ ओव्हरीत विकेट नाही पडली तर १०० च्या वर आपला स्कोअर जायला हरकत नाही.

सचिन साठी वानखेडेवर विश्वचषक फायनल म्हणजे सिंहाने घरच्या अंगणात शिकार करण्यासारखे आहे.. तेव्हा मुरली, मलींगा, मेंडीस यांची खास धुलाई होणार हे निश्चीत. तसेही सचिन ला धावा करायला मोटीवेशन लागत नाही, पण वानखेडे, मुम्बई, विश्वचषक अंतीम सामना, अन कदाचित हा त्याचा शेवटचा विश्वचषक सामना असेल... या एव्हड्या गोष्टी सचिन ला १००-१०० करायला आणि आपल्याला जिंकून द्यायला (one last time please!!) पुरेशा मोटीवेशन आहेत Happy

गेल्या तीन प्रेशर सामन्यातून विजयी झाल्यावर आपल्या खेळाडूंचे मनोधैर्य, आत्मविश्वास प्रचंड वाढला असणार.
रैना, कोहली हे क्षेत्ररक्षण करताना जवळ जवळ प्रत्त्येकी २० धावा वाचवतात. त्यामूळे तो एक मोठा बोनस आहे. गंभीर ला काढून बदल्यात युसूफ, आणि कोहली ला क्र. ३ वर पाठवले तर आपला संघ नक्कीच जास्त संतुलीत आणि बलवान वाटतो.

असाम्या,
माझ्या आठवणीत तरी वानखेडेची खेळपट्टी बहुतांशी मध्यम गती व फिरकी ला साथ देणारी आहे. त्यातही उन्हाळ्यात संध्याकाळी हमखास समुद्रावरून येणार्‍या वार्‍यांमूळे moisture खूप असते, ज्यात दुसरी फलंदाजी करताना त्रास होतो. (गोलंदाजांनाही त्रास होतोच). अश्विन, भज्जी, युवी दुसरी गोलंदाजी करताना जास्त भेदक वाटतील.

एकंदरीत परवाच्या सामन्यात मला तरी रैना, युवी, युसूफ (घेतला तर), अश्विन (नेहरा दुखापतीमूळे बाहेर), हे सामन्याची दिशा बदलू शकतील असे वाटते. अर्थात, विरू अन सचिन ने पुन्हा १००+ ची भन्नाट सलामी दिली तर तेही निर्णायक ठरेल. लंकेकडून, दिलशान, मुरली, अँजेलो, माहेला हे सामन्याची दिशा बदलू शकतात.
एक नक्की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची दाट शक्यता वाटते... can't imagine how that will be... will be memorable for lifetime experience for sure! as mr shastri says " an electrifying atmosphere". Happy

किती घायाळ करुन सोडले होते लंकेनी आपल्याला. लोकांनी तर दारुच्या बाटल्या भारतीय खेळाडुंना फेकून मारल्या होत्या. ह्यावेळी भारत ह्या सर्वांचा बदला घेवो!
<<<<<<

बी,
सर्वांचा बदला घ्यायचा म्हणाजे या वेळी जिंकून मग आपल्या क्रिकेट टिमनी " प्रेक्षकांवर बाटल्या " फेकायच्या का ?????? Biggrin Rofl

अरे तो अश्वीन फिल्डींगला पण वाघ आहे एकदम. डाइव वगैरे बिंदास मारतो. पहिली बॅटिंग आली तर मजा येणार आहे. सगळ्या मॅचेस बघितल्या नाहीत त्यांच्या पण श्रीलंकेची बॅटिंग चिवट वाटते पण तडाखेबंद नाही.

लॉ ऑफ अ‍ॅव्हेरेजेस नुसार या सामन्यात महिला जयवर्धने नक्की भरपूर धावा करणार (कारण तो मागच्या काही सामन्यात फ्लॉप होता). तसेच थरंगा आणि दिलशान फ्लॉप जाणार. संगक्कारा जीनीयस असल्यामुळे तोही भरपूर धावा करणार. समरवीरा, चमारा हे चालले तर चालतील. त्यांचा काहि भरवसा नाही. मॅथ्यूज मात्र त्रास देणार.

श्रीलंकेची फिरकी खेळण्यासाठी गंभीर संघात हवाच. पाकड्यांच्या विरूध्द खेळलेल्या संघात भारताने काहिही बदल करू नये. नेहरू फिट नसेल तर अश्विनला घ्यावे. बाकी कोणी बदलू नये. आपली पहिली फलंदाजी असेल तर सामना ७५ टक्के जिंकल्यासारखाच आहे.

>>श्रीलंकेची फिरकी खेळण्यासाठी गंभीर संघात हवाच
मास्तुरे,
गंभीर फिरकी चांगला खेळतो हे मान्य. पण तेच काम वरच्या ४ जणांनी केले तर एक जास्तीचा गोलंदाज, पॉ.प्ले मध्ये हाणामारी करू शकणारा फलंदाज आणि गंभीर पेक्षा चांगला क्षेत्ररक्षक म्हणून युसूफ अधिक फायद्याचा आहे असे वाटते. युवी, रैना, युसूफ, अश्विन मूळे आपली मधली फळी लंकेपेक्षा फलंदाजीत जास्त चांगली वाटते. दिलशान, संगा, थरंगा, (माहेला भारताविरुध्ध नेहेमीच खेळतो, परवाही खेळेल. आणि संगा देखिल गंभीर सारखा बर्‍याच वेळा ऐन मोक्याच्या क्षणि गरज नसताना बाद होतो!) चालले नाहीत तर लंकेकडे विशेष फलंदाज नाहीत. आपल्याकडे वरचे फेल गेले तरी रैना, युवी, पठाण आहेत आणि ते धावा करू शकतात, सामना फिरवू शकतात हे नाकारता येत नाही. धोणी या संपूर्ण मालिकेत फलंदाज म्हणून फ्लॉप ठरला.. परवाच नेमका त्याला सूर गवसला तर सगळी कसर भरून निघेल Happy
मला तरी आपल्या विजयाची शक्यता ९०% वाटते. लंका नक्कीच चिवट झुंज देईल.. पण आपण कणभर सरस ठरू.
ऊद्या पिच रीपोर्ट आला की धावसंख्या अन संघ निवड अधिक स्पष्ट होईल...

योगदादा, पाकिस्तान विरुद्धच्या विजयामुळे तुमची फायनल बद्दल मतं बरीच बदललेली दिसतायत, चक्क ९०% चान्स भारताला? Proud

असो, चांगलय, चांगलय. तो गंभीर चांगला खेळतो स्पीनर्स्ला असं कॉमेंटटर म्हणत असे पर्यंत डिसीव होऊन स्टंपिंग करुन घेतलं बापड्यानी. पठाणचा जुगार खेळावाच म्हणतो मी. काल युवी जाऊन पण आपण तरलोच शेवटी, युवीचा निदान बॉलिंग मध्ये उपयोग तरी आहे.

धोणी या संपूर्ण मालिकेत फलंदाज म्हणून फ्लॉप ठरला.. परवाच नेमका त्याला सूर गवसला तर सगळी कसर भरून निघेल
>>
हो, त्याचे ते उटपटांग फटके बघून श्रीलंकेच्या खेळाडूंना मैदानावर हसू आवरणार नाही. मग त्यांची एकाग्रता भंग होईल आणि बाकीचे जे थोडेफार तंत्रशुद्ध फलंदाज आहेत ते धुतील श्रीलंकेला. अशा प्रकारे त्याला अप्रत्यक्षरित्या सूर गवसेल. Proud

एक प्रश्ण या धाग्याचे नाव
"विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका" असे का?
"विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका (तरही)" असे का नाही?
Happy

माझ्या आठवणीत तरी वानखेडेची खेळपट्टी बहुतांशी मध्यम गती व फिरकी ला साथ देणारी आहे. त्यातही उन्हाळ्यात संध्याकाळी हमखास समुद्रावरून येणार्‍या वार्‍यांमूळे moisture खूप असते, ज्यात दुसरी फलंदाजी करताना त्रास होतो. (गोलंदाजांनाही त्रास होतोच).>>मी कुठे काय वेगळे म्हटलय रे ?

गंभीर ल बहुतेक घेतील कारण मेंडीस आणि मुरलीला खेळण्याचा अनुभव. पठाण चे काहि कळत नाही. जो मनुष्य आफ्रिकेमधे जाऊन डोके ताळ्यावर ठेवून खेळू शकतो त्याला भारतातील पाटा पिचेसवर काय होते ?

शेवटी भारताने सामना जिंकल्यावर शेजारच्या गिलानीला तर सोडाच पण स्वतःला सुध्दा ऐकू जाणार नाहीत अशा पध्दतीने अत्यंत हलक्या टाळ्या त्यांनी वाजवल्या. >>> Lol

यापेक्षा सोनिया गांधींची प्रतिक्रिया एकदम उत्स्फुर्त होती.

यापेक्षा सोनिया गांधींची प्रतिक्रिया एकदम उत्स्फुर्त होती.>>>>>>> मलाही आश्चर्य वाटलं बघून. नेहमी एकदम रिजर्व्ड वाटतात त्या. मजा आली पण बघायला. अमिर खान वगैरे सगळे एकदम अवाक युवी गेल्यावर! Proud

हिंदी कॉमेंटरी ऐकताना मस्त करमणूक होते. शेवटची तीन शटकं चालू असताना एक रन काढून रैनाला स्ट्राईक देण्यात समझदारी सूझबूझ आहे असं त्याचं पालुपद चालूच होतं. ते शेवतच्या चेंडूपर्यंत चालू होत.
एक बॉल शिल्लक असताना रैनाला स्ट्राईल मिळाला तेव्हा ये समझदारी का काम किया है... इसी कि जरूररत थी ही वाक्यं ऐकताना खरच मजा आली.

तसच मुनाफ जीव तोडून बॉलिंग करत असतानाही त्याला झहीरशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. प्रत्यक्षात झहीर मुनाफपेक्षा (तुलनेने) महागडा ठरला.

अवांतर : भारत वीस धावांनी विजयी होणार, पाक शेवटच्या पच षटकात पावर प्ले घेणार असे बुकींचे अंदाज होते म्हणे. सामना चालू असतानच कानावर येत होतं. आता भारत अंतिम फेरीत ३ -४ धावांच्या फरकाने जिंकणार असाही अंदाज आहे...( नाणेफेक फिक्स असू शकते का?)

पठाण चा परफॉर्मन्स गेल्या ५ सामन्यात असा आहे
ज्या ओवर मध्ये तो खेळायला आला ते आणि किती रन्स केल्या ते दिले आहे
48th over 8 runs
47th over 14 runs
40 th over 30 notout india wins
9th over 11 runs (1 * 6 , 1* 4)
41th over 0 runs bold by Steyn on 2nd ball.
47th over 11 runs Windies

यात फक्त ९थ ओवर मध्ये तो आउट झाला तो एकदाच त्याचा गुन्हा. स्टेनने तर सगळ्यांआच घेतले.
मग एकदम पठाण वाइट कसा झाला ?
कोणी हे समजवेल ?
मागे मुनाफला पण असाच कटवला.

पठाण, सेहवाग सारख्या खेळाडूंचा दिवस असतो. जा दिवशी ते खेळतात त्या दिवशी समोरच्यांचं काही खरं नसतं. पूर्वी के श्रीकांत नावाचा फलंदाज असायचा. कपिलने त्याच्यावर सातत्याने विश्वास टाकला आणि आपण वर्ल्डकप जिंकला. असे खेळाडू सर्वात धोकादायक असतात. प्रतिस्पर्ध्यांना त्यांची धास्ती असतेच. तंत्रशुद्ध खेळणं त्यांना जमत नाही त्यामुळेच प्रत्येक सामन्यात ते खेळतीलच असं नाही.

म्हणूनच आक्रमक फलंदाजांच्या नामावलीत एखादा तंत्रशुद्ध फलंदाज घ्यायला काय हरकत आहे ? सचिन कडे तंत्र आहे. पण त्याच्यावर धावा वेगाने जमवायचीही कामगिरी असते. म्हणूनच पडझड होणार नाही आणि स्ट्राईक रोटेट होईल ही मुख्य जबाबदारी असणारा फलंदाज (फक्त एक ) घ्यावा...

Pages